Back
रन फॉर यूनिटी: टिटवल्या में एकता और अखंडता का संदेश
UJUmesh Jadhav
Oct 31, 2025 12:47:27
Thane, Maharashtra
‘रन फॉर युनिटी’मधून कल्याण ग्रामीण मध्ये एकतेचा जयघोष.. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग... देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमला परिसर... ॲंकार... राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज टिटवाळ्यात ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनच्या माध्यमातून एकतेचा, अखंडतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला गेला. कल्याण तालुका पोलिस ठाणे (ग्रामीण) यांच्या वतीने आयोजित या धावस्पर्धेत तरुण, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी वाजपेयी चौकातून धावेला सुरुवात झाली. गणपती मंदिर चौक येथे ही मॅरेथॉन संपन्न झाली. एक भारत, श्रेष्ठ भारतच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. देशभक्तीचे गीत, तिरंगा आणि जोशपूर्ण घोषणांनी टिटवाळ्याचे वातावरण दणाणून गेले. कार्यक्रमादरम्यान सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि वैद्यकीय सुविधा यांची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत करत होते. प्रत्येक सहभागीच्या चेहहऱ्यावर देशभक्तीचा भाव आणि एकतेचा संदेश झळकत होता. या उपक्रमातून “एकता आणि अखंडता हीच भारताची खरी शक्ती” असा संदेश समाजमनात रुजविण्यात आला. ‘रन फॉर युनিটি’मुळे आज टिटवाळा देशभक्तीच्या लहरींनी न्हावून निघाले. पोलिस ठाण्याच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेबद्दलची जाणीव दृढ झाली असून हा उपक्रम देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला. डॉ.डी.एस.स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, अनमोल मित्तل अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण आणि अनिल लाड उपविभागीय पोलीस अधीकारी मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज गिरी पोलीस निरीक्षक, कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या नियोजनाखाली तसेच कल्याण तालुका पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 17:01:130
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 16:50:180
Report
SNSWATI NAIK
FollowOct 31, 2025 16:17:050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 31, 2025 16:16:520
Report
KPKAILAS PURI
FollowOct 31, 2025 15:46:070
Report
ABATISH BHOIR
FollowOct 31, 2025 14:16:480
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 31, 2025 14:04:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 31, 2025 13:03:420
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 31, 2025 12:47:060
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 31, 2025 12:37:420
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:35:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:20:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 31, 2025 12:18:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:15:370
Report