Back
महाराष्ट्र के नगरनिगम चुनावों में दिग्गज नेताओं की प्रतिष्ठा दांव पर
PNPratap Naik1
Dec 01, 2025 11:39:25
Kolhapur, Maharashtra
राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील कोण कोणत्या नेत्यांचा कस लागला आहे यावर एक नजर टाकूया...
सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात नजर टाकूया.
1) उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, आजरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
2) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
3) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे.
4) भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची मुरगूड, गडहिंग्लज, चंदगड, शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि हुपरी नगरपंचायत निमित्ताने कस लागला आहे.
5) पन्हाळा, पेठ वडगाव, मलकापूर नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे.
सांगली जिल्ह्यात पार पडणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकीसाठी कोणकोणत्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यावर एक नजर टाकूया.
1) ईश्वरपूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे,
2) तासगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित आर आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
3) जत नगर परिषदेसाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
4) पलूस नगरपरिषदेसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्य.
5) विटा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांची तर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
6) आटपाडी नगरपंचायतीसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
7) शिराळा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि भाजपा आमदार सत्यजित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सातारा जिल्ह्यात कोणकोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यावर एक नजर टाकूया.
1) मेढा नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आ.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आणि त्याचा विरोधात मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
2) म्हसवड नगरपालिका निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.विरोधात अजित पवार गट आहे
3)पाचगणी आणि वाई नगरपालिकेत मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
1) अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेत भाजप वि. शिवसेना शिंदे गट अशी लढत असणार आहे. याठिकाणी भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री शिंदे सेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे या नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे.
2) अकलूज नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील याची प्रतिष्ठा पणाला.
3) पंढरपूर नगरपालिकेत माजी आमदार प्रशांत परिचारक याची प्रतिष्ठा पणाला.
4) सांगोला नगरपालिका माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 12:20:490
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 12:15:440
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 01, 2025 12:04:21101
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 01, 2025 11:51:5890
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 11:51:1471
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 11:48:0821
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 01, 2025 11:39:05137
Report
KJKunal Jamdade
FollowDec 01, 2025 11:09:29113
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 11:04:4137
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 01, 2025 10:55:16195
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 10:48:5093
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 10:31:42107
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 01, 2025 10:31:30124
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 01, 2025 10:05:56126
Report