Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला नगर परिषद को 75 लाख का पुरस्कार; राज्य स्तर पर 6वां, विभाग में 1वां

SKSudarshan Khillare
Feb 18, 2026 01:15:37
Yeola, Maharashtra
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता और शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येवला शहराने राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक पटकावला असून येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 02:32:26
Kalyan, Maharashtra:डोंबिवली सागांव अग्नीकांडाचा मोठा खुलासा! ‘पार्किंगला आग जाणीवपूर्वक’ — पोलिसांनी CCTVच्या आधारे लवेश पार्टे नावाच्या आरोपीला केली अटकेत; २९ दुचाकी जळाल्या, ५ जखमी डोंबिवली सागांव येथील रविकिरण सोसायटीच्या राज अर्पाटमेंटच्या पार्किंगमध्ये पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाले होते.यात एका महिलेची प्रकृत�ी चिंताजनक आहे. महिलेची दोन मुले देखील जखमी झाली आहेत. अग्नीशमन दलाने आग विझविली. मात्र या आगीत पार्किंगमधील २९ दुचाकी जळून खाक झाल्या. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत लगेच तपास सुरु केला. इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फूटेज पोलिसांनी तपासले. सीसीटीव्हीत एक तरुण पार्किंगच्या कचरा पेटीत काही तरी टाकतो आहे. त्यानंतर काही सेंकदातच पार्किंग आग लागली. लवेस पार्टे या तरुणाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लवेशने घरातून कोणती वस्तू आणून कचरा पेटीत टाकली ? त्याुळे आग लागली. त्यात पाच जण गंभीररित्या जखमी झाले. याचा तपास पोलिस करीत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 18, 2026 02:32:07
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 18, 2026 02:01:27
Chendhare, Maharashtra:महाडचे ग्राम दैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची आज मध्यरात्री सांगता होत आहे. महाशिवरात्री से शुरू होकर या उत्सवाला प्रारंभ झाला है. मंदिरात धार्मिक विधी, देवी देवतांच्या पालखींच आगमन सुरू आहे. आज संध्याकाळी महाड तालुक्यातील विवीध देवी देवतांच्या पालख्या वीरेश्वर मंदिरात आएंगी. धार्मिक प्रथा पार पडतील. यासोबत लाखोंचा भक्त समुदाय देखील महाड शहरात दाखल होणार आहे. या निमित्ताने मिठाई, प्रसादची दुकान, खेळणी, शोभिवंत वस्तुंची दुकान आणि उंचउंच आकाश पाळणे देखील महाडमध्ये दाखל झाले आहेत. यामुळे महाड शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून महाडच्या छबिना उत्सवाची ओळख आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 18, 2026 01:16:13
Thane, Maharashtra:भिवंडीतील गटर खोदकामामुळे वाहन चालकांसह वाहतूक पोलीस हैराण... गटाराचं पाणी रस्त्यावर, घाणीचं साम्राज्य.. अँकर... भिवंडी शहरातील धामणकर नाका ते अंजुरफाटा या रस्त्यामधील नारपोली वळण रस्त्यावर ठेकेदाराने गटर बांधकाम करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत रस्त्याचं खोदकाम केले आहे. या रस्ते खोदकामामुळे धामणकर नाक्यावरून नारपोलीकडे वळण घेणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे. या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने हि वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध खोदकाम केले असून दुसऱ्या बाजूने वाहनांना वळण घेण्यासाठी जागा सोडलेली नाही. त्यामुळे येथून येणारी-जाणारी वाहने मध्येच अडकून पडतात. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे खोदकाम केल्यामुळे शेजारील डाइंग कंपनीतून निघणारे केमिकलचे गरम केमिकल मिश्रित पाण्यातून दुचाकी स्वारांना जावे लागत आहे. या पाण्यात दुचाकी स्वारांचे पाय या केमिकल मिश्रित पाण्यात पडल्याने गरम पाण्याचा पायांना चटका बसत आहे. खोदकाम केलेल्या रस्त्याच्याया दुसऱ्या बाजूला खड्डे व दगड असल्याने येथे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. ठेकेदाराने कोणतेही सुरक्षितता न ठेवता रस्त्यावर खोदकाम केले असून या खोडकामाचा आम्हाला प्रचंड त्रास होत असून दुचाकी स्वार रस्त्यात पडतात व गरम पाण्यात प्रवाशांचे पाय भाजत आहेत.मात्र मनपा प्रशासनाचे देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया येथे कर्तव्य बजावणाऱ्या एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 18, 2026 01:15:54
