Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

मुंबई-नाशिक महामार्ग पर वाशिंद के पास कंटेनर में आग, यातायात बाधित

UJUmesh Jadhav
Oct 15, 2025 10:06:47
Thane, Maharashtra
मुंबई-नाशिक महामार्गावर वाशिंद जवळ दहागांव फाट्यावर कंटेनरवरील ताडपत्री आग लागल्याची घटना घडली. सदरचा कंटेनर हा मुंबईहुन नाशिकच्या दिशेने एक भला मोठी लोखंडी मशीनी घेऊन जात असताना महावितरणच्या एसटी वाहिनीच्या संपर्कात आल्याने कंटेनर上 असलेल्या प्लास्टिक ताडपत्रीने पेट घेतला. यामुळे सदर कंटेनरला आग लागली. यावेळी शहापूर नगरपंचायत अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी बराच काळ महामार्गावर वाहतूक कोंडी मात्र निर्माण झाली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Dec 07, 2025 09:18:55
Yeola, Maharashtra:संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून खाजगी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सोनु तुला माझ्यावर भरोसा नाय काय या गाण्याची आठवण सर्वांना झाली आहे पाहूया आमचा विशेष रिपोर्ट. VO :- मंत्री छगन भुजबळ यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ… नगरपरिषद निवडणुकीत प्रचंड राजकीय तापमान चढलेलं आहे. अशातच आज ईव्हीएम सुरक्षेबाबत पहिल्यांदाच मोठी घटना समोर आली आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे पुतणे रूपेश लक्ष्मण दराडे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार… तर दुसऱीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार राजेंद्र भाऊलाल लोणारी. या कट्टर लढतीच्या दरम्यान, ईव्हीएम सुरक्षा केंद्राबाहेर खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक झाल्याचं समोर आलं. 121 with शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे *BYTE*— विरोधी उमेदवार राजेंद्र लोणारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट Vo:- दरम्यान, शिंदे गटाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले असून, “सुरक्षेसाठी रक्षक ठेवले, निवडणुकीत काहीही गैर नाही” असा दावा केला जात आहे. भुजबळांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जात असल्याने येवल्यातील प्रत्येक हालचाल राजकीयदृष्ट्या महत्वाची ठरत आहे.
39
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 07, 2025 08:54:07
Vasai-Virar, Maharashtra:वसईत गाडीला कट मारल्याच्या कारणावरून तुफान हाणामारी; 9 जणांवर गुन्हा दाखल. वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर फाटा येथे किरकोळ कारणावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. काळ्या रंगाच्या क्रिएटा कारला कट का मारला, या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. हा सर्व प्रकार काल शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला असून, संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेरात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिएटा कारला कट मारल्याच्या रागातून तब्बल 9 ते 10 जणांनी एकत्र येत पीडित व्यक्तीवर लाथाबुक्क्यांनी, दांडक्यांनी तसेच लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या मारहाणीत पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
170
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 07, 2025 08:38:33
Nagpur, Maharashtra:नागपूर प्रवीण दरेकर, भाजपा नेते आमच्याच महायुतीत आता एकमेकांना ताकद दाखवण्याची भाषा कोणी करू नये. महायुतीत समन्वयानने पुढे जाणार आहे... कोणाची किती ताकद निवडणुकीचा निकाल आल्यानंतर समोर येईल रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहे... ते एक जबाबदार नेते आहेत...निलेश राणे यांनी आता त्यांच्यावर भाष्य करण्यापेक्षा थोडे संयमाने घ्यावे राणे यांची कोकणात ताकद आहेच.. राणे साहेब कोकणात मोठं नेतृत्व आहे... त्यामुळे संपण्याचा विषय नाही... भाजपाचे मोठे नेते आहेत.. त्यांचे चिरंजीव पालकमंत्री आहे.. त्यामुळे ताकद आहेच इंडिगो - आमदार फटका अत्यंत अस्ताव्यस्त चित्र इंडिगोच्या दुरावस्थेमुळे झाले आहे.... त्याचा परिणाम आम्हाला भोगावे लागला....आम्ही अनेक आमदार इंडिगो ने येणार होतो... तिकीटही काढल्या होत्या...मात्र सर्व तिकिटर रद्द करावी लागली...ग्रुप करून आम्हाला यावे लागले.. सहा -सात जणांनी कॉन्ट्रीब्युशन करून प्रायव्हेट फ्लाईट करून आलो
195
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 07, 2025 08:31:07
Akola, Maharashtra:अकोला में अवैध पानी चोरी के आरोपी दातकर पर दहीहंडा पुलिस ने मामला दर्ज किया है। उनके hingani गावातील सरपंच कल्पना पळसपगार ने 2010 से लगभग 4,95,352 रुपये मूल्य के पानी की चोरी का आरोप लगाया था। गाव को पानी पहुँचाने वाली टंकी में 160 मिमी की पाइप अवैध तरीके से जोड़कर दातकर ने पानी अपने खेतों व घर की तरफ मोड़ लिया, ऐसा उनका दावा था। इससे पहले जिल्हाधिकारी के पास भी शिकायत दर्ज कराई गई थी। स्थान-निरीक्षण के लिए आए तत्कालीन कार्यकारी अभियंता और उप-अभियंता को अवैध कनेक्शन मिलता दिखा, पर तब दातकर परारोध करते हुए अधिकारियों को भगा देने का आरोप भी लगाया गया था। बाद में अवैध कनेक्शन को तोड़कर बंद कर दिया गया था। सरपंच ने पुलिस व जिल्हाधिकारी को कई आवेदन दिए, पर कार्रवाई नहीं हुई, जिसके बाद उन्होंने अदालत की शरण ली। अकोट न्यायालय ने दहीहंडा पुलिस को मामला दर्ज करने के आदेश दिए, जिसके बाद दातकर पर मामला दर्ज किया गया। जिल्हा परिषद की चुनावी घड़ी के चलते इस कार्रवाई ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है।
