Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

बार्शी डिपो की लापरवाही से स्कूल की छात्राओं को तीन घंटे बस का इंतजार

AAABHISHEK ADEPPA
Nov 18, 2025 03:31:57
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी आगाराचा निष्काळजीपणा, विद्यार्थिनी बसच्या प्रतीक्षेत तासंतास ताटकळत - बार्शी आगाराच्या निष्काळजीपणाचा विद्यार्थिनींना फटका - बार्शी आगाराच्या चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थिनी तासंतास एसटी बसच्या प्रतीक्षेत - वैराग ते यावली दरम्यान धावणारी एसटी बसच तीन तास उशिरा आल्याने शालेय विद्यार्थिनींचे हाल - विद्यार्थिनींची गैरसोय लवकरात लवकर कमी करण्याची मागणी
158
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Nov 18, 2025 04:52:25
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 04:51:55
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेच्या निवडणुकीपूर् पुन्हा दहा रस्त्यांवर पाडापाडी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. जून आणि जुलै महिन्यात महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर रुंदीकरण मोहीम राबविली. जवळपास साडेपाच हजार बाधित मालमत्ता पाडण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा प्रशासनाने पाडापाडी मोहीम सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी दहा रस्त्यांची यादीही तयार करण्यात आली. विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद केले जातील. या मोहिमेची सुरुवात पडेगाव रोडवरील सरोश शाळेसमोरून केली जाईल. एमजीएम गोल्फ क्लबपर्यंतचा रस्ता मोकळा केला जाईल. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई सुरू होईल, अशी अपेक्षाही सूत्रांनी वर्तविली. महापालिकेने आतापर्यंत ज्या रस्त्यांवर पाडापाडी केली ते रस्ते तयार करण्यासाठी शासनाकडे साडेतीन हजार कोटी रुपयांची मागणी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या दहा रस्त्यांवर होणार पाडापाडी : पडेगाव-मिटमिटा १ मुख्य रस्ता ते गोल्फ कोर्सपर्यंत नगरनाका ते 3 महापालिका हद्द कांचनवाडी मुख्य 3 रस्ता ते लॉ विद्यापीठ रेणुका माता कमान ते उमरीकर लॉन्स सातारा परिसर हसूल टी पॉईंट ते मनपा हद्द सेव्हन हिल चौक ते भाजीवाली बाई पुतळा महावीर चौक ते जळगाव टी पॉईंट (व्हीआयपी रोड) चंपा चौक ते जालना रोड (तीन टप्प्यांत होणार मोहिम) क्रांती चौक ते पैठणगेट हर्मूल कारागृह ते अंबर हिल
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 04:51:34
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : राजू शिंदे आज पुन्हा भाजपात प्रवेश करणार, ताफा मुंबईकडे रवाना विधानसभा निवडणुकी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेले राजू शिंदे आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजू शिंदे आज पहाटेच वाहनांचा ताफा घेऊन छत्रपती संभाजी नगर येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजू शिंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून राजू शिंदे हे भाजप पक्षप्रवेशासाठी इच्छुक होते. मात्र भाजपसह मित्र पक्षांचा राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. त्यामुळे दीड वर्षांपासून राजू शिंदे हे भाजप पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर होते.मोठ्या विरोधानंतर आज राजू शिंदे यांचा पक्षप्रवेश मुंबई येथे पार पडणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 18, 2025 04:51:17
