Back
पालम के खरब धानोरा में पीक विमा कंपनियों के प्रतिनिधियों पर धोखाधड़ी के आरोप
GDGAJANAN DESHMUKH
Oct 15, 2025 10:08:31
Parbhani, Maharashtra
अँकर- शेतकऱ्यांना विमा परतावा नाकारण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा धक्कादायक प्रकार परभणीच्या पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे उघडकीस आलाय. या प्रकरणी दोघांविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, या प्रकारांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून परभणी जिल्ह्यात झालेले सगळे पीक कापणी प्रयोग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाऊ लागलीय. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांना विमा मदत मिळू नये यासाठी जाणूनबुजून हा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकारामुळे तालुका कृषी विभाग व ग्रामस्तरीय विमा समितीने अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या दोन्ही प्रतिनिधींविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा फसवणुकीचा प्रकार इतर ठिकाणी झालेल्या कापणी प्रयोगात ही झाला असावं म्हणून आतापर्यंत जिल्ह्यात घेण्यात आलेले सर्व कापणी प्रयोग रद्द करून नव्याने घेण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केलीय. जर हि प्रकिया रद्द न झाल्यास पीक विमा कंपनीच्या कार्यालायत घुसून कर्मचार्यांना चोपून काढु असा ईशारा देण्यात आलाय. पर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा द्यायचा निर्णय कंपनी ठरवते. परभणीच्या पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे काल अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक कापणी प्रयोग घेतला. यावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधिने सोबत आणलेल्या वजन काट्यात सोयाबीन पाच किलो भरत होते. एवढे कमी सोयाबीन असतांना 5 किलो वजन सोयराबीनचे कसे भरले यावरून शेतकऱ्यांना संशय आला, गावातील दुकानातील एक वजन काटा आणून त्याच सोयाबीनची मोजणी केली असता, सदर सोयाबीन केवळ 3 किलो भरण्यात आले. शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करून अधिकची आणेवारी दाखवण्याचा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला. सदर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर आणि कंपनीवर गुन्हा दाखल करावा म्हणून शेतकार्यांनी पालम पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता, त्यानंतर पालम पोलीस ठाण्यात पीक विमा कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर पालम तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी वरून शेतकर्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विमा कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत रामदास शेरे आणि रणदीप भालेराव या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे पीक विमा कंपन्या शेतकर्यांची अशीच फसवणूक करून नुकसान होऊन ही पीकविमा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकरी नेते करतायेत. बाईट- सुभाष कदम- माजी जिल्हा परिषद सदस्य
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 15, 2025 13:54:450
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 15, 2025 13:54:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 15, 2025 13:49:382
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 15, 2025 13:47:522
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 15, 2025 13:47:040
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 15, 2025 13:46:470
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 15, 2025 13:44:470
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 15, 2025 13:04:040
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 15, 2025 12:56:413
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 15, 2025 12:17:223
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 15, 2025 12:16:503
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 15, 2025 11:59:042
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 15, 2025 11:55:226
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 15, 2025 11:38:596
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 15, 2025 11:31:435
Report