Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

राम सातपुते हत्या मामले पर उत्तम जानकर की तीखी प्रतिक्रिया: राजनीतिक संघर्ष तेज

AAABHISHEK ADEPPA
Feb 11, 2026 09:15:31
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मुर्दाड माणसाला कोण मारणार? राम सातपुते यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपावर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची टीका मुर्दाड माणसाला कोण मारणार? राम सातपुते यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपाबाबत पालकमंत्री यांनाच जास्त माहिती असेल, ते माहिती देतील पण माजी आमदाराच्या हत्येचा कट कोण रचेल? राम सातपुतेनीच आगावपणा केला, गुलालाची पिस्तूल बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला बाबा माने पराभूत झाले आणि रागात एकमेकाची धराधरी झाली, अशा घटना अनेक ठिकाणी होतात राम सातपुते यांच्या अंगावर गेलेल्या लोकांना भीती घालण्यासाठी पालकमंत्री बोलले असतील याची दखल कराचीच्या NIA ने घेतली का? आम्ही मैदनात लढणारी माणसे आहोत, असं चोरीछुपं काही करतं नाही तो राजकीय विरोधक आहे आणि राम सातपुते साठी काही करावं हे मला पटत नाही ऑन अर्जुनसिंह मोहिते पाटील कारवाई निवडणूक आयोग एवढं कधी जागृत झालं. अनगरमधील एका गावात 96 टक्के मतदान होतं. तिथं निवडणूक आयोग झोपलेले आहे काय? लहान मुलाने हट्ट केला म्हणून मतदान केंद्रावर नेलं असेल. बाईट : उत्तम जानकर, आमदार, शरद पवार गट
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 10:32:46
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात सौर ऊर्जा पॅनल पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी महावितरण विरोधात मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महावितरणच्या पीएम सूर्यघर बाबतच्या नव्या जाचक अटींमुळे ग्राहक आणि सूर्यघर योजनेला धक्का बसण्याची शक्यता असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मोर्चेक-यांनी केली आहे. महाराष्ट्रातील अंदाजे 50-60% निवासी सौर ग्राहकांवर गंभीर परिणाम होईल. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सौर विक्रेते ग्राहकांच्या इच्छित सौर क्षमतेसाठी मान्यता मिळवू शकणार नाहीत. जुन्या नियमांनुसार, ग्राहक त्यांच्या वीज वापराच्या गरजेनुसार सौर क्षमता खरेदी करू शकत होते. ग्राहक त्यांच्या भविष्यातील गरजांनुसार सौर क्षमता निवडत असत. नवीन बदलांनुसार, महावितरण गेल्या १२ महिन्यांत ग्राहकांच्या सरासरी वापराच्या आधारावर त्यांची सौर क्षमता मर्यादित करत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील ग्राहकांनी बुक केलेल्या ६०टक्के पेक्षा जास्त सौर ऑर्डरवर होत आहे. महावितरणाच्या धोरणात्मक बदलाचा ग्राहकांवर परिणाम टाळण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर योजनेसाठी त्वरित मान्यता देण्यात ुयी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रात, जिथे वीज खूप महाग आहे. बिल वाचवण्यासाठी ते इलेक्ट्रिक वाहने, एसी आणि इतर उपकरणे खरेदी करणे टाळत असत. तथापि, सोलर बसवल्यानंतर, त्यांच्या वापराची गरज वाढते, ज्यामुळे त्यांना अधिक वीज वापरावी लागते - कदाचित ते इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा, त्यांच्या कुटुंब वाढवण्याचा किंवा वॉशिंग मशीन, इंडक्शन कुकर, मायक्रोवेव्ह इत्यादी नवीन उपकरणे जोडण्याचा विचार करतात. कुटुंबाला त्यांच्या जीवनशैली आणि घराच्या आकारानुसार अधिक क्षमता हवी असेल तर ते शक्य होणार नाही. सध्या पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सर्वात मोठी बाजारपेठ आहे, दरमहा ५०,००० हून अधिक घरे सौरऊर्जेचा अवलंब करतात. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत एकूण सौरऊर्जा दत्तक घेण्यापैकी २५ % महाराष्ट्राचे योगदान आहे. नवीन धोरण बदलामुळे महाराष्ट्रातील ६० टक्के पेक्षा जास्त ग्राहकांवर परिणाम होईल आणि विद्यमान ऑर्डर रद्द केल्या जातील.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 05, 2026 10:16:34
