Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी में अपक्ष सहित कोणार्क विकास आघाड़ी ने 5 सदस्य बनाकर गट पंजीकरण, विलास पाटील गटनेता नियुक्त

UJUmesh Jadhav
Feb 13, 2026 03:46:35
Thane, Maharashtra
भिवंडीतील अपक्षांसह कोणार्क विकास आघाडीच्या ५ सदस्यांची कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी... माजी महापौर विलास पाटील गटनेता पदी नियुक्त. भिवंडी पालिकेच्या महापौर पदाची निवडणूक तीन आठवड्यानंतर ही प्रलंबित आहे. त्यातच कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांना अटकपूर्व जमीन मंजूर झाल्या नंतर कोणार्क विकास आघाडीच्या गटाची नोंदणी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणार्क विकास आघाडीचे चार सदस्य असताना पालिकेतील एकमात्र अपक्ष विक्रीय उमेदवार नितेश ऐनकर यांना विलास पाटील यांनी आपल्या गटात समाविष्ट करून घेतले आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील, मयुरेश पाटील व नेहा काठवले हे सदस्य कोणार्क विकास आघाडीचे विजयी आहेत. सुरवातीपासून अपक्ष सदस्य नितेश ऐनकर हे भाजपा सोबत राहतील अशी शक्यता सर्वां कडून वर्तवली जात होती. पण शहरात विलास पाटील दाखल होताच त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीची गणित जुळवण्यास सुरुवात केली आहे. यात एकमात्र अपक्ष नगरसेवक नितेश ऐनकर यांना आपल्या गटात घेण्यात यशस्वी झाले असून यापुढे महापौर पदासाठी विलास पाटील यांच्या गटनेत मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचा सुतोवाला केला आहे. तर विलास पाटील यांची गटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 13, 2026 05:30:39
Shirur, Maharashtra:पुण्याच्या मांजरी खुर्द येथे मांजरी वाघोली रस्त्याच्यालगत हॉटेल सूर्याच्या समोर शेतकरी पोपट गणपत उंडरे यांच्या दारातील कुत्र्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवत भक्ष्य करून घेऊन गेला. येथे असणारी बाकीची कुत्री भुंकत होती ती का भुंकतात म्हणून आशिष उंडरे यांनी बाहेर पाहिले तर त्यांना काही दिसले नाही परंतु त्यांनी सीसीटीव्ही मध्ये पाहिल्यानंतर बिबट्याने आपल्या दारातील कुत्र्याला नेल्याचे समजले. बिबट्याची मांजरी परिसरातील दहशत कायम असून गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी मेंढपाळाच्या मेंढ्यांवरतीही बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याने कुत्र्यावर केलेला हल्ला पोपट उंडरे यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याचे चित्रीकरण कैद झाले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 13, 2026 05:00:57
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 13, 2026 04:48:29
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 13, 2026 04:32:02
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाला तडा गेल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला 20 विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले होते. मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान रिसोड तालुक्यातील मांडवा येथील ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रात 21, तर रिसोड शहरातील बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रात 6 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. रिसोड तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रांवर एकूण 27 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असतानाही कॉपीच्या घटना घडत असल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने यापुढे अधिक कठोर उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 13, 2026 04:19:09
Pune, Maharashtra:मावळ तालुक्यातील राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मावळ तालुक्यातील ५ जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत. या विजयानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते जिल्हा परिषद अध्यक्षपदाकडे...काही दिवसांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील जनतेला आश्वासन दिलं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगले यश मिळवून द्या, मावळला जिल्हा परिषदेचे चांगले पद देतो. या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण यावेळी सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक येथून विजयी झालेले संतोष राऊत यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे. कुसगाव बुद्रुक येथील जागा जिंकून संतोष राऊत यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ जागांच्या विजयामुळे पक्षाची जिल्हा परिषदेमध्ये भक्कम स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, जर पक्षाने मावळला शब्द पाळला, तर संतोष राऊत यांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे येऊ शकतं. आरक्षण सर्वसाधारण पुरुष असल्यामुळे संतोष राऊत यांचं नाव चर्चेत आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत होईल. तर मावळ तालुक्याला खरंच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळणार का? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 13, 2026 04:04:20
