Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

शिरूर तालुक्यात बिबट्या जेरबंद, मादा बिबट्या केंद्र में भेजी गई

HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 07:00:19
Shirur, Maharashtra
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट जेरबंद झालाय चार वर्षे वयाचा हा मादी बिबट असून त्याची रवानगी आता माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय. हा बिबट जेरबंद झाला असला तरी अद्यापही या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबट्यांना ही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 08:38:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजीनगर मध्ये सांस्कृतिक मैदानावरुन आता दोन्ही शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या राजकीय जडणघडणीत छत्रपती संभाजीनगर मध्ये सांस्कृतिक मैदानाचे मोठे योगदान आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे च्या शिवसेनेने हे मैदान सहा ते 12 डिसेंबर या तारखेपर्यंत बुक करून टाकलेला आहे त्यामुळे शिंदे सेनेला हे मैदान आता सभेला मिळण्यात अडचणी येतील आणि यातूनच आता जोरदार टोलेबाजी सुरू झाली आहे...\n\nसांस्कृतिक मैदानावर कुणाचा आवाज घुमणार\nबाळासाहेबांचे आवडत्या मैदानावर कुणाची सभा होणार\nउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 7 दिवस मैदान आरक्षित\nछत्रपती संभाजी नगरचे हे सांस्कृतिक मैदान इथल्या राजकीय वर्तुळात महत्वाचे मानले जाते, याच मैदानावरून  बाळासाहेबांनी सँभाजी नगर हवे की औरंगाबाद हा सवाल केलेला आणि त्यानंतर संभाजी नगरचे राजकीय समीकरण बदलली आणि शिवसेना सत्तेत आली.. त्यामुळं या मैदानाची कीर्ती मोठी आहे हेच मैदान आता शिंदे सेनेला मिळू नये म्हणूज अंबादास दानवे यांनी डिसेंबर महिन्यात तब्बल 7 दिवस आरक्षित केले आहे.. मैदान आमचा राजकीय वारसा आहे बाळासाहेबांच्या,  उद्धव ठाकरेंच्या मोठ्या सभा इथं झाल्या आहेत त्यामुळं हे आरक्षित केल्याचं अंबादास दानवे यांचे म्हणणे आहे, तर शिंदे सेनेला मैदान हवे असल्यास आम्ही देऊ त्यांनी यशस्वी सभा घेऊन दाखवावी असा टोलाही दानवे यांनी लावलाय...\n\nByte अंबादास दानवे, नेते उद्धव ठाकरे शिवसेना\n\nVo 2.. यावरून शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी मात्र जोरदार टोलेबाजी केलीय, मैदान आरक्षित केले मात्र उद्धव ठाकरे सभेला येतील का आणि आले तरी मैदान भरवून दाखवा असे आव्हान मंत्री संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिले आहे...\n\nByte संजय शिरसाठ, पालकमंत्री\n\nVo 3...\n\nएकाच मैदानावर सभा घेण्यापूर्वी दोनही शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे, त्यामुळे संभाजीनगर महापालिकेच्या प्रचारात हा मुद्दाही आता चांगलाच गाजणार.. उद्धव ठाकरे 10 डिसेंबर ला इथे सभा घेतील मात्र आचारसंहितेतले अखेरचे दोन दिवस हे मैदान रिकामा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेही इथे सभा गाजवणार का याचीच उत्सुकता आहे\n\nविशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 23, 2025 08:33:39
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 23, 2025 08:33:25
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 23, 2025 08:32:46
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- 66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात , शहरातील पाच ठिकाणी अर्ज-विक्री आणि स्वीकारण्यात येणार, हे सर्व अर्ज ऑफलाइन स्वरूपात स्वीकारण्यात येणार, यासाठी प्रशासनाने केली जय्यत तयारी अँकर:-- 66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होत आहे. शहरातील पाच ठिकाणी अर्ज-विक्री आणि स्वीकारण्यात येणार असून हे सर्व अर्ज ऑफलाइन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारी अर्ज प्रभागनिहाय स्वीकारले जाणार असून आचारसंहिता लागू झाल्यावर लगेच प्रशासनाने स्थिर सर्वेक्षण पथकांची निर्मिती करत निवडणुकीत मतदार आमिषाला बळी पडू नयेत यासाठी उपाय चालविले आहेत. सुमारे 3 लाखावर मतदार आपले स्थानिक कारभारी निवडण्यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान करणार आहेत. राज्यातील ताज्या राजकीय घडामोडी नंतर राजकीय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरून दाखल करण्याची चढाओढ लागली आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 23, 2025 08:05:40
Thane, Maharashtra:दिवा शहरातील बेडेकर नगर, दिवा–आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता. त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन्स दिल्याची माहिती देण्यात आली. पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. ३ डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र १६ डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबिजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबिजची लक्षणे दिसणे हे गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण व संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी नमूद केले. या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का, याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच दिवा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे....
