Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

Nilesh Rane's alliance didn’t form; Shiv Sena gets support in Kankavli — campaign begins

UPUmesh Parab
Nov 20, 2025 01:19:12
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --- आमदार निलेश राणे आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही त्यांना आमच्या सोबत युती करायची नहोती, ज्यांना आमच्या सोबत युती करायची आहे त्यांच्या सोबत युती झाली. म्हणून मी प्रचारासाठी कणकवली मध्ये आलो. ऑन प्रचार सभा --- आमच्या स्टार प्रचारकांची 40 ची यादी आहे, कोणी येऊ शकतात. नाव नंतर जाहीर करू आम्ही शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत.. ऑन युती विरोध --- जिल्ह्यात युती होऊ नये म्हणून बाहेरून विरोध होता जिल्ह्यातून नहोता राणे साहेब अजूनही युती साठी आग्रही आहेत. आता युती होईल अस वाटत नाही आणि साहेबांनी ( नारायण राणे ) आता तुम्ही थांबू नका तुमचाही मोठा पक्ष आहे अस सांगितलं आहे. वेळोवेळी किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आणि किती बैठका घ्यायच्या त्याला काही तरी मर्यादा आहेत. जे उत्तर आलं ते समाधान कारक आले नाही. शिवसेनेला जिथे चांगलं वातावरण आहे तिकडे आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार ऑन निकाल --- कणकवली मध्ये शहर विकास आघाडी आणि इतर तीन ठिकाणी शिवसेनेचा झेंडा लागणार ऑन नारायण राणे युती तोडणार -- राणे साहेबांचं मी अस स्टेटमेंट ऐकलं नाही, अस राणे साहेब बोलले नाहीत.. राणे साहेबांची आणि शिंदे साहेबांची परवानगी घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत. लपून छपून नाही ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी जेवढ योगदान द्यायचं आहे तेव्हढ देणार ऑन प्रचार --- संदेश पारकर जिकडे बोलावतील तिकडे यावं लागणार हा पॅटर्न राज्यभर देखील होऊ शकतो ऑन निलेश राणे कौतुक ( नितेश राणे ) --- जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झाला नाही ते ( नितेश राणे) पालकमंत्री आहेत. नात नात असतं ते तुटत नाही तुटणारही नाही. भाजपाच्या वरच्या स्तरातून निर्णय घेतले गेले. राणे साहेबांना सांगून आम्हीं हा निर्णय घेतलाय ऑन निवडणूक मुद्दे --- शहर हे 21 व्या शतकातील दिसलं पाहिजे. मागच्या 10 वर्षा पेक्षा जे बघितलं त्यापेक्षा चांगलं काय देऊ शकतो आमचा तो प्रयत्न राहील. ऑन फोन करा ( धमकी फोन ) आणि --- धमकीच्या अनुषंगाने घेऊ ना इतर गोष्टीतही कार्यकर्त्यांना गरज लागेल ऑन स्वबळाचा नारा ( भाजपा ). -- त्यांच्या पार्टीत काय होत ते मी बघायला आत बसलो नाही पण आम्ही ज्या नेत्यांसोबत संपर्क साधला असता आम्हाला जे थांबवलं गेल त्यावरून आम्ही समजलो हे जिल्ह्यातून नाही बाहेरून होतय.. ऑन प्रचार सभा --- आज शिवसेनेची प्रचार सभेची सुरवात झालीय बाकीच नियोजन बद्द प्रचार करू आमदार निलेश राणे
186
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Nov 20, 2025 03:17:38
Beed, Maharashtra:मागील अनेक वर्षात बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू होता. याची तक्रार देखील करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत बीड जिल्ह्यातील दोन शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांचा निलंबनात समावेश आहे. नागनाथ शिंदे हे सध्या लातूरचे शिक्षणाधिकारी आहेत. बीड जिल्ह्यात या दोघांविरोधात गंभीर तक्रारी होत्या. निलंबनाच्या काळात त्यांच्यावर चौकशी देखील लादण्यात आली असून या दरम्यान जिल्हा न सोडण्याचे सक्तीचे आदेश आहेत. दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 03:16:20
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 03:04:23
Kolhapur, Maharashtra:कागल मध्ये मंत्री मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे एकत्र आल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक ॲक्शन मोडवर. कागल नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विरोधी उमेदवाराला नेले अज्ञातवासात नगराध्यक्ष पदाच्या रिंगणातील उमेदवारावर राजकीय दबाव वाढत चालल्याच्या कारणावरून विरोधी उमेदवारांना नेते अज्ञातवासात माघारीची मुदت संपल्यानंतर विरोधी उमेदवारांना कागल मध्ये आणले जाईल. कोणत्याही परिस्थितीत कागल नगरपालिका निवडणुकीतन माघार घ्यायची नाही प्राध्यापक संजय मंडलिक यांची भूमिका. कागल मध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे यांच्या विरोधात संजय मंडलिक आक्रमक संजय मंडलिक यांनी भाजप नेते संजय घाटगे यांची देखील घेतली भेट.