Thane, Maharashtra:भिवंडी मधील काल्हेर खाडीपात्रावरील अवैध रेती साठ्यांवर धडक कारवाई... पोखलेन, डंपर सह ९७ लाखांचा मूद्देमाल जप्त.. महसूल विभागाने दिला रेती माफियांना मोठा दणका... उल्हास नदीच्या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा केला जा असल्याच्या तक्रारी नंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकुष्ण पांचाळ यांनी रेती माफियांच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी हरीचंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रूपाली भालके उपविभागीय अधिकारी अमित सानप या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, रेतीगट तहसीलदार अमोल कदम भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथक क्रमांक एक संजय जाधव, सहाय्यक महसूल अधिकारी दिनेश बोराडे, अनिल राजापूरे, दक्षता पथक क्रमांक दोन अरूण शेलार, सहायक महसूल अधिकारी दर्शन नटे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तसेच मंडळ अधिकारी सुधाकर कामडी, ग्राम महसूल अधिकारी निलेश काबेंरे सुर्यकांत पाटील, यांच्या समवेत गूरूवारी भिवंडी तालुक्यातील मौजे काल्हेर येथील रेती बंदर येथे धडक कारवाई करण्यात आली. या समयमा १९ रेती साठे आढलून आले आसून १५२३ ब्रास रेती. रेती उपसा करणाऱ्यांसाठी वापरण्यात येणारे एक वाहन हायवा व पोखलेन जप्त करण्यात आली. तर सहा रेतीने भरलेल्या कुंड्या आढलून आल्य त्या पोखलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. सदर या कारवाईत पथकाने ९७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमूळे माफीयांचे धाबे दणाणले आहेत. काल्हेर बंदर येथिल बेकायदा उत्खनन करून रेती साठवणूक करण्यासाठी तयार करण्यात तयार आलेल्या सहा कुंड्या पोखलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. महसूल विभागाची ही चौथी धडक आहे. या प्रकरणी रेती माफिया विरोधात नारपोली पोलिसठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला है.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 13, 2026 04:04:02
Satara, Maharashtra:सातारा -गेल्या वर्षभरापासून शेतकरी आणि दुचाकीचा पाठलाग करून माणसांना जखमी करणारे बिबटे उंडाळे विभागात धुमाकूळ घालत आहेत. माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे नातू आदिराज पाटील यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला केला होता.हा हल्ला करणाऱ्या तीन बिबट्यापैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वनविभागाचा चांगलाच समाचार घेतल्यानंतर वनविभागाने पिंजरे वाढवले आणि बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम गतिमान केली आहे. वनविभागाच्या कामावर स्थानिक नाराज असून आतापर्यंत 4 ते 5 जण बिबट्याच्या हल्यात जखमी झाले आहेत.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 13, 2026 04:01:57
Satara, Maharashtra:सातारा– सातारा लोणंद रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे. रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या नाल्याचे काम हलक्या दर्जाचे होत असल्याची तसेच काँक्रीट टाकल्यानंतर योग्य पद्धतीने पाणी न मारता काम पूर्ण केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करत काम बंद पाडले. संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत तीव्र नाराजी व्यक्त केली.या मार्गावर पूर्वी अपघात झाले असल्याने निकृष्ट कामामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत कामाची तातडीने तपासणी करून दर्जेदार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 03:46:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC: हैदराबाद गॅझेटरनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. आतापर्यंत 731 जनांनी अर्ज केले होते. त्यातील 24 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. उर्वरित अर्जाची सध्या तपासणी सुरू आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर जीआर काढला होता. त्या हैदादगॅजेटियरनुसार सहा महिन्यात 310 प्रमाणपत्रे मिळाली आहेत. GFX कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्रे मिळाली? जालना जिल्ह्यात 35 परभणी जिल्ह्यात 160 हिंगोली जिल्ह्यात 3 नांदेड जिल्ह्यात 8 बीड जिल्ह्यात 91 लातूर जिल्ह्यात 9 धाराशिव जिल्ह्यात 4 मात्र तत्पूर्वी मराठवाड्यात ज्या कुणबी मराठा कुणबी कुणीबी मराठा अशा नोंदी मिळाल्या होता. त्या आधारावर वर्षभरात 35 हजार 885 प्रमाणपत्र आत्तापर्यंत मिळालेली आहेत. त्यासाठी 36 हजार 237 मराठा समाजातील बांधवांनी अर्ज केला होता. केवळ 49 अर्ज नाकारले होते. त्यामुळे मराठवाड्यात आत्तापर्यंत जवळपास 36 हजार कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 13, 2026 03:32:04
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 13, 2026 03:31:53
Bhandara, Maharashtra:“श्रमसंहितेविरोधात भंडाऱ्यात कम्युनिस्ट पक्षाचा एल्गार; कामगार-शेतकरी प्रश्नांवर तीव्र मोर्चा”. भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली कामगार व शेतकरी प्रश्नांवर तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितेमुळे शंभर वर्षांच्या लढ्यातून मिळालेले कामगार कायदे हिरावले गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. किमान वेतनापेक्षा कमी मजुरी, महिनोन्‌महिने थकीत पगार आणि असुरक्षित रोजगारामुळे श्रमिकांचे जीवन असह्य झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकार उद्योगपतींच्या बाजूने झुकत असून कामगार-शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. समस्यांकडे तातडीने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top