Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में शक्तीपीठ महामार्ग के विरोध में किसानों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन किया

SMSarfaraj Musa
Mar 23, 2026 08:16:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आला आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शनी करण्यात आली.राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सांगली जिल्ह्यामध्ये गरज नसताना आणि हजारो शेतकऱ्यानी हरकती नोंदवलेल्या आहेत.मात्र तरीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे,असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.शक्तिपीठ महामार्ग साठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही,अशी भूमिका देखील यावेळी शेतकऱ्यांनी जाहीर केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 09:32:40
Shirur, Maharashtra:पुणे लोणीकंद जवळ ट्रॅव्हलर बसला भीषण आग, प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला पुणे–अहिल्यानगर महामार्गावर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रॅवलर बसला लोणीकंद जवळ अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने ही घटना चिंतेचा विषय ठरत आहे. लोणीकंद जवळ बस प्रवासात असताना समोरून इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. यानंतर चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही प्रवाशांनी परिस्थितीची तीव्रता पाहून काचा फोडून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी इंजिन, वायरिंग व इंधन यंत्रणेची नियमित तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
216
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Mar 23, 2026 09:01:58
890
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 23, 2026 08:55:53
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात भरवण्यात आलेल्या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ , एकूण 50 पैकी 13 स्टॉल रिकामेच ठेवल्याने कृषी विभागाचे अपयश उघड - सोलापुरात भरवण्यात आलेल्या कृषी महोत्सवाला तुरळक प्रतिसाद - जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने तीन दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन - कृष्ण कार्यालयाच्या वतीने प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या 50 पैकी 13 स्टॉल शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने रिकामीच - जिल्हास्तरीय कृषी महोत्सवास शेतकरी ते ग्राहक शेती उत्पादने विक्री करण्याची संकल्पना सपशेल फेल याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
969
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 08:54:43
Jalna, Maharashtra:जालना : लोकवर्गणीतून बांधली जिल्हा परिषदेची कॉर्पोरेट लूक असणारी शाळा,शिक्षण दर्जेदार असल्यानं बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी घेतायत शाळेत अँडמिशन अँकर : राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या असतानाजालन्यातील लालवाडी तांडा येथे लोकवर्गणीतून कॉर्पोरेट लूक असणारी शाळा बांधण्यात आलीय.जालन्यातील स्टील उद्योजकांच्या मदतीसह शिक्षक आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून ही शाळा बांधण्यात आलीय.या शाळेत 1ली ते 4 थी पर्यतचे वर्ग आहेत. 20 लाख रुपये खर्चून या शाळेचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय.शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल शिक्षणावर शिक्षकांनी भर दिल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगलीच वाढ झालीय.शाळेत दर्जेदार शिक्षण दिलं जात असल्यानं बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी देखील या शाळेत अँडमिशन मिळवण्यासाठी धडपडतायत. बाईट : सचिन खिल्लारे,मुख्याध्यापक, लालवाडी जिल्हा परिषद शाळा
1007
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 08:30:28
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर परिसरात मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर अखेर पुजाऱ्यासह इतर भाविकांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोडोली पोलीस ठाण्यामध्ये 15 पुजारी आणि 15 भाविकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. रविवारी जोतिबा मंदिरातील पुजारी भाविकांच्या अंगावर तुटून पडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती इतकेच नव्हे, तर दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ फोडल्याचेही व्हिडिओ समोर आले. त्यानंतर या वादावर परस्पर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सोशल मीडियावर या अमानुष मारहाणचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर अखेर कोल्हापूर पोलिसांनी पुजारी आणि काही भक्तांवर गुन्हा दाखल केला.
1040
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 23, 2026 08:20:26
1046
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 08:00:58
Ahilyanagar, Maharashtra:कैप्टन खरातच्या अटकेनंतर त्याचे वेगवेगळ्या व्यक्तीशी असलेले संबंध समोर येत आहेत. आदर्शगाव हिवरेबाजार येथील सरपंच पोपटराव पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये पोपटराव पवार खरातच कौतुक करतांना पाहायला मिळत आहे या सोबतच ओशनोलॉजी बाबत देखील पवार बोलत आहेत असा व्हिडिओ समोर आला. दरम्यान कॅप्टन खरात सोबत आमचा संबंध केवळ गावातील दगडी बांधकाम करण्यासाठी आला होता, गावातील शंकराचे मंदिर हे दगडी असावे अशी गावकऱ्यांची भावना होती त्यामुळे अशी दगडी मंदिर कोठे आहेत हे पाहत असतांना मीरगावला जाणं झालं होतं. सोबतच जो व्हिडिओ समोर येतोय तो सिन्नर तालुक्यातील एका वृक्षारोपण कार्यक्रमातील असून माझा अथवा हिवरे बाजारचा संबंध नाही असं पोपटराव पवारांनी म्हंटलंय. पोपटराव पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे यांनी
1037
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 23, 2026 07:20:01
Satara, Maharashtra:सातारा : शहरालगतच्या सोनगाव कचरा डेपो प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून सोनगाव आणि जकातवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत घंटागाड्या अडवल्या. यामुळे बोगदा ते शेंद्रे मार्गावर तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली होती.घटनास्थळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर आणि आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी दाखल होऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी कचरा डेपोचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.चर्चेनंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, हा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
1082
comment0
Report
Advertisement
Back to top