Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410503

कैप्टन खरात मामले पर पूर्व मंत्री दिलीप वळसे पाटील की सख्त टिप्पणी

HCHEMANT CHAPUDE
Mar 22, 2026 05:02:59
Manchar, Maharashtra
मंचर/पुणे\n\nकॅप्टन खरात प्रकरणावरून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कानपिचक्या\n\nकॅॅप्टन खरात यांच्या प्रकरणात गुंतलेल्यांना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चांगलच सुनावताना "अध्यात्म वेगळं असतं, पण सध्या अध्यात्माच्या नावाखाले कर्मकांड करायला शिकवलं जातं. एखादा व्यक्ती जर कर्मकांड करू लागला किंवा कर्मकांडात गुंतला तर त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. आणि त्याचे चांगले वाईट परिणाम त्याला सोसावे लागतात." असं मत व्यक्त केलंय.\n\nVo - आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.\n\nसाउंड Byte - आ.दिलीप वळसे पाटील, माजी सहकार मंत्री\n\nप्रतिनिधी हेमंत चापुडे\nझी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 22, 2026 06:17:22
Nagpur, Maharashtra:live u ने फीड पाठवले ------ ( सीएम जनसंपर्क कार्यालय प्रमुख 121आहे... ज्या नागरिकांना मदत मिळाली अशा वेगवेगळ्या कॅटेगिरीतील नागरिकांचे बाईट्स आहे...) समस्या व अडलेल्या कामाकरता लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात नेहमीच नागरिकांची रीघ दिसते... मात्र अनेकदा आश्वासन याच्यापलीकडे नागरिकांच्या समस्या लवकर सुटत नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघातले जनसंपर्क कार्यालय मात्र वेगळे ठरत आहे. गेल्या दोन वर्षात एक लाख 40 हजारपेक्षा जास्त नागरिकांची समस्या व काम त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयातून झालीय. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा मतदारसंघातील 382 बूथ,न nine प्रभाग आणि 25 वार्डात असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे हे जनसंपर्क कार्यालय सदैव तत्पर असते.. आणि राज्यातील जनतेच्या समस्या सोडवताना आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सतत लक्ष ठेवून असतात... इतकेच नव्हे तर सतत आढावा घेत असतात... त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयातून झालेल्या कामामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदलही घडून आलेय. केवळ त्यांच्या विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील नागरिक आपल्याकडील अडचणी व समस्यांचे निराकरण थेट देवा भाऊंचं कार्यालय गाठतात आणि नागरिकांच्या सगळ्या कामांचं सोल्यूशन देवा भाऊंच्या या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यालयातून त्यांना आवर्जून मिळत असतं... मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील या जनसंपर्क कार्यालयाची कार्यपद्धती कशी व कशा पद्धतीने जनतेच्या समस्या सोडवल्या जातात.... त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने विविध आघाड्यांच्या मार्फत जनतेच्या समस्या सोडवण्याकरता कशी मदत करतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ---------- GFX IN *देवा भाऊंच दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे काम कसे चालते* -1)सोमवार दिव्यांग व ज्येष्ठ कलावंत यांच्या समस्या सोडवल्या जातात... भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी राहतात हजर 2)मंगळवारी मतदारसंघातील जनतेच्या वैद्यकीय समस्यांच्या दृष्टीने करण्यात येते मदत... विविध आजारांनीग्रस्त लोकांना शासकीय सेवांचा लाभ... त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतात आणि हेल्थ चेकअप पण करण्यात येत.. भाजपाच्या वैद्यकीय आघाडीतील डॉक्टर देतात सेवा 3) बुधवारी संजय निराधार योजनेची निगडित कामे केली जातात... रेशनिंग व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडित कामे सोडवली जातात 4) गुरुवारी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि मदत केली जाते.. रोजगार देण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्श दिले जाते 5) शुक्रवार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या... ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान कार्ड... पारिवारिक समस्या सोडवण्यासाठी मदत केली जाते व समुपदेशन केले जाते 6) शनिवारी न्यायालयीन व कायदेशीर कामे सोडवण्यास मदत करण्यात येते.. भाजपा विधी आघाडी याकरता मदत करते. GFX out -======--------------------- ( दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आले त्याच्या केस स्टडीज... त्याचे बाईट्स ) --=====---------------- Case Study 1 बाईट - सत्यवान जामगडे (पांढरा शर्ट) ( कौटुंबिक संपत्तीचा वाद... विधी आघाडीकडून सोडवला ) कुटुंबात छोट्या छोट्या मुद्द्यावर वाद होऊन त्यामुळे भावाभावात न्यायालयीन खटले तयार होतात.. मात्र, सामान्यांना नाहक न्यायालयाची पायरी चढावी लागू नये आणि त्यांच्यातील कौटुंबिक वाद समोरचा आपापसात बोलून सुटावे यासाठी फडणवीसांच्या कार्यालयातील विधी आघाडीचे वकील प्रयत्न करतात अनेक वाद समोपचाराने सोडवले जातात... ) --------------------------------- Case 2 सचिन अंभोरे ( दिव्यांग)( पांढरा शर्ट ) UDID कार्ड . मिळत नव्हते.... मात्र येथून मार्गदर्शन मिळाले आणि मदत मिळाली --=-------- case3 स्मिता वाघमारे(निळा ड्रेस )(आरोग्य ) पतीला कॅन्सर डिटेक्ट झाला होता... रेशन कार्ड नसल्यामुळे आयुष्यमान कार्ड बनत नव्हते .. येथे आल्यावर मदत मिळाली..त्यामुळे लवकर ऑपरेशन झाले ------------------- case 4 21.18 to 23.40 (वैद्यकीय मदत) प्रमोद चांदेकर, सावनेर, गोमुख बाईट -डॉक्टर प्रणाम सदावर्ते -- मुलीला जन्मापासून टाळूची समस्या होती... वैद्यकीय आघाडीने मदत केली...
122
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 22, 2026 06:04:58
1022
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 22, 2026 06:02:06
Amravati, Maharashtra:अवकाळी पावसाने अमरावती करांना दिला दिलासा; पारा आठ अंशाने घसरुन ३३.६ अंशावर पोहोचला मार्च महिन्यातील १२ व ११ तारखेला अमरावतीत पारा ४२.२ अंशापर्यंत गेला होता. हे तापमान देशातील सर्वोच्च असल्याची नोंद झाली होती. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उष्णतेच्या या रौद्र रुपाने अमरावतीकर प्रचंड त्रस्त झाले होते. दरम्यान मागील तीन दिवसांपासून जिल्हह्यात ढगाळ वातावरण व शुक्रवारी काही भागात पाऊस झाला होता. त्यामुळे कमाल तापमानात कमालीची घट होवून पारा थेट ११.६ अंशावर आला होता. आठ दिवसापुर्वीच्या तापमानाच्या तुलनेत ८.६ अंशाची घट झाली होती. यामुळे अमरावतीकरांना तात्पुरता का होईना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. अमरावती यंदा मार्च महिन्यातच उष्णतामानाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले होते. विदर्भातील अकोला, अमरावती या ठिकाणी तापमान इतर शहराच्या तुलनेत अधिक राहतेच. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे १९ मार्चपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्याच दिवशी सायंकाळी तसेच २० मार्चला पहाटे शहरासह जिल्ह्यातील काही भागात मध्यम व हलक्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली होती. यामुळे मात्र २० मार्चला दिवसभर तापमान कमी होते. तसेच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे दिक्साही गारवा जाणवत होता. दरम्यान शनिवारी सकाळपासून वातावरण स्वच्छ व निरभ्र झाले आहेत. ढग कुठेही नाहीत. मात्र १७ मार्चपर्यंत असलेली उन्हाची दाहकता रविवारी जाणवत नव्हती. तुरळक ठिकाणी झालेल्या पावसाचा परिणाम रविवारी कायम राहीला व उन्हाच्या चटक्यांपासून तात्पुरता दिलासा मिळाला होता. दरम्यान २२ मार्चपासून कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. कारण वातावरण स्वच्छ झालेले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस अमरावतीत उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे.