Sinnar, Maharashtra:अँकर:'पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं' अशा घोषणा देत सिन्नर तालुक्यातील २२ गावांतील संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयावर भव्य 'हंडा मोर्चा' काढला. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मनेगावसह परिसरातील २२ गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असल्याने, संतापलेल्या महिलांनी रिकामे हंडे घेऊन प्रशासनाचा निषेध केला. लासलगाव-विंचूर-दळवी-घोटी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे मुख्य जलवाहिनी फुटली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनेगाव, धोंडवीरनगर, रामनगर, पाटोळे, दापूर, दोडी, गोंदे, भोकनी यांसह २२ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलाना २०० लिटर पाण्यासाठी ६० रुपये मोजावे लागत असल्याची प्रतिक्रिया महिमहिलांनी दिली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 17, 2026 14:48:00
Bhandara, Maharashtra:RUPALI CHAKANKAR BYTE (BHANDARA) ON SUPRIYA SULE STATMENT ANCHOR :- अशा पद्धतीचे प्रकरण मंत्रालयात होणे अत्यंत चुकीचं आहे.... या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे... आपल्यासमोर लवकरच सगळ्या बाबी येतील... ((कैबिनेट मंत्राच्या कार्यालयावर छापा पडणे आणि कार्यालय सिल करणे... ही बाब अत्यंत धक्कादायक आहे... या कारवाईसाठी टीप ऑफ नक्की कोणी दिली.... असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलाय.....)) यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या REPLY ON ROHIT PAWAR STATEMENT... ANCHOR :- रोहित पवारांचे दररोज वेगवेगळे स्टेटमेंट येतात त्यामध्ये आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल असतील, तटकरे असतील त्यांनी आपल्याशी या प्रकरणी संवाद साधला..... खर तर दादांच्या गेल्यानंतर मी वहिनींचे मनापासून कौतुक करेल..... आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.... भावना महत्त्वाच्या आहेत पण.... त्या पलीकडेही जाऊन कर्तव्य महत्त्वाचं आहे..... त्यांनी चौथ्या दिवशी जबाबदारी पेलली.... इतक्या दिवसात अनेकांनी अनेक विधाने केली पण आता ती वेळ नाही की उत्तर देता येईल..... योग्य वेळी पक्षश्रेष्ठी त्याचे उत्तर देतील..... REPLY ON ROHIT PAWAR STATEMENT... ANCHOR :- कोणतेही पुरावे नाहीत और अशा पद्धतीचे विधानं करणं चूकचं आहे... त्यांच्याकडे असलेल्या विधानांचे बातम्यांचे पुरावे समोर मांडावे.... ((आमदाराच्या बैठका घेतात आणि विलीनीकरणावर बोलायचं नाही असं सांगतात..... पण विलीनीकरणाच्या समर्थनार्थ असलेल्या 35-40 आमदारांना रोखतील का...? असा सवाल रोहित पवारांनी केलाय....)) यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या... REPLY ON SANDHYA SAWAALAKHE ANCHOR :- मोतीबिंदूचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही..... तसं असतं तर मी दुसऱ्यांदा भंडाऱ्यात आली आहे वेगळ्या पद्धतीने मला सांगायची गरज नाही आम्ही काम करतो विरोधकांमध्ये राहून केवळ सत्ताधाऱ्यांवर बोलणं.... आणि चर्चेत राहणं सतधाऱ्यांवर टीका करणे हा एकतर्फी काम आहे.... आम्ही काय करतो हे सांगण्यापेक्षा तुम्ही सत्तेत राहताना काय केलं हे जनतेला सांगितलं तर ते फार महत्त्वाचं आहे.... ((संध्या सव्वालाखे यांनी रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या मीडियावर येऊन बोलतात पण प्रत्यक्षात महिलांसाठी काही करत नाही अशी टीका केली होती.... त्यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या)) REPLY ON EXAM WITHOUT MNAGALSURTRA ANCHOR :- खऱ्या अर्थाने मंगळसूत्र काढून परीक्षा देणे हे चुकीचं आहे... अशा पद्धतीने होऊ नये असं मला वाटतं.... ((मंगळसूत्र काढून परीक्षा देणं चुकीचं.... आम्हाला आमच्या मुलींचे, बहिणींचे मंगळसूत्र काढले तर चालेल का आम्हाला तर मान्य होणार नाही.... असं वक्तव्य संध्या सव्वालाखे यांनी केलं होतं..... त्यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या))
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 13:51:11