Washim, Maharashtra:वाशिम चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशा पाचही ठिकाणच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी विविध पक्षांकडून उमेदवारांनी मोठ्या संख्येने नामांकन अर्ज दाखल केले. यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे.जिल्ह्यात महायुतीची सांगड चारही ठिकाणी जुळू शकली नाही, केवळ रिसोडमध्ये महायुती झाली आहे.मात्र महाविकास आघाडीने एकत्र राहण्यात यश मिळवले आहे.तरीदेखील,कोण कुठून लढणार याचे वास्तविक चित्र उद्या १९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट होणार आहे.विविध राजकीय पक्षांनी काही ठिकाणी युती,काही ठिकाणी मैत्रीपूर्ण स्पर्धा, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.स्थानिक पातळीवरील गटबाजी,स्वतंत्र उमेदवारांची संख्या,तसेच विविध आघाड्यांची व्यूहरचना यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे राजकीय समीकरण दिसत आहे.विशेषकरुन वाशिम जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून मतदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांत स्थानिक राजकारणात आणखी हालचाली वेग घेतील,अशी चिन्हे आहेत. वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एक नगरपंचायत करिता मुख्य पक्षाचे अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज वाशिम नगर परिषद अध्यक्ष पदासाठी १)अनिल केंदळे- भाजप. २)रेखा सुरेश मापारी - शिवसेना UBT ३)वैभव नितीन उलेमाले- वंचित बहुजन आघाडी. ४)रवी भांदुर्गे -(अपक्ष )शिंदेची शिवसेना ५) मो. काझीम AIMIM ६)नागोराव ठेंगडे शिवसेना,UBT कारंजा नगर परिषद अध्यक्ष पदासाठी १)फरीदा बानो पूंजानी (MIM) २)निशा विनीत गोलेच्छा (भाजपा) ३)फिरदौस सैय्यद नसीरुद्दीन खतीब (वंचित) ४)नाजिया खानम जुनैद खान (अजित पवार) ५)शाहिना परवीन अब्दुल राजिक (कांग्रेस) ६)अलका हरीश हेडा (राठौर) मनसे पुरस्कृत ७) वैशाली येळने-शिवसेना शिंदे गट मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी १)गणेश रामप्रसाद अहिर, काँग्रेस (मविआ ) २) ओमप्रकाश खुरसडे- शिवसेना शिंदे गट. ३) नागेश बळी -भाजप ४) रहमान शाह -वंचित बहुजन आघाडी मंगरूळपिर- नगर परिषद अध्यक्ष पदासाठी १)अशोक परळीकर -राष्ट्रवादी अजित पवार. २)शादाब अहमद रियाज अहमद कुरेशी-वंचित बहुजन आघाडी. ३) डॉ. दिलीप रत्नपारखी-भाजप. रिसोड नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 18, 2025 04:46:58
Latur, Maharashtra:लाडक्या बहिणींना केवायसी करण्यास एकच दिवस शिल्लक. केवायसी करून घेण्यास महिलांची गर्दी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दर महिन्याला मिळणाऱ्या दीड हजार रूपयांसाठी बहिणींना केवायसी करून घेण्यास सांगितले आहे. केवायसी करण्याची आजचा शेवटचा दिवस आहे. या मुदतीत केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित राहवे लागणार आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. केवायसीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचा कात्री लावण्याचे काम होत असल्याचा आरोप ही लाडख्या बहिणीकडून केला जात आहे. केवायसी करण्यासाठी बँक, खाजगी ई केंद्र सेवावर लाडक्या बहिणींची गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
101
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 18, 2025 04:46:41
115
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 18, 2025 04:19:28
Bhandara, Maharashtra:राष्ट्रवादी, भाजपा बंडखोर उमेदवाराच्या मदतीला.... तुमसर येथे राष्ट्रवादी आमदार राजू कारेमोरे यांच्या पत्नी व माजी खासदार मधुकर कुकडे बंडखोर बंडखोर उमेदवाराच्या रॅलीत. राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकी करीता काल सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी पहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सागर गभणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची पत्नी व भाजपा नेते माजी खासदार मधुकर कुकडे देखील सहभागी झाले होते. राष्ट्रवादी तर्फे अभिषेक कारेमोरे व भाजपा तर्फे प्रदीप पडोळे यांना तिकिट झाल्याने दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. अशा बंडखोरीला राष्ट्रवादी कशी पेलवते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे भाजपा नेते व माजी खासदार मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी बंडखोर उमेदवारासोबत असल्याने भाजपा मध्ये देखील नाराजीचा सूर पहायला मिळत आहे...
