Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

पंढरपूर जाते समय दुर्घटना: चालक की मौत, छह महिलाएं गंभीर रूप से घायल

SMSarfaraj Musa
Mar 29, 2026 13:16:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा गाडीला अपघात,चालकाचा मृत्यू तर सहा महिला जखमी. पंढरपूरच्या चैत्रवारीससाठी निघालेल्या वारकरयांच्या एका गाडीला सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी जवळ अपघात झाला आहे.या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे,तर सहा महिला या गंभीर जखमी झाले आहेत.जत तालुक्यातल्या संख येथील महिला वारकरी पंढरपूरच्या चैत्रवारीसाठी निघाले असता, उमदी जवळ गाडीला अपघात झाला आहे. भरधाव गाडीवरील चालकाचा ताबа सुटल्याने गाडी थेट समोरून येणाऱ्या एका ट्रकला जाऊन धडकली,ज्यामध्ये चालकाच्या जागीच मृत्यू झाला आहे,तर सहा महिला वारकरी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर मधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Mar 29, 2026 13:48:26
Pandharpur, Maharashtra:भटक्या विमुक्त समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत संधी द्यावी, जय मल्हार क्रांती संघटनेच्या मेळाव्यात समाजाची मागणी राज्यातील 42 भटक्या जमातीच्या प्रतिनिधींचा पंढरपुरात मेळावा संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषा करून समाज बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकांत 53 जागांवर बेरड, रामोशी , बेडर, अशा 42 जमातीच्या मतदारांनी भाजप सोबत उभे राहिले. त्यामुळे तिथे भाजपला मदत झाली. भाजपचे 53 आमदार निवडून येण्याला हा समाज कारणीभूत आहे स्वातंत्र्यानंतर या समाजातील लोकांना कोणीही योग्य प्रतिनिधित्व दिले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी एकमुखी मागणी या मेळाव्यात करण्यात आली. आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात या कडे समाजाचे लक्ष आहे
1013
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 29, 2026 13:15:50
966
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 29, 2026 12:49:06
Shirdi, Maharashtra:कोपरगाव जिले की News Flash पणन मंत्री जयकुमार रावल कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर... कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाचे भूमिपूजन.. रुपाली चाकणकर यांच्या समन्स बाबत मला माहीत नाही.. मी सकाळपासून बाहेर आहे.. “नाव पाहत नाही, फक्त फाईल पाहतो” – निधी मंजुरीवर मंत्री जयकुमार रावलांची प्रतिक्रिया... निधी मंजूर करण्यासाठी काही प्रणाली असतात.. DPTC च्या माध्यमांतून जी कामे असतात ती जिल्हाधिकाऱ्यांकडे येतात.. तिथून राज्य समितीकडे आल्यावर मंत्रालय स्तरावर चौकशी होत असते.. निधी मंजूर करताना अनेक प्रकरणे असतात.. त्यावेळी कोण चेअरमन, कोण ट्रस्टी हे पाहिले जात नाही.. देवाचे काम असते व देवासाठी ते पैसा दिले जातात.. तुम्ही सांगताय म्हणून मला समजले ते शिवनिका संस्थान आहे.. खालून चौकशी करून आलेली प्रकरणे मंत्रालय स्तरावर मंजूर केली जातात.. (माहितीसाठी - 2018 साली शिवनिका संस्थानच्या विविध विकासकामांची फाईल मंजुर झालेली आहे..त्या वेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे होते..)