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 07:48:36
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 07:46:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या “ कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं” या कॅम्पिंगच्या फलकाचे अनावरण केलं. यावेळी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सर्वजण निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले. एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे मात्र सतेज पाटलांनी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह महायुतीच्या काही नेत्यांना चांगलाच दम भरला... तुम्ही आता जो त्रास आमच्या उमेदवारांना देत आहात, तुम्ही लक्षात ठेवा 16 जानेवारीला आम्हीच आहोत... अशा शब्दात भर पत्रकार परिषदेतच सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना दरडावले.. पाहूया सतेज पाटील नेमकं काय म्हणाले..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 23, 2025 07:33:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:क्या बडा तो सबसे दम बडा.. आणि सगळ्यांना हाणलं नाही,तर जयंत पाटील नाव सांगणार नाही - ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलांच्या डायलॉग बाजींचे लागले बॅनर्स.. अँकर - सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे, या विजयानंतर ईश्वरपूर शहरात विरोधकांना इशारा देणारे,जयंत पाटलांच्या डायलॉग बाजीचे बॅनर झळकले आहेत."क्या बडा तो, सबसे दम बडा...आणि सगळ्यांना हाणलं नाही,तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,"या जयंत पाटलांच्या डायलॉगचे पोस्टर ईश्वरपूर शहरात ठीक ठिकाणी झळकले आहेत. ईश्वरपूर नगरपरिषदे निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटलांना पाय दिसत सर्व विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न केला मात्र जयंत पाटलांनी ईश्वरपूर नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवली आहे, या विजयानंतर जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांनी विरोधकांना डिवचत सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही या आशयचे फलक लावले आहेत, हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 23, 2025 07:20:15
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा बंडखोर अपक्ष उमेदवार जांबा उर्फ सचिन कराळे या अतिशय सर्वसामान्य व रुग्णसेवकाने प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवाराला धूळ चारत विजय संपादित केला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचे निकटस्थ व पंधरा वर्षांपासून नगरसेवक असलेल्या सुभाष भोयर यांना त्याने पराभवाची धूळ चारली आहे. दिवसभर रस्त्यांवर फिरून कोणाच्याही मदतीला धावणारा, रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांची सेवा करणारा, रात्री रुग्णालयातच मुक्काम ठोकणारा असा हा निर्धन उमेदवार. भाजपासाठी विस्तारक निघून जिल्ह्यात संघटन मजबूत करणाऱ्या जांबाला पक्षाने उमेदवारी नाकारली, पैसा व कार्यकर्ते नाहीत असे कारण त्याला दिले. मात्र जनतेने लोक वर्गणी गोळा करून जांबा ला निवडणुकीत उतरविले. या ठिकाणी लोकशाहीची ताकद दिसली आणि जांबा भरघोस मतांनी विजयी झाला. पालिकेतही जनतेचा सच्चा सेवक म्हणून कार्यरत राहू असा विश्वास त्यांनी दिला आहे. बाईट : जांबा उर्फ सचिन कराळे
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 23, 2025 07:05:03
Parbhani, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील ढोलक्याची वाडी गावाच्या शिवारामध्ये आज भली मोठी मगर आढळून आली आहे. गावाच्या शेत शिवारात असलेल्या एका उसाच्या फडामध्ये ही मगर नागरिकांना दिसून आली. त्यानंतर गावातील नागरिकांनी या मगरीला दोरी आणि इतर साहित्य सामग्रीच्या सहाय्याने पकडल असून जवळच असलेल्या ईसापुर धरणातून किंवा या धरणाच्या कालव्यातून ही मगर बाहेर आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो. या मगरीने आतापर्यंत एकाही व्यक्तीवर हल्ला किंवा तसा प्रयत्न केलेला नाही परंतु पहिल्यांदाच मगर आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये काहीसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेण्यासाठी वन विभागाचे टीम दाखल झाली होती. वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेत तिला पाण्यामध्ये सोडण्यासाठी घेऊन गेले आहेत.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 23, 2025 06:51:43
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पोलीस अधीक्षकांच्या बदलीनंतर रात्रीतून झाल्या दहा ठाणेदारांच्या बदल्या तर अन köz? (दया) आश्चर्य व्यक्त होतेय आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा दिले गेले तेच पोलीस ठाणे अँकर : वर्ध्यात एकीकडे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकले…तर दुसरीकडे त्यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहेय. नेमक्या या बदल्या कुणाच्या आदेशाने असाही प्रश्न आता उपस्थित जेला जातोय. वर्ध्यात पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकताच,मध्यरात्री उशिरा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात बदली दिली असल्याची बाब समोर आलीय. तडकाफडकी तब्बल दहा ठाणेदाराच्या बदल्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेय. नगर परिषद निवडणुकीत भाजपला देवळी, पुलगाव आणि वर्ध्यात मिळालेल्या अपयशामुळे हा प्रकार तर घडला नाही ना? अशीही शक्यता वर्तविली जातं आहे. पोलीस अधीक्षकांची बदली झाल्याबरोबर त्यांनी ठाणेदारांच्या बदल्या केल्याने पोलीस विभागात देखील आश्चर्य व्यक्त केले जातेय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top