Akola, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी व्हावी याकरिता आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी सुरुवातीपासून लावून थकली होती. आज शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे , हे मागणी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे असल्याचे ते म्हणाले. ब्लॅक बॉक्स आणि जे पायलट निघाले त्यांचा लोकेशन काय आहे ? ते कुठे होते त्या दिवशी ? हे महाराष्ट्राच्या मनात अजूनही प्रश्न उर्वरित असल्याच ते म्हणले. सीआयडी चौकशीच्या संदर्भात जे काही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिला आहे आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री महोदय यावर तात्काळ दखल घेतील आणि गांभीर्याने कारवाई करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कारवाईला उशिरा होण्यास कारण नाही, कारण कार्यकर्त्यांचा संयम सुटत आहे एवढा मोठ्या नेत्याचा दुर्दैवी अपघात होणं आणि त्या अपघातानंतर कुठले ठोस समाधानकारक उत्तर न भेटणार त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांचा मृत्यूचा अध्याय एवढा लवकर संपेल असं कुणाला वाटत असेल कुणाला तर हे चुकीचं असल्याचाही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं त्याचा अजून उत्तर आलं नाही , प्रदेशाध्यक्षांना मी पत्रव्यवहार केला त्यावरही अजून मला उत्तर मिळालेले नाही म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या पत्राला काही किंमत नसेल तर याचा मी खेद व्यक्त करत आहे, म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 17, 2026 13:35:25
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे... गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे... संशयित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बेबी गवारे असे मृत महिलेचे नाव आहे घरगुंत किरकोळ कारणावरून सुहास गवारे उर्फ मामा याने आईशी वाद घालत तिला मारहाण केली... भिंतीवर आपटलं आणि कात्रीने तिचा निर्घृण खून केला... तो मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समजतय... माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले... उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी पाहणी केली... सध्या संशयित सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याचं तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी सांगितले.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 17, 2026 13:06:10
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 17, 2026 13:03:57
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 17, 2026 12:53:34
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - टिपू सुलतान यांच्या फोटोवरून राज्यात जे वादळ उठलं ते चुकीच- धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव. राज्यात जाती जातीत तेढ निर्माण करून चुकीची आंदोलने केली जात आहेत... देशात विकासाच्या मुद्द्यांवर कोणी चर्चा करीत नाही.. धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार शोभा बच्छाव यांनी नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांची भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी टिपू सुलतान यांच्या फोटोवरून राज्यात जे वादळ उठलं ते चुकीच असल्याचं सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली नसल्याचे सांगत त्यांनी पाठराखण केली.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 17, 2026 12:33:51
Yavatmal, Maharashtra:जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या प्रताप टेलीकास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात कर्मचाऱ्यांनी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील सवना या गावी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामुळे या भागातील मोबाईल सेवा देखील प्रभावित झाली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमधून कंपनीचे कर्मचारी येथे एकवटले असून त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. टेलिकम्युनिकेशन आणि रिगर या पदावर हे कर्मचारी महाराष्ट्रभर काम करतात, पगारवाढ, संरक्षण विमा, सेफ्टी किट, टूलकिट कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. परप्रांतीय वरिष्ठाकडून मराठी कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक थांबवावी अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top