Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वासिम के वनोजा फाटा-पूर मार्ग की हालत खस्ताहाल, नागरिक दुरुस्ती की मांग

GMGANESH MOHALE
Feb 18, 2026 03:31:18
Washim, Maharashtra
वाशीमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा फाटा ते पूर या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाल्याने नागरिकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे.रस्त्याच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही भाग खचलेला आहे.तसेच रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या कसरतीने प्रवास करावा लागत आहे.या मार्गावरून पूर येथील प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या भाविकांची नेहमीच वर्दळ असते.मात्र खराब रस्त्यामुळे भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 05:02:07
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानक येथे मंगळवारी सकाळी मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार प्रियंका थोरात या कल्याण येथे रहाते अंधेरी येथे नोकरी करतात. दररोजप्रमाणे त्या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक सहावरून प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. काही महिला उतरत होत्या, तर काहीजणी चढण्याचा प्रयत्न करत होत्या. या गोंधळात डब्यातून उतरणाऱ्या एका अनोळखी महिलेने प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला. स्वतःही नीट उतरत नसताना तिने प्रियंका यांना दरवाजातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान संबंधित महिलेने प्रियंका यांच्या हाताला धरून त्यांच्या दंडाला जोरात चावा घेतला आणि बोट पिरगळले. या प्रकारातPriyanka यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात महिलेचा शोध सुरू आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 18, 2026 05:01:05
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. कोणार्क विकास आघाडीचे माझी महापौर विलास पाटील आणि भाजपमध्ये झालेल्या राड्या नंतर विलास पाटील यांना शिवसेनाने जवळ करून महापौर निवडण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये शर्यत लागल्याने भाजप मधील नाराज नगरसेवकांना शिवसेने कडून फोडण्याचे प्रयत्न सुरु असून भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भिवंडीच्या महापौर निवडणूकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोणाचा महापौर होईल हे पहाणं तितकचं म्हत्वाचं असणार आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 18, 2026 04:47:07
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 8 वर्षीय चिमुकल्याचा बेवारस कुत्र्यांने चावा घेतल्याने मृत्यू? वर्ध्याच्या आर्वी शहरातील धक्कादायक घटना धवल गुल्हाने असं मृत बालकांचे नाव 25 जानेवारीला आर्वीच्या भाकरे ले-आऊट मध्ये चावला होता बेवारस कुत्रा 8 वर्षीय धवल याच्या गालावर आणि हाताचे तोडले होते बेवारस कुत्र्याने लचके आर्वी येथून अमरावती,आणि नागपूर येथे उपचारासाठी आले होते हलविण्यात 16 तारखेला नागपूर मेडिकल मध्ये धवल गुल्हाने याचा मृत्यू झाला. आर्वी शहरात महिन्याभरापासून बेवारस कुत्र्यांची दहशत शहरातील विविध प्रभागमध्ये आतापर्यंत 12 जणांचे बेवारस कुत्र्यांनी तोडले लचके नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांकनडून आहे ओरड
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 04:33:44
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यात जे बाधित आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष घरी जाऊन चर्चा केली जाणार आहे. यामध्ये मिळकतीचा आकार, पुनर्वसनाचेpär्य याबाबत चर्चा होईल. जनतेचा कौल घेऊनच आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूल परिसरातील भूसंपादन करून पार्किंग, म्युझियम, पदपथ या बाबी करता येतील का याचाही विचार केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठी उच्च अधिकार समिती नेमली आहे. या समितीमार्फत अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याची प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. सध्या मंदिर परिसर विकास आराखड्यात भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी किती जमीन संपादित करावी लागेल याबाबत आढावा घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या शासकीय इमारती देखील ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 18, 2026 04:33:33
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 18, 2026 04:32:23
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 04:31:50
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार येणारा महापूर, नद्यांवरील पूल पाण्याखाली जाणे यामुळे फुलांची स्थिती नेमकी काय आहे, त्याचे वयोमान काय, देखभाल दुरुस्तीची गरज आहे का, पूल कोसळण्याचा काही धोका आहे का ? यासंदर्भात पुलाचे सुरक्षितता मूल्यांकन दाखवणारा पहिला पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि ऑस्ट्रेलियातील यु बी एम एस या संस्थेच्या वतीने हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचा अहवाल महिनाभरात जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे. कोल्हापुर हा नद्यांनी, पाण्याने समृद्ध असणारा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या चहुबाजूनी नद्या बारमाही वाहतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये महापुराची स्थिती येते, अतिवृष्टीमुळे अनेक फुल पाण्याखाली जातात. एकदा पूर आला की किमान 15 ते 20 दिवस किंवा महिनाभराचा कालावधीत हा पूल पाण्याखालã असतो. या काळात या पुलाची परिस्थिती काय आहे हे कळत नव्हतं, पण आता मात्र हे कळण्यासाठी जिल्ह्यात पायलेट प्रोजेक्ट राबवला जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 04:31:34
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 04:31:07
Kalyan, Maharashtra:कल्याण रेतीबंदर परिसर, मोठा गाव ठाकुर्ली रेतीबंदर परिसर हा रेतीमाफियांमुळे कायमच चर्चेत असतो. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उप विभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विकास गरुड यांच्या पथकाने काल कल्याण रेतीबंदर परिसरात सकाळपासूनच कारवाई मोहीम राबवली. कल्याण रेतीबंदर मधील या कारवाईत 4 अवैध रेती हौद JCB व पोकलेनने जमीनदोस्त झाले. मोठागाव–ठाकुर्ली रेतीबंदर येथे दुसरी मोठी कारवाई करत 18 अवैध साठवण हौद, अंदाजे 48 ब्रास रेती आणि 8 इंजिन पूर्णपणे नष्ट झाले. या कारवाईत रेती माफियांचे अंदाजे 8 ते 9 लाखांचे साहित्य आणि रेती वर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 18, 2026 04:19:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - देशभरातील स्वामी भक्तांसाठी मोठी गुड न्यूज, अक्कलकोट ते कर्नाटक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाला रुंदीकरणासाठी 353 कोटींचा निधी मंजूर - देशभरातून अक्कलकोटला येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी मोठी गुड न्यूज - महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमेवरील 47 किमी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 353.23 कोटींचा भरीव निधी मंजूर - अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीला मोठे यश - देशाच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोट नगरीत येणाऱ्या स्वामी भक्तांच्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार - महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने शेतकरी, व्यापारी, उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार असल्याचा आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 18, 2026 04:16:40
Bhandara, Maharashtra:धान खरेदी केंद्रांची लिमिट संपली....भंडाऱ्यात शेतकरी अडचणीत, लिमिट वाढ करण्याची मागणी....ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांची खरेदी मर्यादा पूर्ण झाल्याने सुमारे ७० टक्के धान उत्पादक शेतकरी विक्रीपासून वंचित राहिल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी धान साठून राहिले असून आर्थिक अडचणी वाढत आहेत. तातडीने मोजमाप करून धान खरेदी सुरू करावी आणि केंद्रांची लिमिट वाढवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. उशीर झाल्यास धानाची गुणवत्ता खालावण्याच्या भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top