Back
चंद्रपूर नगर निगम का 746 करोड़ रुपए का बजट पेश, स्वास्थ्य-स्वच्छता-पेयजल को प्रमुख प्राथमिकता
AAASHISH AMBADE
Mar 27, 2026 14:05:46
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिकेचा ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर, शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा यावर विशेष भर अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी सादर केला. शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा यावर यात विशेष भर देण्यात आला आहे. अमृत 2.0 अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ८० कोटी, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी १०० कोटी, तसेच रस्ते बांधकामासाठी ३ कोटी आणि नाली बांधकामासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसेच कुठल्याही करात वाढ करण्यात आलेली नाही. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता २२.४९ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयांचे सक्षमीकरण आणि औषधोपचारांसाठी हा निधी खर्च केला जाईल. महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या विकासासाठी २.२८ कोटी रुपयांच्या विविध योजना राबवल्या जातील. दिव्यांगांच्या कल्याणासाठी १.४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चंद्रपूरला सुंदर आणि हरित करण्यासाठी चौक सौंदर्यीकरणासाठी १ कोटी, तर शहर सौंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे. 'माझी वसुंधरा' अभियान आणि ई-बस सेवेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाईल. स्थानिक प्रभागातील तातडीची कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीत वाढ करण्याची मागणी महापौर व सभापतींनी मान्य केली. पूर्वीचा ५ लाख रुपयांचा निधी आता १५ लाख रुपये (प्रति नगरसेवक) करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. दुसरीकडे विरोधी नगरसेवकांनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केली असून या आधीच्या महापालिका आयुक्तांनी टेंडर टेररिझम चालविले होते. त्याची चौकशी करण्यात येणार असल्याने हा आपला विजय असल्याचं ते म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 27, 2026 15:18:380
Report
SNSWATI NAIK
FollowMar 27, 2026 15:16:520
Report
MAMILIND ANDE
FollowMar 27, 2026 15:02:05677
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 14:36:251016
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 27, 2026 14:35:09Khalapur, Maharashtra:150 एकर जमीन, गुंठा 2 से 3 लाख
1012
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 27, 2026 14:34:40918
Report
JMJAVED MULANI
FollowMar 27, 2026 14:10:53944
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 13:46:341055
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 27, 2026 13:32:561075
Report
AKAMAR KANE
FollowMar 27, 2026 13:32:351098
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 13:30:24Ranbambuli, Maharashtra:PACL के संदर्भ में जो जमीन की जानकारी मांगी गई थी, वह जानकारी पूरी तरह से पता नहीं है, जिसकी वजह से जमीन की जानकारी नहीं मिल पायी.
1058
Report
CFChandrakant Funde
FollowMar 27, 2026 13:20:191093
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 27, 2026 13:01:02995
Report