Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

Shirur Nagarapalika Chunav: MLA Katke Par Dabav Ke Aaroop, Pawar Gutt Ne Shikayat Ki

HCHEMANT CHAPUDE
Dec 03, 2025 09:09:10
Shirur, Maharashtra
शिरूर मतदान केंद्रात आजी-माजी आमदारांची शाब्दिक बाचाबाची शिरूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन दबाव तंत्र वापरल्याचा आरोप शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी केला आहे. मतदार नसताना मतदान केंद्रात जाणे हे आचारसंहितेचे उल्लंघन असून, संविधानिक पदावर असले तरी ते अयोग्य असल्याचे पवार म्हणाले. आमदार कटके दिवसभर अनेक केंद्रांवर गेले आणि कार्यकर्त्यांवर दबाव टाकला, असा आरोप करत 'लोकप्रतिनिधी आहात, कायद्याने वागा' असे म्हणत पवार आक्रमक झाले. यावेळी निवडणुकी आयोगाकडे तक्रार करणार, कारवाईची मागणी केली. शिरूर नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव दिसत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप विद्यमान आमदार माऊली कटके यांनी केला आहे. निवडणुकीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने 'पायाखालची वाळू सरकली का?' असे म्हणत पवार आक्रमक झाल्याचे कटके म्हणाले. माझ्याबद्दल काही तक्रारी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे कराव्यात, अशोक पवार यांनी राजकारणातून अलिप्त व्हावे आणि निवृत्ती घ्यावी, असा सल्ला आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी माजी आमदार अशोक बापू पवार यांना दिला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Dec 03, 2025 09:19:15
Parbhani, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या औंंडा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद गावात बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवून ग्राम पंचायत मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार तहसीलदार हरीष गाडे यांच्याकडे केली आहे. आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पेरजाबाद हे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. परंतु गावामध्ये अनुसूचित जमातीचे नागरिक राहत नाहीत. गावातील काही जणांना हाताशी धरून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी बीएलओकडे बनावट कागदपत्रे बनवून सादर केले जात आहेत. बनावट कागदपत्रांची योग्य तपासणी करून चौकशी करावी व योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी औंंडा तहसीलदारांकडे केली आहे.
33
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 03, 2025 09:08:47
36
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 03, 2025 09:08:09
Beed, Maharashtra:बीड : स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा तगडा पहारा, उमेदवारांची पहाटेपासूनच स्ट्रॉंग रूम कडे धाव परळीतील माजी नगराध्यक्षाची अनोखी मागणी बीड जिल्ह्यात सहा नगरपरिषदांचा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.. आज निवडणुकीचा निकाल लागण्याची उत्सुकता सर्वांना होती मात्र न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया ठेवल्याने जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमधील स्ट्रॉंग रूम वरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. तर दुसरीकडे रात्रीपासून ते सकाळी झोपेतून उठल्या उठल्या उमेदवार नगर परिषदेकडे धाव घेत आपलं भविष्य ज्या स्ट्रॉंग रूम मधील मतपेटी मध्ये कैद आहे.. त्याला पहारा देण्यासाठी येत आहेत... तर आम्हाला इथे अंथरून पांघरून घेऊन येत राहण्याची मुभा द्यावी किंवा आमची व्यवस्था करावी अशी अनोखी मागणी परळी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे..
16
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 03, 2025 09:07:51
26
comment0
Report
SKShubham Koli
Dec 03, 2025 08:38:54
Thane, Maharashtra:उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला पुन्हा एकदा सुनावले.. ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात तब्बल 18 जणांनी रस्तेअभावी त्यांचा जीव गमावला आहे. घोडबंदर मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी जड अवजड वाहने रस्त्यावरील खड्डे व त्यावर केलेले पॅचवर्क या कारणांमुळे घोडबंदरवासीय व त्या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार या घोडबंदर मार्गावर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येते; तरीही खड्ड्यांचा प्रश्न जसाच असून या खड्ड्यांमध्ये पडून जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात 18 जणांनी जीव गमावला आहे. उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेडून लपवा-लपवी केल्याचे सांगितले. ठाणे महानगरपालिका याकडे गांभीर्याने का दखल घेत नाही असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
62
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 03, 2025 08:35:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली پولیس दलाच्या कॅन्टीन 'अपहार' प्रकरणी व्यवस्थापक हवालदाराला अटक. सांगली पोलिस दलाच्या संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन 'मध्ये अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या अपहार प्रकरणी कॅन्टीन व्यवस्थापक हवालदाराला अटक करण्यात आली आहे. सांगली पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदीसाठी सुरू केलेल्या 'संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन' मध्ये 74 लाखांचा अपहार झाल्याचे समोर होता. ज्यामध्ये कॅन्टीन व्यवस्थापक पोलीस हवालदार भूपेश भीमराव चांदणे यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. चांदणे याला संजयनगर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
79
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 03, 2025 08:33:02
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिले के बांदिवडे में एक विवाह समारोह में मेहमान के रूप में आई एक महिला चक्कर आकर गिर गई. स्टेज पर मौजूद डॉक्टर नवविवाहित दुल्हन ने चक्कर आ चुकी महिला को प्राथमिक उपचार देकर उसे होश में लाया. इस घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया. विवाह के शुभारम्भ के समय स्टेज पर उपस्थित नवविवाहित दुल्हन Priya Bharti ने घटना के तुरंत बाद मरीज को प्राथमिक उपचार दिया और धैर्य से उसकी देखरेख की. रोहित Buwa, पन्हाला तालुक्यातील चव्हाणवाडी बोरगाव निवासी इंजीनियर हैं जिनकी शादी पुणे जिले के वेल्हे स्थित डॉ. Priya Bharti से तय थी. यह विवाह रविवार 30 नवंबर को देवगिरी फार्म में सम्पन्न हुआ. इस घटना ने पूरे क्षेत्र में चर्चा का विषय बन गई है.
