Back
निवृत्त शिक्षक भरती रद्दसाठी पदवीधरांनी केले धरणे आंदोलन.
Miraj, Maharashtra
सांगली जिल्ह्यातील शिक्षक भरती विरोधात अल्पसंख्याक कन्नड भाषिक डीएड-बीएड पदवीधर संघटनेने धरणे आंदोलन केले आहे. राज्य सरकारने निवृत्त शिक्षकांची पुन्हा भरती केल्याने बेरोजगार पदवीधरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, तातडीने ही भरती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात संघटनेचे नेते सदाशिव खरात आणि पांडुरंग कोळी यांनी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Beed, Maharashtra:
बीड : आडागळे कुटुंबावर हल्ला प्रकरण; 35 ते 40 जणांचा जमाव सीसीटीव्हीत कैद.. शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल..!
Anc : शहरातील शाहूनगर परिसरातील गजानन कॉलनीत आडागळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तब्बल 19 दुचाकींवर बसलेले 35 ते 40 जणांचा जमाव सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रात्री बारा बाजेच्या सुमारास हाच जमाव दिनकर आडागळे यांच्या घराकडे गेला होता. चाकूचा धाक दाखवत घरातील सामानाची तोडफोड करत आडागळे कुटुंबातील दोघांना मारहाण केली होती. सध्या आडागळे कुटुंबावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसात पाच मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सीसीटीव्हीत कैद झालेल्या 35 ते 40 जणांचा तपास सुरू आहे.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0107ZT_WSM_BUSSTAND_WORK
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे कोट्यवधी रुपये खर्चून नव्या बस स्थानकाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे स्थानक परिसरात सर्वत्र चिखल साचलेला आहे.या अस्वच्छतेमुळे आणि अपूर्ण कामामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागत आहेत.बस स्थानकात चढ-उतार करताना प्रवाशांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत आहे.स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून देखील नियोजनशून्य पद्धतीने आणि हलगर्जीपणे हे काम सुरू असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत असून या कामाला गती देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _
डहाणू जव्हार रोडवरील तलवाडा येथे डहाणू संभाजी नगर एसटी बसला अपघात झालाय. समोरून येणाऱ्या ट्रकने हूलकावणी दिल्याने चालकाचा बस वरील ताबा सुटून बस रोड खाली कोसळली.
सुदैवाने एसटी बस आंब्याच्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत.
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - राज्यातील धार्मिक स्थळी भाविक मोठ्या आस्थेन दर्शनासाठी येत असतात... मात्र अनेकदा प्रसाद हार फुल खरेदी करताना त्यांची आर्थिक लूट होण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत.. मात्र आता साईंच्या शिर्डीत आता एक नवीन प्रयोग पार पडतोय... शिर्डीतील व्यावसायिकांसाठी हार, प्रसाद, फुल आणि शाल यासह अनेक वस्तूंसाठी एक दरपत्रक तयार करण्यात आले.. 15 जुलै पर्यंत व्यावसायिकांनी दरपत्रक दुकानासमोर लावण्याची नोटीसच शिर्डी नगरपालिकेने काढली असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग देवस्थानच्या ठिकाणी पथदर्शी ठरेल अशी चर्चा सुरू आहे...
V/O - गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीत गुन्हेगारीनं डोकं वर काढलं.. याच समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांसह साईबाबा संस्थानने देखील नियमावली तयार केली... आणि आता शिर्डी नगरपालिकेच्या वतीने देखील एक अनोखा प्रयोग शिर्डी शहरात सुरू करण्यात आलाय.हार फुल प्रसाद किंवा शाल या वस्तूंना शिर्डीत मोठी मागणी आहे... मात्र यात अनेकदा भाविकांची लूट होत असल्याचे प्रकार समोर आले.त्यामुळेच शिर्डी नगरपालिकेने व्यावसायिकांची बैठक घेऊन एक नियमावली तयार केली असून एक अंतिम दरपत्रक निश्चित केले... 15 जुलैपर्यंत हे दरपत्रक आपल्या दुकानासमोर लावण्याचे आदेश नगरपालिकेने दिल्या असून हा कदाचित धार्मिक स्थळी राबवला जाणारा पहिलाच प्रयोग असेल...
Byte - सतीश दिघे , मुख्याधिकारी शिर्डी नगरपालिका
V/O - शिर्डीतील व्यावसायिकांनी सुद्धा या प्रयोगाचे स्वागत केलय... भक्तांची होणारी लूट थांबवण्यासाठी असा उपक्रम गरजेचा आहे असं मत व्यावसायिकांनी व्यक्त करताना काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत अशी मागणी देखील केली आहे.शिर्डी बाजारपेठेत आढावा घेत व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी..
चौपाल कुणाल जमदाडे व्यावसायिक
V/O - एखाद्या धार्मिक स्थळी दरपत्रक नियमावली करणारं शिर्डी हे शहर कदाचित राज्यातील पहिल असावं... जर हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यासाठी निश्चित पथदर्शी ठरेल व गुन्हेगारी कमी होऊन भाविकांसाठी आनंददायी प्रयोग ठरणार यात शंका नाही..
