Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापूर महापालिका: आज नगरसेवक के लिए आवेदन, शुक्रवार को नाम घोषित

AAABHISHEK ADEPPA
Feb 18, 2026 02:32:07
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - महापालिका स्वीकृत नगरसेवकांसाठी आज अर्ज घेण्याची प्रक्रिया तर शुक्रवारी होणार नावांची घोषणा सोलापूर महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज अर्ज घेण्याची प्रक्रिया तर शुक्रवारी होणार नावांची घोषणा महापालिका सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार भाजपला 9 तर एमआयएमच्या पदरात एक स्वीकृत जागा म महापालिका आयुक्त कार्यालयात सकाळी 11 ते दीड वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार अर्ज एकीकडे भाजपमध्ये मोठी चुरस असल्याने भाजप देणार धक्कातंत्र तर दुसरीकडे एमआयएम कडून इच्छुकांचे हैदराबाद दौरे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Feb 18, 2026 04:19:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - देशभरातील स्वामी भक्तांसाठी मोठी गुड न्यूज, अक्कलकोट ते कर्नाटक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाला रुंदीकरणासाठी 353 कोटींचा निधी मंजूर - देशभरातून अक्कलकोटला येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी मोठी गुड न्यूज - महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमेवरील 47 किमी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 353.23 कोटींचा भरीव निधी मंजूर - अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीला मोठे यश - देशाच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोट नगरीत येणाऱ्या स्वामी भक्तांच्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार - महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने शेतकरी, व्यापारी, उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार असल्याचा आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 18, 2026 04:16:40
Bhandara, Maharashtra:धान खरेदी केंद्रांची लिमिट संपली....भंडाऱ्यात शेतकरी अडचणीत, लिमिट वाढ करण्याची मागणी....ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांची खरेदी मर्यादा पूर्ण झाल्याने सुमारे ७० टक्के धान उत्पादक शेतकरी विक्रीपासून वंचित राहिल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी धान साठून राहिले असून आर्थिक अडचणी वाढत आहेत. तातडीने मोजमाप करून धान खरेदी सुरू करावी आणि केंद्रांची लिमिट वाढवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. उशीर झाल्यास धानाची गुणवत्ता खालावण्याच्या भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 18, 2026 04:05:09
Dharashiv, Maharashtra:उमरगा पंचायत समिती सभापतीपदावरून भाजप-शिवसेना तणाव वाढला, भाजपाच्या सदस्य गेले सहलीवर. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे टेन्शन वाढलं उमरगा तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपदावरून भाजप आणि शिवसेनेतील रस्सीखेच अद्यापही कायम आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे आणि शिवसेनेच्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले हे सभापतीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. भाजपाचे नेते माजी मंत्री व स्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सदस्य शनिवार केली आहे. भाजपाने कैलास शिंदे यांना सभापती करण्यासाठी आग्रह झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचं चांगलंच टेन्शन वाढला आहे. महायुतीमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा असली तरी पहिली संधी कोणाला मिळणार यावरून पेच निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर बैठका सुरू असून वाद पक्षश्रेष्ठीकडे पोहोचल्याची माहिती आहे. दरम्यान, उमरगा पंचायत समितीतील भाजपाचे सात सदस्य मुंबईच्या सहलीवर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 18, 2026 04:04:47
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 18, 2026 03:48:41
Satara, Maharashtra:दुबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती उदयनराजे भोसले यांची निकटवर्तीय रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या माध्यमातून केले जात असून यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात दुबई येथे साजरी करण्यात आली. दुबई येथे 'शिवसृष्टी 2026 या कार्यक्रमातून रक्षक प्रतिष्ठान आणि 'प्रथा' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात मोठ्या संख्येने दुबई येथे वास्तव्यास असणारे महाराष्ट्रातील मराठी शिवप्रेमींसह इतर राज्यातील शिवप्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तब्बल 2000 हून अधिक शिवप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावून सुशील मोझर यांनी घेतलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य भारताबाहेर प्रथमच सर्वाधिक मर्दानी खेळ सहभागींचे थेट सादरीकरण करण्यात आले, याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरील काही प्रतिकृती देखावे याबरोबरच त्या काळात वापरात येणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते...या शिवजयंती सोहळ्यात मराठमोळ्या कपड्यांमध्ये प्रत्येक जण या ठिकाणी पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वाक्षरी केलेली विशेष प्रशस्तीपत्रे देऊन सर्व खेळाडूंचा सन्मान आला. रक्षक प्रतिष्ठांचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी राबवलेल्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 18, 2026 03:48:20
Beed, Maharashtra:बीड: पाटोदा तालुक्यातील जवळाला गावात धाडसी चोरी; नऊ लाख रुपये आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास..! ANC- विद्युत डी पी मधील फ्यूज काढून गावात घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील जवळाला उघडकीस आला. चोरांनी एकाच रात्रीत दोन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज आणि रोखड लंपास केली आहे. पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरातील नऊ लाख रुपये रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे..या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. माझ्या मुलाने ऊस तोडणी करून मोठा कष्टाने कमवलेले पैसे चोरांनी नेले आहेत, माझे पैसे मला परत द्या अशी मागणी कोठुळे कुटुंबातील महिलांनी केली. बाईट- पीडित महिला..
