Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Apr 15, 2025 12:56:13
Sangli, Maharashtra
सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 03:18:20
141
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 26, 2025 03:02:52
Pune, Maharashtra:सहज अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुगल मॅपवर महावितरण सब स्टेशनचे लोकेशन शोधून तांबे धातू चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली आहे. या टोळीकडून एक लाख 40 हजार चे तांबे धातू आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महावितरण सब स्टेशन मधील तांबे धातू चोरीच्या घटना वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला धातू चोरणारी ही टोळी गुगल मॅप च्या साह्याने सब स्टेशन पर्यंत पोहोचत आणि पहाटेच्या वेळी सबस्टेशन मधील तांब्याच्या तारांची चोरी करत...चोरी करतांना पोलिसांनी ५ जणांना रंगेहात पकडून जेरबंद केल आहे. यामध्ये बबलू खान, समीम खान, शकील खान, कासीम खान आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे. या टोळीने अहिल्यानगर नाशिक पुणे भागातील महावितरण सब स्टेशन मधील तांबे धातूची चोरी केल्याचं उघड झाला असून पोलिसांकडून त्यांनी केलेल्या चोरीच्या घटनांचा तपास केला जात आहे
65
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 26, 2025 03:02:38
Shirur, Maharashtra:राज्याच्या राजकारणात एकेकाळी वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांकडे पाहिलं जायचं. पण आता राज्यात स्वतःचं वजन कमी झाल्याची कबुली वळसे पाटलांनी दिलीये. राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती होताचं वळसेंनी स्वतःबद्दल असं वक्तव्य केलं, आत्ताच हे वक्तव्य करण्यामागे नेमकं काय कारण असावं? वळसेंना राजकारणातील घटलेलं वजन वाढवायचं आहे का? त्यासाठी पुन्हा मंत्रीपद तर नकोय ना? अशी चर्चा यानिमित्ताने रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतर हा मंत्री पदी वर्णी लागलेल्या दिलीप वळसेंचा 2024च्या विधानसभेत 1500 मतांनी निसटता विजय झाला. परिणामी महायुतीच्या सत्तेत त्यांना मंत्री पदावरुन डावलण्यात आलं. अशा परिस्थितीत मी कोणत्या तोंडाने मंत्रीपद मागू, असं निकालानंतर वळसेंनी समर्थकांसमोर जाहीर वक्तव्य केलं होतं. आता राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली अन माझं राज्यातील वजन कमी झाल्याची कबुली वळसे पाटलांनी दिली. आता वळसेंनी हे टायमिंग का साधलं असावं? याचं उत्तर आता ते स्वतःच देऊ शकतील. sound bite : दिलीप वळसे पाटील - माजी मंत्री प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया रांजणगाव पुणे...
81
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 03:01:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बनावट आयएएस कल्पना भागवतचे अफगाणिस्तान-पाकिस्तान कनेक्शनचे धागेदोरे समोर येत आहेत. अफगाणी मित्र अशरफच्या भावाच्या पाकिस्तानातील रेस्टॉरंटसाठी कल्पनाने ३ लाख रुपये हवालामार्फत पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तेथून त्याने मित्राच्या मदतीने ती hवालामार्फत पाकमध्ये पोहोचवली. दोघांनी किती रक्कम फिरवली हे मात्र अद्याप गूढ आहे. कल्पनाच्या बँक खात्यात तब्बल ३२ लाखांचे व्यवहार झाले. शहरातील एका बिल्डरने तिला पैसे दिले होते. तसेच तिने दोन बड्या राजकीय नेत्यांकडेही पैशांची मागणी केल्याचे तपासात समोर आले. अशरफचा शोध सुरू असून त्याचे लोकेशन हरियाणात आढळल्यानंतर गुप्तचर यंत्रणेचे एक पथक तिकडे गेले आहे... ही महिला छत्रपती संभाजीनगर मध्ये सहा महिने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होती पोलिसांनी संशयानंतर तिची चौकशी केली आणि नंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे...
92
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 02:16:48
Akola, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे राज्यात प्रचाराचा जोर वाढला आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आज अकोटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गाजिया बानो बद्रुजम्मा यांच्या प्रचारार्थ ही सभा अकोट शहरातील जवाहरलाल नेहरू मैदानात आयोजित केली असून, या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये या सभेबाबत उत्सुकता आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असून दोन्ही आघाड्यांकडून प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.
