Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

तटकरे के बयान पर गोगावले का कड़ा जवाब: महाड के विकास कार्यों पर राजनीतिक तू-तू मैं मैं

PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 11:25:36
Chendhare, Alibag, Maharashtra
विकासाच्या मुद्द्यावर तटकरे यांनी केलेल्या टिकेवर गोगावले यांचे जोरदार उत्तर....... महाड शहरात केलेल्या विकास कामांची यादीच वाचली ...... तटकरे यांच्या वक्तव्यावर केला प्रश्न उपस्थित महाड नगर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी भाजप युतीचे उमेदवारी अर्ज दाखल करताना तटकरे यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून गोगावले यांच्यावर टिका करताना दुर्बीण आणि जाड भिंगाचा चष्मा लावून बघितलं तरी विकास काम दिसत नाही अस तटकरे म्हणाले होते. यावर बोलताना गोगावले यांनी महाडमध्ये केलेल्या आणि मंजुरी असलेल्या विकास कामांची यादी वाचली. आमचा विकास उघड्या डोळ्यांनी दिसतोय त्याला भिंगाची गरज नाही. तटकरे यांना खासदार म्हणून दोन वेळा निवडून दिलं त्यांनी महाडसाठी काय केल हे सांगावं, हिंमत असेल आमच्या मैफिलीत या आणि होऊन जाऊद्या आम्ही कामं केली असतील तर लोक आम्हाला निवडून देतील असं प्रति आव्हान गोगावले यांनी दिलं.
144
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Nov 17, 2025 12:37:37
Dharashiv, Maharashtra:अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदारा विरोधात काम केलं. शिवसेना नेते माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा नवा गौप्यस्फोट माझ्याही मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी मिळून महायुतीत असताना एकत्र लढले त्यामुळे मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर सावंत ठाम साठ आमदारांनी या गोष्टी वरिष्ठ नेत्याकडे सांगितल्या धाराशिव विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढत असताना देखील शिवसेनेचा 60 आमदारा विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी व शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी एकत्र येत विरोधात काम केल्या असल्याचा गोफेस्फोट माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी सत्य शिवाय राहू शकत नाही या केलेल्या टीकेवर आज देखील ठाम असून त्यांनी माझ्या मतदार संघात देखील एकत्रितपणे मला विरोध केला असल्याने मी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही सावंत म्हणाले आहेत या घडलेल्या विरोधातील गोष्टी साठ आमदारांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितल्या का माहित नाहीत पण मी माझी तक्रार मात्र माझ्या नेत्याकडे केली असल्याचे देखील सावंत म्हणाले आहेत
107
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 17, 2025 12:36:20
Satara, Maharashtra:सातारा - फलटणच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी अखेर धनुष्यबाणाच्या चिन्हावरून निवडणूक अर्ज दाखल केला आहे. रामराजे राष्ट्रवादीत असताना त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेना (शिंदे गट) कडून मैदानात उतरल्यानं राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. याचवेळी भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.यामुळे यंदा फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी थेट आणि रोमहर्षक लढत पाहायला मिळणार आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ टक्कर रंगणार असून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
122
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 17, 2025 12:35:42
40
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 17, 2025 12:07:41
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि नगरपंचायत शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार; महायुतीसाठी प्रयत्न केले परंतु ते शक्य झाले नाही – आनंदराव अडसूळ. अँकर: अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या 12 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकामध्ये शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढणार आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात महायुती होणार नसल्याचा स्पष्ट झाला आहे. दरम्यान सहा ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले असून शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, मोर्शी, शेंदुर्जना घाट आणि वरुड या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीसाठी प्रयत्न करण्यात आले परंतु ते शक्य झाले नाही असेही शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ म्हणाले आहे.
