Back
वसई में लग्न के तगादे पर मामा ने भतीजी को ट्रेन से ढकलकर मारा
PTPRATHAMESH TAWADE
Nov 19, 2025 11:50:38
Vasai-Virar, Maharashtra
मामाकडून लग्नाचा तगादा , लग्नाच्या वादात भाचीला ट्रेनमधून ढकलून केले ठार
भाईंदर- वसई रेल्वे स्थानक घडला प्रकार
आरोपी मामाला प्रवाशनीच पोलिसांना दिले पकडून
आरोपी मामाला पोलिस कोठडी
अँकर - वसईच्या सातवली परिसरातील एका मुलीच्या अपहरण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हातात धक्कादायक माहिती लागली आहे. आपल्या मामासोबत प्रेमसंबंधात असलेल्या मुलीला लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिच्याच मामाने रेल्वेतून ढकलून देऊन ठार केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अर्जुन सोनी याला अटक केली असून वसई न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल सोनार हिचे तिच्या सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. कोमल त्याच्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावत होती. या पाश्र्वभूमीवर १६ नोव्हंबर रोजी कोमलची मामी अंजली सोनार हिने वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती.
पोलिसांच्या तपासात १७ तारखेच्या दुपारी ही घटना घडल्याचे उघडकीस आले. कोमल आणि अर्जुन हे चर्चगेट–विरार फास्ट लोकलने प्रवास करत असताना भाईंदर–वसई दरम्यान, वादाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनने कोमलला ट्रेनमधून ढकलून दिले. ती खाली पडून ठार झाली.
ट्रेनमधील प्रवाशांनी तत्काळ आरोपीला पकडून वसई रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. अपहरणाचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात असल्यामुळे आरोपीला पुढील तपासासाठी वालीव पोलिसांकडे सोपवण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात मामा–भाचीचे प्रेमसंबंध आणि त्यातून उद्भवलेले वादामुळे खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
— दिलीप घुगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे
83
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 19, 2025 12:47:0718
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 19, 2025 12:34:0771
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:33:2769
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:31:3215
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 12:21:1455
Report
ABATISH BHOIR
FollowNov 19, 2025 12:20:59186
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:19:3390
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:03:5333
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 11:51:0936
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 11:36:28157
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 11:26:4083
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:25:06115
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:20:49160
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 11:03:34167
Report