Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

Ajit Pawar के चले जाने से Pune जिले में बड़ा नुकसान, Zilla Parishad उम्मीदवार वही तय

HCHEMANT CHAPUDE
Feb 05, 2026 15:30:40
Shirur, Maharashtra
Anc: सध्या दोन्ही राष्ट्रवादी विलगीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित दादांच्या जाण्याने पुणे जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार हे उपमुख्यमंत्री अजित दादांनी निश्चित केले असून राष्ट्रवादीला मत हीच खरी अजित दादांना श्रद्धांजली ठरेल असं खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी म्हटलं असून राष्ट्रवादी विलगीकरणाच्या चर्चेत खासदार अमोल कोल्हे यांनी घड्याळाला मतदान करण्याच आव्हान केलेले सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Feb 06, 2026 03:17:21
Akola, Maharashtra:अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका कॉस्मेटिकच्या दुकानातून वस्तू खरेदी करणाऱ्या महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर अकोला महापालिका एक्शन मोडवर आली आहे. महापालिकाेने महात्मा गांधी मार्गावरील अनधिकृत बांधकाम करत उभारलेल्या दुकानांवर कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण राजरोसपणे सुरू होतं. विशेष म्हणजे महापालिका पासून काही अंतरावरच हे अतिक्राम उभारण्यात आले होते, अखेर या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली. मात्र अनधिकृत जागांवर अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे घडून गेल्यानंतर प्रश्नाला जाग येते का? आधीच अशा अतिक्रमणांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 06, 2026 03:16:49
Latur, Maharashtra:लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीमुळे महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ४३ जागांवर विजय मिळवत भारतीय राष्ट्रिय काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता वाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे महापौरपदाची निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून महापौरपदासाठी जयश्री सोनकांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून एकहाती सत्ता स्थापनेचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र निवडणूकपूर्व युतीतील वंचित बहुजन आघाडीला सत्तेत अपेक्षित वाटा न दिल्याचा आरोप करत वंचितने बंडाचे निशाण फडकावले असून, महापौरपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 06, 2026 02:47:42
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव ( नाशिक ) - नाशिकच्या मालेगाव येथील कललेल्या घराला अग्निशमन विभागाकडून टेकू - जवळच असणाऱ्या रेशन दुकानातील घुशींच्या उपद्रवामुळे परिसरातील घर धोक्यात - नागरिकांचा आरोप मालेगाव येथील रविवार वॉर्ड भागातील इस्लामाबादमधील रोहिदास वाडा चंदनपुरी गेट परिसरातील तंसिम कौसर साजिद अख्तर यांच्या मालकीचे घर अचानक कलले. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत घराला टेकू लावले. तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाने घर पाडण्याची नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. येथील तंसिम कौसर यांचे घर हे दोन मजली आहे. इमारत जुनी असल्याने ती कमकुवत झाल्याचे अग्निशमन दलात नोंद करण्यात आली आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी जात इमारतीला चार टेकू लावले. तसेच घराच्या समोरील व पाठीमागील दोन्ही घरातील रहिवाशांना घर खाली करण्यात आले. जवळच असलेल्या रेशन दुकानातील घुशींच्या उपद्रवामुळे, घुशी परिसरातील घर पोखरत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असा आरोप नागरिकांनी केला आहे. बाइट: 2 स्थानिक नागरिक
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 06, 2026 02:46:47