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणून ओळख असलेली पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विख्यात सापडली आहे... विशेषतः शिरोळ तालुक्यात या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून नदीपात्रात जलपर्णीचा विळखा पडला आहे. नदीपात्रातील जलपर्णी इतकी वाढ झाली आहे की हे नदीपात्र आहे की मैदान अशी स्थिती आहे.. या प्रदूषणामुळे पंचगंगा नदीकाठच्या 99 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. प्रदूषण थांबवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने आता आर या पार ची लढाई करणार असल्याचा इशारा या पंचगंगा नदी काठावरील गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 05, 2026 10:07:31
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या शाहूंवाडी तालुक्यातील उदगिरीच्या काळम्मा देवीच्या धूलिवंदनाच्या यात्रेला वाघ हजेरी लावत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेला दुजोरा म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'तील कर्मचारी धूलिवందनाच्या यात्रेदरम्यान काळम्मा देवीच्या मंदिराच्या जंगलामधून वाघाची नोंद करत आहेत असं यात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांचं म्हणणे आहे. यंदा 'एसटीआर टी०३' म्हणजे 'बाजी' या वाघाचा वावर यात्रेदरम्यान मंदिर परिसरातील जंगलामध्ये असल्याचे भक्ताचे म्हणणे आहे. कोयना वन्यजीव अभयारण्यातील 'बाजी' या वाघाने सात दिवसांत १५० किमीचे अंतर कापून होळीच्या दिवशी उदगिरीचे जंगल गाठले. त्याच दिवशी काळम्मा देवीच यात्रा होती. दरवर्षी वाघाची यात्रेला हजेरी लागते, अशी भाविकांची श्रद्धा आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 09:49:18
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची महापौरांनी सभेत केली घोषणा, काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का, अखेर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याच्या निषेध करत केला सभात्याग, भाजपातील खदखद देखील आली नजरेस, पहिल्यांदाच नगरसेवक झालेले रवी लोणकर यांनी आपल्याला स्थायी मध्ये संधी न दिल्याने सभागृह आणि बाहेर देखील व्यक्त केली नाराजी अँकर:--चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची निवड करण्यासाठी मनपाच्या विशेष सभेचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले. यात महापौरानी बंद लिफाफ्यात आलेल्या नावांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला यात मोठा धक्का बसलाय. काँग्रेसकडून स्थायी समितीत नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाही धानोरकर समर्थकाला जागा नसून सातही जागी विजय वडेट्टीवार समर्थकांची नावे देण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाकडून या 7 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. वसंता देशमुख सचिन कत्याल राजेश अडूर संजीवनी वासेकर चंदा वैरागडे सोफिया तवंगर विनोद लभाने ------------- तर भाजपने सुभाष कासमगोट्टूवार संजय कंचर्लावार पुष्पा उराडे सारिका संदूरकर प्रज्वल कडू सविता सरकार --------------------- शिवसेना उबाठा तर्फे मनस्वी गि-हे श्रुती घटे ---------   आणि शेकाप तर्फे प्रदीप देशमुख ------------------ यांना संधी देण्यात आली आहे. या नावांची घोषणा होताच अपेक्षित नावे नसल्याने खा. धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. बाईट १) सुरिंदर अडबाले, काँग्रेस नगरसेवक, खा. धानोरकर गट बाईट २) राजेश अडुर, काँग्रेस गटनेते, वडेट्टीवार गट व्ही. ओ.२) पक्षाकडून आपले नाव निश्चित झाले असताना भाजपचे गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनी आपले नाव दिले नाही असे सांगत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी लोणकर यांनी आपल्याच गटनेत्यावर रोष व्यक्त केला. सभागृहात रोष व्यक्त करतच लोणकर यांनी बाहेरही आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले. बाईट ३) रवी लोणकर, नगरसेवक, भाजप व्ही. ओ.४) स्थायी समिती सदस्यांची नावे देण्यासाठीच आयोजित केलेली ही सभा मात्र विविध कारणांनी गाजली. भाजपमधील असंतोष जसा दिसला तशीच काँग्रेस मधील खदखदही या निमित्ताने पुढे आली. या पुढच्या काळात एका मताने सत्ता आल्याने सभागृह असो वा स्थायी समिती ,सत्ता राबवणे तारेवरची कसरत राहणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 05, 2026 09:48:12
