Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

नाशिक के ब्राम्हणगाव में भूत-आफवाह फैलाने वालों की पुलिस कर रही है जांच

VNVishal Nagesh More
Feb 13, 2026 01:01:52
Malegaon, Maharashtra
नाशिक के ब्राम्हणगाव में भूत-आफवाह फैलाने वालों की पुलिस कर रही है जांच. भुताच्या अफवे मागे वेगळे कारण? भुताची अफवा पसरताच काही संशयितांना रात्री ग्रामस्थांनी घेतले ताब्यात आणि केले पोलिसांच्या स्वाधीन. वाळू, डाळींब, पाण्याच्या मोटारी चोरी करण्यासाठी भुताची अफवा पसरवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. भूत दाखवा एक लाख, 21 लाख, 25 लाख रुपये मिळवा - ग्रामस्थ व अंनिसचा दावा. नाशिकच्या बागलाणच्या आराइट गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गावात भूत आल्याचे वृत्त प्रसारीत झाल्यान गावक-यांमध्ये भितीच वातावरण पसरले आहे; त्या गावात नेमके त्याच वेळी कोणी बाहेरील संशयित इसम मिळून आल्याने गावकऱ्यांनी त्यांना पकडले आणि सटाणा पोलिसांच्या स्वाधीन केले असुन पोलिस चौकशी करीत आहे. दरम्यान वाळू, डाळींब, पाण्याच्या मोटारी चोरी करण्यासाठी भुताची ही अफवा पसरवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप केला आहे. अंनिस राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी असा कुठलाही भुताचा प्रकार नसून AI च्या माध्यमातून भुताचा फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा दावा केला असून अंनिस कडून 25 लाखांचे बक्षिस देण्याचेही त्यांनी घोषित केले. दरम्यान तो भुताचा फोटो कोणी व्हायरल केला, कोणत्या ग्रुपवर करण्यात आला याचा शोध पोलिसांनी घेतला का? अख्ख्या गावाला भीतीच्या वातावरणात जगायला भाग पाडणाऱ्या संशयितावर अद्याप गुन्हा दाखल का नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Feb 13, 2026 04:04:20
Thane, Maharashtra:भिवंडी मधील काल्हेर खाडीपात्रावरील अवैध रेती साठ्यांवर धडक कारवाई... पोखलेन, डंपर सह ९७ लाखांचा मूद्देमाल जप्त.. महसूल विभागाने दिला रेती माफियांना मोठा दणका... उल्हास नदीच्या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा केला जा असल्याच्या तक्रारी नंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकुष्ण पांचाळ यांनी रेती माफियांच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी हरीचंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रूपाली भालके उपविभागीय अधिकारी अमित सानप या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, रेतीगट तहसीलदार अमोल कदम भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथक क्रमांक एक संजय जाधव, सहाय्यक महसूल अधिकारी दिनेश बोराडे, अनिल राजापूरे, दक्षता पथक क्रमांक दोन अरूण शेलार, सहायक महसूल अधिकारी दर्शन नटे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तसेच मंडळ अधिकारी सुधाकर कामडी, ग्राम महसूल अधिकारी निलेश काबेंरे सुर्यकांत पाटील, यांच्या समवेत गूरूवारी भिवंडी तालुक्यातील मौजे काल्हेर येथील रेती बंदर येथे धडक कारवाई करण्यात आली. या समयमा १९ रेती साठे आढलून आले आसून १५२३ ब्रास रेती. रेती उपसा करणाऱ्यांसाठी वापरण्यात येणारे एक वाहन हायवा व पोखलेन जप्त करण्यात आली. तर सहा रेतीने भरलेल्या कुंड्या आढलून आल्य त्या पोखलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. सदर या कारवाईत पथकाने ९७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमूळे माफीयांचे धाबे दणाणले आहेत. काल्हेर बंदर येथिल बेकायदा उत्खनन करून रेती साठवणूक करण्यासाठी तयार करण्यात तयार आलेल्या सहा कुंड्या पोखलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. महसूल विभागाची ही चौथी धडक आहे. या प्रकरणी रेती माफिया विरोधात नारपोली पोलिसठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला है.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 13, 2026 04:04:02
Satara, Maharashtra:सातारा -गेल्या वर्षभरापासून शेतकरी आणि दुचाकीचा पाठलाग करून माणसांना जखमी करणारे बिबटे उंडाळे विभागात धुमाकूळ घालत आहेत. माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे नातू आदिराज पाटील यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला केला होता.हा हल्ला करणाऱ्या तीन बिबट्यापैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वनविभागाचा चांगलाच समाचार घेतल्यानंतर वनविभागाने पिंजरे वाढवले आणि बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम गतिमान केली आहे. वनविभागाच्या कामावर स्थानिक नाराज असून आतापर्यंत 4 ते 5 जण बिबट्याच्या हल्यात जखमी झाले आहेत.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 13, 2026 04:01:57