70
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 20, 2025 03:02:26
Nashik, Maharashtra:नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी दिसून येत आहे. या मध्ये शिवसेना उबाठा गटाकडून या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात एक जागा वगळता इतर ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मनसे आमच्या सोबत असून मनसैनिक आम्हाला मदत करत असल्याचे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. तर ही निवडणूक धन शक्ती विरुद्ध जण शक्ती असून जनता आमच्या सोबत असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. प्रत्येक तालुका आणि नगरपालिकेची स्थानिक परिस्थिती वेगळी असून, जिथे जिथे शक्य तिथे आम्ही लढत आहोत, संघर्ष करत आहोत. ही निवडणूक म्हणजे धन शक्ती विरुद्ध जण शक्ती अशी आहे. सत्ताधारी पक्षातील धनुषबान, कमळ आणि घड्याळ समोरासमोर लढत आहे, प्रत्येकासाठी ही प्रत्येकाच्या वर्चस्वाची लढाई दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र जनता शंभर टक्के आमच्या सोबत आहे. तर सिन्नर ओझर, भगूर, मनमाड येथे आम्ही स्वबळावर लढत असून, इगतपुरी येथे मात्र महाविका आघाडी मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत लढत आल्याचे देखील यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट केले.
87
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 03:02:03
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये राज्यातील 26 सहकारी बँकांनी घेतली धाव. सहकारातील नव्या नियमाने सहकारी बँकेमधील निम्मे संचालक अपात्रतेची शक्यता असल्याने नागरी बँक असोसिएशनच्या माध्यमातून कोर्टात धाव. देशात सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यामुळे आता सर्व निर्णय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जात आहे सलग दहा वर्षे संचालक पदी राहता येईल हा यापूर्वी कमर्शिअल बँकांना लागू असलेला नियम आता सहकारी बँकांना लागू या नव्या नियमामुळे सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या संचालक अपात्र होण्याची शक्यता असल्याने नागरी बँक असोसिएशन उच्च न्यायालयात. कायदा झाल्यापासून पुढे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरी बँक असोसिएशनची धाव. राज्यात एकूण 458 सहकारी बँका, प्रत्येक बँकेत साधारण 17 ते 19 संचालक. नव्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास निम्याहून अधिक संचालक अपात्र ठरून राजकारण बदलण्याची शक्यता.
20
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 20, 2025 02:47:03
Shirdi, Maharashtra:नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात मेन रोडवरील दुकानांना भीषण आग , आठ दुकाने जळून खाक.. अचानक लागलेल्या आगीने नेवासा शहरात खळबळ... मेनरोडवरील सलून , मोबाईल शॉप, बॅग हाऊस, प्रसाधनालय, कोल्ड्रिंक्स शॉप, गॅस शेगडी रिपेरिंग, केक शॉप व किड्स वेअर— सर्व दुकाने जळून खाक.. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट ; तपास सुरू... सुमारे 2000 नागरिक मदतकार्यासाठी धावून आले मोठी मानवी साखळी निर्माण.. नेवासा नगरपंचायत व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल.. आग विझवण्यात यश मात्र व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान...पोलीस प्रशासनातर्फे परिसर सील ; गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू..
