Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

ईश्वरपुर डायलिसिस सेंटर उद्घाटन पर खोत–पाटील के बीच चुटीली टकराव

SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 01:15:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - जयंतराव,कधीतर टायमिंग चुकवत जा,म्हणजे आमचाही नंबर लागेल,तर सदाभाऊ खोत मोठा माणूस - आमदार सदाभाऊ खोत आणि जयंत पाटलांच्या रंगली टोलेबाजी.. अँकर - राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि आमदार सदाभाऊ खोत या दोघांच्या मध्ये सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली.जयंतराव पाटलांचे अलीकडे अचूक टायमिंग चाधायला लागलेत,पण कधी तर 'टायमिंग चुकवत जा,म्हणजे आमचाही नंबर लागेल,अशी कोपरखळी आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना लगावली,यावर जयंत पाटलांनी ही सदाभाऊ खोत मोठा माणूस आहे,नगराध्यक्षांनी आपली छोटी-मोठी काम त्यांच्याकडे करून घेवीत,माझ्यासारख्या गरिबावर प्रेशर देऊ नये,असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी,सदाभाऊ खोतांना लगावला, ईश्वरपूर मधील उपजिल्हा रुग्णालयातील नवीन डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी हे दोन्हीही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. साऊंड बाईट - सदाभाऊ खोत - आमदार . साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार .
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 03:02:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांना बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही; परंतु विभागातील काही जिल्ह्यांत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आयुक्तालयाकडे आली आहे. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांची दाणादाण उडवली आहे. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात निसर्गाच्या या प्रकोपाचा सर्वाधिक फटका बसला असून, काढणीला आलेला गहू, मका, हरभरा आणि कांदा पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील उभी पिके आडवी पडली असून शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया गेले आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 20, 2026 02:45:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जोरदार दोस्तीतील कुस्ती सुरू असल्याच दिसून येत आहे. राष्ट्रवादी गटनेचे आदिल फरास आणि शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख हे भर सभागृहात एकमेकाला बघून घेण्याची भाषा करण्याबरोबरच चौकात ये तुला दाखवतो अशी धमकी देखील देत आहेत. या टोकाच्या वादानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वाद मिटवला जाईल अस आश्वासन दिल आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्यामुळे माफी मागत असल्याचं म्हटलय. जर का या दोघांमधील वाद मिटले नाही तर कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानात या दोघांची कुस्ती लावू अशी टिप्पणी करत उपरोधिक चिमटा काढला आहे.
814
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:33:55
992
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:33:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत भविष्यात शिवसेनेकडून अविश्वास ठराव आणत सत्तेला सुरुंग लागू नये यासाठी राष्ट्रवादी आणि अपक्षांना सभापती पदासह स्थायी समितीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रयत्न करूनही शिवसेना सत्तेत येऊ शकले नाही त्यामुळे शिवसेना दुखावली आहे आणि सातत्याने भाजपची या सत्तेत अडचणी निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करू शकते, त्यामुळं ज्यांनी ज्यांनी सत्ता स्थापन करताना भाजपला मदत केली ते जर फुटले तर भाजपाला धोका होऊ शकतो, त्यामुळे भाजपने सावध खेळ सुरू केली आहे , सत्ता स्थापनेत ज्यांनी साथ दिली अशा सगळ्यांना काहीतरी देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे...
944
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 20, 2026 02:31:57
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या सोनुलीत सोलर वायर चोरीचा कहर. शेतकरी भीतीच्या छायेत, पिकांवर संकट. वरठी पोलीसात गुन्हा नोंद. भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनोली गावात सोलर पॅनलच्या कनेक्टर वायर चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सात शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलच्या वायर व कनेक्टर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. यापूर्वी १७ मार्च रोजीही पाच शेतकऱ्यांना अशाच प्रकारे फटका बसला होता. सलग घडणाऱ्या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी सोलर पंपांवर अवलंबून असताना वायर चोरीमुळे पाणीपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची bhiती आहे. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
1058
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:30:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषद अध्यक्ष और उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबाडास दानवे यांनी आमचा १८ कोटी रुपयांना सौदा केला. त्यातील ४ कोटी रुपये स्वतः हडपले, असा आरोप शिऊर गटाच्या उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला... स्वःपक्षाच्या काही सदस्यांवर पैसे खाल्ल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. यावर निकम म्हणाले, १० ते १७ मार्च या कालावधीत निवडून आलेल्या नऊ सदस्यांना इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत आणि गोवा अशा विविध ठिकाणी सहलीला नेण्यात आले. तिथे ओलीस ठेवून आमचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. दानवे यांनी आमचा परस्पर १८ कोटी रुपयांत सौदा केला होता. त्यातील काही रक्कम आगाऊ मिळाली होती, तर उर्वरित रक्कम मतदानानंतर मिळणार होती. त्यातील काही रक्कम ते सदस्याच्या पदरात टाकणार होते. याची चाहूल लागताच आम्ही तातडीने पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर आणि आ. मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क केला व आपली भूमिका सांगितली. त्यानंतर आम्ही कुठल्प पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असा खुलासा संजय निकम यांनी केलाय... Byte संजय निकम, जीप सदस्य उद्धव ठाकरे गट
1087
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 20, 2026 02:19:34
1075
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 20, 2026 02:02:13
Dharashiv, Maharashtra:दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्याला हजार रुपये दंड कळंब नगरपालिकेने व्यापाऱ्यांना दिल्या नोटीसा दुकानदारांना कचरा वर्गीकरण सक्तीचं. नियम पाळला नाही तर थेट दंड कळंब नगरपरिषदेचा कडक इशारा कळंब शहरात स्वच्छता मोहिमेला गती देण्यासाठी नगरपरिषदAdministrationने आता कडक भूमिका घेतली आहे. दुकानदारांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्यात आले असून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नगरपरिषुदेच्या वतीने शहरातील सर्व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नियम न पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना हजार रुपये दंड केला जाणार असल्याचं मोठी नमूद करण्यात आलं आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच तो नगरपरिषदेकडे द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छ शहर अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंड आकारण्यात येणार आहे.
963
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 02:01:39
Akola, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या बदलत्या हवामानाचा फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने 18 ते 20 मार्चदरम्यान महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अकोट परिसरात काल सायंकाळी गारपीट झाली, तर मध्यरात्रीनंतर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उभ्या पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गावाकडील भागात गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीस अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र अवकाळी पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
1031
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 20, 2026 02:01:19
1086
comment0
Report
Advertisement
Back to top