Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चंद्रकांत पाटील का तंज: सत्य-असत्य मोर्चे पर विपक्ष को चुनौती

SMSarfaraj Musa
Oct 31, 2025 07:03:18
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
मत चोरीचा आरोप करत महाविकास आघाडी व मनसेच्या वतीने उद्या मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे,यावरून चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला आहे.तसेच लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्यावर आम्ही घोटाळा म्हणला का ?पण विधानसभेत तुम्ही हरला मत चोरी,जिंकला की बरोबर,हे नकळण्या इतपत.samānya māṇuṣa mūrkha āhe, kā? aśā praśna dekhīla candraṅkānta pāṭālī ne kālā āhe, te sāṅgalīm̐ madhē bōlata hōtē. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 31, 2025 13:03:42
Ambernath, Maharashtra:रेल्वे स्थानकावर बंद असलेल्या सरकत्या जिन्याना वाहिली श्रद्धांजली बदलापूर रेल्वे स्थानकावर महाविकास आघाडीच अनोखा आंदोलन Anchor बदलापूर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याच पंधरा दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आलं , मात्र उद्घाटनानंतर अवघ्या तीन दिवच हे सरकते जिने सुरू राहिले , त्यामुळे आज रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या सरकत्या जिन्याला श्रद्धांजली वाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोख आंदोलन केलं ,तसेच  यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला तसेच  प्लॅटफॉर्म  क्रमांक 2 वर लावण्यात आलेल्या संरक्षण जाळ्या  लवकरात लवकर  काढून  टाकाव्यात अशी मागणी केली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 31, 2025 12:47:27
Thane, Maharashtra:‘रन फॉर युनिटी’मधून कल्याण ग्रामीण मध्ये एकतेचा जयघोष.. नागरि‍कांचा उत्स्फूर्त सहभाग... देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमला परिसर... ॲंकार... राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज टिटवाळ्यात ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनच्या माध्यमातून एकतेचा, अखंडतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला गेला. कल्याण तालुका पोलिस ठाणे (ग्रामीण) यांच्या वतीने आयोजित या धावस्पर्धेत तरुण, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी वाजपेयी चौकातून धावेला सुरुवात झाली. गणपती मंदिर चौक येथे ही मॅरेथॉन संपन्न झाली. एक भारत, श्रेष्ठ भारतच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. देशभक्तीचे गीत, तिरंगा आणि जोशपूर्ण घोषणांनी टिटवाळ्याचे वातावरण दणाणून गेले. कार्यक्रमादरम्यान सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि वैद्यकीय सुविधा यांची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत करत होते. प्रत्येक सहभागीच्या चेहहऱ्यावर देशभक्तीचा भाव आणि एकतेचा संदेश झळकत होता. या उपक्रमातून “एकता आणि अखंडता हीच भारताची खरी शक्ती” असा संदेश समाजमनात रुजविण्यात आला. ‘रन फॉर युनিটি’मुळे आज टिटवाळा देशभक्तीच्या लहरींनी न्हावून निघाले. पोलिस ठाण्याच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेबद्दलची जाणीव दृढ झाली असून हा उपक्रम देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला. डॉ.डी.एस.स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, अनमोल मित्तل अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण आणि अनिल लाड उपविभागीय पोलीस अधीकारी मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज गिरी पोलीस निरीक्षक, कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या नियोजनाखाली तसेच कल्याण तालुका पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 31, 2025 12:47:06
