Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

सांगोलामे धाड पर दीपक साळुंखे ने शहाजी पाटील पर तंज: आरोप हास्यास्पद

SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 11:04:41
Pandharpur, Maharashtra
सांगोल्यात धाड सत्र प्रकरणावर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेले आरोप हास्यास्पद , त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी खडसावले. सांगोला मधील शिवसेना माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर पडलेली धाड याप्रकरणी माजी आमदार दीपक साळुंखे यांना जबाबदार धरले आहे. यावर माजी आमदार साळुंखे यांनी कडक शब्दात फटकारले आहे. शहाजी पाटील यांना अशी नाटके करायची सवय आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत माझा मुळे गुलाल उधळला. आता माझावर आरोप कशासाठी करता. निवडणूक झाल्यानंतर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. लबाड लोकांचे अधिवेशन घेतले तर शहाजी पाटील बिनविरोध अध्यक्ष होतील अशी टीका माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 01, 2025 11:39:25
Kolhapur, Maharashtra:राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील कोण कोणत्या नेत्यांचा कस लागला आहे यावर एक नजर टाकूया... सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात नजर टाकूया. 1) उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, आजरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 3) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे. 4) भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची मुरगूड, गडहिंग्लज, चंदगड, शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि हुपरी नगरपंचायत निमित्ताने कस लागला आहे. 5) पन्हाळा, पेठ वडगाव, मलकापूर नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. सांगली जिल्ह्यात पार पडणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकीसाठी कोणकोणत्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यावर एक नजर टाकूया. 1) ईश्वरपूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, 2) तासगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित आर आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 3) जत नगर परिषदेसाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 4) पलूस नगरपरिषदेसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्य. 5) विटा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांची तर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 6) आटपाडी नगरपंचायतीसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे 7) शिराळा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि भाजपा आमदार सत्यजित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यात कोणकोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यावर एक नजर टाकूया. 1) मेढा नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आ.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आणि त्याचा विरोधात मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2) म्हसवड नगरपालिका निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.विरोधात अजित पवार गट आहे 3)पाचगणी आणि वाई नगरपालिकेत मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 1) अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेत भाजप वि. शिवसेना शिंदे गट अशी लढत असणार आहे. याठिकाणी भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री शिंदे सेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे या नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. 2) अकलूज नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील याची प्रतिष्ठा पणाला. 3) पंढरपूर नगरपालिकेत माजी आमदार प्रशांत परिचारक याची प्रतिष्ठा पणाला. 4) सांगोला नगरपालिका माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
59
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Dec 01, 2025 11:39:05
Navi Mumbai, Maharashtra:मुंबईच्या हवेत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. याला मेट्रोची कामे जबाबदार असून या बाबत कारवाई ची मागणी भाजपचेच आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. मुलुंड परिसरात सुरू असलेल्या मेट्रो चार च्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, ज्या उपाययोजना कंत्राटदराने करणे आवश्यक आहे त्या तो करत नाही हा देखील पाचशे कोटींचा घोटाळा आहे. याचे शंभर फोटो घेऊन आपण एमएमआरडीए ला तक्रार करणार असल्याचे मिहिर कोटेचा म्हणाले. स्थानिक नागरिकांनी या बाबत तक्रार केल्यावर मिहिर कोटेचा यांनी या कामाच्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली होती. या ठिकाणी अस्वच्छता आणि प्रदूषण बाबत शंभर पेक्षा जास्त फोटो त्यांनी काढले आहेत. हे सर्व मोठे ते मुख्यमंत्री आणि एमएमआरडीए ला देणार असून कारवाई ची मागणी करणार आहेत.