Kolhapur, Maharashtra:ऊन्हाळ्याची चाहूल देणारी झाडे आता रंगीबेरंगी फुलांनी व्यापली आहेत. पळस, पांगिरा आणि कटेसावर यासारख्या झाडं पक्षांसाठी ज्युसबार ठरत आहेत. विशेषता घाट माथ्यावर असणाऱ्या झाडे विविध रंगी फुलांनी व्यापली आहेत.. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात ही झाडे फुलली असल्यामुळे उन्हाळ्याची चाहूल एक प्रकारे लागली आहे. पश्चिम घाटात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ऊन्हाळ्याची चाहूल लागली की मोठ्याप्रमाणात पळस, पागिंरा आणि काटेसावर ही झाडं फुललेली पहायला मिळतात. हि झाडं म्हणजे पक्षांसाठी ज्यूसबर आहेत. या झाडांवर सध्या सकाळी आणि संध्याकाळी पक्षांची शाळा भरत असल्याचे दिसतय. या झाडांवर 28 ते 29 प्रकारचे पक्षी मधूरस प्यायला येतात. युरोपमधून स्थलांतर करून येणारा रोज़ीपिस्टर, भूर्ड्या, त्याचबरोबर पश्चिम घाटातील प्रमुख आकर्षण असणारा हळद्या, ब्लॅक बुलबुल, सनबर्ड, साळुंखी, प्राईड मैना, ग्रीन क्रिटर असे विविध पक्षी या ठिकाणी आढळतात.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 02:46:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे , त्यामुळं भाजप आज उमेदवाराचे नाव जाहीर करू शकते, 57 नगरसेवक असलेला भाजप अजूनही महापौर पदाचा उमेदवाराचे नाव जाहीर करू शकला नाही आहे,  पक्षात प्रचंड चढाओढ आहे त्यामुळे भाजप नावाबाबत गुप्तता पाळताना दिसत आहे , मात्र अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे आज भाजप काय खेळी करणार याकडेच लक्ष आहेदरम्यान भाजपने महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी चार चार अर्ज घेतले असल्याची माहिती पुढे येते त्यामुळे आज दोन्ही पदासाठी चार चार उमेदवार अर्ज भरणार आणि दहा तारखेला निवडणुकीच्या दिवशी उर्वरित तीन उमेदवारांचे अर्ज मागे घेणार असा काहीसा फंडा भाजप राबवणार  असल्याचे दिसत आहे, दरम्यान संख्याबळ नसतानाही एम आय एम आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करू शकतो तर शिंदे सेनेचे शिवसेना उप महापौर पदासाठी  अर्ज घेणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 06, 2026 02:45:35
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि पुमापोर निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि एमआयएम पक्षाने दिले आहेत उमेदवार.. सोलापूर महानगरपालिकेत 102 पैकी 87 भाजप नगरसेवकांचे संख्याबळ, एमआयएम पक्ष 8, शिवसेना शिंदे चार, काँग्रेस दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एक नगरसेवक निवडून आला आहे.. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज सोलापूर महापालिकेची विशेष सभा पार पडणार आहे महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांच्या नावाची औपचारिकता बाकी.. कोंड्याल आणि देवकर यांना आज मतदान करण्यासाठी भाजपकडून आपल्या सर्व नगरसेवकाना व्हीप बजावण्यात आला आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 02:45:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल व्हिट्स आणि लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. या लिलावात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने चौकशी समितीमध्ये बदल केला असून, आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती या प्रकरणाचा छडा लावणार आहे. ३ महिन्यांपूर्वी या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपवण्यात आली होती. मात्र, आता त्यात बदल करून ही जबाबदारी थेट विभागीय आयुक्त कडे देण्यात आली आहे.. हॉटेलच्या या लिलावानंतर उबाठासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मालमतेचे बाजारमूल्य १५० कोटींच्या घरात असताना ती केवळ ६४ कोटींत मोजक्याच लोकांना देण्यात आल्याचा आरोप झाला. विधिमंडळातही हा मुद्दा गाजला. विरोध पाहून पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलाने लिलावातून माघार घेतली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 06, 2026 02:32:32
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : मला पोलीस स्टेशनला रिंगण करुन मारले जात होते अशी गुंडगिरी बार्शीत होती - माजी. आ. राजेंद्र राऊत *- ऑन एकनाथ शिंदे सभा :-* - एकनाथ शिंदे साहेब माझ्या विरोधकांची सभा घेऊन गेले असले तरी त्यांचा खरा आशीर्वाद मलाच आहे. - तालुक्यातील भाजपच्या 6 झेडपी आणि 12 पंचायत समिती निवडून आणणार. - तालुक्यातील अभद्र युती केवळ स्वार्थासाठी केलीय. - शिंदे साहेबांची आणि माझी भेट झाली नाही. सोलापुरातील काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे साहेबांना चुकीची माहिती दिली. - भाजपच्या झेडपीच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागा निवडून आल्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा ताई बार्शीत विजयी सभेला येतील. *- ऑन दिलीप सोपल टीकेला उत्तर :-* - मुळात बार्शीतील दहशत होती, पांडे चौकात खून केला, पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग केली गेली. - माझ्यावर 4 वेळा खुनी हल्ला केला गेला मात्र यांची (सोपलांची) गुंडगिरी मोडून काडण्याचे काम केले. - मला पोलीस स्टेशनला रिंगण करुन मारले जात होते. अंगाला गोळे येत होते ही यांची गुंडगिरी आणि दहशत होती. - त्यामुळे हे मला विविध उपमा देतात. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. - याउलट यांच्यावर 420 के 3 गुन्हे दाखল आहेत. *- ऑन विरोधक सभा :-* - सत्तेशिवाय ही माणसं जिवंत राहू शकत नाहीत. मी साडेचार वर्षे सत्तेत आणि साडे सातोत्तर वर्षे विरोधात काम केले. - आम्हाला कधीही सत्तेची स्वप्ने पडली नाहीत म्हणून आम्ही कायम मजबूत राहिलो. - मात्र सोपल सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. पाण्याविना मासा तडफडतो तसं हे तडफडतात. - कधी म्हणतात मी शरद पवारांचा पठ्ठ्या आहे, कधी उद्धव साहेब, कधी शिंदे साहेबांकडे आणि स्वर्गीय अजितदादांकडे पण गेले होते. - पैसे कुठून मिळतील आणि अर्थकारणाची तरतूद कशी होईल हे पाहतात. - मी मात्र अपक्ष निवडून आल्यावर विरोधीपक्षाला पाठींबा दिला. यावरून यांची मानसिकता काय आहे हे कळते. *- ऑन सभेला पाठ फीरवली :-* - तालुक्यात झालेली अभद्र युती आहे. मात्र शिंदे साहेबांबद्दल मला आणि तालुक्यातील लोकांना आदर आहे. - मात्र तालुक्यात चाललेले नाटक होतं एवढाच संदेश जनतेला द्यायचा होता. हे चुकीचं चाललंय - मात्र तुम्ही हे सर्व विजयी झाल्यावर राजा राऊताचे स्वागत करायला या आम्ही प्रचंड गर्दी करुन तुमचे स्वागत करू. *- ऑन शिवाजी महाराज पुतळा निधी आणि एमआयडीसी :-* - 2019 ते 2024 मध्ये गाताची वाडी येथे एमआयडीसी झालेली आहे. त्यात 42 प्रोजेक्ट सुरु आहे. - तालुक्यात आणखी 3 एमआयडीसी बनविणार आहोत. ते आम्हीच करू शकतो. - शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक खर्चाचा विषय येत असल्याने आणि काही लोकांना मधलं काहीतरी मिळाले नाही. - त्यामुळे माझ्यावर राग काढण्याच्या दृष्टीने हे केले. अन्यथा शिवसेनेच्या 2 झेडपी आणि 3 पंचायत समितीच्या जागा निवडून आणल्या असत्या. - नगरपालिकेला 6 उभे केले आणि निवडून आणले. हे निवडून आणल्यावर त्यांच्याकडे जाणार आणि सांगणार. *- ऑन एकनाथ शिंदे सोपल कौतुक :-* - भाषणात नेत्यांना बोलावेच लागते मात्र खरा जीव कुठे आहे ते तुम्ही भगवंत मैदानावर राजा राजा हे ऐकले आहे. - मी एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता, सहकारी राहिलो आहे. - भविष्यात माझ्याच आमदारकीला एकनाथ शिंदे साहेब आलेले दिसतील. *- सोलापूर झेडपीवर भाजपचा अध्यक्ष असेल :-* - सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होणार. *Byte : राजेंद्र राऊत (माजी आमदार, बार्शी)*
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 02:32:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता शनिवारी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांमधील सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण ८३० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी २८२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ६३ गटांतील आणि १२६ गणातील २ हजार २८२ मतदान केंद्रांवर आता ७फेब्रुवारीला सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २४८९ पोस्टल मतदार आहेत. तर १८ लाख ७३ हजार ५३ एकूण मतदार आहेत. यात ९ लाख ७९ हजार पुरूष व ८ लाख ९३ हजार ७७८ महिला मतदार आहेत. ४१ मतदार तृतीयपंथीय आहे. २२८२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सुमारे १२ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 02:30:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये फेब्रुवारी महिना सुरू झाला असला तरी थंडीचा कडाका अद्याप ओसरलेला नाही. ध्रुवीय वारे सक्रिय असल्यामुळे शहरात पहाटे आणि सूर्यास्तानंतर रात्री थंडीचा प्रभाव जाणवत असून, ही परिस्थिती पुढील आठवडाभर कायम राहणार आहे. परिणामी, शहरात थंडीचा मुक्काम लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी शहराचे किमान तापमान १५.५ अंश तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. एकीकडे पहाटे हुडहुडी जाणवत असली, तरी दुपारी कमाल तापमान ३० अंशांच्या आसपास राहत असल्याने उन्हाचा चटकाही सोसावा लागत