Satara, Maharashtra:सातारा– सातारा लोणंद रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे. रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या नाल्याचे काम हलक्या दर्जाचे होत असल्याची तसेच काँक्रीट टाकल्यानंतर योग्य पद्धतीने पाणी न मारता काम पूर्ण केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करत काम बंद पाडले. संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत तीव्र नाराजी व्यक्त केली.या मार्गावर पूर्वी अपघात झाले असल्याने निकृष्ट कामामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत कामाची तातडीने तपासणी करून दर्जेदार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 03:46:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC: हैदराबाद गॅझेटरनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. आतापर्यंत 731 जनांनी अर्ज केले होते. त्यातील 24 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. उर्वरित अर्जाची सध्या तपासणी सुरू आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर जीआर काढला होता. त्या हैदादगॅजेटियरनुसार सहा महिन्यात 310 प्रमाणपत्रे मिळाली आहेत. GFX कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्रे मिळाली? जालना जिल्ह्यात 35 परभणी जिल्ह्यात 160 हिंगोली जिल्ह्यात 3 नांदेड जिल्ह्यात 8 बीड जिल्ह्यात 91 लातूर जिल्ह्यात 9 धाराशिव जिल्ह्यात 4 मात्र तत्पूर्वी मराठवाड्यात ज्या कुणबी मराठा कुणबी कुणीबी मराठा अशा नोंदी मिळाल्या होता. त्या आधारावर वर्षभरात 35 हजार 885 प्रमाणपत्र आत्तापर्यंत मिळालेली आहेत. त्यासाठी 36 हजार 237 मराठा समाजातील बांधवांनी अर्ज केला होता. केवळ 49 अर्ज नाकारले होते. त्यामुळे मराठवाड्यात आत्तापर्यंत जवळपास 36 हजार कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 13, 2026 03:46:35
Thane, Maharashtra:भिवंडीतील अपक्षांसह कोणार्क विकास आघाडीच्या ५ सदस्यांची कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी... माजी महापौर विलास पाटील गटनेता पदी नियुक्त. भिवंडी पालिकेच्या महापौर पदाची निवडणूक तीन आठवड्यानंतर ही प्रलंबित आहे. त्यातच कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांना अटकपूर्व जमीन मंजूर झाल्या नंतर कोणार्क विकास आघाडीच्या गटाची नोंदणी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणार्क विकास आघाडीचे चार सदस्य असताना पालिकेतील एकमात्र अपक्ष विक्रीय उमेदवार नितेश ऐनकर यांना विलास पाटील यांनी आपल्या गटात समाविष्ट करून घेतले आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील, मयुरेश पाटील व नेहा काठवले हे सदस्य कोणार्क विकास आघाडीचे विजयी आहेत. सुरवातीपासून अपक्ष सदस्य नितेश ऐनकर हे भाजपा सोबत राहतील अशी शक्यता सर्वां कडून वर्तवली जात होती. पण शहरात विलास पाटील दाखल होताच त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीची गणित जुळवण्यास सुरुवात केली आहे. यात एकमात्र अपक्ष नगरसेवक नितेश ऐनकर यांना आपल्या गटात घेण्यात यशस्वी झाले असून यापुढे महापौर पदासाठी विलास पाटील यांच्या गटनेत मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचा सुतोवाला केला आहे. तर विलास पाटील यांची गटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 13, 2026 03:32:04
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 13, 2026 03:31:53
Bhandara, Maharashtra:“श्रमसंहितेविरोधात भंडाऱ्यात कम्युनिस्ट पक्षाचा एल्गार; कामगार-शेतकरी प्रश्नांवर तीव्र मोर्चा”. भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली कामगार व शेतकरी प्रश्नांवर तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितेमुळे शंभर वर्षांच्या लढ्यातून मिळालेले कामगार कायदे हिरावले गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. किमान वेतनापेक्षा कमी मजुरी, महिनोन्‌महिने थकीत पगार आणि असुरक्षित रोजगारामुळे श्रमिकांचे जीवन असह्य झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकार उद्योगपतींच्या बाजूने झुकत असून कामगार-शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. समस्यांकडे तातडीने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 13, 2026 03:17:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - रस्त्यांसाठी आमदारांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तात्काळ होकार Anchor - राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते. शहराच्या विकास आराखड्यातील तसेच अक्कलकोट रोड, होटगी रोड, एमआयडीसी या भागातील रस्त्यांकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी वाढीव निधीची मागणी केली. सोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार यांच्या या मागणीला तात्काळ होकार दिला. एमआयडीसीतील रस्त्यांकरिता लागणारा निधी 75 टक्के राज्य शासन आणि 25% उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून 75 टक्के राज्य शासन आणि 25% जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्याची मागणी यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 13, 2026 03:17:09
