Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

अंबरनाथ के नाले में रसायनिक प्रदूषण, एमपीसीबी से कड़ी कार्रवाई की मांग

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 13:25:33
Ambernath, Maharashtra
अंबरनाथमध्ये नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो लोकवस्तीस उग्र रासायनिक दुर्गंधी आणि श्वसनाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. एमपीसीबीने केमिकल सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अम्बरनाथच्या लोकनगरी बायपासच्या बाजूने वाहणारा नाला गोविंद पूलमार्गे शिवगंगानगर, स्वामी देवप्रकाश गार्डन, मोहनपुरम, गुरुकुल शाळेच्या मागून वाहतो. काही दिवसांपासून कोणतीही प्रक्रिया न केलेलं रासायनिक सांडपाणी नालेत सोडलं जातंय; त्यामुळे नाल्याचं पाणी रंगात बदलेल. नाल्यातून केमिकलचा उग्र वास येतोय. या दुर्गंधीमुळे नागरिकांनी पोलिस, अग्निशमन दल आणि एमपीसीबीकडे धावा केल्या आहेत. सामाजिक संस्थांनी प्रदुषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे एमपीसीबीने अंबरनाथ शहर प्रदूषित करणाऱ्यांवर कागदी कारवाई न करून ठोस कारवाई करण्याची गरज आहे. चंद्रशेखर भुयार, अंबरनाथ
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Nov 05, 2025 15:17:21
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 05, 2025 15:16:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - से विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराने नीना कुलकर्णी सन्मानित, शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान. अँकर - मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या थाटात सांगलीत पार पडला. जेष्ठ अभिनेत्री, और नाटककार नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विष्णुदास भावे गौरव पदक, २५ हजार रोख रुपये, शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगलीच्यावतीने गेल्या ५७ वर्षा पासून रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतय.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 05, 2025 14:51:37
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 05, 2025 14:18:25
Chendhare, Alibag, Maharashtra:एलईडी दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाले मंदिर. चौल येथील रामेश्वर मंदिरात दीपोत्सव. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विद्युत रोषणाई. दिव्यांचा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अलीबागच्या चौल येथील श्री रामेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरावर एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत दिव्यांच्या विविधरंगी प्रकाशात मंदिर आणि मंदिराचा परिसर न्हाऊन निघाला. मंदिरासमोरील पुष्करणीत या विद्युत रोषणाईचे पडणारे प्रतिबिंब अधिकच खुलून दिसत होते. यावेळी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. हा दिव्यांचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 14:09:41
Chandrapur, Maharashtra:हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनाने चंद्रपूर जिल्ह्यातील वढा तीर्थक्षेत्र फुलून गेले आहे. चंद्रपूर शहरापासून 20 किमी अंतरावर औद्योगिक नगरी घुग्गुसच्या जवळ असलेल्या वढा गावी कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. आज 5 नोव्हेंबर रोजी यात्रेचा प्रारंभ झाला असुन यात्रा 3 दिवस चालते. हे ठिकाण चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्रिवेणी संगमात स्नान करून शेकडो वर्षे जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. दिंड्या, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांनी परिसर गजबजून गेलाय. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद पोलिस, एसटी विभागाने यासाठी तयारी केली आहे. वणी येथील निरगुडा, माहूर येथून पोचणारी पैनगंगा आणि सातपुड्यातून दाखल होणारी वर्धा अशा 3 नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. वढा तीर्थक्षेत्री यामुळे धार्मिक कार्यक्रम आणि भक्तीचा अलोट संगम झाला आहे. या ठिकाणी पोचणारे भाविक पुरातन बालाजी मंदिर आणि संगमापालिकडे असलेल्या जुगाद गावातील प्राचिन शिव मंदिरात दर्शनासाठी देखील गर्दी करतात.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 14:01:17