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 02:17:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहराचे मध्यवर्ती ठिकाणी, क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वरवाडी परिसरात एक तरुण व तरुणीचा मध्यरात्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तरुणीला तरुण ढकलत एका बाजूला नेत असल्याचे चित्रीकरणात दिसत आहे. या प्रकारावरून शहरात रात्री पोलिसांची गस्त सुरू असते की नाही, असा प्रश्न आहे. हा व्हिडिओ ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांचा आहे. एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात याचे चित्रीकरण झाले आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणीला तरुण रस्त्यावरून ओढत नेत आहे. ती तरुणी सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वर्हळ नव्हती. शेवटी एका जागरूक नागरिकाने खिडकीतून हटकल्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले. सुमारे १० ते १५ मिनिटे ते दोघे तेथे होते. हा व्हिडिओ ५ दिवसांनंतर व्हायरल झाला आहे. सध्या क्रांती चौक पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित तरुण-तरुणीचा शोध घेत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार देण्यासाठी समोर आलेले नाही.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 06, 2026 02:17:26
Nagpur, Maharashtra:नागपूर महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा आज सकाळी 11 वाजता रेशीमबाग मधील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलीय. भाजपाकडून नीता ठाकरे तर काँग्रेस कडून नगरसेविका स्नेहल ठाकरे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून लीला हातीबेड तर काँग्रेसकडून विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केलाय.102 नगरसेवकांसह भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. तर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या आघाडीचे 36 नगरसेवक आहेत. याशिवाय एमआयएम सहा, मुस्लिम लीग चार तसेच बसप व राष्ट्रवादीची प्रत्येकी एक सदस्य आहेत. दरम्यान भाजपाचे सर्व नगरसेवक अगोदर शहर भाजप कार्यालय मंगलम येथे एकत्रित येऊन मग पहिल्या विशेष सभेसाठी भट सभागृह करता जल्लोषात रवाना होणार आहे
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 06, 2026 02:16:49
Bhandara, Maharashtra:राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन... काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आंदoloकांची भेट घेत केली चर्चा.... महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद गोंदिया समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले “15 दिवसांत प्रश्न मार्गी लावू” हे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.... या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून मानधन प्रलंबित, सेवा संरक्षणाचा अभाव यामुळे काम बंद आंदोलन पुकारले असून आज काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर या कर्मचाऱ्यांची भेट घेतली.. यावेळी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी पोचविण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली....
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 06, 2026 02:16:14
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव येथे रात्री एका अस्वलाने थेट निवासी घरात शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. लाखांदूर वनविभागाने अत्यंत संयम आणि चतुराईने राबवलेल्या ३ तासांच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'मुळे अस्वलाला सुखरूप जेरबंद करण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वन्यजीवालाही जीवदान मिळाले. पिंपळगाव कोहळी हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला असून येथे हिंस्त्र श्वापदांचा वावर मोठा आहे. रात्रीच्या सुमारास जंगलातून भरकटलेले एक पूर्ण वाढलेले अस्वल गावात शिरले. गल्लीतून धावत असताना हे अस्वल अचानक स्थानिक रहिवासी इंदु बारसागडे यांच्या घरात घुसले. घरात अस्वल पाहताच कुटुंबातील सदस्यांची तारांबळ उडाली सुदैवाने,सर्वांनी तातडीने घराबाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनची माहिती मिळताच लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक आणि शीघ्र बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाला सुरक्षितपणे पकडणे हे मोठे आव्हान होते,कारण अस्वल घरात अडकलेले असल्याने ते आक्रमक होण्याची शक्यता होती. ३ तास हा थरारक ऑपरेशन सुरू होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने अस्वलाला पिंजऱ्याच्या दिशेने वळवले आणि त्याला कोणतीही इजा न होता पिंजऱ्यात जेरबंद केले. अस्वलाला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जेरबंद केलेल्या अस्वलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top