Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

अलीबाग नगर पालिका: तनुजा पेरेकर भाजपा में शामिल, महायुती को बड़ा झटका

PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 02:18:01
Chendhare, Alibag, Maharashtra
अखेर अलिबागेत उमेदवाराचा शोध संपला महायुतीकडून नगराध्‍यक्ष पदासाठी तनुजा पेरेकर. ठाकरे गटाच्या नाराज पेरेकर भाजपच्‍या गळाला. अलिबाग नगरपालिका निवडणूकीसाठी महायुतीचा नगराध्‍यक्ष पदाच्‍या उमेदवाराचा शोध संपला. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून अलिबागच्‍या नगराध्‍यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. भाजपचे रायगड जिल्हाध्‍यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी तनुजा पेरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. महायुतीकडून उमेदवाराचा शोध सुरू होता. मात्र महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या ठाकरे गटातील माजी नगरसेविका तनुजा पेरेकर भाजपच्या गळाला लागल्या.
126
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 04:15:41
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 15, 2025 04:09:12
Shirdi, Maharashtra:कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांत इनकमिंग-आउटगोइंग मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कलविंदर सिंग दडीयाल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. कोपरगाव शहरातील भाजप कार्यालयात पार पडला. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे , भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दडीयाल आणि त्यांच्या समर्थकांचे भाजपमध्ये औपचारिक स्वागत केले.
93
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 15, 2025 04:02:21
66
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 15, 2025 04:02:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शरद पवार उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर, मुक्कामी दौऱ्यात महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर - राष्ट्रवादीचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार सोलापुरात - शरद पवारांच्या मुक्कामी दौऱ्यात महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची शक्यता - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांची भेट होण्याची शक्यता - शरद पवार सोलापुरात मुक्कामी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी होण्याची शक्यता - जिल्ह्यातील राजकारणात आणि राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्यानंतर प्रथमच शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर - जिल्ह्यातील थंडावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार यांच्या दौऱ्याने मिळणार नवी ऊर्जा
107
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 15, 2025 04:01:43
Satara, Maharashtra:सातारा - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघीण T20-S-2 (चंदा) ला “ऑपरेशन तारा” अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वीरीत्या स्थलांतरित करण्यात आले. WII च्या मार्गदर्शनाखाली NTCA च्या नियमांनुसार वाघीण पकडून १००० किमीचा २७ तासांचा प्रवास पार करत चांदोली येथे सुखरूप आणण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर तिला सोनारली एनक्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज करण्यात आले असून पुढील निरीक्षण सुरू आहे. या मोहिमेत सह्याद्री आणि ताडोबा पथकांनी समन्वयाने काम केले. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, DFO स्न्हेलता पाटील, ACF, वनाधिकारी आणि संशोधकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वाघीणीचे नवीन नाव “तारा (STR T 04)” असे ठेवण्यात आले आहे.ऑपरेशन ‘तारा’- ऑपरेशन ‘तारा’ सारख्या शास्त्रीय मार्गदर्शनखाली राबविलेल्या उपक्रमांमुळे संवर्धनाला नवी ऊर्जा मिळणार आहे. या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल. पश्विम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्प आहे, जो सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे.
67
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 15, 2025 03:48:41
Nanded, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नगर नगराध्यक्षपदाच्या नावांची शुक्रवारी घोषणा केली. आमदार प्रताप पाटील यांनी या नावांची घोषणा केली. देगलूरमध्ये सौ. विजयमाला टेकाळे, उमरीमध्ये सौ. शकुंतलाबाई मुदिराज, हिमायनगर मध्ये मोहम्मद जावेद, धर्माबाद मध्ये माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुदखेडसाठी गिरीजाबाई पचलिंग यांच्या नावांची घोषणा केली. राष्ट्रवादीने या पाच नावांची घोषणा केल्याने युतीची शक्यता मावळलीये. युती झाली नाही तर सर्व जागाचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू असे चिखलीकर म्हणाले. परंतु भाजपने प्रस्ताव दिला तर विचार करू असेही चिखलीकर म्हणाले.
126
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 15, 2025 03:47:38
Nashik, Maharashtra:नाशकात वाढली थंडीची लाट अँकर नाशिक शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून थंडीची लाट पसरताना पाहायला मिळते थंडी म्हटलं की व्यायामासाठी पोषक वातावरण म्हटलं जातं यामुळे अनेक नागरिक जॉगिंग साठी आणि व्यायामासाठी घरातून बाहेर पडतात मात्र शहरातल्या थंडीमुळे नागरिक गारठले असल्याने व्यायाम आणि जॉगिंग झाल्यानंतर त्यांचा थेट मोर्चा चहाच्या स्टॉलवर जातोय नाशिक जिल्हा हा थंडीचा जिल्हा म्हणून ओळख आहे यामुळे शहरातले अनेक नागरिक घरातून थंडीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर चहाचा आस्वाद घेताना देखील पाहायला मिळतात.. आज देखील नाशिक शहर परिसरात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली... या संदर्भात थंडीचा आढावा घेत नाशिककरांशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
72
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 15, 2025 03:45:27
Bhandara, Maharashtra:अनियंत्रित कार पानठेल्यात धडक; तीन नागरिक जखमी. लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना. Anchor : -प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले धीरज लोणारे हे संध्याकाळच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनाने घराकडे निघाले असताना त्यांची गाडी अचानक अनियंत्रित होऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर असलेल्या पान ठेल्यावर जाऊन धडकली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे घडली असून वाहन थेट पान ठेल्यात धडक दिल्याने पान ठेल्यावर बसलेले व उभे असलेले तीन जण जखमी यात झाले असून यापैकी दूधराम मेश्राम नामक इसमाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. तर इतर دوघांवर बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच दिघोरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
110
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 15, 2025 03:34:33
Belagavi, Karnataka:Bel Coll Centre Feed:- 2C Anc:- बेळगाव शहरात अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विविध राज्यांमधील एकूण ३३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी बेळगावातील अजमनगर सर्कलजवळ असलेल्या कुमार हॉलवर छापा टाकला. येथे अनधिकृत कॉल सेंटर चालवणाऱ्या गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मेघालय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड आणि नागालँड अशा विविध राज्यांतील 33 व्यक्तींचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक करून त्याच्याकडून सुमारे 8 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
162
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 15, 2025 03:34:18
Jalna, Maharashtra:जालना : जरांगे यांच्या हत्येचा कट,तिन्हीही आरोपींना अटक न्यायालयीन कोठडी अँकर : मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या काही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या. यानुसार गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तीनही आरोपींची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अंबड न्यायालयाने दिले आहेत. अमोल खुने, दादा गरूड, कांचन साळवी अशी आरोपींची नावे आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली होती. अडीच कोटी रुपयांत ही हत्या करण्याचा कट रचला होता, अशा काही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणात जालना गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे
94
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 03:34:01
Washim, Maharashtra:वाशीम: चार नगरपरिषद आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून निवडणुक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय.या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख, काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अमित झनक तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे यांची उपस्थिती होती.या बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगर परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. पुढील दोन–तीन दिवसांत जागावाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने वाशिम आणि मंगरूळपीर येथील उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. ते महाविकास आघाडीसोबत राहिले तर आवश्यक तेवढ्या जागा सोडण्याबाबत विचार केला जाईल, असे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले. बाईट : संजय देशमुख, खासदार
133
comment0
Report
Advertisement
Back to top