Back
कोकण के किसानों की भातपिक नुकसान, मराठवाड़ा-विदर्भ के समान मदद की मांग
PPPRANAV POLEKAR
Oct 31, 2025 12:47:06
Ratnagiri, Maharashtra
परतीच्या अवकाळी पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान कोकणातील शेतकऱ्यांना मराठवाडा, विदर्भाप्रमाणेच मदत जाहीर करा आमदार भास्करराव जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना पत्र अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांयांना कृषी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोकणात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजून आडवे पडले आहे, त्यांना पुन्हा कोंब फुटले आहेत, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके अक्षरशः सडत आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त असून शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत. भातपीक हे कोकणातील एक प्रमुख पिक असून बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. हातातोंडाशी आलेले पिक डोळ्यांदेखत वाया जात असल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोकणातील शेतकरी कितीही नुकसान झाले, संकटात सापडला, अन्याय झाला किंवा कर्जबाजारी असला तरी आत्महत्या करत नाही. त्यामुळे सरकार कोकणातील शेतकऱ्यांकडे कायमच दुर्लक्ष करत आलेलं आहे. परंतु यावेळची परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भात यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्य सरकारने दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 17:01:130
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 16:50:180
Report
SNSWATI NAIK
FollowOct 31, 2025 16:17:050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 31, 2025 16:16:520
Report
KPKAILAS PURI
FollowOct 31, 2025 15:46:070
Report
ABATISH BHOIR
FollowOct 31, 2025 14:16:480
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 31, 2025 14:04:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 31, 2025 13:03:420
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 31, 2025 12:47:270
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 31, 2025 12:37:420
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:35:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:20:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 31, 2025 12:18:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:15:370
Report