Back
नाशिक: चांदवड़ के सरकारी खरीदी केंद्र पर मक्का ट्रैक्टर से आयी, गोदाम में जप्त
SKSudarshan Khillare
Mar 16, 2026 03:16:26
Yeola, Maharashtra
एकीकडे गोण्याअभावी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शासकीय हमीभावाने मका खरेदी केली जात नसतांना दुसरीकडे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हिवरखेड येथील शासकीय हमीभाव केंद्रावर चक्क निफाड तालुक्यातील मक्का खरेदी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विक्रीसाठी आलेल्या मकाच्या ट्रॅक्टरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय गोण्यांही आढळून आल्याने शेतकरी आता मक्का बरोबरच शासकीय गाण्यांचे उत्पादन करायला लागला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हिवरखेडयेथील शासकीय हमीभाव मक्का खरेदी केंद्रावर निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील ट्रॅक्टरमधून आलेला मक्का खाली होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली असता. प्रहार शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व तहसीलदार व महसूल यंत्रणेला माहिती दिली. दरम्यान शासकीय यंत्रणेने हिवरखेडे येथील शासकीय खरेदी केंद्रावर छापा मारला असता याठिकाणी खरेदी केंद्रावरील अधिकारी तसेच खरेदीदार गैरहजर असल्याचे निदर्शनात आले विशेष म्हणजे मका विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टरमध्ये मकाच्या खाली चक्क शासनाच्या हमी भाव खरेदीसाठी असलेल्या गोण्या आढळून आल्या. एकूण सहा ट्रॅक्टर मका विक्रीसाठी आले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विक्रीसाठी आलेल्या सहापैकी पाच ट्रॅक्टर मक्यासह ताब्यात घेतले असून ,शासकीय धान्य गोडाऊन जप्त केले आहे.याबाबत अधिक तपास केला जात आहे.विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून हा मका विक्रीसाठी आणला होता त्या ट्रॅक्टर चालकांना कुठलीही माहिती नसल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:31:010
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 04:22:0350
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:21:4163
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:17:32155
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:15:46128
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:05:44167
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 04:05:22220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 04:05:11110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:03:13123
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:01:05Bhandara, Maharashtra:डिव्हाइडरवर दुचाकीची धडक युवकाचा जागीच मृत्यू....मडेघाट फाटा येथील घटना
मोहन जयप्रकाश शहारे (२५) रा चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.
146
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 16, 2026 03:50:03160
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 03:33:59147
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 03:33:03107
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 03:32:43106
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 03:31:29167
Report