Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

डहाणू नगर परिषद चुनाव में शिंदे गट व पवार गुटों की मिलीजुली शक्ति

HPHARSHAD PATIL
Nov 15, 2025 01:18:02
Palghar, Maharashtra
पालिक भाषण/जगह-वार (ग़ैर-सामाचार) नहीं: पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे सेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने नवा राजकीय अध्याय लिहिला जात आहे. डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत हातमिळवणी केली आहे. डहाणूमध्ये सुरु असलेली एकाधिकारशाही संपवण्यासाठी एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी दिली आहे. दरम्यान जागा वाटप आणि उमेदवार ठरवले जात असून, सोमवारी शक्ती प्रदर्शन करून नगराध्यक्ष आणि 27 उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. डहाणूमध्ये शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या युतीला ठाकरे गट आणि माकपचा देखील छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
105
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 02:18:35
Dhule, Maharashtra:बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पक्षाला घवघवीत यश मिळाले. या यशाचा आनंद उत्सव धुळे शहरात साजरा करण्यात आला. शहरातील लोक जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर जल्लोष केला. यावेळेस फटाक्यांचे आतीशबाजी करत एकमेकांना पेढे भरवण्यात आले. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, जेडीयू आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाने मोठे यश मिळवलं आहे. या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत एनडीएने विरोधकांना अशरक्षः धूळ चारली आहे.एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीतील लोजपाच्या विजयानंतर धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षातर्फे फटाक्यांची आतिशबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. सदर हा जल्लोष धुळे लोजपाच्या जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही एनडीए स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादित करेल असा विश्वास यावेळेस लोजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
91
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 02:18:01
Chendhare, Alibag, Maharashtra:अखेर अलिबागेत उमेदवाराचा शोध संपला महायुतीकडून नगराध्‍यक्ष पदासाठी तनुजा पेरेकर. ठाकरे गटाच्या नाराज पेरेकर भाजपच्‍या गळाला. अलिबाग नगरपालिका निवडणूकीसाठी महायुतीचा नगराध्‍यक्ष पदाच्‍या उमेदवाराचा शोध संपला. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून अलिबागच्‍या नगराध्‍यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. भाजपचे रायगड जिल्हाध्‍यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी तनुजा पेरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. महायुतीकडून उमेदवाराचा शोध सुरू होता. मात्र महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या ठाकरे गटातील माजी नगरसेविका तनुजा पेरेकर भाजपच्या गळाला लागल्या.
46
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 02:00:32
Chendhare, Alibag, Maharashtra:म्हसळा तालुक्यात आढळली बिबट्याची पिल्ले. गवत कापण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना सापडली बिबट्याची पिल्ले. बिबट्याची चाहूल लागल्याने ग्रामस्थ भयभीत. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील संदेरी गावाजवळ एका शेतात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली आहेत. शेताच्या बांधावर गावत कापण्यासाठी गेलेल्या काही स्थानिक शेतकऱ्यांना ही पिल्ले आढळून झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही पिल्ले या शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवून त्यांच्या ताब्यात दिली आहेत मात्र गावाच्या आजूबाजूचा परिसरात बिबट्याची चाहूल लागल्याने गावकऱ्यांनी बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाला विनंती केली आहे.
116
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 15, 2025 01:19:27
149
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 15, 2025 01:19:12
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात भाजपला खिंडार चार माजी नगरसेवक शिवसेना आणि टीम ओमी कलानीच्या गळाला आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहे, भाजपमधील दिग्गज नेते हे शिवसेना शिंदे गट आणि टीम कलानीच्या गळाला लागले आहेत, यात भाजप माजी जिल्हाअध्यक्ष जमनू पुरस्वानी, महेश सुखरामनी, प्रकाश माखीजा आणि राम पारवानी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांच्या उपस्थिती जाहीर प्रवेश केलय, त्यामुळे उल्हासनगरात भाजपला मोठा धक्का बसला आहे, मागील २५ वर्षांत भाजपमध्ये एकनिष्ठ काम करणारे चारही माजी नगरसेवक यांच्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि ओमी कलानी यांची ताकद वाढलीय
195
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 15, 2025 01:18:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सांगलीमध्ये कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकरी-उत्पादक खरेदीदार संमेलन पार पडले आहे. जिल्ह्यात पिकणाऱ्या प्रमुख पिकांना आणि शेतकऱ्यांना-व्यापार पेठ मिळावी,या उद्देशाने संमेलनाचा आयोजन करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन पार पडले,यावेळी चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांना परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नये,शेतमालावर प्रकिया करण्याकडे भर दिले पाहिजे,असं आवाहन शेतकरयांना केले,या संमलेना दरम्यान बेदाणा,हळद,परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. तसेच या संमेलनाच्या माध्यमातून 14.39 कोटींच्या 1580 मेट्रीक टन शेतीमालाच्या खरेदी विक्रीबाबत करार देखील पार पडला.
119
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 15, 2025 01:17:46
108
comment0
Report
Advertisement
Back to top