Kalyan, Maharashtra:केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर डॉक्टर नर्स,कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन. ठिय्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. केडीएमसी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील १५ व्या वित्त आयोगाच्या हेल्थपोस्टवरील डॉक्टर, नर्स आणि एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांचे वेतन थकले तसेच NUHM कर्मचार्यांचे भर उन्हात केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत केडीएमसी विरोधात जोरदार घोषणाबाजी सकरत आंदोलन सुरु आहे आंदोलनाचा आज चा दुसरा दिवस आहे ,थकीत वेतन देण्याची मागणी केडीएमसीचे उपयुक्त नी केली आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरु आहे NUHM कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात 1 महिन्याच्या पगार महापालिकेच्या निधीतून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपायुक्तांचे बोरकर यांनी आश्वासन दिले आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 05, 2026 09:31:03
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 05, 2026 09:25:38
Nanded, Maharashtra:एका पुरातन मंदिराच्या आवारात खड्डे खोदत अघोरी पूजा करुन गुप्तधन शोधणाऱ्या मांत्रिक आणि त्याच्या सात जणांच्या टोळीला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे गुप्तधनाबाबत अजूनही लोकांच्या मनात अंधश्रद्धा कायम आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. ग्राफिक्स: गुप्तधनासाठी मंदिराच्या आवारात खोदले खड्डे; खड्डे खोदून मध्यरात्री अघोरी पूजा; मांत्रिक आणि त्याच्यासह सात साथीदारांना अटक. जमिनीखाली दडलेले गुप्तधन मांत्रिक शोधून देतात ही अंधश्रद्धा अजूनही अनेकांच्या मनात कायम आहे. मी पायाळू असून गुप्तधन दिसत असल्याचा दावा करून भोंदू मांत्रिक अनेकांना गंडा घालतात. असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आलााय. नायगाव तालुक्यातील गडगा जवळ महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या आवरात काहीजण गुप्तधनासाठी खड्डे खोदून अघोरी पूजा करत असल्याची माहिती नायगाव पोलिसांना मिळाली. पोलीसांनी मध्यरात्री धाड टाकत मांत्रिक आणि त्याच्यासह सात साथीदारानी अटक केली. तेलंगनातील मांत्रीकाने नायगाव मधील काहीजनाना गुप्तधनाचे अमिष दाखवून या ठिकाणी आणले होते. पोलिसांना या ठिकाणी फावडे, पूजेचे साहित्य मिळाले. या सात जणांवर पोलिसांनी जादूटोनाविरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. Byte - संजय मारकड - पोलीस निरीक्षक, नायगाव. Vo - कोणत्याही जमिनीखाली मंत्रतंत्राने धन प्रकटत नाही. हा प्रकार म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेतून नरबळी देण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. मांत्रीकांना जर गुप्तधन दिसले असले तर या मांत्रीकांना सोन्याच्या खाणीच्या ठिकाणी बोलावले नसते का अशी प्रतिक्रिया अनिसने दिली. Byte - प्रदीप नागपूरकर - अंधश्रद्धा निर्मूलन ज्येष्ठ कार्यकर्ते. Vo - गुप्तधन शोधून देतो म्हणून भोंदू मांत्रिक अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यातून लोकांची आर्थिक फसवणूक होते. याच भोंदूबाबा आणि अंधश्रधेला आळा बसावा यासाठी कायदा करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या लढ्यामुळे जादूटोना विरोधी कायदा अस्तित्वात आला. पण तरीही ए आय क्रांतीच्या या युगातही अंधश्रद्धा कायम आहे. त्यामुळे याबाबत सरकारने नेहमी जनजागृती करणे गरजेचे आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 05, 2026 08:36:36