110
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 01, 2025 11:09:29
Shirdi, Maharashtra:शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संगमनेर शहरात भव्य रॅली.. भाजप सेनेच्या उमेदवारांसाठी मोटार सायकल रॅली.. तांबे थोरात यांच्या विरोधात महायुतीचे आव्हान... काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली होती सभा... आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजपा सेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी... शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे बाईट पॉईंटर्स - ऑन निवडणुक स्थगिती - एक दिवस राहिला असताना स्थगितीचा निर्णय देण चुकीच... काही निवडणुका पूर्णपणे रद्द केल्या गेल्या... काही हजार उमेदवारांच्या निवडणुकीला स्टे दिला... आयोगाने अगोदर मतदार यादयांमध्ये घोळ केला , याद्यांमध्ये दुरूस्ती करत करत त्यानंतर याद्या मिळाल्या... निवडणुक आयोगाच अस काम कधीच पाहिल नव्हत... पहिल्यांदा असा घोळ झालाय , लोकांची थट्टा करायच काम आयोगाने केलय... आयोगाने गांभिर्यपुर्वक विचार केला पाहिजे... पुढे जिल्हा परिषद , महापालिका निवडणुका आहेत... त्यात चुका होता कामा नये ... 2 तारखेला मतदान आहे त्यानंतर 3 तारखेला मतमोजणी पण 3 तारखेला मतमोजणी करू नये कारण त्याचा परिणाम राहिलेल्या मतदारसंघावर होवू शकतो... मतदानाचा निकाल 20 डिसेंबर नंतर द्या... ऑन संजय राऊत - त्यांना मी खुप खुप शुभेच्छा देतो , त्यांची कमी सर्वांनाच भासत होती... आजारी असताना देखील माध्यमांसमोर आले आहेत... लवकरात लवकर ते बरे होवोत अशा त्यांना शुभेच्छा !! ऑन शिंदे गट आमदार फुट - निवडणुका आता एका महिन्यात आहेत... जावू द्या , साहेब पण बोललेत... उगाचच टिकेला टिकेने उत्तर देण काय उपयोगाच ? कामातून उत्तर द्यायला हव , वेळ सगळ्यांना सारखा आहे...ज्या गोष्टी होणार आहेत त्या होतील... bite - खा. श्रीकांत शिंदे
95
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 01, 2025 10:55:16
Washim, Maharashtra:अकोल्याचे आमदार साजीद खान पठाण यांनी भाजपावर हल्लाबोल करत विधान सभेत माझ्या मतदार संघात बटेंगे तो कटेंगे चा नारा चला नही असे म्हणत मालेगावातील धार्मिक एकता, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुना संस्कृतीचे कौतुक केले. शहरातील हिंदू-मुस्लिम समाजाने वर्षानुवर्षे जपलेला बंध हा मालेगावची ओळख असून पुढेही हा सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.सत्ताधारी पक्षाने विधानसभा निवडणुकीत “बटेंगे तो कटेंगे” अशा घोषणांद्वारे समाजात धार्मिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र मालेगावकरांनी त्याला झुगारून सामंजस्याचा मार्ग निवडला,असा यासह लाडक्या बहिणी योजनेवरून टोला पठाण यांनी भाजपासह महायुती सरकार लगावला. स्टेज बाईट: आ.साजिद खान पठाण
166
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 01, 2025 10:48:50
Nashik, Maharashtra:बिहार और कनाडा से कुरियर के जरिए भेजे गए 'ट्रीपल तलाक' का मामला Nashik शहर के मुंबईनाका पुलिस स्टेशन की सीमा में रहने वाली एक विवाहित महिला के साथ सामने आया है। उसकी शादी 24 जनवरी 2022 को 쇼ध पर मुस्लिम तरीके से हुई थी और अब तक उसके पति ने सास-ससरे के साथ मिलकर उसे शारीरिक-मानसिक शोषण किया। आरोपियों ने माहिर पैसे न देने पर गालियाँ दीं और मारहाण की, तथा विवाह में मिलने वाले आठ तोले के गहने भी जबरदस्ती छीन लिए गए। इसके बाद पति ने लिखित रूप से अपने हस्ताक्षर के साथ ट्रिपल तलाक का पत्र कुरियर के जरिए भेज दिया। पीड़ित ने महिला सुरक्षा शाखा में आवेदन और फिर मुंबईनाका पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। मामले में मुस्लিম महिला विवाह अधिकार संरक्षण कानून की धारा 4 और भारतीय दंड संहिता की धारा 85 के अंतर्गत विवाहित को अपमानित करने और प्रताड़ित करने के आरोप लगे हैं। बैक-एंड बाइट: वरिष्ठ पुलिस निरीक्षक, मुंबई नाका पुलिस स्टेशन। ट्रिपल तलाक इस देश में अवैध है और 2019 के मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कानून के तहत इसे अपराध माना गया है; फिर भी कुछ धार्मिक समूह और लोग इसे चुनौती दे रहे हैं, तथा यह प्रथा अभी भी जारी है।
93
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 01, 2025 10:05:14
Akola, Maharashtra:अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंजिरे वाजवत अनोखे आंदोलन उभारले. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पारंपरिक ग्रामीण पद्धतीने मंजिरे वाजवत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी परिसरात घोषणांचा आवाज घुमत होता. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना सर्वसमावेशक कर्जमाफी द्यावी, तसेच यंदाच्या हंगामातील प्रमुख पिकांना योग्य व हमीभाव द्यावा. सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये तर कापसाला 10,000 रुपये भाव देण्याची मागणी आंदोलकांनी जोरदारपणे केली. सध्याच्या बाजारभावातील घसरण, नैसर्गिक आपत्तींचे सततचे संकट आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर या मागण्या अधिक तीव्र झाल्या असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या आंदोलनात विविध शेतकरी कार्यकर्ते, तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारींचे फलक हातात धरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. योग्य दर न मिळाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारादेखील शेतकरी संघटनांनी दिला आहे.
