Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

शिरूर चांडोह में बिबटिया जेरबंद, छह साल की मादी बिबट्या माणिकडोह केंद्र भेजी गई

HCHEMANT CHAPUDE
Dec 22, 2025 03:32:37
Shirur, Maharashtra
शिरूर तालुक्यातील चांडोह येथे वनविभागाने लावलेल्या पिंजय्रात बिबट्या जेरबंद झाला असून ६ वर्ष वयाचा हा मादी बिबट असून त्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय मात्र अद्यापही या परिसरात बिबट्या ची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबट्यांना हि जेरबंद करण्याच मोठ आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Dec 22, 2025 04:48:16
Niphad, Maharashtra:रामसर दर्जा प्राप्त असलेले तसेच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख निर्माण केलेल्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 25 ते 30 हजार देशी-विदेशी पक्षी दाखल झाल्याने पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे जणू एक प्रकारचा देशी विदेशी पक पक्षांचा मेळावाच भरला आहे चला पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.... महाराष्ट्रातील एक उत्तम तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक मध्ये कुंभमेळा भरतो त्याप्रमाणे नांदूर मधमेश्वर हे पक्षीतीर्थ’ असलेल्या या अभयारण्यामध्ये करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे 300 हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात 24 जातीचे मासे आहेत.परिसरात 400 हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षीतीर्थ जाळ्या’त समाविष्ट करण्यात आले आहे फ्लेमिंगो, टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस्, गज, पेलिकन, गॉडविट, सॅन्ड पायपर, क्रेक, कर्ल्यु, हैरियर, प्रॅटिनकोल, गल इत्यादि स्थलांतरीत पाणपक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात. पाण कोंबडी, मुक्त बलाक, गायबगळे, मध्य बगळे, खंड्या, आयबीस, स्टॉर्क इत्याही स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसून येत असतात. तर पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, कुट आदी स्थानिक स्थलांतरित पक्षीही येथे आढळून येत असतात.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 22, 2025 04:47:49
Kolhapur, Maharashtra:Kop Mandlik On Mushrif Anc:- राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरणा बदली. पण या बदललेल्या समीकरणानंतर शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक गट चांगलाच आक्रमक झाला. मुरगुड नगरपालिकेत शिंदे गटाच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर मंडलिक गटाने जोरदार जल्लोष केला. त्यानंतर प्रतिक्रिया देत असताना संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बद्दल मला काहीच बोलायचं नाही.. कारण त्यांच्या विचारावर मी राजकारण करत नाही.. हसन मुश्रीफ हे काय हिटलर लागून गेले नाहीत.. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात मला प्रश्न विचारू नका... मरू दे तिकडे... अशी खरमरीत टीका मंडलिकाने केली. राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांमध्येच मोठ्या प्रमाणात मतभेद ताणले गेले. अनेक ठिकाणचे मतभेद हवेत विरले देखील. पण कागल मध्ये मात्र वेगळा चित्र दिसतंय. याला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची किनार मानली जात आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 22, 2025 04:02:19
Amravati, Maharashtra:शहरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी काढली धिंड; दोन दिवसांआधी धुडगुस घालत वाहनांवर दगडफेक करत केली होती तोडफोड. दोन दिवसाआधी अमरावती शहरालगत असलेल्या नांदगाव पेठ परिसरात एक व्यक्तीचा खून झाला होता त्यानंतर काही तरुणांच्या टोळक्याने शहरात धुळघुस करत दगडफेक करत वाहनांची तोडफोड करून शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शहराच्या काही भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर येत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या व तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक केली आणि काल अखेर ज्या परिसरात टोळक्याने तोडफोड करत दहशत माजवली होती तिथूनच हाताला बेळ्या बंधून या टोळक्याची धिंड काढत परिसरातील नागरिकांचे माफी मागायला लावली. त्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर झाले असून या संपूर्ण टोळक्याची चांगलीच नाचक्की पोलिसांनी केली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 22, 2025 04:01:00
Shirdi, Maharashtra:Anc - नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे.रेल्वे संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही बैठक संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळवाडी फाटा व घारगाव येथे होणार असून आमदार सत्यजित तांबे, खासदार वाकचौरे, आमदार किरण लहामते, कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्यासह जुन्नर येथील काही आमदार उपस्थित राहणार आहेत. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग संदर्भात केंद्र सरकारची लक्ष वेधण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचा आयोजन....
