Back
सोलापूर मंत्री का बड़ा खुलासा: राम सातपुते हत्या की साजिश का आरोप
AAABHISHEK ADEPPA
Feb 11, 2026 10:57:15
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट असल्याचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा गौप्यस्पोट
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा गौप्यस्पोट
- माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट?
- कॉन्ट्रॅक्ट किलर कडून राम सातपुते यांचा काटा काढला जाणार होता का?
- पालकमंत्र्यांच्या खळबळ जनक दाव्यानंतर जिल्ह्यातील राज्यातील तपास यंत्रणा कामाला
एकीकडे सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकांचा गुलाल विसावताना विसावतो तोच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याच पाहायला मिळतय. अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा खळबळजनक दावा केलाय. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केलाय. यावरून आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठे खळबळ माजलीय.
मालिका- ऊत्तरम यांना भेटलेल्या टीकेनुसार उत्तम जानकर यांनी सातपुते यांना खोचक टोला लगावला आहे. मुरदाड लोकांना कोण मारणार? निवडणुकीत ज्यांच्या सोबत सातपुते यांचा वाद झाला त्यांना घाबरवण्यासाठी पालकमंत्र्यांनी असे विधान केले असेल.
उत्तम जानकर ( माळशिरस आमदार )
तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील पालकमंत्र्यांच्या या विधानावर टीका केली आहे. माळशिरस लोकसभा आणि विधानसभेत पालकमंत्र्यांना सपशेल अपयश झाले आहे ते अपयश लपवण्यासाठी अशा रीतीने खोटे आरोप केले जात आहेत. ते कोणत्याही स्तराला जाऊन कोणतीही बातमी देतात असं देखील खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
धैर्यशील मोहिते पाटील ( खासदार )
दरम्यान माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उत्तम जानकर यांना गोळ्या सुरू associated आहेत, त्यांचावर मानसिक रोगाचे उपचार सुरु आहेत.
राम सातपुते ( माजी. आमदार )
राम सातपुते यांच्या पाठीशी संपूर्ण ताकतीने भाजप असून जनता देखील त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही विचार जरी कराल तर तुम्हाला महागात पडेल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिलाय...
शशिकांत चव्हाण ( जिल्हाध्यक्ष भाजप )
सत्ताधारी मंडळी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत राहिला आहे. मात्र पालकमंत्री गोरे यांनी केलेल्या या आरोपानंतर त्यातून नेमकं सत्य बाहेर काय येतंय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 10:32:460
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 05, 2026 10:30:340
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 10:16:340
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 10:08:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 10:07:310
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 09:49:180
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 09:48:120
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 09:31:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 05, 2026 09:30:480
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 05, 2026 09:25:380
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 09:15:300
Report
KJKunal Jamdade
FollowMar 05, 2026 09:07:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 08:36:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:34:270
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:30:530
Report