Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा के विडणी में रानगव्य ने राजेंद्र जाधव को घायल किया; रेस्क्यू के बाद मुक्त

TTTUSHAR TAPASE
Feb 28, 2026 05:46:22
Satara, Maharashtra
सातारा: फलटण तालुक्यातील विडणी येथे कोकरेवाडी परिसरात जंगली रानगव्याने वस्तीमध्ये तसेच रस्त्यावर धुमाकूळ घालत रस्त्याने सायकलवर निघालेल्या राजेंद्र जाधव यांना गंभीर जखमी केले होते. यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांना कल्पना दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना रात्री उशिरा रानगव्याला रेस्क्यू करण्यात यश आले आहे. यानंतर आज अभयारण्यात या रानगव्याला मुक्त करणार आले.. मात्र काल दिवसभर विडण्यसह परिसरात नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Feb 28, 2026 07:00:54
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 28, 2026 06:46:32
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको , पोलीस बंदोबस्तामध्ये कांदा लिलावाला सुरुवात - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर गडगडले - कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य चौकात शेतकऱ्यांचा रास्ता रोको - कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचा काही काळ एपीएमसी बाहेर ठिय्या - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलीस बंदोबस्तात कांद्याच्या लिलावाला सुरुवात - दोन हजार रुपये भाव अपेक्षित असणाऱ्या कांद्याला केवळ सातशे ते आठशे रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी - लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी संतप्त
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 28, 2026 06:46:15
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 28, 2026 06:18:28
Pimpri-Chinchwad, Maharashtra:डबघाईला आलेल्या महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेन अभय योजना सुरू केलीय. नागरिकांनी त्यांचा थकलेला मालमत्ता कर आणि त्या वरील दंड भरता यावा, या हेतून पिंपरी चिंचवड महापालिकेन अभय योजना सुरू केली आहे. कधी काळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळं महापालिके समोर विकास कामासाठी निधी उभारण्याच मोठ आव्हान आहे. नागरिकांना जर मालमत्ता करात अभय योजनेच्या माध्यमातून सवलत दिली, तर नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांनी थकवलेला मालमत्ता कर भरतील, आणि त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वाढ होईल अशी अपेक्षा महापालिकेला आहे. त्यासाठी महापालिकेने अभय योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत करदात्यांच जवळपास 90% दंड माफ केला जाणार आहे. एक मार्च ते 31 मार्च दरम्यान ही योजना राबवली जाणार आहे. आणि जे करदाते पूर्ण रक्कम एकाच वेळी भरतील त्यांच्यासाठी ही योजना लागू असळे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 28, 2026 06:18:05
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_CHIKEN_PKG सहा फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 चिकनच्या तुकड्यावरून 12 वर्षीय मुलाचा रक्तरंजित शेवट; मुलाच्या मावस भावाने खून केल्याने परिसरात खळबळ, आरोपी अटक अँकर :- अमरावतीच्या भातकुली येथून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात चिकन खाण्याच्या किरकोळ वादातून मावस भावानेच १२ वर्षीय मुलाची लोखंडी वस्तूने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघाताचा बनाव मध्ये आम्ही तपासले नाही कारण पोलिसांच्या तपासात खुनाचा थरारक प्रकार समोर आला. पाहूया झी 24 तासचा हा खास रिपोर्ट… Vo१ : भातकुली तालुक्यात चिकन खाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन मावस भावांमध्ये वाद झाला आणि या वादाने घेतला एका निरागस जीवाचा बळी घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे मृत मुलाचे नाव जितेराजा गौड असून त्याचे वय अवघे १२ वर्षे आहे. दरम्यान आरोपी त्याचाच मावस भाऊ बब्बू गौड असून त्याच वय २१ वर्षे आहे दोघेही मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून कामानिमित्त भातकुलीत राहत होते दोघेही चिकन खाण्यासाठी बसले असता चिकनच्या तुकड्यावरून मोठा वाद झाला आणि वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात आरोपीने लोखंडी वस्तूने जितेराजावर वार केला त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा घरातच मृत्यू झाला Vo२: घटनेनंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यात आले मृतकाच्या वडिलांनी पोलिसांत अपघाताची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांना संशय आल्याने सखोल तपास सुरू करण्यात आला वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळावरील पुराव्यांवरून हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी आरोपी बब्बू गौड याला अटक केली तसेच खोटी तक्रार दिल्याप्रकरणी मृतकाच्या वडिलांनाही आरोपी करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. बाईट :- रवींद्र राजुलवालकर, पोलीस निरीक्षक भातकुली Vo३: चिकनसारख्या क्षुल्लक कारणावरून एका निरागस बालकाचा जीव जाणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे… क्षणिक राग आणि आवेग किती भयंकर ठरू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे भातकुलीतील या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. किरकोळ कारणावरून घडलेली ही घटना समाजासाठी गंभीर इशाला देणारी ठरते आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Feb 28, 2026 05:46:32