870
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 22, 2026 05:03:32
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात घडलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी तीव्र आक्रमक भूमिका घेत आरोपी अक्षय मांजरे याच्या तात्काळ फाशीची मागणी केलीय. नराधम आरोपी हा बायसेक्सुअल असून लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून आरोपीने ही हत्या केलीय. धक्कादायक बाब म्हणजे 21 महिन्यापूर्वी हि याच नराधम आरोपीने 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातूनही हत्या केली होती. दोन वर्षाच्या कालखंडामध्ये दोन अल्पवयीन मुलांची हत्या केल्याने नराधम आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी मृत मुलाच्या नातेवाईकांकडून केली जातीय.
1010
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 22, 2026 04:17:55
Malegaon, Maharashtra:नाशिक के बागलाण तालुक्यातील सालोटा किल्ल्याच्या आगीत नुकसान झाले. जागतिक पातळीवरील UNESCOच्या यादीत समाविष्ट ऐतिहासिक साल्हेर व सालोटा किल्ल्यांस दो संशयितांनी आग लावल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. वन विभागाने आग आटोक्यात आणले व तातडीने दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. आग सालोटा किल्ल्यावर लागल्यानंतर शेजारील साल्हेर किल्ल्यावरही आग लागल्याने विविध जातीचे झाडे, वनौषधी, वनस्पती, गवत, लहान-मोठे वन्यजीव भस्म झाले. या वनक्षेत्रात गुराखींकडून मिळालेल्या माहितीनुसार किल्ल्यावर फिरायला गेलेले दोन अल्पवयीन मुले विडी ओडत असताना त्यांनी जळती काडी जागेवर फेकल्यामुळे आग लागली.
1008
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 22, 2026 04:17:41
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सुमारे ४.९५ कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अपूर्ण आहे.वाढत्या उन्हामुळे विहिरी कोरड्या पडत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.कामातील विलंबामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली असून येत्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून गावाला लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाईट : संजय काळे,ग्रामस्थ वनोजा बाईट : ज्ञानेश्वर मुखमाले, ग्रामस्थ वनोजा बाईट : संतोष खोरणे,ग्रामस्थ वनोजा
1014
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 22, 2026 04:15:57
Yavatmal, Maharashtra:शेतात, मंदिरात किंवा जुन्या घरांच्या खोदकामावेळी अनेकदा जमिनीत पुरातन वस्तु आढळतात, यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर गावात तर घराच्या खोदकामावेळी सोन्याचा हंडा मिळाला अशी जोरदार चर्चा पसरली. ग्रामस्थांनी तेथे प्रचंड गर्दी केली. खोदकाम करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोदकाम सुरू केले, मात्र निघालेल्या वस्तू या सोन्याच्या नव्हत्या तर तांब्या पितळीची भांडी जमिनीतून निघाली. प्रमोद कार्लेकर यांना घरकुल मिळाल्यामुळे त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना हे मातीत गाडलेले जुने पितळ आणि तांब्याचे भांडे सापडले. दरम्यान जमिनीत सोनेाचा हंडा असल्याची चर्चा झाल्याने, वडकी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व जमिनीतून मिळालेल्या सर्व वस्तू हस्तगत केल्या.
1021
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 22, 2026 03:46:28
Amravati, Maharashtra:मेळघाटात भीषण पाणीटंचाई, मोथा गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा; जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता. मेळघाटातील मोथा या सुमारे 1 हजार 433 लोकसंख्या असलेल्या गावात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावातील पाण्याची गरज भागवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सध्या 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळा वाढत असताना ग्रामीण भागात पाणीप्रश्न अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
1046
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 03:46:14
Bhandara, Maharashtra:*सिलेंडरसाठी रांगा, ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली गॅस इन्शुरन्स व पाईपची सक्ती....वरठीत नागरिक संतप्त...* भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे भारत गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिलेंडर वितरणाच्या वेळी एजन्सीकडून “मेंटेनन्स”च्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आधीच गॅस टंचाईमुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना अशा सक्तीमुळे त्यांचा आर्थिक भार वाढत आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेत एजन्सी धारकांकडून ही पद्धत राबवली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
960
comment0
Report
Advertisement
Back to top