88
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 17, 2025 12:07:21
Beed, Maharashtra:बीड़ ब्रेक:भाजपकडून बीड़ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात 52 उमेदवारी अर्ज दाखल. ANC - ऐनवेळी अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले योगेश क्षीरसागर हे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी नगरपरिषदेत दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून डॉ. ज्योती रविंद्र घुमरे उमेदवार असून त्यांचा अर्ज दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजपने देखील आपले नगराध्यक्ष पदासह 52 नगरसेवकांसाठीचे अर्ज दाखल केले आहेत. यामुळे आता बीडमधील सर्वच बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बाईट: योगेश क्षीरसागर भाजपा नेते
95
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 12:07:06
Manchar, Maharashtra:माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तालुक्यातील ही एकमेव नगर पंचायत आहे. - येथे अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजप मध्ये युती झाली असून नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीला देण्यात आलंय. भाजप ला नगरसेवक पदाच्या पाच जागा तर राष्ट्रवादीला बारा जागा देण्यात आल्यात - भाजप मध्ये इथे दोन गट पडले असून भाजप नेते संजय थोरात यांच्या नेतृत्वात दुसऱ्या गटाने नगराध्यक्ष पदासह सात उमेदवारी अर्ज भरलेत. - शिंदेंच्या शिवसेनेने येथे स्वतंत्र पॅनल दिलं असून सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरलेत. - ठाकरे सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात येथे नैसर्गिक आघाडी झाली असून ठाकरे सेनेला नगराध्यक्ष पदासह नगर सेवक पदाच्या आठ जागा देण्यात आल्यात तर राष्ट्रवादी शप ला पाच जागा व काँग्रेस ला चार जागा देण्यात आल्यात प्रत्यक्ष प्रतिनिधी हेमंत चापुडे
93
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 12:06:48
Dhule, Maharashtra:शिरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, भाजप विरुद्धात शिवसेना अशी लढत शिरपूर शहरात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेमध्ये भाजपचे एके काळचे निष्ठावंत हेमंत पाटील हे काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आमदार अमरेश पटेल यांना आव्हान द्यायला उभे टाकले आहेत. शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून आज 27 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.यात नुकतेच भाजप पक्षातून शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला आहे. शिरपूर शहरातील पाटील वाडा येथून शिवसेना जिल्हाध्यक्षसतीश महाले यांच्या नेतृत्वाखालीशक्ती प्रदर्शन करत शिवसेना पक्षाचे सर्वच उमेदवार एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.भाजप पक्षात वारंवार जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून दबाव तंत्र वापरण्यात येत होते यामुळे भाजप पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केल्याचे माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी सांगितले.
158
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 12:00:49
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरली असून भाजपाच्या वतीने डॉक्टर योगिता चवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पहिल्यांदाच होणाऱ्या पिंपळनेर नगर परिषद साठी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. एवढी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळनेर नगर परिषद च्या निवडणुकीत महायुतीतील भाजप व शिवसेनेतर्फे स्वतंत्र नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप व शिवसेना आमने-सामने लढणार आहेत. दरम्यान पिंपळनेर शहराच्या विकास हाच आमचा अजेंडा असून पिंपळनेर नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे.
121
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 11:57:54
Nashik, Maharashtra:पुण prebितील कोरेगाव पार्कमधील महार वतनाचा ४० एकर जमीन हडपण्यासाठी महसूल यंत्रणेचा बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्यभरातील अशा अनेक तक्रारीचा ओघ झी २४ तासकडे सुरू झालाय. आता नाशिकमध्ये महार वतनाच्या जमिनी हडप करण्यासाठी भूमाफियाना मदत करण्यासाठी महसूल महापालिका आणि स्थानिक यंत्रणा कशा एकत्रित याचा पर्दाफाश आपण करणार आहोत ...बघूया ४५ एकर वतनाच्या जमिनीचा नवीन पर्दाफाश आनंद गांगुर्डे रेल्वेमध्ये नोकरी करत ते आता निवृत्त झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना दसक गावात सर्वे नं. ७८ आणि ७९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिली. मात्र या जमिनीवर नाशिक रोड परिसरातील काही भूमाफियांनी ताबा घेतला. तो सोडविण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र ती देऊ न शकल्याने भूमाफियांनी ही जमीन परस्पर विकली. अवघ्या १०० रुपयांच्या स्टॅम्पवर... सर्वसामान्य निरक्षर गरजू लोकांना गुंठ्याने विक्री करत लाखोंचे व्यवहार करण्यात आले. गांगुर्डे यांनी तक्रार केली मात्र तलाठी तहसीलदार यांनी लक्ष दिले नाही...