Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

महायुती ने सात नगरपालिकाों में धमाकेदार जीत, विपक्ष को जनता ने नकार दिया

GDGAJANAN DESHMUKH
Dec 22, 2025 02:01:02
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं असून महाविकास आघाडीला लोकांनी सपशेल नाकारलय. सात नगर पालिके पैकी भाजप 2,राष्ट्रवादी 2 शिवसेनेने 1 नगर पालिका जिंकली तर महायुती सोबत असलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून पूर्णा ही नगर पालिका जिंकून नगर पालिकेत खात उघडलं. सात पैकी सहा नगर पालिकेत महायुतीला कौल मिळाला असून सोनपेठ नगर पालिकेवर जण सामान्य तरुणांनी झेंडा फडकवलाय,त्यात ही अनेक जण महायुतीच्या विचारांचेच आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 22, 2025 03:36:12
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 22, 2025 03:32:58
Lasalgaon, Maharashtra:मुंबईहून कांदा भरण्यासाठी आलेल्या कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात काल दुपारी 1 वाजता लासलगाव येथील बायपास रोडवर एडीएफजवळ घडली असून संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कंटेनर (MH 46 CL 4030) वळण घेत असताना सरळ वेगात येणाऱ्या दुचाकीला (MH 15 EM 9712) जोरदार धडक बसली. या धडकेत गायत्री हेमंत घायाळ (रा. पाबळवाडी, ता. निफाड) या महिलेला डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालक तुषार भाऊसाहेब पानगव्हाणे (वय 25) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 22, 2025 03:16:05
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांडेकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या एक महिन्यांपासून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नांडेकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता, सध्या ते चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक झालेले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली, विश्वास नांडेकर यांच्या निधनाची वार्ता वणीत पोहोचताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून सहवेदना व्यक्त होत आहे. वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 03:04:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आचारसंहिता कक्षाकडे अनेक तक्रारी येतात. या तक्रारींचे निरसन अवघ्या ६० मिनिटांत करण्यात येईल असे महापालिकेने सांगितले आहे... राजकीय व्यक्ती कितीही मोठी असली, तरी आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांशी बांधिल आहोत. जे नियमात आहे, तेच आम्ही करणार आहोत. कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. प्रशासक जी. श्रीकांत यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. उमेदवारांनी, नेत्यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे यासंदर्भात सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके राहणार आहेत. त्यासोबतच शहरात १५ ठिकाणी स्थिर पथके २४ तास कार्यरत राहतील. वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 03:03:41
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 22, 2025 03:03:14
Manchar, Maharashtra:पहिल्यांदाच निवडणूक पार पडलेल्या मंचर नगरपंचायतीत दोन उमेदवारांना मतदारांनी समान कौल दिला. मग चिठ्ठी उचलण्याचा निर्णय झाला अन या चिठ्ठीने शिंदे शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांचं नगरसेवक पदाचं दार उघडलं. चिठ्ठीत त्यांचं नाव आल्याचं ऐकून लक्ष्मण यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मंचर येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. या प्रभागात शिंदे शिवसेनेनं लक्ष्मण मारुती पारधी आणि भाजपनं ज्योती संदीप बाणखेले यांना रिंगणात उतरवलं. दोघांनी ही मतदारांकडे मतांचा जोगवा मागितला. पण या मतदार राजाने दोन्ही उमेदवारांना ही समान कौल दिला, दोघांच्या पारड्यात 223 इतकी समान मते टाकली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारीांनी चिट्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली, अखेर लक्ष्मण पारधी यांची चिठ्ठी उचलली गेली अन नगरसेवक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 02:50:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून दुप्पट सेवा शुल्कवसुली केली जात असल्याच्या तक्रारी येताय.. उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्रासाठी ६९ रुपये दर असताना आपले सरकार सेवा केंद्रचालक २०० रुपये आकारत आहेत. जिल्ह्यातील १४०६ केंद्रांपैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रात ९० तर अन्य सर्व ठिकाणी १५० रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारला जातो. राज्यामध्ये १५ हजार जागांसाठी पोलिस भरती जाहीर झाली आहे. यासह अनेक वेगवेगळ्या परीक्षा आणि शैक्षणिक कामांसाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. याचाच गैरफायदा आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून घेतला जात आहे. शासकीय शुल्काच्या दुप्पट, तिप्पट वसुली सुरू असल्याच्या तक्रारी आहेत
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 22, 2025 02:50:04
Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल टॉवर असून इंटरनेट सेवा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांसाठी धडपड करावी लागत आहे. शासनाकडून सर्वच योजना ऑनलाइन करण्यात आल्या आहेत, मात्र इंटरनेट सेवा मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन ऑनलाईनचे काम करावे लागत आहेत. ग्रामीण भागात मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत मात्र हे टावर सुरू कधी होणार याची प्रतीक्षा करावी लागतं आहे. इंटरनेट सेवा अत्यंत कमकुवत असल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याने, दैनंदिन कामकाजासह शासकीय सेवा देखील ठप्प झाल्याचे चित्र आहे. शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र, इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनांचे अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा खासगी इंटरनेट केंद्रांवर वणवण भटकंती करावी लागत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, शेतकऱ्यांचे ई-सेवा अर्ज, तसेच आधार, उत्पन्न दाखला, जाती प्रमाणपत्र यांसारख्या कामांसाठीही इंटरनेटचा अभाव अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा तात्काळ सुधारण्यात याव्यात, मोबाईल टॉवरची क्षमता वाढवावी आणि स्थिर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 22, 2025 02:49:50
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 02:31:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या बगंगापूर तालुक्यातील बगडी येथे शॉर्टसर्किटमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शेतातील तब्बल सहा एकर ऊस शेतीसह ठिबक सिंचनाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. बगडी येथील शेतकरी संतोष कुंडलिक जाधव आणि बापूसाहेब मछिंद्र जाधव यांच्या गट नंबर 137 मधून 33 केवी क्षमतेची विद्युत वाहिनी गेली आहे. अचानक या विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या व ऊस शेतात आग पसरली. विजेचा प्रवाह मोठा असल्याने आग काही मिनिटांतच विक्राळ रूप धारण करून संपूर्ण सहा एकर मधील ऊस जळाला आहे.आगीत केवळ ऊस पिकाच जळून खाक झाले नाही तर ठिबक सिंचन संच, पाईपलाइन, नळी, व्हॉल्व्ह, यांसह इतर कृषी साहित्यही पूर्ण जळून खाक झाले आहे. यामुळे दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top