Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401301

हिंदी headline

PTPRATHAMESH TAWADE
Mar 13, 2026 11:06:30
Virar, Maharashtra
निमंत्रण पत्रिकेवरून वाद; महापालिका मुख्यालयावर घेराव विरार : वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’च्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपाने आज मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. निमंत्रण पत्रिकेत आमदार-खासदारांची नावे वगळल्याने, राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत भाजपा नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पालिका मुख्यालयात आंदोलन केले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने एक प्रसिद्धी पत्रक काडून संबंधित निमंत्रण पत्रिका अधिकृत नसल्याचा खुलासा केला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 13, 2026 12:02:48
Kolhapur, Maharashtra:Kop Amababai Gabhara Savrdhan Feed:- 2C Anc:- करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिराच्या संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाचाच एक भाग म्हणून देवीच्या गाभाऱ्याची संवर्धन प्रक्रिया युद्धपातळीवर केली जात आहे . त्यामुळे उद्यापासून म्हणजे 14 मार्चपासून ते 17 मार्चपर्यंत अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचे दर्शन भक्ताना करता येणार नाही. पण बाहेरून येणाऱ्या भक्तांना देवीचे दर्शन करता यावे यासाठी श्री करवीר निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळ यांच्या वतीने अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 18 मार्च 2026 पासून अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे.
24
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 13, 2026 11:52:43
96
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 11:34:23
167
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 11:05:43
Chandrapur, Maharashtra:शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी परिसरात ग्रेटा ग्रीन स्टील और न्यू इरा क्लीनटेक नामक दो बड़े कोल गैसिफिकेशन प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. चंद्रपूर जिला कोयला उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु कोळशापासून मिथेन, युरिया व अन्य वायूंची निर्मिती होणार आहे. देशासाठी अत्यंत महत्वाचा असलेले हे प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी दहा वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला आहे. येत्या काळात विदर्भात आणखी दोन मोठ्या प्रकल्पांसह 100 मिलियन टन कोळसा उद्योगांच्या कामी आणला जाणार असल्याची माहिती उद्योग संघटनांनी दिली आहे.
116
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 10:49:38
133
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 10:47:25
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात पोलीस भरतीचा अंतिम टप्पा, १५ मार्चला लेखी परीक्षा, पोलिस प्रशासनाने केली जय्यत तयारी आंकर:- चंद्रपुरात २१५ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा येत्या रविवारी पार पडणार आहे. मैदानी चाचणीत घाम गाळल्यानंतर २३२१ उमेदवार लेखी परीक्षेच्या मैदानात उतरणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज तर महिलांसाठी सरदार पटेल महाविद्यालय हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने परीक्षेसाठी 'हायटेक' सुरक्षा तैनात केली आहे. बायोमॅट्रिक हजेरीपासून ते सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
158
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 10:19:18
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात बुलेट गाड्या चोरीचे सत्र सुरू असून बुलेट मालक धास्तावले आहेत. जिल्ह्यातील लोणी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगावसह अनेक ठिकाणाहून बुलेट चोरीचे गुन्हे दाखल झाले असून पोलीसांसमोर चोरांना शोधण्याचे आव्हान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर, श्रीरामपूर, कोपरगाव आणी लोणी येथून बुलेट चोरीच्या घटना घडल्या आहेत. खास म्हणजे चारही ठिकाणच्या सीसीटीव्हीत साधर्म्य असलेले चोरटे दिसत आहेत. चोरट्यांनी दिवसा ढवळ्या बुलेट चोरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व ठिकाणच्या दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने पोलीसांनी वेगाने तपास सुरू केला असून बुलेट चोरी करणारी एखादी टोळी समोर येण्याची शक्यता आहे.
154
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 10:18:30
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील कार्यालयातून चेक चोरी करून तब्बल ५ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तींनी कार्यालयातील काही चेक चोरी करून त्याद्वारे विविध बँक खात्यांतून रक्कम काढल्याचे समोर आले आहे.ही रक्कम जवळपास पाच वेगवेगळ्या खात्यांमध्ये काढण्यात किंवा ट्रान्सफर करण्यात आली.हा प्रकार लक्षात येताच मालेगाव तहसील प्रशासनाने संबंधित बँक खाती तातडीने होल्ड केली.तसेच या प्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून चेक चोरी कशी झाली आणि पैशांची अफरातफर कशी करण्यात आली याचा तपास सुरू केला आहे.या घटनेमुळे सरकारी कार्यालयांतील कागदपत्रे आणि चेकच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
184
comment0
Report
Advertisement
Back to top