नंतर त्यावर बंगले बांधण्यास सुरुवात झाली त्यावेळीही महापालिकेला सूचना देण्यात आली मात्र प्रत्येकाने दुर्लक्षच केले....अखेर गांगुर्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यासह लेखी तक्रार नोंदविली... आनंद गांगुर्डे तक्रारदार मात्र तरीही महसूल प्रशासन जागे झाले नाही...गांगुर्डे यांनी त्यांच्याप्रमाणे ३९ शेतीमालकाना जागे करण्याचा प्रयत्न केला, संघटितपणे आंदोलने केली..१० ते १२ आंदोलने नाशिक महापालिकेसमोर आणि विभागीय आयुक्तांकडे करून प्रशासनाला जागविण्यात आटोकाट प्रयत्न केला मात्र आजपर्यंत keवलं केवळ कागदी कारवाई झाली आजही ते भूमिहीन आहेत...आता जवळपास ३९ जमीन मालकांच्या या जागेवर महापालकींच्या नोंदीनुसार ३६७ घरे बंगले उभी राहिलीयेत. याप्रकरणी अनेक परिसरातील तत्कालीन नगरसेवक आणि काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येतायेत... (पवन पवार, दिनकर आढाव, इतर सर्व कुख्यात गुन्हेगार) त्यातील काहींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अन्य तक्रारी... खरतर कुठलीही महार वतनाची शेतजमीन शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही. दसक गावातील हे केवळ एक प्रकरण नाही तर विनयनगर, वडाळा, नांदुरनाका, पंचक जेल रोड परिसरात शेकडो हेक्टर गरीबांच्या जमिनी प्रशासनाच्या संगनमताने गिळकृत करण्यात आल्या आहेत. बांधकाम सुरू झाल्यापासूनच या विरोधात तक्रारी होत असताना कारवाईवळ नेहमी राजकीय दबाव आणून नेहमीच ही प्रकरणे दाबण्यात आली आहेत. या साठी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला. त्यामुळे अधिकारी तुपाशी आणि जमीनमालक आजही उपाशी राहिले आहेत.
137
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 17, 2025 11:57:25
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या घुग्गुस नगर परिषदेसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी दाखल केले अर्ज, आ. किशोर जोरगेवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे निवडणूक अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहराच्या घुग्गुस नगर परिषदेच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या सार्वजन‌िक निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. 22 नगरसेवक आणि एका नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी रॅलीसह शक्तिप्रदर्शन करत उत्साहाने अर्ज दाखल केले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील घुग्गुस शहरात नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. अर्ज सादर केल्यावर काँग्रेस उमेदवार दीप्ती सोनटक्के यांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. बाईट १) दीप्ती सोनटक्के, काँग्रेस उमेदवार बाईट २) किशोर जोरगेवार, आमदार,चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
141
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 11:48:34
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने देखील आता दंड थोपडले आहेत. महाविकासाकडे तर्फे काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चौरे देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसच्या वतीने पिंपळनेर शहरातून जंगी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते खासदार गोवाल पाडवी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच होत असलेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप शिवसेना स्वतंत्र लढत असून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या प्रतिभा चौरे देशमुखांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला. पिंपळे शहरातील प्रश्न व विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास आहे यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
90
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 17, 2025 11:42:36
100
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 11:41:17
Chendhare, Alibag, Maharashtra:श्रीवर्धन मध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आमनेसामने आदिती तटकरेच्या मतदार संघात शिवसेनेचं आव्हान दोन्ही बाजूच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. महिलाविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील श्रीवर्धन नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा महायुतीच्या घटक पक्षांतील सामना बघायला मिळणार आहे. राष्ट्रवादीची सत्ता या नगर पालिकेवर आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने नगराध्यक्षसह नगरसेवक पदासाठी १९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आज दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी मिरवणुकीने जाऊन आपापले अर्ज दाखल केले. श्रीवर्धन नगर पालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रमोद घोसाळकर यांनी यावेळी केला. प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमুখ
97
comment0
Report
Advertisement
Back to top