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मोहपा रोडवर भीषण अपघात, १२वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, वडिलांचाही जागीच अंत, संतप्त गावकऱ्यांनी जाळपोळ करत टिप्पर चालकाला दिला चोप - १२वीची परीक्षा देण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा मोहपा रोडवरील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. - उमरेड पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या या दुर्घटनेत आणखी एक विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत - मोहपा गावातील सुभाष केशव भिवणकर (वय ५२) हे गुरुवारी सकाळी आपल्या दुचाकीने मुलगी तन्वी सुभाष भिवणकर (वय १६) आणि तिची मैत्रीण वंशिका ज्ञानेश्वर नरुळे (वय १७) यांना घेऊन उमरेडकडे निघाले होते. - एमआयडीसी पुलाजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. - या अपघातात सुभाष भिवणकर आणि तन्वी भिवणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वंशिका नरुळे ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. - दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालक प्रफुल दशरथ भोयर (वय २७) याला पकडून मारहाण केली. संतप्त जमावाने टिप्पर पेटवून दिला. टिप्पर चालकास घेऊन जाताना पोलिसांच्या वाहनाचा काचा फोडल्यात.. - उमरेड पोलिसांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. पुढील तपास करीत आहेत.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 13, 2026 03:16:18
Dharashiv, Maharashtra:भाजपाला रोखण्यासाठी धाराशिवमध्ये दोन सेनेची रणनीती? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उबाठाकडून शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा – सूत्रे ‘अध्यक्ष शिवसेनेचाच’ – शिवसेनेचा दावा आकड्यांची जुळवाजुळव वेगात सुरू. तानाजी सावंत ठरणार किंगमेकर? चंद्रपूरमध्ये राजकीय समीकरणांनंतर आता धाराशिवमध्येही मोठी घडामोड होण्याची शक्यता. भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी उबाठा आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येतेय. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीआधी राजकीय हालचालींना वेग आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, उबाठा गटाकडून शिवसेनेला अध्यक्षपदासाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी सुरू आहे. भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही सेनेने रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 19 जागा जिंकलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला असताना, शिवसेनेकडून मात्र ‘अध्यक्ष शिवसेनेचाच’ असा ठाम दावा केला जातोय. विजयी उमेदवारांना सहलीवर पाठवत भाजपाने मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये उबाठा चे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिव सेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आकड्यांची जुळवाजुळव, बैठका आणि संपर्क मोहिमा यामुळे धाराशिवचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकंदरीत, धाराशिव जिल्हा परिषदेवर भगवा फडकणार का भाजपाची सत्ता येणार, हे चित्र अवघ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 13, 2026 03:04:23
Yavatmal, Maharashtra:मध्यप्रदेश व गोवा येथील स्वस्त दारू बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात विक्री केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार यवतमाळच्या उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आल्यानंतर आता यातील आंतरराज्यीय दारू तस्करांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मध्य प्रदेश व गोवा येथील स्वस्तात मिळणाऱ्या दारूच्या शिष्यावर महाराष्ट्रातील दारूच्या किमतीचे लेबल चिपकवून ती दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात आणखी वाढीव किमतीने विकणारे हे तस्करीचे नेटवर्क उघड झाले आहे. वाहनांमध्ये समोर अंड्याचे कारेट व त्यामागे दारूचे बॉक्स ठेवून ही तस्करी केल्या जात होती. कारवाईत तब्बल 38 लाखांचे मद्य व वाहने असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सर्व आरोपी पसार झाले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 03:01:38
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 02:50:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मल्टिलेव्हल पार्किंग, ईव्ही चार्जिंग स्टेशन, महिलांसाठी स्वच्छतागृहे आदी कामांसाठी संभाजी नगर महापालिकेने जिल्हा नियोजन समितीला साकडे घातले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ वर्षासाठी १,५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा ७६५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. या वेळी मनपाच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील शासकीय इमारतींवर रूफ टॉप सोलार यंत्रणा बसवण्याच्या प्रस्तावाचाही आराखड्यात समावेश आहे. २०२६-२७ साठी सर्वसाधारण योजनेसाठी वित्तीय मर्यादा ५२६ कोटी ८३ लाख रुपये होती. मात्र, यंत्रणांनी २०३१ कोटी ९७ लाख रुपयांची मागणी केली. त्यावर १,५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 02:48:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटींवर स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिकेत राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले. ३ आठवड्यांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने  दिले आहेत. पुढील प्रतिज्ञापत्रे नेमक्या मुद्द्यांवर आधारित असावीत, अन्यथा न्यायालयाचा अवमान मानून कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने बजावले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बालगृहातून ९ अल्पवयीन मुली पळून जाऊन जिल्हा न्यायालयात तक्रार करण्यासाठी आल्याची घटना घडली होती. यासंदर्भात माध्यम वृत्तांची दखल घेत न्यायालयाने ही याचिका स्वतःहून दाखल केली आहे..
0
comment0
Report
Advertisement
Back to top