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 08:34:27
Baramati, Maharashtra:सीआयडीच्या तपासाला एक महिना होऊन गेला. खूप अगोदर चौकशीसाठी त्यांना बोलवायला पाहिजे होतं. जे पुरावे आमच्या समोर येत आहेत आम्ही ते पुरावे तुमच्या सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला यश मिळेल असं वाटतं. ही चौकशी खूप अगोदर व्हायला पाहिजे होती असं वाटतं. फक्त लेयर जेट नको तर त्यांची सर्वच विमान ग्राउंड झाली पाहिजेत. त्या कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी लवकरात लवकर पार पाडली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. सर्वात जास्त अनुभव शरद पवार यांकडे आहे. साठ वर्ष आता त्यांची राजकारणात पूर्ण झाली आहेत. आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनाही त्यांची जाणीव झाली आहे. सर्वांनी पवार साहेबांना पाठिंबा दिला आहे. देश हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पवार साहेबांना राज्यसभेला पाठवला आहे. मी घटनास्थळी सुरुवातीला पोहोचलो होतो. ज्या ठिकाणी विमानतळ आहे तो भाग दुष्काळी पडतो, तिथे पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही आज जरी त्या ठिकाणी गेला तरी तुम्हाला मोठी जाडी दिसणार नाही जी आहे ती अगदी छोटीशी लहान झुडुप आहेत. सर्व प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लढत आहोत. प्राथमिक हा जो त्यांचा अहवाल होता त्याचं स्वागत असेल पण खूप काही गोष्टी आहेत खूप काही प्रश्न आमचे राहिले आहेत ज्याला उत्तर मिळालं नाही. लवकरात लवकर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावी. लोकांच्या मनात संभ्रम आहे संशय आहे नक्की काय झालं महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर मिळावं. आता उन्हाळा सुरू झाला आहे बारामती तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. 32 गावात जिथे व्यवस्थित पाणी मिळत नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच पाण्याचे नियोजन करायचा प्रयत्न करत आहोत. पूर्वी बारामतीच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळत होतं दादा तिथे पालकमंत्री होते त्यांना तालुक्याची माहिती होती. कुठून पाणी आणि कसं आणायचं होतं हे दादांना तिथे माहिती होतं. आता आपला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. बारामती तालुक्याचा जो जिराईत भाग आहे त्या भागाला या उन्हाळ्यात पाणी कमी पडू दिले नाही पाहिजे. चाऱ्याचा प्रश्न सोडवावा लागेल. शरद पवार यांनी आमदार असताना मुख्यमंत्री असताना जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना या ठिकाणी आणली होती. शिरसाई भागाची पाहणी करून त्या योजनेची आज मी माहिती घेणार आहे पाहणी करणार आहोत. या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची किती आवश्यकता जाणवत आहे ते आपण समजून घेणार आहे त्यांच्यासाठी पुन्हा काम करणार आहे. पुढील आठवड्यात जाणाईची पाहणी असेल किंवा पुरंदर उपसा योजने ची पाहणी असेल ती करेल. नाझरे धरणा मधून देखील खूप पाणी बारामती तालुक्यात येत होतं हे सर्व पाणी आता येत राहिले पाहिजे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच आपण याचा आढावा घेणार आहोत. आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बारामतीच्या हक्कासाठी या जिल्ह्यासाठी लढत राहिला पाहिजे. दादांसारखी दूरदृष्टीचे नेते आज आपल्यात राहिले नाहीत. बारामतीच्या हक्काचं सर्व पाणी आणण्याची जबाबदारी आता आपली सर्वसामान्य नागरिकांची आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 08:30:53
0
comment0
Report
Advertisement
Back to top