964
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 29, 2026 12:47:57
Shirdi, Maharashtra:राहुरी तालुक्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही जादूटोणा आणि करणीसारख्या प्रकारांवर विश्वास ठेवणारे लोक अजूनही सक्रिय असल्याचं या घटनेतून दिसून आलं आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे जावयानेच सासऱ्याच्या घरासमोर मध्यरात्री जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गोविंद गंगाधर पठारे, वय ५३ वर्षे यांच्या मुलीचा विवाह २०२० साली देहरे येथील विशाल लांडगे याच्यासोबत झाला होता.मात्र २०२५ मध्ये त्यांची मुलगी पूनम विशाल लांडडे हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.दरम्यान , २७ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पठारे हे घरात झोपलेले असताना त्यांना गेट वाजल्याचा आवाज आला.त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता आरोपी विशाल लांडगे हा घराच्या गेटजवळ जमिनीवर हळद-कुंकू टाकताना दिसला.पठारे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासोबत आलेले तीन जण घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी घराच्या दरवाजाजवळ टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली आणि त्यावर हळद-कुंकू टाकलेले आढळून आले. तसेच आरोपीच्या बुलेटजवळ कुऱ्हाड, गलोल, नायलॉन दोरी, टाचण्या आणि हळद-कुंकूच्या पुड्या देखील सापडल्या. या सर्व प्रकारावरून आरोपींनी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे... याप्रकरणी गोविंद पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल रावसाहेब लांडगे आणि तीन अज्ञात इसमांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष , अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत..यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नसून, मुलीच्या मृत्यूनंतरच्या वादातून किंवा अंधश्रद्धेच्या प्रभावातून हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
960
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 29, 2026 11:21:27
Ambernath, Maharashtra:बदलापुरात हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अपघात स्पीड ब्रेकरवर पट्टे नसल्यानं अपघात अपघातात अभिनेता विराज जगताप जखमी विराज जगताप हा २४ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या sुमारास मित्राच्या घरून परतत होता. आदर्श शाळेसमोर रस्त्यावर नव्याने तयार केलेला स्पीड ब्रेकर त्याला अंधारामुळे दिसला नाही. आणि या स्पीड ब्रेकरवरून त्याची दुचाकी उडून स्लिप झाली. या अपघातात त्याच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली असून सर्जरी करावी लागणार आहे. तर हातापायाला अनेक ठिकाणी किरकोळ दुखापत देखील झाली आहे. स्पीड ब्रेकर नव्याने उभारलेला असल्यानं अंदाज आला नाही, कारण त्यावर पांढरे पट्टे सुद्धा मारलेले नव्हते, स्पीड ब्रेकरचा फलकही नव्हता, त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप विराज जगतापने यानंतर केलाय.
1096
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 29, 2026 10:48:36
949
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 10:48:13
Beed, Maharashtra:बीड: खून, हाणामाऱ्यांनी हादरला बीड जिल्हा; ग्रामसभेत झालेला वाद उफाळून आला दोन गटात हाणामारी; जखमींवर उपचार सुरू... व्हिडिओ व्हायरल कधी खून तर कधी खुणाचा प्रयत्न आणि मारहाणी यामुळे बीड जिल्हा पुरताच हादरला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. बीड तालुक्यातील कुमशी गावात दोन गट आपापसात भिडल्याने पाच जण जखमी आहेत. त्यातील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत. कुमशी गावात ग्रामसभे दरम्यान करपे नामक गटाने गावातील कामांबाबत सरपंचाच्या गटाला जाब विचारला. यावरूनच दोन्ही गटात वाद निर्माण झाला एकमेकांवर दगडफेक आणि लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. या घटनेत जखमी व्यक्तींवर उपचार सुरू असून पोलिसांकडून जखमींचा जबाब घेतला जातोय. पोलीस तपासात परस्पर विरोधी गुन्हा नोंदवला जाईल अशी माहिती देण्यात आली.
988
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 29, 2026 09:50:41
Yeola, Maharashtra:जयकुमार रावल ऑन ऑपरेशन टायगर ऑपरेशन तूतारी होणार ज्योती वाघमारे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत स्थिर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली... सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करतय.... सर्व फोकस हा विकासावर आहे सामान्य लोकांना न्याय देण्यावर आहे... त्यामुळे अशा विषयाला वेळ नाही व त्यात तथ्य नाही जयकुमार रावल ऑन भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे. भोंदू प्रकार चाललेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे... कायद्याच्या चाकोरीत या सर्वांवर कारवाई होणार..... जसा जसा काळ वेळ जाईल तसे तसे प्रकरण उघडतील व जे कोणी दोषी असतील... मदतगार असतील त्यांच्यावर कायद्याचा बडगा होणार ... जयकुमार रावल ऑन झिरवळ प्रकरण व्यक्तिगत कोणाबद्दल काही सांगता येणार नाही.... सामाजिक कामात अनेक लोक भेटतात त्यांचा परिचय नसतो.... जोपर्यंत त्यांच्या कनेक्शन, त्यांच्या आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणावर आरोप लावणं योग्य होत नाही..... कायदा सर्वांसाठी समान आहे कोणी चुकीचे काम केले असेल तर कारवाई होणार... जयकुमार रावल ऑन कांदा प्रश्न युद्ध मुळे नक्कीच कांदा सह इतर पिकांना देखील परिणाम होतोय... मुख्यमंत्र्यांनी कांदा संदर्भात बैठक घेतली... कांदा संदर्भात शॉर्ट व लॉन्ग टर्म योजनांवर चर्चा झाली... तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. . त्याकरता कृषी सचिव पणन सचिव यांची समिती... नेमून अहवाल द्यावा व त्यानंतर शेतकऱ्यांना काय भरीव मदत देता येणार ती सरकार देणार...