Mumbai, Maharashtra:संजय राऊत अरविंद केजरीवाल आणि इतर २३ जण या सगळ्यांना एका मुख्यमंत्री यांना फरफटत घेऊन गेले .. तिकडेचे अधिकारी भाजपच्या पदअधिकारी यांच्या सारखे वागत होते .. निवडणूका आल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलं काल कोर्टांनी सांगितलं की ही केस उभी राहणं शक्य नाही .. आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे मला आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं … निर्दोष मुक्तता करण्यात आमची आली … केजरीवाल यांना फक्त निवडणूक होती म्हणून अटक करण्यात आली आहे CBI अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे भुजबळ ही तुरुंगात गेले आणि कोर्टानी निर्दोष सुटले आहेत किरीट सोमयावर कारवाई का नाही केली . ED आधिकारी वर काय कारवाई झाली मोदी आणि अमित शाह यांनी केजरीवालांनी माफी मागायला हवी … ऑन क्लोजर रिपोर्ट अजित पवार Close रिपोर्ट करावं लागेल कारण त्या आता उपमुख्यमंत्री झाल्या आहेत .. अजित दादा अस्तानाही गोष का झाली नाही .. केंद्राकडे रिपोर्ट पाठवण्यात आले . म्हणून अजित दादा चिंत्त होते … आता आण्णा हाजरे यांना न सांगता closer रिपोर्ट आला आहे On complaint Ajit Pawar death Vsr company आणि DGCI यात आरोपी आहेत .. त्यांचामुळे अजित दादांचा मृत्यू झासा आहे .. यांच्यावर कारवाई होत नाही .. कारण या मध्ये कोण आहे जे नेते अं्दप्रदैश आणि महाराष्ट्राच्या नेते ही शामिल आहेत का … On Devendra Fadnavis travels by VSR plane देवेंद्र फडणवीस चा प्रश्न आहे .. ऑन सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार गप्पा का ? FIR घेत नाही म्हणजे काय … सुनेत्रा पवार ज्या आता उपमुख्यमंत्री आहेत .. त्यांनी मुख्यमंत्री यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही FIR घ्या … त्यांनी मागणी केली पाहिजे ऑन शरद पवार शरद पवार साहेब हॅास्पिटलमध्ये आहे … कोणतेही राजकीय चर्चा नाही .. काल त्यांना भेटलो .. मी बोलो .. ते अनेक विषयांवर बोले .. अनेक फोन दिल्लीवरूण आले .. त्यांची प्रकृती बरी आहे .. आणि ते कामासाठी सक्रिय होतील .. ऑन आदित्य ठाकरे दावा महाविकास आघाडी एकत्र येऊन आम्ही चर्चा करू ना …. प्रत्येकाचा दावा आहे .. आम्ही बसू एकत्रीत मग आदित्य ठाकरे बरोबर बोलत आहेत .. प्रियांका चतुर्वेदी , शरद पवार साहेब आणि काँग्रेसकडून ही एक व्यक्ती आहे त्यामुळे मागणी आहे आदित्य ठाकरे बरोबर बोलत आहे .. आम्हाला२ खासदार असणं हे महत्त्वाचा आहे .. मी एकता काही करू शकणार नाही .. प्रश्न शरद पवार यांचा आहे ते आम्ही बोलू ऑन उद्धव ठाकरे राज्यसभा उद्धव साहेब यांनी अशी इच्छा व्यक्त केली नाही .. त्यांनी पुन्हा विधीमंडळात जावं आणि सगळ्या आमदारांनी मार्गदर्शन करावं ही आमची इच्छा आहे
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 28, 2026 05:18:22
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 28, 2026 04:35:38
Beed, Maharashtra:खडकी देवळा येथील कानिफनाथ मंदिर परिसरात दरवर्षी भरत असलेल्या यात्रेत एक धक्कादायक व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. परंपरेच्या नावाखाळे तान्हुल्या बालकांना मंदिराच्या कळसावरून खाली फेकण्याची अघोरी प्रथा येथे आजही सुरूच आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये माहेरवाशिणींचा मोठा सहभाग असतो. मात्र दर्शनानंतर निष्पाप बालकांना उंच कळसावर नेले जाते आणि वरून खाली उभ्या असलेल्या चार व्यक्तींच्या हातातील चादरीत फेकले जाते. क्षणभर चादर हातातून निसटली, समन्वय बिघडला किंवा तोल गेला तर त्या चिमुकल्याच्या जीवाचे काय? या विचारानेच अंगावर काटा येतो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा म्हणजे बालकांच्या जीवाशी उघडपणे खेळण्याचा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा ओलांडणारा हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी जोर धरत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ हस्तक्षेप करावा, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.. परंपरेच्या नावाखाळ्या चालणाऱ्या अशा जीवघेण्या प्रथांना आळा बसणार का, की आणखी एखादा अनर्थ झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 28, 2026 04:35:19
Chandwad, Maharashtra:दिवसेंदिवस शेतीमालाचे घसरत असलेले दर ही शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब होत चालली आहे कांदा शेती परवडत नसल्याने नाशिकच्या चांदवड येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला मात्र सध्या भाजीपाला पिकाला देखील भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी टोमॅटो अवघा 100 ते 150 रुपये प्रति कॅरेट विकला जात आहे.एका कॅरेट मध्ये साधारण 15 ते 20 किलो टोमॅटो बसतात म्हणजे टोमॅटोला अवघा पाच ते सात रुपये किलोचा दर मिळत आहे यात उत्पादन खर्च देखील निघत नाही यासह उत्पादन केलेला टोमॅटो बाजारात विक्री करण्यासाठी घरातून पैसे द्यावे लागत असल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे या संदर्भात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती मधून आढावा घेतला आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 28, 2026 04:32:42
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर – दिल्ली विमानसेवा 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीच्या बैठकीत एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य आणि प्राधिकरणाचे अधिकारांची बैठक झाली, यामध्ये कोल्हापूर दिल्ली विमानसेवा सुरू करण्याबरोबरच शिर्डी, गोवा, नागपूर, इंदोर, चेन्नई, विशाखापट्टणम , सुरत, अहमदाबाद , हैदराबाद, तिरुपती या मार्गावर देखील विमानसेवा लवकर सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्यासह इतर सदस्यांनी विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीत केली.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top