194
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 20, 2025 02:45:20
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात 27 हजार लाडखा बहिणी अपात्र ठरविण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी शासनाकडून जिल्ह्यातील 73 हजार 375 बहिणींच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली होती. अँगणवाडी सेविकांनी महिलांच्या घरी पडताळणी केली. पडताळणीचा अहवाल प्राप्त झाला असून, 27 हजार 69 लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येणार आहे. अपात्रतेचा प्रस्ताव महिला आणि बाल कल्याण खात्याकडे सादर झाला आहे. निर्णय झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात रक्कम येणे बंद होईल. एकाच कुटुंबातील तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही अनेक युक्त्या करून 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झालेले आहे. जिल्ह्यात 73 हजार 375 लाभार्थी महिलांची यादी प्रशासनास प्राप्त झाली होती. अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पडताळणी केली. मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली होती. राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या याद्या तपासण्याचे काम मुंबई येथून झाले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थींच्या नावांची पडताळणी करून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र केले जाणार आहे. जालना जिल्ह्यात योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण लाभार्थी महिलांची संख्या 4 लाख 64 हजार 694 एवढी आहे.
185
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 20, 2025 02:33:56
219
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 20, 2025 02:32:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात यंदा थंडीचा दररोज नवा रेकॉर्ड होतो आहे. 10 दिवसांत किमान तापमान तीन अंशांनी घसरले आहे. शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. नोव्हेंबर महिन्यात रोज किमान तापमान घसरण्याचा रेकॉर्ड होतो आहे. मंगळवारी दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले, तर कमाल तापमान 27.7 अंशांवर होते. काल किमान तापमान 10.5 अंशावर गेले. कमाल तापमान 30.2 अंशांवर होते. या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान काल नोंदविले गेले. सकाळी थंड वाऱ्यासह हुडहुडी भरते आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे, तर सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे. 22 ते 23 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल, असे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.
47
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 02:31:57
Bhandara, Maharashtra:तो सहायक शाखा व्यवस्थापक म्हणतो, कर्ज फेडण्यासाठीच घातला दरोडा... आरोपीची कबुली... भंडारा जिल्ह्यात स्वतः कार्यरत असलेल्या बँकेतच सहायक शाखा व्यवस्थापकाने केला हात साफ. ऑनलाइन गेमींग, बेटींग व शेअर ट्रेडींगच्या नादात लाखोंचे कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी सीतासावंगीतील कॅनरा बँकेत आपण चोरी दरोडा घातला, अशी कबुलीच पोलिसांच्या तपासात बँकेच्या शाखा सहायक व्यवस्थापक मयुर नेपाळे याने दिली. शाखा सहायक व्यवस्थापक याला ऑनलाइन गेर्मीग, बेटींग व शेअर ट्रेडींगचा नाद जडला होता. याच नादात त्याच्यावर तब्बल ८० लाख रुपयांचे कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठीच त्याने दरोड्याची योजना आखली. दरोडा घालताना त्याने रोख रकमेसह बँकेतील डिव्हीआर मशीनही चोरून नेली होती. दरम्यान त्याच्याकडून ९६ लाख १२ हजार रोख व अन्य साहित्य जप्त केले.
169
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 20, 2025 02:31:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अतिवृष्टी नुकसाननंतर शासन मदत वाटपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जी रक्कम मिळते त्यापेक्षा जास्त रक्कम ही पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाली आहे, त्यांच्या आणि आमच्या जमिनी तितक्याच असताना आमच्यावर अन्याय झाला असल्याचं शेतकऱ्यांनी प्रशासनाला सांगितले. या उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार अनुदान हा अन्याय आहे आणि त्यातच प्रशासन निजामाच हस्तक असल्याप्रमाणे शेतकऱ्यांशी वागतय असा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
109
comment0
Report
Advertisement
Back to top