Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410503

आंबेगाव अवसरी खुर्द में दो बिबट्यों का मुक्त संचार; स्थानीय भय

HCHEMANT CHAPUDE
Dec 05, 2025 05:33:49
Manchar, Maharashtra
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावात रात्री दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ईश्वरबुवा मंदिर परिसरात रात्री दोन बिबट्यांचा रस्त्यावर फिरताना स्थानिकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. वनविभागाला बिबट्यांविषयी सूचना देण्यात आली, परंतु ते तेव्हा लांब गेले होते. अवसरी खुर्दसारख्या ग्रामीण भागात वन्यजीव-मानवी संघर्ष वाढत असल्याने नागरिकांनी रात्री बाहेर पडू नये अशी आवाहन वनविभागाकडून केली जाते. वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे. प्रतिनिधी Hemant Chapude (Ambegaon) — झी मिडिया मंच पुणे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Dec 05, 2025 06:02:44
Amravati, Maharashtra:तीन प्रधान सचिवांची समिती आज मेळघाट दौऱ्यावर; वाढत्या बालमृत्यूवर न्यायालयाने कान टोचल्याने प्रधान सचिवांना आली जाग, प्रधान सचिवांच्या स्वागतासाठी मेळघाट होतंय चकाचक तीन प्रधान सचिवांची समिती अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर जाणार आहे. ही समिती मेळघाटची झाडाझडती घेणार असून दौऱ्यावर निघण्याआधी समितीची अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. वाढत्या बालमृत्यूवर न्यायालयाने सरकार आणि प्रशासनाचे कान टोचल्यानंतर पहिल्यांदाच तीन प्रधान सचिवांची समिती मेळघाट दौऱ्यावर जाणार आहे. सचिवांच्या दौऱ्यासाठी मेळघाटातील सहा मार्ग निश्चित करण्यात आले असून त्याआधी प्रधान सचिवांच्या स्वागतासाठी रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रधान सचिवांच्या स्वागतासाठी मेळघाट चकाचक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास विभाग या विभागांच्या सचिवांचा दौऱ्यात समावेश आहे. दौऱ्याआधी बैठक स्थानिक अधिकाऱ्यांसोबत प्रधान सचिवांनी बैठक घेतल्याने चर्चांना उधाण आले असून दौऱ्याआधी अधिकाऱ्यांसोबत बैठक का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 05, 2025 05:49:30
Khed, Maharashtra:कुलदैवत खंडोबाच्या गडावर चोरी केल्या, रोख रकमेसह ४१ लाखांचा ऐवज लंपास. खेड तालुक्यातील कुलदैवत खरपुडी खंडोबा गडाच्या मंदिरात रात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडालीय. खंडोबा मंदिरातील दोन दरवाजांची लॉक तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन खंडोबा देवाच्या अंगावरील २१ किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोकड असा तब्बल ४१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे रेकॉर्डिंगवर नसल्यामुळे चोरट्यांचा चेहरा कैद होऊ शकला नाही. स्थानिक भक्त वर्ग आणि ग्रामस्थ या चोरीच्या घटनेमुळे आक्रोशित आणि संतप्त आहेत. राजगुरुनगर पोलिसांकडून तपास सुरु असून चोरट्यांचा शोध सुरु आहे.
86
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 05, 2025 05:48:55
Ratnagiri, Maharashtra:दाभोळखाडीतील प्रदूषणाचा पुन्हा अभ्यास सुरू अभ्यासासाठी केंद्रीय पथक दाखल वाघिवरे ते तुंबाड दरम्यान घेण्यात आले पाण्याचे नमुने सांडपाण्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम तपासणार खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील सीईटीपीमधून प्रक्रिया करून खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मासे तसेच इतर सागरी जीवसृष्टीवर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी भारत सरकारच्या सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून संशोधन केलं जात आहे. पावसाळ्यानंतर संस्थेच्या पथकाने गेल्या आठवडाभरापासून दाभोळखाडी संघर्ष समितीबरोबर वाघिवरे ते थेट तुंबाडपर्यंतच्या दरम्यान खाडीत ठिकठिकाणी वेगवेगळे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. संस्थेने पावसाळ्यादरम्यान दाभोळ खाडीतील एकूण सहा ठिकाणांवरून पाणी नमुने गोळा करून प्राथमिक तपासणी केली आहे. आता पावसाळ्यानंतर गेल्या आठवडाभरात खाडीतील वाघिवरे, कारूळ, धोपावेनंतर करंबवणे येथील दिवा बेट ते तुंबाडपर्यंत मृत मासे, पाणी, चिखलाचे नमुने घेतले. या नमुन्यांतून तुलनात्मक विश्लेषण केलं जाणार असून या अभ्यासातून पाण्यातील रासायनिक घटक, विरघळलेल्या ऑक्सिजनची मात्रा, जड धातूंची उपस्थिती तसेच त्याचा माशांच्या आरोग्यावर होणारा प्रभाव तपासण्यात येणार आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या दाभोळखाडीवर नदीकाठच्या मच्छीमारांचा उदरनिर्वाह अनेक वर्षापासून चालत आला आहे. मात्र लोटे औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या रासायनिक प्रदूषणामुळे भोई समाजाने निकराचा लढा देऊनही आजतागायत प्रदूषणाचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघालेला नाही. खाडीत अधूनमधून मासे मरतुक ही होतच असते. त्यामुळे या खाडीचा शास्त्रोक्त सर्व्हे करण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असलेली सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटवर ही जबाबदारी सोपवली. ही एक प्रमुख मासेमारी संशोधन संस्था असून ती देशातील अंतर्गत मासेमारीच्या विविध पैलूंवर संशोधन करत असल्याने या खाडीच्या अभ्यासाची जबाबदारी सोपवली आहे.
