Back
अकोला में भाजपा ने नगरपालिका चुनावों में सबसे अधिक सीटें जीतकर वर्चस्व कायम किया
JJJAYESH JAGAD
Dec 22, 2025 03:50:11
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील ५ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक यश संपादन करत जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे. सहापैकी चार नगरपरिषदांमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला असून काँग्रेसला एक तर वंचित बहुजन आघाडीला एका नगरपंचायतीत सत्ता मिळवता आली आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि नव्याने स्थापन झालेल्या हिवरखेड नगरपरिषदेवर भाजपने बाजी मारली. बाळापूर नगरपरिषदेवर काँग्रेसने तर बार्शीटाकळी नगरपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने सत्ता मिळवली.
या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण १४० नगरसेवकांपैकी ५० नगरसेवक भाजपचे निवडून आले, त्यामुळे नगरसेवक संख्येच्या बाबतीतही भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. वंचित बहुजन आघाडी २७ नगरसेवकांसह दुसऱ्या, तर काँग्रेस २० नगरसेवकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महायुतीचे घटक आमनेसामने, तरीही भाजप विजयी..
या निवडणुकीचे विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. महायुतीतील घटक पक्ष देखील अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. अकोट, तेल्हारा, हिवरखेड आणि मूर्तिजापूर या चार ठिकाणी भाजपविरुद्ध मित्रपक्षच आमनेसामने होते, मात्र तरीही भाजपने या सर्व ठिकाणी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदारांनी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्पष्ट नकार दिला आहे. बार्शीटाकळी वगळता इतर बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा दावा बळावणार...
या निवडणुकीत सर्वच पक्षांतील आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यश केवळ भाजपच्या आमदारांनाच मिळाले, त्यामुळे आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजप अधिक जागांचा दावा करू शकतो. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या निवडणुकीत एमआयएम पक्षानेही काही ठिकाणी चांगली कामगिरी करत लक्षवेधी उपस्थिती नोंदवली आहे.
नगरसेवक संख्येचा पक्षनिहाय आढावा.. (१४० जागा)
भाजप – ५०
काँग्रेस – २०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ३
शिवसेना (शिंदे गट) – ८
शिवसेना (उबाठा) – ६
वंचित बहुजन आघाडी – २७
एमआयएम – ७
अन्य – १५
नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार ...
१) मुर्तीजापुर येथून भाजपचे हर्षल साबळे 718 मतांनी विजयी झाले, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर ठरली.
२) अकोट येथून भाजपच्या माया धुळे यांचा 5271 मतांनी विजय झाल्या, या ठिकाणी दुसरा क्रमांक वर एमआयएम राहिली.
३) तेल्हारा येथे भाजपच्या वैशाली पालीवाल यांचा 1242 मतांनी विजय झाला, या ठिकाणी उबाठाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.
४) बार्शीटाकळी येथून वंचित बहुजन आघाडीच्या अख्तर खातून अलीमुद्दीन यांनी विजय मिळविला त्यांनी 6242 मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला.
५) बाळापुर येथून काँग्रेसच्या आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांनी 1927 मतांनी विजय मिळविला, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर होती.
६) पहिलीच नगरपालिकेची निवडणूक असलेली हिवरखेड नगरपरिषद भाजपने काबीज केली येथे भाजपच्या सुलभा दुतोंडे यांनी 1241 मतांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला.
एकूण निकाल (६ स्थानिक स्वराज्य संस्था)
भाजप – ४
काँग्रेस – १
वंचित बहुजन आघाडी – १
अकोला जिल्ह्यातील या निकालांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, भाजपने जिल्ह्यात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 05:20:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 22, 2025 05:04:060
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 04:48:160
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 04:47:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:15:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:02:190
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 04:02:020
Report
KJKunal Jamdade
FollowDec 22, 2025 04:01:000
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 22, 2025 03:36:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 03:35:570
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 03:32:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 03:32:370
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 03:16:050
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 03:04:350
Report