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 22, 2025 03:50:11
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील ५ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक यश संपादन करत जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे. सहापैकी चार नगरपरिषदांमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला असून काँग्रेसला एक तर वंचित बहुजन आघाडीला एका नगरपंचायतीत सत्ता मिळवता आली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि नव्याने स्थापन झालेल्या हिवरखेड नगरपरिषदेवर भाजपने बाजी मारली. बाळापूर नगरपरिषदेवर काँग्रेसने तर बार्शीटाकळी नगरपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण १४० नगरसेवकांपैकी ५० नगरसेवक भाजपचे निवडून आले, त्यामुळे नगरसेवक संख्येच्या बाबतीतही भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. वंचित बहुजन आघाडी २७ नगरसेवकांसह दुसऱ्या, तर काँग्रेस २० नगरसेवकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीचे घटक आमनेसामने, तरीही भाजप विजयी.. या निवडणुकीचे विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. महायुतीतील घटक पक्ष देखील अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. अकोट, तेल्हारा, हिवरखेड आणि मूर्तिजापूर या चार ठिकाणी भाजपविरुद्ध मित्रपक्षच आमनेसामने होते, मात्र तरीही भाजपने या सर्व ठिकाणी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदारांनी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्पष्ट नकार दिला आहे. बार्शीटाकळी वगळता इतर बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा दावा बळावणार... या निवडणुकीत सर्वच पक्षांतील आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यश केवळ भाजपच्या आमदारांनाच मिळाले, त्यामुळे आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजप अधिक जागांचा दावा करू शकतो. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत एमआयएम पक्षानेही काही ठिकाणी चांगली कामगिरी करत लक्षवेधी उपस्थिती नोंदवली आहे. नगरसेवक संख्येचा पक्षनिहाय आढावा.. (१४० जागा) भाजप – ५० काँग्रेस – २० राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ३ शिवसेना (शिंदे गट) – ८ शिवसेना (उबाठा) – ६ वंचित बहुजन आघाडी – २७ एमआयएम – ७ अन्य – १५ नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार ... १) मुर्तीजापुर येथून भाजपचे हर्षल साबळे 718 मतांनी विजयी झाले, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर ठरली. २) अकोट येथून भाजपच्या माया धुळे यांचा 5271 मतांनी विजय झाल्या, या ठिकाणी दुसरा क्रमांक वर एमआयएम राहिली. ३) तेल्हारा येथे भाजपच्या वैशाली पालीवाल यांचा 1242 मतांनी विजय झाला, या ठिकाणी उबाठाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. ४) बार्शीटाकळी येथून वंचित बहुजन आघाडीच्या अख्तर खातून अलीमुद्दीन यांनी विजय मिळविला त्यांनी 6242 मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. ५) बाळापुर येथून काँग्रेसच्या आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांनी 1927 मतांनी विजय मिळविला, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर होती. ६) पहिलीच नगरपालिकेची निवडणूक असलेली हिवरखेड नगरपरिषद भाजपने काबीज केली येथे भाजपच्या सुलभा दुतोंडे यांनी 1241 मतांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला. एकूण निकाल (६ स्थानिक स्वराज्य संस्था) भाजप – ४ काँग्रेस – १ वंचित बहुजन आघाडी – १ अकोला जिल्ह्यातील या निकालांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, भाजपने जिल्ह्यात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 22, 2025 03:36:12
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 22, 2025 03:32:58
Lasalgaon, Maharashtra:मुंबईहून कांदा भरण्यासाठी आलेल्या कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात काल दुपारी 1 वाजता लासलगाव येथील बायपास रोडवर एडीएफजवळ घडली असून संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कंटेनर (MH 46 CL 4030) वळण घेत असताना सरळ वेगात येणाऱ्या दुचाकीला (MH 15 EM 9712) जोरदार धडक बसली. या धडकेत गायत्री हेमंत घायाळ (रा. पाबळवाडी, ता. निफाड) या महिलेला डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालक तुषार भाऊसाहेब पानगव्हाणे (वय 25) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 22, 2025 03:16:05
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांडेकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या एक महिन्यांपासून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नांडेकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता, सध्या ते चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक झालेले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली, विश्वास नांडेकर यांच्या निधनाची वार्ता वणीत पोहोचताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून सहवेदना व्यक्त होत आहे. वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top