218
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 25, 2025 17:15:54
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी सीसीआयकडून जिल्ह्यात चार ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी सीसीआय कडून कापूस खरेदी केंद्र उशिरा सुरू करण्यात आले आहेत. मात्र इतर ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस कमी दरात खरेदी होऊ नये यासाठी सीसीआय कडून चार ठिकाणी म्हणजे नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा येथे सीसीआय कडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आला आहे. कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे खेडा खरेदी केंद्र आणि मध्यप्रदेश राज्यात जाऊन कापूस विक्री करावा लागत होता, यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि खर्च अधिक होत होता, मात्र उशिरा का होईना जिल्ह्यात सीसीआय कडून कापूस खरेदी केंद्र झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यावर्षी कापसाच्या लागवडीत घट आली होती, त्यामुळे कापसाच्या उत्पादन ही कमी आलेला असताना कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती परंतु सीसीआयकडून जिल्ह्यात चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सीसीआयच्या कठोर नियमांमुळे सामान्य शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कापूस खरेदी केंद्रांना व्यापाऱ्यांचा विळखा पडायला नको, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच यां केंद्रनी प्रभावीपणे काम करावे असंगी अपेक्षा व्यक्त केले जात आहे.
128
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 15:46:27
Washim, Maharashtra:अँकर:वाशीम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाशीम येथील प्रचारसभेत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका केली. सभेत उपस्थित मुस्लिम मतदारांना उद्देशून जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली. जलील म्हणाले आज उद्धव ठाकरे साहेब मोठे सेक्युलर झाले आहेत मुसलमान म्हणतात की ते खूप चांगले व्यक्ती आहेत. पण इतकं भोळं राहू नका. बाबरी मशीद शहीद झाली तेव्हा ‘मला गर्व आहे माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली’ असं विधान उद्धव ठाकरे स्वतः केलं होतं. ते विसरलं का? त्यांनी पुढे इशारा दिला की उद्धव ठाकरे यांच्या ती भूमिकेची थोडक्यात जाणीव घेतली, तर शिवसेनेला मतदान करणारा प्रत्येक मुस्लिम बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल, असा अर्थ निघतो. मग आपण स्वतःच्या इतिहासाच्या आणि भावनांच्या विरोधात का जावं सभेला अपेक्षेपेक्षा मोठी उपस्थिती होती. जलील यांनी मुस्लिम समाजाने स्वतंत्र आणि ठाम राजकीय भूमिका ठेवण्याची गरजही अधोरेखित केली. महाविकास आघाडीतील ठाकरे गट मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असला तरी त्यांची पूर्वीची विधानेच त्यांच्या विचारसरणीचा आरसा दाखवतात, असा टोला तेव्हा जलील यांनी लगावला.
146
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 25, 2025 15:21:58
Solapur, Maharashtra:सोलापूर - अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली नाही, आता उलट्या फुगड्या खेळा। - एक गोष्ट स्पष्ट झाली आहे अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली नाही - निवडणूक निर्णय अधिकारी कायद्याचा भंग करून प्रक्रिया केलीय - ज्यावेळी अपील दाखल होतं त्यावेळी पुढची प्रक्रिया त्याच ठिकाणी थांबते, जोपर्यंत जिल्हा न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत प्रक्रिया थांबते - जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस प्राप्त झाली त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती - आज अधिकाऱ्यांच्या वतीने न्यायालय समोर सुनावणी आजच्या आज घेण्याची मागणी करण्यात आली.. चिन्ह अलोटमेंट करण्यासाठी आजच्या आज सुनावणी घेण्याची मागणी - जल्लोष केला, फुगड्या खेळलात, अंगावर बसलात, फटाके उडवलात हे सगळं तुम्ही केलं... आता खालची माणसं खांद्यावर घेऊन बोकांडी घ्या - सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहात विड्रॉल केल्याचे सांगितलं... - पाटलीन बाई बिनविरोध झाल्याचा जल्लोष तुम्ही केला तुम्ही उघड्या खेळल्या आता तुम्ही - जे लोक तुम्हाला खांद्यावर बसून नाचले आता त्या लोकांना खांद्यावर घेऊन नाचा - कारण निवडणुक बिनविरोध झालेली नाही. - अरोनी निवडणुकीचा विड्रॉल बेकायदेशीर रित्या केलेला आहे. - हा निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून राहण्याच्या पात्रतेचा नाही. - राज्याच्या निवडणूक आयुक्तांवर राज्य निवडणूक आयोगावर एक प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
112
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 25, 2025 14:49:53
158
comment0
Report
Advertisement
Back to top