Nashik, Maharashtra:नाशिक - गिरीश महाजन, मंत्री बाईट मुद्दे ऑन रस्ता पाहणी - आज नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली - गेल्या वर्षी रुंदीकरण होऊ शकले नाही - मोठी ट्राफिक या रस्त्यावर होते आहे - नॅशनल हायवेच्या नुसार 50 मीटर मोकळा करायचा आहे - नियमानुसार काढली पाहिजे - गावकरी आग्रह करत आहे - घरं आहे, दुकान आहे - वाहनांची संख्या वाढली आहे - कुंभ दीड वर्षावर आला आहे - 50 मीटर रस्ता मोजला त्यानुसार अनेक घरं काढावी लागणार है - 25 ते 30 मीटर पर्यंत घ्या अशी त्यांची मागणी - आचारसंहिता लागली आहे - किती पदरी रस्ता करावा असा प्रश्न आहे - मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलणार आहे - उद्या याबाबत निर्णय होईल - सुवर्णमध्य काढू - लोकांना त्रास होणार नाही - मोबदला देण्याबाबत आश्वासित केले आहे - कुंभात ट्रॅफिक होईल - नियम पण आहे - सुवर्णमध्य काढला जाईल - उद्या निर्णय होईल ऑन कुंभ कामे - आचारसंहिता लागली आहे - नियम पाहुन करू - मुख्यमंत्री तारीख देतील - खड्डे बुजवायचे काम सुरू - नवीन टेंडर काढले आहे - रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार - तोडगा काढला आहे - मुख्यमंत्री सांगितले आहे ऑन अंबादास दानवे आरोप - अतिशय हास्यास्पद आहे - इथं असलेले सगळे नगरसेवक निकटवर्तीय आहे - पण ते स्टेटमेंट हास्यास्पद - कोणत्याही आमदाराची सुपारी दिली नाही - कुठल्याही नगरसेवकाने केलं नाही - काहीही स्टेटमेंट करतात - त्यांनी पुरावे द्यावे - कुठलीही तक्रार नाही - हवेत गोळीबार करतात - संभ्रम पसरविला तरी काहिही उपयोग होणार नाही - वोटचोरी वरूनही नकाहीही होणार नाही ऑन महायुती - आम्ही युतीत लढणार - फार काही ठिकाणी टोकाचे मतभेद असेल तर मैत्रीपूर्ण लढू ऑन शरद पवार युती - एकटे लढले तर सुफड साफ होईल - म्हणून कोणाबरोबर युती करतील ऑन उद्धव ठाकरे दौरा - कोरोना काळात बाहेर पडले नाही - आता सगळं झाल्यावर बाहेर पडले - मोठा पाऊस झाला तेव्हा आम्ही सगळे तिथं होतो - पुटना मावशीचे प्रेम ऑन दुबार नोंदनी - मुद्दाम सुरू आहे - गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले पाहिजे - ट्रम्प चे नाव टाकायचे काय काम - यादीत नाव टाकायचे काम भाजप करत नाही - जपानच्या रशिया, ब्राझील च्या बाबत नाव टाकायचे काम ते करतात - मुस्लिम भागातील नाव का सांगत नाही - भामरे साहेब 3 हजार मतांनी पडले - 50 हजाराच्या वर दुब्लिकेट नवे आहे - जाधव पाटील चौधरी यांचे नाव सांगायचे - विधानसभेला पडले म्हणून बोलत आहे ऑन साटम दावा - ठराविक लोकांवर बोलत आहे - भाजपचा संबंध नाही - नावात चूक आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे - इलेक्शन कमिशनचे काम आहे - रडत बसू नका - पराभव दिसत आहे म्हणून बोंबलत आहे ऑन कॉल सेंटर कारवाई - चर्चा आहे - कोणी करत असेल तर कारवाई होईल ऑन शेतकरी आत्महत्या - पिकांवर बुरशी आली - द्राक्ष आले नाही - शासन मदत करेल - उत्पन्न गेले आहे - नुकसान होईल त्यास शासन मदत करेल
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 05, 2025 13:59:35
Pandharpur, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोहिते पाटील यांच्या ताब्यातील तीन सहकारी संस्था मधील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्याचे सहकार आणि पणन प्रधान सचिवांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश माळशिरस तालुक्यातील भाजप मंडल उपाध्यक्ष हरी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जयसिंह मोहिते पाटील चेअरमन असलेल्या सुमित्रा पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे दाखवून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.याबात मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिलेआहेत. तसेच शंकर सहकारी साखर कारखान्यातील ऊस उत्पादक शेतकरी सामान्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या चौकशीचे मागणी सुद्धा केली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणीही पालवे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकार आणि पणन सचिवांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूम्यावर मोहिते पाटलांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 05, 2025 13:58:39