95
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 05, 2025 05:21:01
Dhule, Maharashtra:सारंगखेडा घोड़ेबाजार पहिल्याच दिवशी महागड्या घोड्यांची खरेदी विक्री झाली. आमदार राहुल कुल यांच्या मुलाने अकरा लाखाचा घोडा खरेदी केला आहे. घोडे बाजारात प्रचंड तेजी असल्याने पहिल्याच दिवशी 40 लाखाचा उलाढाल झाली आहे. जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंखेडा घोडेबाजाराला सुरुवात झाली असून घोडेबाजारात पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे या बाजारात पहिल्याच दिवशी अकरा लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झाली असून पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी अकरा लाखाची गुढी खरेदी केली आहे. एकूणच सारंगखेडा घोडेबाजारात प्रचंड तेजी दिसून येत असल्याने यावर्षी आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत अजून पाच दिवसात घोड्याबाजारात साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे.
135
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 05, 2025 05:17:23
Akola, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अकोला जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर अकोल्यातील शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरात ठிகठिकाणी बॅनर्स ही लावण्यात आले.मात्र या बॅनर्समुळे आता नव्या राजकारण चर्चांना ऊत आला आहे.याआधी संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांचा फोटो शहरात लावलेल्या अनेक बॅनर्सवरून गायब असल्याचे समोर आले आहे.या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क–वितर्कांना सुरुवात झाली आहे.अनावधानाने झालेली ही चूक आहे की पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीचे हे प्रतिबिंब तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.कॅप्टन अडसूळ यांच्या नियुक्तीने जिथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तिथेच बॅनरवरील गायब फोटोमुळे निर्माण झालेला नवीन वाद शिंदे गटाच्या स्थानिक राजकारणाला वेगळे वळण देऊ शकतो.
104
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 05, 2025 05:05:42
Khed, Maharashtra:जादूटोणा.... सीसीटीव्ही कॅमेरात कैद.. Anc :- खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी घडलेल्या एका जादूटोणाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीय…जादूटोणा करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कँमेरात कैद झालाय Vo :- बंद घराच्या दारात दह–भात, लिंबू, हळदकुंकू लावून नारळ फोडणाऱ्या संशयितांचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय! या विचित्र कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं असून हा प्रकार जमिनीच्या वादातून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.कडुस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर हातात पिशवी घेऊन आलेला एक पुरुष भरदुपारी काहीतरी विधी करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतोय.दारात दही–भात, लिंबू ठेवून त्यावर हळद–कुंकू लावलं जातं… आणि त्यानंतर नारळ फोडला जातो.इतकंच नव्हे तर या पुरुषासोबत एक चेहरा बांधलेली महिला सुद्धा दिसते. परिसरातील नागरिकांनी जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्याने मुंबईहून आलोय असं सांगितलं. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे.गावकऱ्यांच्या मते, या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू असून त्यातूनच हा जादूटोणा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरलीय.
137
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 05, 2025 05:05:08
Manchar, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरीचा थरार! चालकाला मारहाण; मारहाणाचा व्हिडीओ व्हायरल. मंचरच्या तरुणांनी खेड घाटात थार गाडी आडवी लावून बसमध्ये घुसत ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केली. यानंतर चालकाने बस चालू केली असतात या तरुणांनी चालकालाच चालू बसमध्ये मारहाण केली यामुळे बसमधील ३५ ते ४० प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. एसटी बस खेड ते मंचर अशी चालू असताना दोन गुंडांनी आत घुसून मारहाण सुरू केली. तेव्हा एक आजोबा प्रवासी त्यांना थांबवा म्हणत असतानाही त्यांना झालं मारलं. ड्रायव्हरला मारहाण करणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! मंचर पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल नाही, पण ही गुंडगिरी प्रवाशांमध्ये दहशत पसरवतेय. ड्रायव्हर और कंडक्टरवरही हल्ला, लेकिन मंचर पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल नाही! या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली असून, पोलिस कारवाईची मागणी जोर धरतेय. प्रतिनिधी हेमंत चापुडे.