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 18, 2026 03:48:08
Ahilyanagar, Maharashtra:राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 5.0 अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे... 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे... या अभियानात विशेष मेहनत घेऊन केलेल्या उपाययोजना, त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानअंतर्गत कचरामुक्त शहराला श्री स्टार मानांकन मिळालं आहे... माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महानगरपालिकेेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता... यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळविला आहे... भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या... शहरात याविषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले... शहरात विविध उद्याने, हरित क्षेत्र, सौरऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच जनजागृती आदी उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला... माझी वसुंधरा 6.0 या अभियानात महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 18, 2026 03:33:13
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 18, 2026 03:31:18
Washim, Maharashtra:वाशीमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा फाटा ते पूर या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाल्याने नागरिकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे.रस्त्याच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही भाग खचलेला आहे.तसेच रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या कसरतीने प्रवास करावा लागत आहे.या मार्गावरून पूर येथील प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या भाविकांची नेहमीच वर्दळ असते.मात्र खराब रस्त्यामुळे भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे。
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 18, 2026 03:30:39
Latur, Maharashtra:लातूर शहरात वाढत्या गुन्हेगारीने गंभीर रूप धारण केले आहे. पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थेतील चार विद्यार्थ्यांवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीचे मीटर फोडल्याच्या किरकोळ कारणावरून ही २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात अाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरात चार खून आणि सात जणांवर कोयत्याने हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके ऐवजी शस्त्रे दिसू लागल्याने पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 18, 2026 03:30:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधून सोयगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 3,448 बोगस जन्मनोंदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या पोर्टलचा पासवर्ड बिहारमधून हैक करून हा संपूर्ण कारभार करण्यात आला. गावची लोकसंख्या साडेचार हजार असून जन्मनोंदी साडेतीन हजार झाले असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आरोग्य संचालकांनी या सर्व नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले असून सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेरील देशातील जन्मनोंदी असल्याचा संशय असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारीांनी सांगितलं. आमच्या ग्रामपंचायतचा पोर्टल आयडी एका तरुणाने हैक केला, त्यातून त्याने 3 हजार 447 जन्म नोंदी केल्या आहेत, त्यासंदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 18, 2026 03:18:45
Amravati, Maharashtra:तीन महिन्यांपासून राखडली मेळघाटातील आदिवासींची मजुरी; अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी थकीत, मेळघाटातील आदिवासींची होळी अंधारात जाण्याची शक्यता मेळघाटातील आदिवासींचा होळी हा प्रमुख सण मानल्या जातो मात्र अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात सापडले आहे. दोन ते तीन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने आदिवासी मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप वाढला आहे. अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी थकीत असून मेळघाटातच 22 कोटी 28 लाख रुपये थकीत आहे. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. होळी सण जवळ आला आहे मात्र मजुरांच्या हातात पैसे नाही त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान रखडलेली मजुरी तात्काळ द्या अशी मागणी आदिवासी बांधव करत आहे. होळीच्या आधी आदिवासींना मजुरी मिळाली नाही तर नागपूरच्या आयुक्तालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top