1095
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 29, 2026 09:50:20
Bhandara, Maharashtra:Anchor – मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. समजा हे खरे असेल तर कारवाई होईल अशा सूचना दिल्या आहेत. या सरकारमध्ये अशा घटना होणं, आणि स्वतःला ही सरकार हिंदू धर्माचे पाईक आहोत म्हणणं. या पद्धतीचं सत्यव्रतीपना दाखवतात हे महाराष्ट्रात कुठेच नाही. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशी विचारायची वेळ आली आहे. त्यामुळे खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. आणि त्या भोंदू बाबा बरोबर भाजप आणि सत्तेतल्या अनेक नेत्यांच्या संबंध राहिलाय. या सरकारच हे सगळं पापाचं भांडं फोडायची वेळ आली आहे. यात ज्या पद्धतीने राजकारण केलं जातय. हे सगळे प्रकरण चाललं असताना फडणवीसांचे पोलीस झोपले होते का? सरकारच या व्यवस्थेला पाठीशी घालते का? हे सर्व प्रश्न आहेत. नरहरी झिरवड यांच्या वायरल व्हिडिओ बाबत विचारले असता‌... नाना पटोले बोलत होते. नाना पटोले, (1:42) ... Anchor – घरात आमच्या जे काही घडामोडी आहेत वागणं आहे. ज्या पद्धतीने ओशो ने पाणी दिले जायचं. त्यातच सगळं आहे त्या पद्धतीच्या संबंध ज्या लोकांचे त्याच्या आश्रम आणि ऑफिसमध्ये होते अमित शहा उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री हे पाहायला मिळतात. रूपाली चाकणकर ही महिला आहे त्यामुळे तिच्यावर आधी ॲक्शन घेऊन पदमुक्त केलं गेलं... मग बाकी लोकांना का बर पदमुक्त केलं नाही...? या पद्धतीच्या ही प्रश्न निर्माण होतो... मंत्रिमंडळात असलेल्या अमित शहाचा का राजीनामा घेतला जात नाही?? Anchor – मला असं वाटतंय की योजना सुरू झाल्या की त्यांनी बोंबाबोंब केली जात नाही. आमच्या काळात संजय गांधी निराधार योजना सुरू केली त्यामध्ये अनेक महिला पुरुष निर्धार होते पण काँग्रेसने कधीच या हप्त्यात पैसे सोडतो अशी प्रसिद्धी दिली नाही. त्यासाठी हे आपल्या घरचे पैसे देत नाहीयेत. जे सांगितलं होतं सत्ता आल्यानंतर 2100 रुपये देणार आता तर पंधराशे देत आहेत तेही तीन तीन महिन्यानंतर देतात ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना त्रास होऊन पैसे दिले जातात आणि अपात्रतेची यादी काढून अर्ध्यापेक्षाही कमी पात्र संख्या केली. त्या लाडक्या बहिणींशी यांनी धोकादायी केली आहे काँग्रेसने सत्तेच्या काळात कधीच असं केलं नाही. त्यावेळी ज्या योजना सुरू झाल्या त्या लोकांच्या योजना होत्या. भाजप दिखावा करते. मुख्यमंत्र्यांची घोषणा दिखाव्याची आहे. महागाई वाढली आहे त्याच बहिणीकडून पाच हजार रुपये दर महिन्याचे काढले जात आहेत त्यावरही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पुढील तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.... यावर नाना पटोले बोलत होते. Anchor – एफ्स्टिन फाईल जी आहे, त्यात स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि आपल्या पंतप्रधानांचे नाव आहे. आणि जे ते हातात घेतात आणि पूर्ण करतात असं बोलत आहेत. ट्रम्पचं म्हणणं नेमकं काय याचा त्यांनी खुलासा करावा.... त्याच ट्रंम्पनी पाच मिनिटात मी मोदींचे राजकारण संपवू शकतो असं बोलले होते. ते कशासाठी बोलले होते..? आज देशात ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेल आणि गॅसचा तुटवडा आहे, सामान्य माणसं त्यात भरडली जात आहे त्याचे उत्तर देणार नाही का?? एकीकडे गोदी मीडिया ज्या पद्धतीने