79
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 03, 2025 08:12:03
Kalyan, Maharashtra:मेट्रोच्या कामा दरम्यान जलवाहिनी फुटकी, कल्याण शहरांमध्ये वाहतूक कोंडी. रस्त्या खालची माती खासल्याने रस्ता बंद. मेट्रोचे काम दरम्यान जलवाहिनी काल रात्री फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी रस्त्याच्या खालची माती खचल्याने बैल बाजार ते शिवाजी महाराज चौक हा रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे कल्याण शहरांमध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे भिवंडी कल्याण शिळ रोडला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे तर पत्रिपुल ते बैल बाजार ला येणाऱ्या मोठ्या गाड्या गोविंदवाडी बायपास दुर्गाडी का मार्गे वळण्यात आलेला आहेत. त्यामुळे कल्याणकरांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.
69
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 03, 2025 07:51:42
Nagpur, Maharashtra:राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ओबीसी महासंघ पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा बबनराव तायवाडे यांचा आरोप. निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण देताना गणितीय कॅल्क्युलेशनचा घोळ टाकल्याचाही केला आरोप बाईट --- बबनराव तायवाडे,अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ ----------- नागपूर बाईट -बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ (पॉईंटर) -- 24 ऑक्टोबर 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने जे आदेश निर्गमित केले होते.त्याबाबत महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका बाबत निवडणुकांचे आरक्षण कसे करायचे याबद्दल आदेश देताना त्यांनी एससी, एसटी,ओबीसी आणि महिला या चार प्रवर्गापैकी एससी,एसटी आणि महिलांना वेगळा न्याय दिला.आणि ओबीसीला वेगळा न्याय दिलेला आहे. एससी, एटी महिलांच्या बाबतीत जर आरक्षण गणना करताना कॅल्क्युलेशन ०.५० च्या वर जाते असेल तर मग ततो पूर्णांक मोठ्या आकड्यांमध्ये कन्व्हर्ट केला जातो. उदाहरणार्थ समजा 20.66 तर 21 होते. 21.77 असेल तर 22 होततो. हा नियम एससी,एसटी,महिलां करता आहे. परंतु ओबीसीचा कॅल्क्युलेशन करताना ओबीसी गणना करताना जर गणना 0.50 च्या वर येत असेल तर त्यांना वरचा आकडा न देता तो दुर्लक्षित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश त्याच्यामध्ये दिलेले होते. आणि त्याबाबतच आम्ही राज्य निवडणूक आयोगाला 15 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण मागितलं होतं. ते आम्हाला वेळेच्या आत मिळाले नाही,म्हणून 28 तारखेला आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. आणि हायकोर्टाने पुन्हा निवडणूक आयोगाने दोन तारखेच्या आत يांचं निवेदन जे आहे त्याच्यावरती आपण आपला निर्णय कळवावा. त्या अनुषंगाने काल आम्हाला तो निर्णय मिळाला. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या 24 ऑक्टोबर 2025 च्या आदेशामध्ये तशी तरतूद असल्याने आपलं निवेदन हे करताना येणार नाही..असं म्हटलेलं आहे की ओबीसीचा आरक्षण 27% पेक्षा जास्त जात आहे. अपूर्णांक पूर्णांका मध्ये बदल केला जात नाही.. अरे बाबा 27% ची गणना करताना कॅल्क्युलेशन करताना गणितीय नियमाप्रमाणे जर ते किती गणना 0.50 च्या वर जात असेल तर तो कन्वर्ट करून करून वरचा आकडा द्यायला पाहिजे. हा गणितीय नियम आहे जो आपण एससी, एसटीला लागू केला. महिलाला लागू केला. पण ओबीसीच्या बाबतीमध्ये मात्र वेगळाच नियम आपण त्या आदेशामध्ये दाखवलेला आहे. स्वतःच्या आदेशाचं वेगळं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने काल आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू. निवडणूक आयोगाने केलेली चूक दुरुस्त करण्याची निर्देश द्यावे ही विनंती उच्च न्यायालयाला करावी
190
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 03, 2025 07:39:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वाळूज पुलिस ने गोमांस वाहतुकी पर बड़ी कार्रवाई की है. ८०० किलो गोमांस के साथ एक कार जप्त की गई और दो लोगों को गिरफ्तार किया गया है. जप्त सामग्री की कीमत लगभग ७ लाख ४० हजार रुपये बताई गई है. गोमांस वाहतुकी की सूचना मिलने पर नियंत्रण कक्ष ने वाळूज टोलनाके पर नाका बंदी की. अहिल्यानगर से आ रही एक कार ने पुलिस को देखकर बैरिकेड को धक्का देकर भागने का प्रयास किया. तुरंत पीछा करके वह कार सीधे वाळूज पुलिस स्टेशन के सामने रोक दी गई. जांच के दौरान पीछे की सीट और डिक्की में छुपाकर रखा गया भारी मात्रा में गोमांस पाया गया. चालक हुसेन इब्राहिम तांबोळी और उसके साथी जिकरान शेख को गिरफ्तार कर लिया गया. पूछताछ में दोनों ने बताया कि यह मांस ममदापूर में काटे गए गायों का है और शहर में बिक्री के लिए लाया जा रहा था. लेकिन उनके पास कोई वैध वाहन (वाहन) परवाना नहीं था. पुलिस आगे की जांच कर रही है.
175
comment0
Report
Advertisement
Back to top