214
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 01, 2025 09:49:40
36
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 01, 2025 09:48:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाढ़ मध्ये मगरीच्या हल्ल्यात लक्ष्मण कलगी यांचा मृत्यू झालाय. लक्ष्मण कलंगी हे गेल्या पंचवीस वर्षापासून दूधगंगा नदीत पोहायला जात होते. आज सकाळी देखील ते नदीत पोहायला गेल्यानंतर मगरीने त्यांच्यावर हल्ला केला, हल्ला केल्यानंतर कलगी यांना मगर जवळपास अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवली, त्यामुळे लक्ष्मण कलगी यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर देखील मगरीने जवळपास तीन तासांमध्ये अनेक वेळेला कलगी यांच्यावर हल्ला केला.. या हल्ल्यानंतर घटनास्थळी वनविभाग पोहोचले, त्यानंतर कलगी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कृष्णा नदीच्या पात्रात अनेक वेळेला मगरीचा वावर दिसून आला होता, पण आता दूधगंगा नदीत देखील मगरीचा वावर असल्याचे सिद्ध झाल्याने नदीकाठच्या परिसरात दहशत पसरली आहे.
84
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 01, 2025 09:44:31
Vasai-Virar, Maharashtra:मीरा रोडच्या सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल ला बॉब ने उडवून द्यायची धमकी शाळेच्या ईमेलवर प्राप्त झालेल्या मेलने एकच खळबळ पोलीस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल अँकर - मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे साडेहच्या सुमारास स्कूल प्रशासनाला एक संशयास्पद ईमेल प्राप्त झाला. या मेलमध्ये शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्कूल प्रशासनाने तत्काळ काशिमिरा पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच काशिमिरा पोलीस, बॉंब शोध पथक आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची सुरक्षितता प्राधान्य मानत संपूर्ण शाळा तात्काळ रिकामी करण्यात आली आहे. परिसर सील करण्यात आला असून सर्व कक्ष, करिडॉर, पार्किंग आणि आसपासच्या जागांची सखोल तपासणी सुरू आहे. शाळा प्रशासन व पालकांत मोठी चिंता निर्माण झाली असून, पोलीस कोणतीही जोखीम न घेता अत्यंत सावधगिरीने तपास करत आहेत. बॉ Bomb पथकाने आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी धमकीच्या मेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर युनिटची मदत घेतली जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
96
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 01, 2025 09:44:07
Pimpri-Chinchwad, Maharashtra:तुम्ही सर्वजण खूप नशिबवान आहे तुमच्या पूर्वजांच्या कृपाने त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आज ही भूमी प्राप्त झाली आहे. आम्ही राज्यात फिरत असताना आम्ही इथली घ्याती सांगत असतो. उद्या तुम्ही यावेळी मतदान करणार आहे कुणाला निवडून आणायचं हा तुमचा अधिकार आहे.पण पुढील पाच वर्ष तुमचे काम व्हायला पाहिजे हे पाहिले पाहिजे. मी अनेकवर्ष तुम्हाचा पालक मंत्री म्हणून काम केले आणि तेव्हा मी पहायचो सर्व आळंदी कराना न्याय मिळवून द्यायचे काम केले. इथे माझ्या अनेक बहिणी उन्हात बसल्या आहेत अनेक भाऊ पण उन्हात बसले आहे काहींच्या डोक्यावर टोपी आहे पण काहींच्या डोक्यावर टोपी नाही ते काम आमच्या सारखे करत आहे आम्ही सहन करतो तर तुम्हीपण करा. उन्ह म्हणत आहे.(लोकांमध्ये हशा) आळंदी मध्ये अनेक काम केली आहे लोकांच्या मागण्या आजही आहे मागण्या कधी संपत नसतात काम वाढले आहे लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे कामाची मागणी होताच असते. इंद्रायणी नदी मध्ये प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहे. लोकांना स्वच्छ पाणी द्यायचे आहे हे आमचे उद्दिष्ट आहे.वारकाऱ्यांसाठी वारकरी भवन अजूनही नाही ते काम करायचे आहे मोठ्या प्रमाणात पार्किंगची गरज आहे मोठ्या प्रमाणात वाहने इथे येत असतात. बारामतीत मी बदल करून दाखवले आहे माझ्या लाडक्या बहिणींनी तुमचे कोणी नातेवाईक असले तर त्यांना विचारा पहाटे पाच पासून स्वच्छता सुरू होते. अनेक जण येतील काही म्हणतील पण मी याच शहरातून आहे माझ्यापुढे काही फाईल आली तर मी आधी माझ्या शहराचा विचार करेल कोणी ठाण्याचा विचार करेल कोणी मुंबईचा करेल कोणी नागपूरचा करेल मी माझा शहराचा विचार करणारच ना...?
85
comment0
Report
Advertisement
Back to top