तारीफ केली तर वावाही दाखवतात... पण आता सामान्य जनता अडचणीत आहे त्यांच्या तोंडाचा घास हिसकावला जातोय सिलिंडर साठी लाईन लागल्यात ब्लॅक मार्केटिंग चालत आहे त्याच्यावरही उत्तर दिलं पाहिजे... हे सगळं पाप ट्रम्प आणि मोदींमुळे आहे आणि त्याचा परिणाम देश भोगत आहे.... Anchor – सरकारचे पद त्याच्या रुपयाचा निच्चांक होते त्याच्यावरून सरकारची पद कळते. असे हेच नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारच्या वेळी सांगायचे.... आता नरेंद्र मोदींची पद संपली काय?? आणि त्यामुळे आता रुपया खाली पडत आहे. डॉलरच्या किमती वाढत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे..... उद्या शंभर रुपयांवर येईल आपल्या रुपयाची शून्य किंमत झाली तेही नाकारता येणार नाही.... हेच मोदी त्यावेळी म्हणून भारताची मनमोहन सिंगवर आरोप करत होते मग आता नरेंद्र मोदी का बोलत नाही?? भारताची आणि देशाच्या रुपयाची पद घालवण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भाजप करत आहे त्याच्या परिणाम देशातील सर्वसामान्य नागरिकांना भोगाव लागत आहे.... Anchor – अधिवेशनामध्ये सरकारने जी मनमानी केली, महाराष्ट्राच्या लोकशाहीची जी खून करण्याची पद्धत आपण पाहिली..... विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही, आणि त्यामुळे कामकाज पाहिजे तसा घेतला, दुरगामी परिणाम होतील असे कायदे राज्य सरकारने निर्माण केले त्यामध्ये धर्म स्वतंत्र्याचा कायदा, सहकारातला एक कायदा आणला असे खूप सारे कायदे महसूल चे कायदे त्यात व्यापाऱ्यांना उद्योगांना मोठा लोकांना फायदा होईल शेतकऱ्यांना बरोबर करायचं ठरवलं.... नगरपालिका महानगरपालिका च्या भागात त्यांनी टॅक्स वाढवण्यासाठी कायदे आणले.... सर्वसामान्य नागरिकांना लुटायचं आणि बहुमताच्या आधारावर हे कायदे पारित करायचे... पण विरोधी पक्ष जर सभागृहात असता तर कुठलाही कायदा आणायच्या आधी सरकारला विरोधी पक्षाला विचारावं लागतं... हे सरकार आहे हे लोकशाहीला मानणारं नाही त्यामुळे त्यांनी विरोधी पक्ष नेता नेमला नाही.... Anchor – भंडारा जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात काही जिल्हा परिषद सदस्यांवर अन्याय झाला.... जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी या अन्याय विरोधात उपोषण सुरू केले आहे यावर नाना पटोले बोलत होते. Anchor – भंडारा नगरपरिषद जेव्हापासून भाजपच्या ताब्यात गेली तेव्हापासून तिला भ्रष्टाचाराची कीड लागली. तिरंगा झेंडा उभा केला त्यातही पैसे खाल्ले....नालीच्या कचऱ्यातही पैसे खाल्ले.... जी गटार योजना आणली गेली त्यातही पैसे खाल्ले.... सत्यनाश करून ठेवला.... आता भाजपला दोष द्यायचा की कुणाला दोष द्यायचा हेच कळत नाही.... आणि इतका भ्रष्टाचार असून सुद्धा पुन्हा राज्यात ते सत्तेत बसत असेल तर यावर विचार मंथन करायची वेळ आली आहे.... Anchor – हे रॉकेल तेल 80 रुपये लिटर मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. आता गॅस तर सर्वांच्या घरी आहे, आणि सिलेंडर वाल्यांना जर रॉकेल दिले जात नाही तर हे रॉकेल कुणासाठी आणलं जात आहे?? हे अजून स्पष्ट केलं नाही. आता 86 रुपये लिटर हे रॉकेल मिळणार आहे हे कुणाला दिले जाईल? कुणाला पात्र ठरवलं जाईल? हे सर्व प्रश्न आले आहेत. हे स्पष्ट झाल्यावर हे सरकार गरिबांसाठी आहे की मोठ्या लोकांसाठी आहे हे त्यावेळी कळेल....
1051
comment0
Report
Advertisement
Back to top