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकींग - हर्षवर्धन सपकाळ ऑन व्होट चोरी / मनसे आघाडी (राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स) राहुल गांधी यांनी आरोप केला नसून पुरावे दिलेय... निवडणूक आयोगाचा दस नंबरी कारभार आहे, तो स्पष्ट करण्यासाठी ज्याचं नाव जितक्यांदा आहे तितक्यादा मतदार यादीत स्टार लावावे निवडणूक आयोगासमोर एव्हडा मोठा दस्तऐवज ठेवल्यानंतरही निवडणूक आयोग झोपेतून जागं होत नाही आता पुरावे द्या, पुरावे द्या आता पुरावे दिले तर त्यावर बोलत नाही, निवडणूक आयोग दबावात काम करत आहे, मतदार यादीत फार मोठा तांत्रिक घोटाळा आहे... मनसे न कोणत्याही प्रकारचा आघाडीचा प्रस्ताव हा काँग्रेसकडे दिला नाही, त्यामुळं आघाडीचा प्रश्नच उदभवत नाही मनसेच्या आघाडी संदर्भात राहुल गांधींना प्रस्ताव देण्याचा प्रश्नच उदभवत नाही टिळक भवनात संघटनात्मक चर्चा झाली, युती, आघाडीची कोणत्याही प्रकारे चर्चा झाली नाही... स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकसंदर्भात निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांना देण्यात आलीय शेतकऱ्यांची फसवणूक फडणवीस सरकारने केली आहे, या दरम्यान पॅकेज जाहीर केलं पण लिकेजस किती आहे बघितलं नाही बच्चू कडूना दिलेलं आश्वासन फोल ठरू नये, त्यांना कर्जमाफी मिळावी हिच अपेक्षा आहे...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 05, 2025 13:32:05
Dharashiv, Maharashtra:धाराशिव अतिवृष्टीतील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी धाराशिवच्या परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे पाहाणी धाराशिव – अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेती, रस्ते, सार्वजनिक तसेच वैयक्तिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखालील हे पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, आज परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला असून, शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 13:27:19
Jalna, Maharashtra:या फूटेजमध्ये मयत तरुणाचे व्हिडीओ आणि फोटो आहे तसेच त्याच्या काकांचा एक बाईट आहे\n\nजालना : ब्रेकिंग\n\nछत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन वरील पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या तरुणाची आत्महत्या\n\nमहेश आडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव\n\nमाफी मागूनही व्हिडीओ व्हायरल होत असल्याने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन\n\nव्हिडिओ व्हायरल आणि फोन करून धमकी देणारांवर कारवाईची मागणी\n\nअँकर- काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन इथल्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील एका तरूणाने विहिर्ही उडी घेत आत्महत्या केलीये.. महेश आढे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो जालन्यातील परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी आहे..\nमहेश आढे आणि त्याचा एक मित्र छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करत होते. तिथे एका तरुणाने त्यांचा व्हिडीओ काढला. तेव्हा हे दोन तरुण नशेत असल्याचं कळलं. लघवी करतानाचा या तरुणांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला नंतर दुसऱ्या दिवशी या दोघांचा माफीचा एक व्हिडीओ आला.. ज्यात त्यांनी झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती.. पण तरीही यांचे व्हिडीओज sगळ्या इंस्टाग्राम वर व्हायरल केले.या व्हिडीओमध्ये या तरुणाचे पत्ते आणि फोन नंबर टाकण्यात आला होता. या मुलांना रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. त्यामुळे महेश आडे या तरुणाने काल-परवा घरी आणि मित्रांना सांगितलं की मी जीव देईन मला हे सगळं सहन होत नाही. म्हणून त्याने आज गावच्या जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून जीवन संपवले.दरम्यान ज्यांनी कुणी त्याचे व्हिडीओ व्हायरल केलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे...महेश याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह परतूर येथील रुग्णालयात पडून होता.जोपर्यंत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ईशारा मयत महेशच्या नातेवाईकांनी दिला आहे\n\nबाईट : ज्ञानेश्वर आडे,मयत महेशचे काका
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 05, 2025 13:25:54
Ratnagiri, Maharashtra:राजेश सावंत हे चांगले कार्यकर्ते आहेत. पण ते सध्या अडचणीत आले. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. ती सध्या रत्नाकरती सध्या रत्नागिरीतील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. त्यामुळे पक्षाचे काम करताना कुठेही अडचण नको. याचमुळे राजेश सावंत यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मला मिळाला असून मी आणि वरिष्ठ यावरती विचार करू आणि निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. चिपळूण येथे राजेश सावंत यांनी चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेला राजीनामा कोकणातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top