134
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 07, 2025 08:01:17
Kalyan, Maharashtra:कल्याणात दुबार मतदार ? विशिष्ट समाजाचे दुबार मतदार ! भाजप नेत्यांचा गंभीर आरोप मतदार याद्यामधील घोळ दुरुस्त करा,अन्यथा निवडणूका पूढे ढकला -- भाजपचे नरेंद्र पवार यांची मागणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या तरी मतदार याद्यांचा घोळ मात्र काय आहे .मतदार याद्यांमध्ये मतदारांची अदलाबदल,दुबार मतदार मोठ्या प्रमाणात आढळल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे .भाजप चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील घोळ उघड केला .अनेक प्रभागांमधील दुबार मतदान उघड करत काही प्रभागात 1000 ,3400 मतदार दुबार असल्याने सांगत विशेष करून विशिष्ट समाजाचे मतदार दुबार असल्याचा गौप्यस्फोट केला .यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे त्यासाठी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करा ,त्यासाठी मुदतवाढ द्या अन्यथा निवडणूका पुढे ढकला अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली
95
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 07, 2025 07:50:49
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार, 121 (on विरोधी पक्ष नेता) -- यह अधिवेशन फालतू है, उसका कोई तात्पर्य नहीं। सात दिन के अधिवेशन का मतलब नहीं है। पहले दिन शोक प्रस्ताव रहेगा, और आखिरी दिन कब थमेगा? इसलिए अधिवेशन पाँच दिन का है। नागपुर में पहली बार विरोधी पक्ष बिना विपक्ष के हो रहा है... संख्या बल के अभाव में भी हमने विपक्षी नेता पद दिया है, 1980 में 14 विधायक और 1985 में 16 विधायक थे। तब हमने विपक्षी स्पेस बनाए रखा। सरकार अब मनमानी कर रही है और किसी का अंकुश नहीं चाहती। इस अधिवेशन में विरोधी पक्ष ने नेता के निर्णय पर चर्चा होनी चाहिए ताकि सरकार डरती न दिखे। मुद्दे: कुपोषण, कुंभमेळा, पेयजल, ड्रग्स, महिला अत्याचार, भूखंड, कृषि कर्ज माफी-पिकविमा, बनावट दवा, आदि। खर्गे समिति की रिपोर्ट पर देरी हो रही है; अगर पहले आई होती तो सरकार पर कार्रवाई हो जाती। विपक्ष ने कहा कि अगस्त तक रिपोर्ट आ जाए तो अच्छा है। निलेश राणे के बारे में कहा गया कि ताकत सत्ता से आ रही है, न कि चरित्र से। चिट्ठी में कहा गया कि सभी एक-दूसरे के विरुद्ध भड़ रहे हैं, पर दोनों पक्ष राजनीतिक चढ़ाव-ओ-उतार में लगे हैं। इंडिगो-आदानी मामले पर सरकार समर्थित अड़चनें हैं; सरकार ने अचानक सर्कुलर जारी किया और पायलट्स की संख्या कम बताई, 8-10 करोड़ रुपये के मामले में एक नजर है। विरोधी पक्ष की बैठक में कहा गया कि चाय-नाश्ता छोड़कर चर्चा के बाद ही निर्णय लिया जाएगा; राज्य लुट गया है, इस वक्त चाय-पान पर जाना उचित नहीं।
170
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 07, 2025 07:30:11
114
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 07, 2025 07:02:56
Satara, Maharashtra:सातारा - आग्रा येथे जे शिवस्मारक उभारले जाणार आहे त्या संदर्भात मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून आग्र्याच्या कैदेतून सही सलामत छत्रपती शिवाजी महाराज सुटले आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हादरा दिला त्याच ठिकाणी तसंच उचित स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच असावा अशी महायुती सरकारची धारणा असून त्या अनुषंगाने एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आहे. या समितीमध्ये मला अध्यक्ष करण्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलंय. अधिवेशन काळात किंवा अधिवेशन काळानंतर या समितीची बैठक होईल यामध्ये प्रस्ताव आम्हाला तयार करायचा आहे. पर्यटन विभागाची टीम आग्र्याला जाऊन आली असून त्या ठिकाणची पाहणी करून आली आहे त्यांचा आलेला अहवाल आणि आम्हाला कशा पद्धतीने स्मारक या ठिकाणी करायचं याचं सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर आम्ही करू तसेच दर्जेदार उठावदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला साजेल असे स्मारक आम्ही या ठिकाणी बांधू असं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
183
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 07, 2025 07:02:15
209
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 07, 2025 06:31:35
Amravati, Maharashtra:धक्कादायक मेळघाटात व्यसनांमुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताची कमतरता, संशोधन चमू काढणार निष्कर्ष मेळघाटात व्यसनांमुळे कॅन्सर वाढत असल्याचंही या पाहणी दौऱ्यात समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेळघाटात नऊ ते दहा वर्षापासूनच मुलं मुली तंबाखूचे सेवन करतात त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते त्यातून मेळघाठात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आढळत असल्याचं आरोग्य प्रधान सचिवांनी सांगितला आहे. आतापर्यंत माता मृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषणाचे रुग्ण मेळघाठात आढळत होते मात्र आता कॅन्सरचेही रुग्ण मेळघाटात आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे सर्वत्र एकच खडबड उडाली आहे.
153
comment0
Report
Advertisement
Back to top