Ratnagiri, Maharashtra:परतीच्या अवकाळी पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान कोकणातील शेतकऱ्यांना मराठवाडा, विदर्भाप्रमाणेच मदत जाहीर करा आमदार भास्करराव जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना पत्र अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांयांना कृषी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोकणात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजून आडवे पडले आहे, त्यांना पुन्हा कोंब फुटले आहेत, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके अक्षरशः सडत आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त असून शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत. भातपीक हे कोकणातील एक प्रमुख पिक असून बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. हातातोंडाशी आलेले पिक डोळ्यांदेखत वाया जात असल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोकणातील शेतकरी कितीही नुकसान झाले, संकटात सापडला, अन्याय झाला किंवा कर्जबाजारी असला तरी आत्महत्या करत नाही. त्यामुळे सरकार कोकणातील शेतकऱ्यांकडे कायमच दुर्लक्ष करत आलेलं आहे. परंतु यावेळची परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भात यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्य सरकारने दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 31, 2025 12:37:42
Lasalgaon, Maharashtra:अँकर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला फ्रान्सच्या 15 जणांच्या महिला व पुरुष शिष्टमंडळाने भेट दिली. त्रासच्या या शिष्टमंडळाचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिवांकडून पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले या शिष्टमंडळाने कांदा लिलाव प्रक्रिया, व्यापाऱ्यांची खरेदी-विक्री पद्धत तसेच कांद्याच्या लागवडीपासून बाजारपेठेपर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी सविस्तर पाहणी केली शिष्टमंडळातील सदस्यांनी बाजार समिती परिसरातील कांदा लिलाव प्रत्यक्ष पाहिला तसेच काही व्यापाऱ्यांच्या गोडाऊनलाही भेट देऊन कांदा साठवण व विक्री प्रक्रियेची माहिती घेतली. चर्चेदरम्यान शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या शेतकरी तोट्यात कांदा विक्री करत असल्याचे समजताच या फ्रेंच शिष्टमंडळाने मोठे आश्चर्य व्यक्त केले
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 31, 2025 12:35:34
Kolhapur, Maharashtra:आता राज ठाकरे त्या ग्रुपमध्ये जोडले गेले आहेत. राज ठाकरे यांच्यावर कॉलेजमध्ये असल्यापासून माझे प्रेम आहे. पण आज ते या ग्रुप मध्ये गेले आहेत. मी हल्ली कोणावरील निगेटिव्ह बोलत नाही. जो ग्रुप आहे पवार साहेब, उद्धव ठाकरे, काँग्रेस मधील इतर नेते त्यांना लोकसभेला यु एम मध्ये घोटाळा वाटत नाही, पण त्यांना विधानसभेला घोटाळा वाटतो. सतत आम्ही 41 जागा मिळवणारे लोकसभेला 17 जागावर कसे आलो.. त्याचा प्रश्न आम्हाला देखील होता.. पण त्यावर आम्ही विश्वास ठेवला.. पण आता ते सिस्टीमवर आघात करत आहेत, ते आरा जगतेवर जाईल. पण ते सर्वांनाच भस्मसात करून टाकेल. उद्याचा मोर्चा मध्ये मनामध्ये एक आणि ओठावर एक.. मनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीवर राग असेल तर तो राग सदा सर्वदा व्यक्त करा. केजरीवाला हरले की म्हणायचे ईव्हीएम मध्ये दोष.. त्यामुळे उद्याचा मोर्चा सर्वसाधारण दृष्टीने राजकीय स्टंट.. यांना हा नव्याने शोध लागला आहे. माझ्या टोटल विधानसभा मतदारसंघात निवडणूक पूर्व सुद्धा एक आणि एक मत नसते, आपण ते हजारामध्ये काढतो.. ते हजारात कधी नसतोच.. पत्ते बदलले जात असतात, दुपार मतदान असतो. नगरसेवक असणारी लोक गावाकडे राहणारी पण नोकरीनिमित्त आलेल्या लोकांची नावे देखील नोंदवतात.. त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये नाव नोंदवत असताना स्पेलिंग चुकले तर अशा लोकांची नावे दुबार लागतात.. वेगवेगळ्या पक्षाने दुबार नावे आयडेंटिफाय करून दिले तर, का मतदाराने करून द्यावे असं सुचवले. हे दुतोंडी आहेत, बिहारमध्ये यादी शुद्ध केली तर त्यांना हे नको आहे.. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुपडा साफ होईल. तासगाव मध्ये 4000 लोकांची सभा होते.. पण लोक महायुतीला पसंती देत आहेत.. यांना निवडणुका लढवायच्या आहेत.. बाकी काही नाही.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 31, 2025 12:18:58
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील जऊळका ते अमाणवाडी या ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.रस्ता उखडल्याने वाहन चालकांना वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागत आहे.समृद्धी महामार्गाच्या बांधकामावेळी या मार्गावरून गौणखनिजाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, त्यामुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.याचबरोबर जाऊळका ते वरदारी खुर्द दरम्यानचा पूल जीर्णावस्थेत असून तो धोकादायक स्थितीत आहे.या रस्ता व पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा करण्यात आली असली तरी बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी आज धरण आंदोलन केलं यावेळी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तात्काळ रस्ता आणि पूल दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 31, 2025 12:15:37
