Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

संभाजी पवार का राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश, नाशिक में हलचल मच गई

SKSudarshan Khillare
Nov 18, 2025 12:45:59
Yeola, Maharashtra
मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख संभाजी पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष अजित पवार व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे दरम्यान येवला तालुक्याच्या विकासासाठी आपण हा प्रवेश केला असून यापुढे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याची माहिती संभाजी पवार यांनी दिली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Mar 10, 2026 12:00:46
Nasik, Maharashtra:लवासा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. नाशिकचे विधीज्ञ नानासाहेब जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे, त्यांच्या पती सदानंद सुळे आणि Hindustan Construction Company के अजित गुलाचंद यांच्यावर सीबीआय चौकशीची मागणी आहे. प्रकल्पासाठी हजारो कोटींची मुद्रांक शुल्क माफी, 141.15 हेक्टर शासकीय जमीन कमी दरात देणे आणि 5,000 एकर जमीन खरेदीतील कथित अनियमितता हे आरोप आहेत. उच्च न्यायालयाने याचिका उशिरा दाखल झाल्याचे कारण देत फेटाळली होती. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे नाव याचिकेतून वगळण्यात आले आहे. नानासाहेब जाधव याचिकारता
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 10, 2026 11:55:59
Dhule, Maharashtra:इराण-अमेरिका तणावाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे..... युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण गेल्या आठवड्याभरात २٢٠० वरून १२०० वर केळीचे दर आलेत...... नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादक अडचणीत; बाजारभाव घसरल्याने नुकसानाची भीती.....उत्पादन खर्च वाढला, पण दर घसरले केळी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले..... इराण-अमेरिका तणावाच्या परिणामांचा फटका आता नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होत असून केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी बाजारात सुमारे २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना सध्या तो घसरून जवळपास १२०० रुपयांपर्यंत आला आहे. दरातील या मोठ्या घसरणीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 10, 2026 11:45:25
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 10, 2026 11:37:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - मिरज पंचायत समिती सभापती निवडीत भाजपाला धक्का,महाविकास आघाडीने मारली बाजी.. सांगली जिल्हा परिषदेच्या तोंडावर पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाला मिरज पंचायत समिती मध्ये धक्का देत महाविकास आघाडी सोबत राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे.केवळ 3 जागा असणाऱ्या काँग्रेसने पंचायत समिती सभापती पदी बाजी मारली आहे.तर शिवसेना शिंदे गटाला उपसभापती पद मिळाले आहे.मिरज पंचायत समितीच्या 22 पैकी दहा जागावर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते,त्यामुळे भाजपाचा मिरज पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सोबत सभापती होईल आणि सत्ता येईल, अशी दाट शक्यता असताना,अत्यंत नाट्यमय्यारित्या घडलेल्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे,सभापती म्हणून काँग्रेसची तन्वी कमलेकर,ही 21 वर्षीय तरुणी सभापतीपदी निवडून आली आहे,तर शिवसेना शिंदे गटाच्या ललिता शेजुळ या उपसभापती म्हणून विजयी झाल्या आहेत. खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून रोखठ मिरज पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे. बाईट - विशाल पाटील - खासदार बाईट - तन्वी कमलेकर - नुतून सभापती- मिरज पंचायत समिती बाईट --अजित घोरपडे -माजी मंत्री,राष्ट्रवादी अजित पवार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 11:21:56
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | पंचायत समिती सभापती निवडणूकीत भाजप ,शिवसेना ठाकरे पक्षात राडा (पॅकेज) फोडले सदस्य,पकडली कॉलर,झाला राडा! भाजपने ठाकरे सेनेचे 3 पंचायत समिती सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. दानवेंनी पकडली भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराची कॉलर,झाला राडा. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत मतदान होण्याआधी भाजपने ठाकरे सेनेचे 3 सदस्य पळवल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. निवडणुकीदरम्यान दानवेची मतदान केंद्राजवळ एन्ट्री झाली आणि भाजप शिवसेनेत राडा झाला. नेमकं झालंय काय या निवडणुकीत पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती पंचायत समितीत एकूण 20 सदस्य आहेत. सभापती पदासाठी 11 सदस्यांची गरज लागणार होती. यात भाजपकडे स्वतःचे भाजप 6 आणि 1 पुरस्कृत असे एकूण 7 सदस्य होते. एकनाथ शिंदे शिवसेनेचे 6, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 1 तर प्रहारचा 1 सदस्य निवडून आला होता. शिवसेना शिंदे पक्षाचे 3 सदस्य भाजपसोबत असल्याची चर्चा होती. तर भाजपने ठाकरे गटाचे 3 सदस्य पळवून नेल्याचा आरोप दानवेंनी केला. ठाकरेच्या एकूण 4 पैकी 3 सदस्य भाजपने पळून नेल्याचा आरोप दानवेंनी केल्यानं ठाकरेकडे केवळ एकच सदस्य उरला. त्यामुळे दानवेंनी थेट भाजपच्या सभापती उमेदवाराची कॉलरच पकडली. या राड्यानंतर सभापती पदासाठी मतदान पार पडलं. या मतदानावेळी ठाकरे सेनेचे तीन सदस्य गैरहजर राहिले. तर शिंदे शिवसेनेतही एक खासदार संदीपान भुमरे यांचा तर दुसरा पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा. त्यामुळे कल्याण गायकवाड (भाजप उमेदवार) एकूण मतदान 09 (भाजप 7+शिरसाट समर्थक शिवसेना सदस्य 2) अनुराग शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार) मतदान 08 (ठाकरे गट 1+काँग्रेस 1+प्रहार 1+भुमरे समर्थक शिवसेना 4 आणि स्वतः 1). उपसभापती निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट झाले आणि शिवसेना शिंदे पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात उतरले: बाळासाहेब गाडे, शिंदेसेना (सिरसाट समर्थक) 10; बाबासाहेब राठोड, शिंदेसेना (भुमरे समर्थक) 7 मत मिळाली. त्यामुळे या अटी तटीच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारली. कल्याण गायकवाड, नवनिर्वाचित सभापती, पंचायत समिती, छत्रपती संभाजीनगर. अनुराधा चव्हाण, आमदार, फुलंब्री, भाजपा. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात वेगवेगळ्या संस्थांमधील सत्ता स्थापनेवरून चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळतोय. तर शिवसेना शिंदे पक्षातही अंतर्गत कलह दिसून येतोय. त्याचाच फायदा आजच्या निवडणूकीत भाजपने घेतल्याचं समोर आलं पण या निमित्ताने राडा देखील पाहायला मिळाला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 11:10:10
Akola, Maharashtra:शेतकरी बंधूंनो, कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात अशाच प्रकारे कापूस खरेदीत फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे कापूस खरेदी व्यवहारात एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कापूस खरेदीदरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. कापूस खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले. उदाहरणार्थ ९०० किलो वजनाच्या ट्रकमध्ये १०० किलो वजनाची मातीची पिशवी ठेवून वजन केल्यास काट्यावर १००० किलोची पावती घेतली जाते. त्यानंतर ती माती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केले जाते. त्यामुळे आधीच्या वजनातील फरकामुळे व्यापाऱ्याला जास्त कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र शेतकरी संदीप धोंडे आणि गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला. मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याने इतर शेतकऱ्यांकडूनही अशा प्रकारे कापूस खरेदी केला आहे का याची माहिती घ्यावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यापारी बाजार समितीत परवानाधारक असल्यास त्याचा परवाना रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी वजन काट्याची आणि वाहनाची नीट तपासणी करून व्यवहार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 10, 2026 10:51:42
Ahilyanagar, Maharashtra:गावात कोणी शिवराळ भाषा वापरली तर पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे... गावात सार्वजनिक ठिकाणी घाण केली किंवा कचरा टाकला तर शंभर रुपयाचा दंड भरावा लागणार आहे... अहिल्यानगरच्या कोळगाव या ठिकाणी तुम्हाला शिवराय भाषा वापरता येणार नाही आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा ही टाकता येणार नाही. महिला दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत अशा प्रकारचा ठरावच करण्यात आला आहे या ग्रामसभेचं आणि ठरावाचं कौतुक केलं आहे... ग्रामपंचायत ने केलेला ठराव सर्वांचाच लक्ष वेधून घेणारा ठरला आहे या ठरावाचं तरुणांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलंय गावात शिस्तीच्या दृष्टीने केलेले हे ठराव आगामी काळामध्ये खूप सकारात्मक बदल घडवणारे असतील अशा प्रतिक्रिया गावातील तरुणांनी आणि महिलांनी दिल्या आहेत... गावामध्ये शेती व्यवसायाबरोबरच अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यामुळे ग्रामस्थांचा वावर चांगला आहे वेगवेगळ्या कारणाने वाद-विवाद होतात मात्र यात शिवराळ भाषेचा वापर झाला तर किरकोळ वाद विकोपाला जाऊन मोठे भांडण होतात ग्रामपंचायत च्या ठरावामुळे या सर्व गोष्टींना आळा बसणार आहे मात्र सर्व ग्रामस्थांनी केलेला ठरावाची जाणीव ठेवावी पाहिजे असं देखील काही ग्रामस्थांनी म्हटला आहे... कोळगाव येथील ग्रामपंचायत ने केलेला ठराव गावातील वातावरण शांत राहावं आपसातील संबंध सलोख्याचे राहावेत यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे इतर गावांनीही ग्रामसभेमध्ये असे विकासात्मक ठराव केल्यास गावात निश्चितच सकारात्मक बदल होतील यात शंका नाही