25
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 18, 2025 04:19:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजू खरे करणार शिंदे सेनेचा प्रचार - मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार राजू खरे करणार शिंदे सेनेचा प्रचार - आ. राजू खरे हे आमच्या सोबतच असणार असून त्यांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा, सक्रिय सहभाग असणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांची माहिती - मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना देखील आ. राजू खरे यांची पक्षाच्या विरोधात भूमिका - मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक शिंदेंची सेना आणि अजित पवार गट हे एकत्रित लढवत असून याठिकाणी शिंदे सेनेच्या वतीने सिद्धी वस्त्रे यांना उमेदवारी देण्यात आलीय - यापूर्वी अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कौतुक केल्यानंतर आ. राजू खरे आता उघडपणे करणार अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार - दोनच दिवसांपूर्वी सोलापूरात झालेल्या शरद पवारांच्या एका कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित असणारे आ. राजू खरे नेमके कोणाचे ? - जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या विद्यमान आमदाराची मात्र धडधडीत पक्षाच्या विरोधात भूमिका - आमच्यासाठी चिन्ह महत्त्वाचे नसून राजन पाटील गट आणि त्याच्या विरोधातील गट हेच महत्त्वाचे असल्याचे उमेश पाटलांचे वक्तव्य बाईट - उमेश पाटील ( राष्ट्रवादी AP )
81
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 18, 2025 04:18:49
Dharashiv, Maharashtra:धाराशिव धाराशिवच्या कळंब नगरपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कळंब नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक आखाड्यात तरी भाजप आणि शिवसेनेची महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत काँग्रेसची आघाडी कळंब नगरपरिषदेत तिरंगी लढत होणार धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. जागा वाटपाचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला ठरवत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र निवडणूक आखाड्यात आहे. त्यामुळे कळंब नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
56
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 18, 2025 04:18:18
Akola, Maharashtra:शेतकऱ्यांचा अगदी महत्त्वाचा रब्बी हंगाम लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पिकांची उच्च प्रतीची, अनुवंशिक शुद्धता असलेली व सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. शाश्वत उगवण क्षमता आणि सर्वोत्तम गुणवत्तेची खात्री देत विद्यापीठ प्रशासनाने शेतकरी बांधवांना थेट विद्यापीठातूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठात यंदा उपलब्ध असलेल्या प्रमुख पीक वाणांमध्ये.. हरभरा : पीडीकेव्हीं कनक, पीकेव्हीं काबुली-2, जॅकी-9218, पीडीकेव्हीं कांचन. गहू : पीडीकेव्हीं सरदार, पीडीकेव्हीं वाशीम, AKAW-4627. करडई : पीकेव्हीं पिंक, AKS-207. रब्बी ज्वारी : पीकेव्हीं क्रांती. जवस : NL-260. मोहरी : TAM-108-1. कांदा : अकोला सफेद. या सर्व वाणांचे अधिशेष ‘ब्रिडर’ बियाणे शेतकऱ्यांसाठी सत्यप्रत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यापीठाकडून गुणवत्तेची हमी देण्यात आली आहे. जिल्हानिहाय उपलब्धता हरभरा : अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा. गहू : अकोला, वाशिम, अमरावती. करडई : वर्धा, चंद्रपूर, अकोला. रब्बी ज्वारी : अकोला, चंद्रपूर, वाशिम. जवस : नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, अकोला. मोहरी : नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला. कांदा : अमरावती, अकोला. विदर्भासह राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ही बियाणे विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर उपलब्ध केली आहेत. तसेच बियाणे खरेदीसोबतच लागवड तंत्रज्ञान, उगवणीनंतरच्या उपाययोजना आणि पिक व्यवस्थापनाबाबत माहिती घेण्याचेही आवाहन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.शेतकरी बांधवांनी गुणवत्तेची हमी असलेली बियाणे कृषी विद्यापीठातून खरेदी करून रब्बी हंगाम अधिक यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
39
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 18, 2025 04:16:51
Nagpur, Maharashtra:live u ने फीड पाठवले नागपूर पंकज भोयर गृहराज्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक कार्यकर्ते लढतात.. त्यामुळे स्थानिक पातळीवर कुठे स्वबळावर लढायचं की महायुती म्हणून लढायचं याबद्दल वरिष्ठांनी सर्व अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते.. त्यामुळे बहुतांश ठिकाणी भाजपा मजबूत असल्याने त्याठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. उमेदवारांची पळवापळव क्वचित काही ठिकाणी घडल आहे.. एक-दोन ठिकाण सोडले तर प्रत्येक ठिकाणी पक्षाचेच कार्यकर्ते लढत आहे.. शालार्थ आयडी घोटाळा. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी त्याची व्याप्ती पाहता राज्यस्तरीय एसआयटी गठीत करण्यात आली आहे.. त्या मार्फत सर्व चौकशी सुरू आहे.. परंतु कोणाचा दोष नसताना त्यांचे पगार रखडले असतील तर त्या ठिकाणी तातडीने त्यांचे पगार देण्याचे निर्देश देण्यात येतील.. ए ekyc मुदत लाडक्या बहिणींना e केवायसी करण्यासाठी कालावधी कमी पडत असेल तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल.. मेळघाट मृत्यू या संदर्भात ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार.. ठाकरे बंधू युती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा मनसे यांचा जमिनीवर बेस न राहिल्याने.. मतदार त्यांच्या मागे नाही..म्हणून सर्व निवडणुकीत त्यांना अपयश झाला आहे.. किमान एकत्र लढल्यावर काही आपले उमेदवार निवडून येतील याची चाचपणी दोन्ही बांधवांच्या माध्यमातून चालू आहे.. अमेडीया कंपनी मुदत वाढ त्या ठिकाणी चौकशी समितीचे गठन केला आहे, त्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही होईल..
