Back
मोहोल अनगर नगरपंचायत: राजन पाटील के बेटे बालराजे ने अजित पवार को चुनौती दी
AAABHISHEK ADEPPA
Nov 19, 2025 12:47:07
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मोहोळचे माजी आ. राजन पाटलांच्या सुपुत्राचा थेट अजित पवारांना चॅलेंज, पाटील परिवारानी नंतर व्यक्त केली दिलगिरी
- अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर गावात मोठा जल्लोष
- जल्लोषा दरम्यान माजी. आ. राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांचे थेट अजित पवारांना चॅलेंज
- जल्लोषावेळी केलेले वक्तव्य हा नावधानाने झाले असून पाटील परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहित পवार यांनी बाळराजे पाटलांच्या वक्तव्यावरून माजी. आ. राजन पाटलांचे टोचले कान
संपूर्ण राज्यात अनगर नगरपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. अनगर नगरपंचायतची निवडणूक गेल्या 70 वर्षांपासून बिनविरोध करण्याची परंपरा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत मोहोळ चे माजी आमदार तथा भाजपाचे नेते राजन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांच्या राजकीय संघर्षामुळे राज्यभरात चर्चेत आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने दिला सत्तर वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणूकित उज्वला थिटे यांच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार देण्यात आला. सुरुवातीच्या काळात उज्वला थेटे यांना अनगर नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरू दिला जात नसल्याच्या कारणावरून प्रचंड आरोप - प्रत्यारोप पाहायला मिळाले. अर्ज छाननीच्या दिवशी उज्वला थेटे यांचा उमेदवारी अर्ज सुचक नसल्याच्या कारणाने रद्द करण्यात आला आणि हा राजकीय संघर्ष आणखी वाढला.
अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत असल्याचे समजतात राजन पाटील समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. या जल्लोषावेळी माजी आमदार राजन पाटील यांचे मोठे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी "अजित पवार अनगरकरांचा नाद करायचा नाही" असे वक्तव्य करत थेट अजित पवारांनाच चॅलेंज केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी राजन पाटील आणि त्यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
बाईट -
उमेश पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष )
राजन पाटील समर्थकांनी केलेला हा जल्लोष नव्हता तर त्यांची विकृती होती अशी जहरी टीका उज्वला थिटे यांनी केलीय. पवारांच्या घराण्याला हाताशी पकडून यांनी 40 वर्षे राजकारण केले आणि सत्ता गाजवल्याचे सांगत टीका केली. तसेच बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध देखील नोंदवला.
बाईट -
उज्वला थिटे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अर्ज बाद झालेल्या उमेदवार )
हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आमच्या गावात केव्हाही निवडणूक झाली नाही. त्यामुळे तरुण पोरं थोडीशी उत्साही होती. त्यामुळे माझ्या मुलाच्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही. माझ्या मुलाकडून अनावधानाने चूक झालीय. माझ्या दृष्टीने राजकारणात तो लहान असून आपल्या मुलांप्रमाणे त्यांना समजून घ्यावे. आतापर्यंत जे मोठे साम्राज्य निर्माण केलंय त्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. शरद पवार यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि विनंती करतो की आता हा विषय इथेच संपवा....
बाईट -
राजन पाटील ( मोहोळ माजी आमदार तथा भाजपा नेते )
चॅलेंज वगैरे काही नाही उत्साहाच्या भरामध्ये माझ्या तोंडून गेलं असेल... गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे कार्यकर्ते आमच्या गावाला आमच्या कुटुंबाला खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत... पाच वर्षे आम्ही हे सगळं अजित दादांकडे बघत सहन करत गेलो अशा भावना बाळराजे पाटील यांनी व्यक्त केले आहेत...
बाईट -
बाळराजे पाटील ( माजी आमदार राजन पाटील यांचे मोठे सुपुत्र )
End p2c
अनगर नगरपंचायतीच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले असून राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष आणखी विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय...
( अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी )
168
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 19, 2025 13:49:400
Report
SKShubham Koli
FollowNov 19, 2025 13:37:3541
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 19, 2025 12:34:07138
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:33:27173
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:31:32152
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 12:21:1472
Report
ABATISH BHOIR
FollowNov 19, 2025 12:20:59188
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:19:33166
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:03:53149
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 11:51:0936
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 19, 2025 11:50:3883
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 11:36:28157
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 11:26:4083
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:25:06115
Report