Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सोनगाव कचरा डपो मामले में ग्रामस्थों का आक्रोश, एक घंटे यातायात ठप

TTTUSHAR TAPASE
Mar 23, 2026 07:20:01
Satara, Maharashtra
सातारा : शहरालगतच्या सोनगाव कचरा डेपो प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून सोनगाव आणि जकातवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत घंटागाड्या अडवल्या. यामुळे बोगदा ते शेंद्रे मार्गावर तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली होती.घटनास्थळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर आणि आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी दाखल होऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी कचरा डेपोचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.चर्चेनंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, हा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 23, 2026 08:30:28
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर परिसरात मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर अखेर पुजाऱ्यासह इतर भाविकांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोडोली पोलीस ठाण्यामध्ये 15 पुजारी आणि 15 भाविकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. रविवारी जोतिबा मंदिरातील पुजारी भाविकांच्या अंगावर तुटून पडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती इतकेच नव्हे, तर दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ फोडल्याचेही व्हिडिओ समोर आले. त्यानंतर या वादावर परस्पर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सोशल मीडियावर या अमानुष मारहाणचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर अखेर कोल्हापूर पोलिसांनी पुजारी आणि काही भक्तांवर गुन्हा दाखल केला.
844
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 23, 2026 08:20:26
1008
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 23, 2026 08:16:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आला आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शनी करण्यात आली.राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सांगली जिल्ह्यामध्ये गरज नसताना आणि हजारो शेतकऱ्यानी हरकती नोंदवलेल्या आहेत.मात्र तरीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे,असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.शक्तिपीठ महामार्ग साठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही,अशी भूमिका देखील यावेळी शेतकऱ्यांनी जाहीर केली आहे.
1006
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 08:00:58
Ahilyanagar, Maharashtra:कैप्टन खरातच्या अटकेनंतर त्याचे वेगवेगळ्या व्यक्तीशी असलेले संबंध समोर येत आहेत. आदर्शगाव हिवरेबाजार येथील सरपंच पोपटराव पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये पोपटराव पवार खरातच कौतुक करतांना पाहायला मिळत आहे या सोबतच ओशनोलॉजी बाबत देखील पवार बोलत आहेत असा व्हिडिओ समोर आला. दरम्यान कॅप्टन खरात सोबत आमचा संबंध केवळ गावातील दगडी बांधकाम करण्यासाठी आला होता, गावातील शंकराचे मंदिर हे दगडी असावे अशी गावकऱ्यांची भावना होती त्यामुळे अशी दगडी मंदिर कोठे आहेत हे पाहत असतांना मीरगावला जाणं झालं होतं. सोबतच जो व्हिडिओ समोर येतोय तो सिन्नर तालुक्यातील एका वृक्षारोपण कार्यक्रमातील असून माझा अथवा हिवरे बाजारचा संबंध नाही असं पोपटराव पवारांनी म्हंटलंय. पोपटराव पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे यांनी
957
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 23, 2026 07:05:57
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हापरिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यमयी घटनेनंतर या निवडी वेळी ज्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ते बापू शिंदे आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात स्वतःचा जवाब देण्यासाठी हजर झाले आहेत. बापू शिंदे यांच्या मुलाने हा गुन्हा दाखल केला होता. कोणत्याही प्रकारे माझे अपहरण झालेले नाही असा जवाब त्यांनी सातारा पोलिसांना दिला है. याच बापू शिंदेच्या अपहरण प्रकरणात निवडणुकीच्या दिवशी सातारा पोलिसांनी राष्ट्रवादी च्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे या दोन सदस्यांना ताब्यात घेतले होते. पण बापू शिंदे यांनी माझे अपहरण झालेले नसल्याचा जवाब दिल्याने मग पोलिसांनी निवडणुकीच्या दिवशी केलेली कारवाई चुकीची असल्याचे समोर येत आहे. बापू शिंदे यांच्या सोबत त्यांच्या राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील हे देखील उपस्थित आहेत.
1094
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 07:04:24
Khed, Maharashtra:हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या बलिदान दिनानिमित्त आज राजगुरुनगर येथील त्यांच्या जन्मस्थळावर ध्वजारोहण करून स्मरण करण्यात आले. देशभरातून राजगुरु प्रेमी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने राजगुरु वाड्यावर दाखल होत असून, परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला आहे.हुतात्मा राजगुरु स्मारक समितीच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी संपूर्ण शहरातून मशाल मिरवणूक काढून हुतात्मा राजगुरु यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
1087
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 23, 2026 05:47:14
1055
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 23, 2026 05:33:53
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरण कामासाठी यंदा सहाव्यांदा प्रयत्न होणार आहेत. मनपा यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविणार आहे. वर्षानुवर्षे गाळ साचून उथळ झालेल्या आणि शहराला 9 किमी वळसा घालणाऱ्या इरई नदीने गेली अनेक वर्षे शहरात मोठा महापूर आणला आहे. सोबतच कोळसा खाणीतिल ओवरबर्डन माती, वीज केंद्राची राख यामुळे नदीची खोली कमी झाली. अशा वेळेस नदीच्या खोलीकरणाची गरज प्रकर्षाने जाणवली होती. याआधी एकूण 5 वेळा, मनपा, राज्य शासन, पाटबंधारे विभाग यांच्या पुढाकाराने हा अयशस्वी प्रयत्न झाले आहेत आणि यात मोठा निधी वाया गेलाय. मात्र अपेक्षित परिणाम साधण्यात हे प्रयत्न कमी पडले आहेत. या सर्व प्रयत्नांवर टीका करत नदी बचाव कार्यकर्त्यांनी दर्जाहीन कामात जनतेचा पैसा वाया घालविण्यापेक्षा नाम अथवा पाणी फाउंडेशनद्वारे काम करवून घेण्याची मागणी केली आहे.
1089
comment0
Report
Advertisement
Back to top