28
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 18, 2025 04:16:32
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री निवडणूक बंडखोरी - जे अपक्ष लढत आहेत त्यांना आमचे त्या त्या भागातील प्रभारी, जिल्ह्या जिल्ह्यातील प्रभारी संवाद करणार आहेत आणि मला विश्वास आहे कि विथड्रॉल पर्यंत अपक्षांचे अर्ज, आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत ते नाराज होते आम्ही परत घेऊ, त्यांना आम्ही विनंती करू निवड प्रक्रियेत एखाद्याला न्याय मिळतोय एखाद्याला मिळत नाही, त्यामुळे आमचा कार्यकर्ता हा पक्षासाठी समर्पित आहे, तो त्या ठिकाणी आपली उमेदवारी परत घेईल सात-आठ वर्षांनी निवडणुका होत आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाढतो की निवडणुका लढाव्या त्यामुळे इतक्या दिवसांनी निवडणुका झाल्याने प्रत्येकाला अपेक्षा आहे, पण साधारण आम्ही उमेदवारी अर्ज वापस घ्यायची जी तारीख आहे तोपर्यंत बऱ्यापैकी बंडखोरी कमी झालेली दिसेल मुंबई महापालिका - आम्ही महायुतीत जातो आहे, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, अमित साटम सर्व नेते एकत्र बसू, अजित पवार आणि शिंदे एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही लढतोय, आणि मला विश्वास आहे मुंबई शहर बदलत आहे डबल इंजन सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या जनतेच्या अपेक्षा आहेत आणि मुंबई आम्हाला निवडून देईल निवडणूक सर्व्हे - सर्वे बाबत चर्चा करणे योग्य नाही पण हे मात्र खर आहे कि आम्ही 51% मत घेऊन मुंबई महानगरपालिकेत महायुती निवडून येईल मेळघाट बालमृत्यू - मेळघाट मध्ये आहे तो आता बऱ्यापकी कमी झाला, उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे आणि या ठिकाणी खूप प्रयत्न करतो आहे पण कालपेक्षा आज कमी आहे कालांतराने हे कमी होत चाललाय पण ते भूषणावह नाही, ते आम्ही पूर्ण कमी करण्याच्या मागे लागलेला आहे, त्या बाजूने आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे टीम काम करताय लवकरच निर्णय चांगला येईल पार्थ पवार मुदतवाढ - जेव्हा आपण नोटीस देतो, पहिले नोटीस दुसरी नोटीस नियमाने द्यावे लागते, असं नाही की पहिल्याच नोटीसीत निर्णय घेतो, पण नोटीस त्यांना दिलेली आहे मुदतवाढ दिलेली आहे कायद्यामध्ये आहे त्या नियमाने त्यांनी मुदत वाढ दिली अंजली दमानिया - अंजली दमानिया यांनी काय आरोप लावले ते लिखित स्वरूपात जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा चौकशी करू
74
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 18, 2025 04:01:14
66
comment0
Report
Advertisement
Back to top