Back
सोलापूर ST स्टँड की अव्यवस्था पर मंत्री ने आगार प्रमुख को निलंबित किया
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 12:20:14
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरच्या एसटी स्टॅन्डची अवस्था पाहून परिवहन मंत्र्यांचा संताप, आगार प्रमुखला मंत्र्यांनी केलं जागेवर निलंबित. सोलापूरच्या स्टॅन्डच्या स्वच्छता पाहण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली कारवाई. मागील आठवड्यात सरनाईक यांनी सोलापूर बस स्टॅन्डची पाहणी केली होती त्यावेळी एसटी स्टॅन्ड हे अस्वच्छतेचे आगार बनल्याचे मंत्र्याच्या लक्षात होते. आठवडाभरात सुधारणा करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या होत्या मात्र त्यानंतर देखील सुधारणा न झाल्याने अखेर परिवहन मंत्र्यांनी आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे याना निलंबित करण्याचे आदेश दिलेत. सरनाईक ऑन निलंबन आदेश. मागच्या आठवड्यात मी अचानक आल्यावर प्रचंड भयानक आणि विदारक अवस्था दिसली. सोलापूर एसटी स्टॅन्ड हे अस्वछतेचे आगार बनले होते, पिण्याच्या पाण्याची ठिकाणी देखील स्वच्छता नव्हती. प्रत्येक वेळी कारवाई करणे योग्य नाही म्हणून मी आठवडाभरात सुधारणा करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर देखील सुधारणा नाही, पिण्याच्या पाण्याची केवळ एक तोटी सुरूय. नाईलजाने मला आगार प्रमुखला निलंबीत करावे लागत आहे, जनतेला सुविधा मिळावी हा आमचा उद्देश आहे. जर राज्यभरात एसटी स्टॅन्डवर स्वच्छता झाली पाहिजे, पण कारवाई केल्यानंतर डोळे उघडणार असतील तर आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. ऑन राज-उद्धव भेट. राज उद्धव एकमेकांच्या घरी चहा, जेवणला गेलेत तरी तुम्ही बातम्या करता. ते एक कुटुंब आहेत एकमेकांच्या सुख दुखत जातं असतील तर जायला दिलं पाहिजे. आमच्यामुळे हे दोन भाऊ एकत्रित आलेत यांचा आम्हाला आनंद आहे, तुम्ही राजकीय म्हणून बघू नका. ऑन राणे बंधू वाद. हा दोन भाऊ भांडण नाहीत, पैशाच्या वाटपच्या तक्रारी असताना त्यांनी त्यांची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली यात चूक काय? निलेश राणे हे शिवसनेचे आमदार, नितेश राणे मंत्री आहे ते दोघे त्यांची भुनिका मांडतात. लोकांचे प्रश्न ते पुढे आणण्याचं काम करतायत त्यांचटले हे भांडणं नाही. ऑन 2 डिसेंबर युती. रविंद्र चव्हाण यांनी दोन तारीख कुठली हे सांगितलं का? त्यांनी दोन डिसेंबर 2025 म्हटलं का? की 2035, 2045 म्हटलेत का? रविंद्र चव्हाण हे आमचे मित्र माझे तर बालपणाचे मित्र आहेत. ऑन शाळकरी विद्यार्थी बस. राज्यात आम्ही सूचना केल्या आहेत शाळकरी मुलं वेळेत घरी पाहोचले पाहिजेत. एसटी महामंडळाने आम्ही एक हॉटलाईन नंबर जाहीर केलाय. जर आपल्या तक्रार असतील तर विद्यार्थी त्या नंबरवर थेट संपर्क करू शकतील. मला आनंद आहे की परिवहन मंत्री सरकार दखल घेतंय न्हणून विद्यार्थ्यांना बळ मिळालं आहे. बाइट : प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 12:40:100
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 28, 2025 12:20:36114
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 12:18:5470
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 28, 2025 12:16:5754
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 12:06:5457
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 11:51:17117
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:50:0174
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 11:48:5798
Report
ABATISH BHOIR
FollowNov 28, 2025 10:45:28145
Report
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 09:36:35115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 09:30:40185
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 28, 2025 09:16:53121
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 09:07:12124
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 09:06:55192
Report