Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

डॉक्टरों ने ड्रेनेज पूरा होने तक ट्रिमिक्स सड़क निर्माण रोककर प्रदर्शन किया

SMSarfaraj Musa
Feb 25, 2026 01:15:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - आधी ड्रेनेज करा मगच ट्रिमिक्स रस्ता करा ,संतप्त डॉक्टरांनी रस्त्यावरच ठिय्या मारून रस्त्याचे काम पाडले बंद. मिरज शहरात करण्यात येत असलेले काँक्रीट ट्रिमिक्स रस्त्याचे काम डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत बंद पाडले,मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यंतचा रस्ता काँक्रीटचा ट्रिमिक्स करण्यात येत आहे.रस्त्याचे काम देखील सुरू झालेला आहे,मात्र रस्ता करण्याआधी ड्रेनेजचे काम पूर्ण करावं मगच रस्ता करावं,अशी भूमिका घेत डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत, रस्त्याचे काम बंद पडले,यावेळी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मारत आंदोलन करण्यात आलं.ट्रिमिक्स रस्ता झाल्यावर ड्रेनेज कामासाठी पुन्हा खुदाई केली जाणार,त्यामुळे कोट्यवधी खर्च करून केलेल रस्ता पुन्हा खराब होणार, अशी भूमिका घेत डॉक्टरांनी हे आंदोलन केले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Feb 25, 2026 03:16:14
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 25, 2026 03:03:52
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या नूतन महापौर रूपाराणी निकम ॲक्शन मोडवर आलेत. कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेसाठी (माझं शहर माझी जबाबदारी) या विशेष मोहिमेची त्यांनी घोषणा केली आहे. महानगरपालिकेत सर्वपक्षीय गटनेते और अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत महापौर रूपाराणी निकम यांनी या मोहिमेची घोषणा केली. येणाऱ्या 27 फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून शहरात ही मोहिम राबवली जाणार असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सामाजिक संस्थांचे शेकडो लोक रस्त्यावर उतरणार आहेत. या मोहिमेंतर्गत मुख्य रस्ते आणि फुटपाथ यांच्या स्वच्छतेबरोबरच अतिक्रमण देखील हटवली जाणार आहेत. कोल्हापूरकरांनी या स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी आवाहन केले आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 03:03:32
Nashik, Maharashtra:नाशिक महानगपालिकेनी १ हजार ४१६ मिळकतधारकांना वॉरंटच्या बजवल्या नंतरदेखील अवघी ९ टक्केच वसुली... अँकर नाशिक मालमत्ता कर नाशिक थकबाकी दारांविरुद्ध महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत वॉरंटची कारवाई सुरू केल्यानंतर शहरातील सहा विभागांतून एकूण ३ कोटी २५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. १,४१६ मालमत्ता धारकांना वॉरंट बजावत ३६ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यातून केवळ ९ टक्केच रक्कम वसूल झाली असून, ही वसुली वाढवण्यासाठी मार्च महिन्यात कारवाई तीव्र करण्याचा इशारा आहे प्रशासनाने दिला एकून थकबाकीदारांपैकी ३२ कोटी ५९ लाख रुपये ही जुनी थकबाकी, तर ३ कोटी ७३ लाख रुपये ही चालू आर्थिक वर्षाची मागणी आहे. वॉरंट कारवाईनंतर आतापर्यंत सव्वातीन कोटी रुपये वसूल झाले असले तरी अद्याप मोठी रक्कम येणे बाकी आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 02:33:10
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 25, 2026 02:32:42
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 02:32:25
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मदमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जलपर्णीने घट्ट विळखा घातला असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. विशेषतः कादवा नदीपात्रात तब्बल आठ किलोमीटरपर्यंत निफाडच्या दिशेने जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे तसेच गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढत आहे जलपर्णीच्या वाढत्या प्रमाणामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता घसरू लागली असून पाणी दूषित होण्यास सुरुवात झाली परिणामी धरणाच्या लाभक्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होणार असून लासलगावसह 16 गाव तसेच निफाड, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, नांदूर मधमेश्वर तसेच गोदाकाठ परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो यामुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने पाटबंधारे विभागाने तातडीने धरण व नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 02:32:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मनपात स्थायी समिती आणि विविध समित्यांच्या सदस्यांची नावे ५ मार्च रोजी निश्चित होतील. त्यासाठी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे. या वेळी स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. महिला व बालकल्याण समितीत नऊपैकी किमान ७५% महिला असणे अनिवार्य आहे. या समितीत किमान ७ महिला सदस्यांची निवड केली जाईल. वैद्यकीय साहाय्य व आरोग्य, शहर सुधार, माध्यमिक व तांत्रिक शाळा आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन या समित्यांच्या प्रत्येकी ९ सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय या सभेत घेतला जाईल, अशी माहिती महापालिका नगरसचिव यांनी दिली आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Feb 25, 2026 02:31:54
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 02:30:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे शेळ्या विक्रीच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून मंगळवारी रात्री दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने झालेल्या तुफान दगडफेकीत दोन जण गंभीर, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. जमावाने रस्त्यावरील सुमारे १५ ते २० वाहने फोडून दुकानांचे मोठे नुकसान केले. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर जमाव शांत झाला. अंभई येथील मुख्य चौकात शेळ्या विक्रीच्या पैशांच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी जवळपास एक हजार लोकांचा जमाव समोरासमोर आला. लाठ्या काठ्या आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला. हाणामारीप्रकरणी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या duoला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 02:30:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ मध्ये मंगळवारी सकाळी एका खासगी व्यक्तीने चक्क कार्यालयाचा ताबा घेऊन निबंधकांच्या खुर्चीवर बसण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अबुलाला हाश्मी असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने अधिकारी वेळेवर येत नाहीत, त्यामुळे 'जनतेने मला नियुक्त केले आहे' असे म्हणत शासकीय कागदपत्रे हाताळली. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे खडबडून जागे होत प्रशासनाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे दिवसभर कार्यालय बंद राहिले. रजिस्ट्रीसाठी आलेल्या जवळपास पाचशे नागरिकांना ताटकबडत बसावे लागले.... या घटनेनंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात हाश्मी आणि त्याच्या १० ते १५ साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तक्रार देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पोलिस ठाण्यात गेल्याने तिन्ही नोंदणी कार्यालये बंद ठेवण्यात आली. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दिवसभरातील सुमारे १ ते १.५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 25, 2026 01:16:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या विटा-तासगाव रस्त्याची चाळण,रस्त्यातील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय.. सांगलीच्या तासगाव विटा रोडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे झाले आहेत, रस्त्यावरच्या या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय,खड्डे चुकवताना अपघाताचे देखील प्रकार घडत आहेत,यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांच्या मधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तासगाव मधून विटा कडे जाणारा हा राज्यमार्ग असून शिरगाव पासून विटा शहरा पर्यंत खड्डेयुक्त रस्ता झाला,मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे。
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 25, 2026 01:15:29
Buldhana, Maharashtra:राष्ट्रपतींच्या हस्ते शेगावात 'आयुष' मेळाव्याचे आज भव्य उद्घाटन. देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६' चे भव्य उद्घाटन होणार आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू ह्या श्री संत गजानन महाराजाँचं दर्शन घेणार असून सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनाच्या वेळेत थोडे बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे आज सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार नाही. दुपारी १२:३० नंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत होईल.
0
comment0
Report
Advertisement
Back to top