137
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 05, 2025 04:48:38
Ambernath, Maharashtra:सराईत गुन्हेगाराचा तरुणावर लोखंडी रॉड आणि तीष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला उल्हासनगरच्या संभाजी चौकातील घटना Anchor तरुणावर लोखंडी रोड आणि तीष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. रणजीत गायकवाड या तरुणावर संभाजी चौक येथील सत्यसाई हायस्कूलच्या समोर सराईत गुंड विक्रम कोठणकर याने लोखंडी रॉड आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात रणजीतच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून अंगार अनेक वारण्यात आले आहेत, विक्रमची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.प्राथमिक उपचारानंतर रणजीतला मध्यवर्ती रुग्णालयातून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संभाजी चौक परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अंतर्गत वादातूनच हा हल्ला झाला असून , याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
172
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 05, 2025 04:39:52
Amravati, Maharashtra:टीईटी सख्ती निर्णय के विरोध में आज राज्यभर में शिक्षकों के संघटन शाला बंद आंदोलन की हाक दी गयी है; अमरावती जिले में 12 संघटन के हजारों शिक्षक शाला बंद आंदोलन में सहभागी होंगे। शिक्षकों एवं शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिति अमरावती शाखा ने निवेदन जारी किया है, आज दोपहर जिलाधिकारी कार्यालय पर शिक्षण संघटन निदर्शने करेंगे। शाला बंद रख आंदोलन में भाग लेने का आह्वान किया गया है; आंदोलन के दौरान वेतनकटौती करने के पत्र सरकार द्वारा जारी किया गया है, जिसे चर्चा के बिना निकाला गया है—यह पत्र चर्चा न करने की बात कर रहा है। यह आंदोलन लोकतांत्रिक मार्ग से है, इसे दडपशाही के तौर पर नहीं स्वीकार किया जाएगा—यह बात शिक्षिका नेता संगीता शिंदे ने प्रशासन से कही है। मुख्यमंत्री ने भी मांगों पर गौर करने की बात कही है।
110
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 05, 2025 04:39:21
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - साखर आयुक्तालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करा अन्यथा पुण्यात आंदोलन - रघुनाथदादा पाटलांचा इशारा साखर आयुक्तालयाचं नाव बदलून ऊस आयुक्तालय करावं अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे. 12 डिसेंबर पूर्वी नाव बदलावं अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह पुण्यातल्या साखर आयुक्तालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करण्यात येईल,असा इशारा देखील रघुनाथ दादा पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात ऊस आयुक्तालय ऊस मंत्रालय आणि मंत्री देखील आहेत. या उलट शेतकऱ्यांच्याच पैशातून पुण्यात साखर आयुक्तालय उभारलेला आहे,पण हे साखर आयुक्त कार्यालय साखर कारखानदारांचे दबाव खाली चालतं,असा आरोप करत साखर आयुक्त कार्यालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करावं,अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा देखील रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.
108
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 05, 2025 04:34:33
Washim, Maharashtra:वाशिमच्या कारंजा तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी मोठ्या संकटात سापडले आहेत. रोगाची तीव्रता वाढल्याने कपाशीची झाडे करपत आहेत आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. उम्बर्डा बाजार परिसरात यंदा सर्वाधिक कपाशी पेरणी झाली होती. मात्र अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. आधीच्या नुकसानीतून सावरण्याआधीच आता लाल्या रोगाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढवली असून पिकावर केलेला खर्चही भरून निघणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
88
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 05, 2025 04:34:11
Amravati, Maharashtra:ई केवायसी न केल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका; पीएम किसान सम्मान योजना मध्ये 3224 शेतकरी वगळले. अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 224 लाभार्थी या योजनेतून वगळण्यात आले आहे. पीएम किसान सम्मान योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला मात्र वीस वा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत अनेक निकष लावल्याने तसेच आधार व केवायसी रखडल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. बँकेच्या व्यवहारासाठी ई केवायसी आवश्यक असताना केवायसी न केल्याने पुढचा हप्ता बंद होतो. पीएम किसान सम्मानच्या 21 वा हफ्ता 19 नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 974 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र या वेळेस प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करताना या योजनेतून शेतकरी कमी होत आहे; अमरावती जिल्ह्यातील 324 शेतकरी कमी झाले आहेत.
98
comment0
Report
Advertisement
Back to top