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यातून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले विजय मालोकार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां जवळ आल्याने अकोला जिल्ह्यात पक्षांतरणाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. विजय मालोकार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 31, 2025 12:12:01
Virar, Maharashtra:खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने मच्छीमार बोट अडकली मत्स्य विभागाच्या वतीने मदत कार्य 'जय जीवदानी' बोटीने खेचून अडकलेली बोट किनारा परिसरात आणली सोबत अर्नाळा मच्छीमार संस्थेच्या बोटीचे सहाय्य खवळलेल्या समुद्रमुळे अनेक मच्छीमारांचे नुकसान अँकर - खोल समुद्रात इंजिन बंद अडकून पडलेल्या मच्छीमार बोटीला कोस्टगार्ड व अर्नाळा मच्छीमार संस्थेतील बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर सुखरूप आणण्यात यश आले आहे... अर्नाळा समुद्र किनाऱ्यापासून ११ नोटिकल माईल्स अंतरावर ' आई तुळजा भवानीसी नावाची मच्छीमार बोट समुद्रात वादळी वाऱ्यामुळे इंजिन बंद झाल्याने अडकून पडली होती.. कोस्टगार्डला याची माहिती मिळाल्यानंतर मत्सविभागाच्या जय जीवदानी बोटीमार्फत अडकलेल्या बोटीला खेचून सुखरूप बाहेर काढण्यात आले , त्यानंतर अर्नाळा मच्छीमार संस्थेच्या ''नमो मारिया' मच्छिमार बोटीच्या मदतीने तिला सुखरूप बंदरात आणण्यात आले आहे ....या बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप असून वेळीच मदत मिळाल्याने सुटकेचा श्वास घेत आहेत ... हवामान बदलामुळे तयार झालेल्या समुद्रातील वादळात अनेक मच्छीमारबोटींचे नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत....
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 31, 2025 12:09:58
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 31, 2025 11:59:36
Yeola, Maharashtra:येवला शहरामध्ये अवैधरित्या गॅसची रिपेरिंग होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालून शाहिद वाहीत खान याला नांदगाव रोड पाटाजवळ असलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेतल्या असून त्याच्या ताब्यातून एकोणावीस गॅस सिलेंडर, गॅस भरण्यासाठी लागणारी मोटर, वजन काटा असा ऐकून 83 हजार 600 रुपयेांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे, सागर काकड, पोलीस शिपाई कापसे, आदींनीही कारवाई केली असून येवला शहर पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 31, 2025 11:56:14
Kalyan, Maharashtra:केडीएमसी सी एफ सी मधील सेवा विस्कळीत एका आठवड्या पासून सेवा विस्कळीत, केडीएमसीचे दुर्लक्ष. नागरिकांना हेलपाटे मारण्यासह मनस्तापाला सामारे जाण्याची वेळ केडीएमसीच्या कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रांमधील ऑनलाइन प्रणाली गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज शेकडो नागरिक जन्म मृत्यू, पाणी, मालमत्ता कर बिलांची रक्कम भरण्यासाठी केंद्रांवर येत आहेत, परंतु सिस्टम बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. आणि हेलपाटे मारण्याची वेळ आल आहे. सोमवारीही मोठ्या संख्येने नागरिक नियमित बिल भरण्यासाठी आले होते, परंतु कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सिस्टीम अजूनही बंद आहे आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणे शक्य नाही. पाणी आणि मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत संपली आहे, तर ऑनलाइन प्रणाली पूर्ववत न झाल्यामुळे बिल भरण्यास विलंब होत आहे. असे असूनही नागरिकांना दंड भरावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. जर चूक महानगरपालिका प्रशासन किंवा कंत्राटदार कंपनीची असेल, तर विलंबाची शिक्षा नागरिकांना का दिली जात आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. ई गव्हर्नर चा टेंभा मिरविणार्या केडीएमसी कधी अपेडट होणार असा सवाल यानिमित्ताने दक्ष नागरिक करीत होते. चेतन मामुनकर नागरिक
0
comment0
Report
Advertisement
Back to top