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 10, 2026 10:46:30
Navi Mumbai, Maharashtra:इस्त्राइल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धाच्या या संघर्षामुळे भारतीय निर्यात मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून भारतातील सुमारे ४० ते ४५ हजार कंटेनर समुद्री मार्गावर तसेच परदेशातील बंदरांवर अडकून पडले होते. आता हे कंटेनर परत आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या कंटेनरमध्ये अंदाजे १ ते १.५ अब्ज डॉलर किमतीचा निर्यात माल आहे. कंटेनर अन्य देशांकडे वळवावे लागले किंवा भारतात परत आणावे लागले, तर निर्यातदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, जो कंटेनर एक हजार डॉलर लागत होते तेच आता सहा ते सात हजार डॉलर भरावे लागत आहेत. जेएनपीटी बंदरात अनेक फळांचे आणि भाज्यांचे कंटेनर अडकून पडले आहेत. कंटेनर अन्य युद्धामुळे शिपिंग कंपन्यांनी आपत्कालीन व अतिरिक्त शुल्क लागू केले असून, त्यामुळे प्रति कंटेनर वाहतूक खर्च ३ ते ५ लाखापर्यंत वाढला आहे. कंटेनरमधील माल नाशविंत असल्याने निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. GNPT कडून जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार अशा कंटेनरवर ग्राउंड रेंट १००% माफ करावा आणि प्लगिंग चार्ज ८०% माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक्स्पोर्टचा माल लोकल मार्केटला आणला गेला तर निर्यातदारांचे ५०% नुकसान होईल असे दिसत असल्याने हा माल एक्स्पोर्ट कसा होईल याकडे निर्यातदारांचे लक्ष लागून आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 10:30:54
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में उद्योगांना गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कंपन्यांकडे असलेला गॅस साठा संपत आला असून तब्बल 30 कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रोपेन आणि ब्यूटेन घरगुती वापरासाठी राखीव केल्याने उद्योगांना गॅस पुरवठा तातडीने थांबवण्यात आला. शेंद्रा, वाळूज आणि चित्तेगाव औद्योगिक वसाहतींमधील सुमारे 30 कारखान्यांकडील साठा संपत आला असून येणाऱ्या दोन दिवसांतच टाळे लावले जाऊ शकते. उद्योगांमध्ये ऑटो, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांवर परिणाम होतोय. उद्योजकांनी मुख्यमंत्री भेटीची तयारी केलीय.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 10:21:07
Akola, Maharashtra:अकोला शहरात पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या एका तरुणाला किरकोळ वादातून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील बाळापूर नाका परिसरात ही घटना घडली. गाडी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर काही तरुणांनी पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या शुभम झुंज याला फायर सिलेंडर, दगड आणि लाठीकाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार संबंधित कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, मारहाणीच्या वेळी जातिवाचक शिवीगाळ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जखमी तरुणाने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संशयित आरोपी पक्षाकडूनही प्रतितक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारींवर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 10, 2026 10:18:21
Dhule, Maharashtra:धुळे जिले में गैस सिलेंडर उपलब्ध न मिलने से होटल बंद करने की स्थिति आ गई है, जिसे हॉटेल मालिकों पर असर पड़ा है। इसलिए ये व्यवसायिक हताश हो गए हैं। गैस सिलेंडर की कमी के कारण धुळे जिले के होटल व्यवसायी भी बड़ी चिंता में हैं। गैस सप्लाई न होने से होटल चालू रखना संभव नहीं। आज शाम के बाद गैस सिलेंडर उपलब्ध न हो पाए तो होटल बंद रखने के अलावा विकल्प नहीं बचेगा—यह हॉटेल व्यवसायियों ने व्यक्त किया है। इससे होटल कर्मचारियों और मजदूरों के रोजमर्रा खर्च समेत होटल खर्चों पर दबाव पड़ेगा और होटल व्यवसाय पर संकट खड़ा होगा। कुछ जगह चूल्हों पर खाना बनाने की व्यवस्था भी अब देखने को मिल रही है। गर्मी के कारण चूल्हे पर पूरे होटल को चलाना संभव नहीं बताया गया है। शासन को तत्काल व्यवसायिक सिलेंडर की सप्लाई सुचारु करनी चाहिए, अन्यथा होटल कारोबार बंद करने के अलावा कोई विकल्प नहीं रहेगा—यह प्रतिक्रया है।
0
comment0
Report
Advertisement
Back to top