Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

गैस कमी से होटल कारोबारी परेशान, तुषार लाड ने तेल-चलने वाला चूल्हा बनाया

SKSudarshan Khillare
Mar 13, 2026 11:52:43
Yeola, Maharashtra
सध्या सर्वत्र गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व्यवसायिक गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल मालकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत येवला शहरातील कारागीर तुषार लाड यांनी देशी जुगाड करत ऑईलवर चालणारी शेगडी तयार केली असून ही शेगडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हॉटेल व्यवसायिकांना ही शेगडी वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे. हॉटेलमधील सर्वच पदार्थ या शेगडीवर तयार करता येतील असे कारागीर सांगत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 13, 2026 12:48:46
Kalyan, Maharashtra:तीन वर्षांची चिमुकली सोबत घेऊन कल्याणच्या कोमल गायकवाड यांची मुलीच्या भविष्यासाठी संघर्ष. आयुष्यातील कठीण परिस्थितीशी दोन हात करत आपल्या मुलीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कल्याणमधील कोमल गायकवाड या रिक्षा चालवत संघर्ष करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या दिवसभर आपल्या तीन वर्षांच्या मुलगी तेजस्वीला सोबत घेऊन रिक्षा चालवतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, घर भाड्याचे आणि सासू आजारी असल्यामुळे त्यांचे पती गावी राहतात. त्यामुळे मुलीची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नसल्याने कोमल गायकवाड यांना मुलीला सोबत घेऊनच काम करावे लागते. सकाळपासून ते रात्री पर्यंत त्या रिक्षा चालवत काबाडकष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शिक्षण कमी असल्यामुळे आणि लहान मुलीला सोबत घेऊन कोणतेही काम देण्यास कोणी तयार नसल्याने त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. रिक्षा चालवताना मुलीची काळजी घेता यावी म्हणून त्यांनी रिक्षामध्ये मुलीसाठी खास बसण्याचा स्टँड तयार करून घेतला आहे. त्या स्टँडमध्ये तेजस्वी त्यांच्या शेजारी आरामात बसते. त्यामुळे प्रवाशांनाही प्रवासादरम्यान कोणताही त्रास होत नाही. दिवसभर कष्ट करणारी ही माय-लेकरांची जोडी अनेकांच्या नजरेत भरत आहे. माझ्यावर जशी परिस्थिती आली तशी माझ्या मुलीवर येऊ नये. तिला चांगले शिक्षण देऊन पोलीस अधिकारी बनवायचे आहे, असे स्वप्न कोमल केल आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 13, 2026 12:48:08
Kalyan, Maharashtra:वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक. हूल्लडबाज तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात. कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान सकाळच्या वेळेस वंदे भारत ही एक्सप्रेस आली असतांना कल्याणच्या पत्रीपूल जवळ सिग्नल मिळाल्याने वंदे भारत एक्सप्रेस ही थांबली असंताना त्यावेळेस त्या परिसरात राहणारे सनी कांबळे आणि त्याचे इतर मित्रांसोबत हुल्लडबाजी चालू असताना वंदे भारत ट्रेन वरती दगड फिरकवल्याने एक्सप्रेस ची खिडकीची काच फुटली त्यानंतर एक्सप्रेस मधले प्रवासीांनी तात्काळ कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीसचा घटनास्थळी पोचून सनी कांबळे याला ताब्यात घेतले आहे व पुढील चौकशी सुरू आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 13, 2026 12:02:48
Kolhapur, Maharashtra:Kop Amababai Gabhara Savrdhan Feed:- 2C Anc:- करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिराच्या संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाचाच एक भाग म्हणून देवीच्या गाभाऱ्याची संवर्धन प्रक्रिया युद्धपातळीवर केली जात आहे . त्यामुळे उद्यापासून म्हणजे 14 मार्चपासून ते 17 मार्चपर्यंत अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचे दर्शन भक्ताना करता येणार नाही. पण बाहेरून येणाऱ्या भक्तांना देवीचे दर्शन करता यावे यासाठी श्री करवीר निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळ यांच्या वतीने अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 18 मार्च 2026 पासून अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे.
175
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 11:34:23
167
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 13, 2026 11:06:30
185
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 11:05:43
Chandrapur, Maharashtra:शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी परिसरात ग्रेटा ग्रीन स्टील और न्यू इरा क्लीनटेक नामक दो बड़े कोल गैसिफिकेशन प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. चंद्रपूर जिला कोयला उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु कोळशापासून मिथेन, युरिया व अन्य वायूंची निर्मिती होणार आहे. देशासाठी अत्यंत महत्वाचा असलेले हे प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी दहा वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला आहे. येत्या काळात विदर्भात आणखी दोन मोठ्या प्रकल्पांसह 100 मिलियन टन कोळसा उद्योगांच्या कामी आणला जाणार असल्याची माहिती उद्योग संघटनांनी दिली आहे.
116
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 10:49:38
133
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 10:47:25
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात पोलीस भरतीचा अंतिम टप्पा, १५ मार्चला लेखी परीक्षा, पोलिस प्रशासनाने केली जय्यत तयारी आंकर:- चंद्रपुरात २१५ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा येत्या रविवारी पार पडणार आहे. मैदानी चाचणीत घाम गाळल्यानंतर २३२१ उमेदवार लेखी परीक्षेच्या मैदानात उतरणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज तर महिलांसाठी सरदार पटेल महाविद्यालय हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने परीक्षेसाठी 'हायटेक' सुरक्षा तैनात केली आहे. बायोमॅट्रिक हजेरीपासून ते सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
158
comment0
Report
Advertisement
Back to top