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _ वाडा तालुक्यातील सोनाळे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र हा मृत्यू शिक्षक यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप करीत गुन्हा नोंद करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांकडून केली जात आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन सीमेंट काँक्रीट रस्त्याची तोडफोड
११० कोटींच्या निधीतून झालेल्या रस्त्यांची सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी जागोजागी तोडफोड
करदात्यांचा पैसा वाया ...पूर्वसूचना न देता काम सुरू करत असल्याने नागरिकांत संताप.
अधिकाऱ्यांची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
Anc mmडोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील श्री जी लाईफस्टाईल कंपनीसमोरच्या नव्याने बांधलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची अचानक तोडफोड करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या रस्त्यासाठी शासनाने गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच ११० कोटींच्या निधीतून डोंबिवली एमआयडीसीत दर्जेदार रस्त्यांची कामे करण्यात आली होतीया निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता. मात्र, रस्ते पूर्ण होण्याच्या अवघ्या काही महिन्यांतच सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी रस्त्यांची तोडफोड सुरू झाल्याने नागरिक संताप वेक्त करत आहे.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे जिल्ह्यातील शिरपूर बस स्थानकाचे दुरावस्था झालेली आहे. बस स्थानक मध्ये खड्ड्यांचा साम्राज्य पसरला असून, या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने प्रवाशांना आणि वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिरपूर आगार बसस्थानक परिसरात खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानकाच्या सुरुवातीलाच मोठं मोठ्याप्रमाणात खड्ड्यांमुळे प्रवासींना बसस्थानकात पायी ये जा करतांना कसरत करावी लागते.या खड्ड्यात बस आली तर बसची मागील बाजू खाली घासरली जात असल्याने बसचे देखील नुकसान होत आहे. रिपरिप पाऊसानंरत देखील बसस्थानकात खड्ड्यांमध्ये पाणी जमा होते. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor कैरीचे भाव कमी झाल्याने बाजारपेठेत कैरी घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे.मे महिन्यात लोणचं टाकण्यासाठी कैरी खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते मात्र जून महिन्याच्या अखेरीस कैरीचा भाव कमी होत असल्याने अनेकांकडून जून अखेरीस कैरी खरेदी करण्यास पसंती दर्शविली जात आहे.मे महिन्यात ६० ते ७० रुपये किलो असलेली कैरी आता ३० रुपये किलो प्रमाणे मिळत असल्याने कैरी घेण्यासाठी महिलांची गर्दी होत असून सातपूडा पर्वत रागेंतून येणाऱ्या गावरान कैरीची जास्त मागणी असल्याने गावरान कैरीचे इतर कैरींपेक्षा भाव जास्त आहेत.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- मुलीला भेटण्यासाठी जिंतूर तालुक्यातून परभणीकडे दुचाकीवर येत असतांना अचानक चक्कर येऊन घाम सुटल्याने 36 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. सदर दुचाकीस्वाराला परभणी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. सदर घटना परभणी - जिंतूर रोडवरील नांदापुर पाटीजवळ घडलीय. जिंतूर तालुक्यातील कसर येथील रहिवाशी 36 वर्षीय शिवाजी भोसले हे दुचाकीने परभणीकडे मुलीला भेटण्यासाठी येत होते. नांदापुर येथे आल्यावर त्यांना अचानक घाम सुटला. त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या बाजुला उभी केली. काही नातेवाईकांना फोन करुन माहिती दिली. अचानक चक्कर आल्याने शिवाजी भोसले हे जागेवर पडले. त्यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय साणालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन सदर व्यक्ती मयत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे...
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी येथे शाळकरी मुलांचे शिक्षणासाठीचे हाल दाखवणारी बातमी झी 24 तास दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची दाखल घेतलेली आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी याबाबत ठोस भूमिका घेत, पीडब्ल्यूडी विभागाचे पथक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाठवले. तसंच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सुविधा व्हावी यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल उभारन्याय येईल, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येणारे दिवसांमध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्यात येणार असल्याची ही माहिती मिताली सेठी यांनी दिलेली आहे. झी 24 तास च्या बातमी नंतर आता केलाखडी तील समस्या सुटायला मदत होणार आहे. अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरावा लागत आहे. नदीवर पूल नसल्याने आणि रस्त्याचा अभाव असल्याने या विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्या पकडत नदी पार करावी लागते. स्वातंत्र्यापूर्वीपासून रस्ता नसल्याची ही परिस्थिती आजही तशीच असून, या मुलांचा शिक्षणासाठीचा प्रवास अक्षरश जीवघेणा ठरत आहे. याबाबतचे वृत्त झी २४ तासने दाखल नंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे
byte - मिताली शेठी, जिल्हाधिकारी
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report