Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

मालेगाव में अज्ञात कारण से पत्थर से हत्या, आरोपी गिरफ्तार

VNVishal Nagesh More
Dec 23, 2025 01:00:29
Malegaon, Maharashtra
विशाल मोरे, मालेगाव मालेगाव शहरात एकाचा दगडाने ठेचून निर्घुण खून... संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात.. मालेगाव शहरातील पवारवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत म्हाळडे शिवारातील गिरणा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेख जावेद शेख सलीम याचा अज्ञात कारणावरून दगडाने ठेचून निर्घुणपने खून करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपी तरुणास अटक केली असून त्याला न्यायालयात देखील हजर करण्यात आले असून पोलिस आता त्याची कसून चौकशी करीतआहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 02:32:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रांजणगाव वाळूज महानगरातील 'मिनी धारावी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव परिसरात वाढत्या अवैध धंद्यांविरुद्ध ग्रामस्थांन रणशिंग फुंकले. विनापरवाना सुरू असलेली उघड्यावरील मांस विक्री आणि गल्लोगल्ली चालणारी अवैध दारू विक्री यामुळे येथील कायदा-सुव्यवस्था व सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. याच्या निषेधासाठी पुकारलेल्या 'रांजणगाव बंद'ला सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविल्याने १०० टक्के बंद यशस्वी झाला. जर आठ दिवसात पोलीस प्रशासनात कारवाई केली नाही तर गाव बेमुदत संपूर्ण बंद राहील असा इशारा यावेळेस आंदोलकांनी दिला...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 02:31:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यातील २,०९० न्यायालयांची सुरक्षा मजबूत; ४४३ कोटींचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यात उच्च न्यायालय, खंडपीठांमध्ये ३८१ सुरक्षा कर्मचारी महाराष्ट्र शासनाने राज्यातील २०९० न्यायालयांत ८ हजार २८२ सुरक्षा कर्मचारी आणि ४४३ कोटी २४ लाख ८४ हजारांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आणि कोल्हापूरचे 'सर्किट बेंच' तसेच तेथे कार्यरत न्यायमूर्ती यांच्या निवासस्थाने यांना एकूण ३८१ सुरक्षा कर्मचारी पुरविले जाणार आहेत. यासाठी १५ कोटींच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. इतर न्यायालयांसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणार आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:18:09
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरत प्रशासनाने सर्वपक्षीय बैठक घेतली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि नियमात संपन्न व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यादरम्यान निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. तसेच राजकीय पक्षांच्या शंकानचे निरसन ही करण्यात आल. आयुक्तांनी यां सर्वपक्षीय बैठक आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे आदर्श आचारसंहिता पाळावी आवाहन केले. इच्छुक उमेदवारांसाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी योजना जाहीर करण्यात आली असून, त्या ठिकाणी उमेदवारांना सर्व प्रकारच्या परवानगी घेता येणार आहेत. त्याचबरोबर दररोजचाही हिशोब देखील सादर करावा लागणार आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 23, 2025 02:15:13
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, सुमारे 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेय... ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सॅन्ताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते..25 डिसेंम्बरसाठी अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे 30 चर्चमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जाने Januarपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनी सध्या येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या गाण्यांनी दुमदुमून गेली.गेल्या आठवडाभरापासून या सर्व चर्चेसमधून कॅरोल पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होऊन शेकडो अबालवद्ध घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्माची गीते सादर करतांना दिसत आहे..
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:02:26
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेमध्ये महायुती करण्यासाठी प्राथमिक बैठक संपन्न झालेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित, भाजपा आमदार अनुप अग्रवाल आणि आमदार राम भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. यावेळेस दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे महायुतीच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे युती झाली तर भाजप आणि शिवसेनेची होईल अशी सध्याची स्थिती आहे. युती संदर्भात चार सदस्य समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. यामध्ये दोन जण भाजपके तर दोन जण शिवसेनेचे असणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. युतीमध्ये निवडणूक लढावे असा प्रयत्न असून, त्यासाठी बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रावल यांनी यावेळी स्पष्ट केल.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 22, 2025 16:47:18
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 22, 2025 15:02:47
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बालापुर शहरात आज भरवस्तीत एक थरारक घटना घडली. चालती ओमनी गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीतून धूर आणि ज्वाळा दिसताच नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आगीत ओमनी गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रमुख माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 14:50:34
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटल लोकार्पणाच्या मुद्यावर आ. जोरगेवार यांनी दिलेल्या पत्रावरून जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार नवा संघर्ष पेटलाय. चंद्रपूर येथे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमाला चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्षेप घेतला होता. रुग्णालयात अत्यावश्यक सोयींची कमतरता लक्षात घेता हे उद्घाटन कितपत संयुक्तिक होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात जोरगेवार यांनी पाणीपुरवठा, मनुष्यबळ आणि इतर सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्याशिवाय रुग्णालय सुरू करणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळणे होईल असं म्हणत जोरगेवारांनी हे رुग्णालय सुरू करणे योग्य होणार नाही अशी पत्रात मागणी केली होती. जोरगेवार यांच्या या पत्रामागे जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार संघर्ष कारणीभूत असल्याची चर्चा आहे. 9 डिसेंबरला लिहिलेले हे पत्र मीडियाच्या हाती पडल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्न उपस्थित करत मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला अशाप्रकारे विरोध करणे योग्य नसल्याचं वक्तव्य केलं. जोरगेवार यानी आपल्या खुलाशात मी देखील स्वयंसेवक असून मुनगंटीवार यांनी राजकीय वैमान्यातून आरोप केल्याचा आरोप केलाय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 22, 2025 14:09:50
Kolhapur, Maharashtra:बेळगाव मध्ये आज देखील कानडी संघटनांचा नंगानाच पाहायला मिळाला. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी तक्रार केल्यानंतर बेळगाव मध्ये कानडी संघटना आक्रमक होऊन माने यांच्या विरोधात आंदोलन केले. बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकात खासदार धैर्यशील माने यांचा तिरडी मोर्चा काढला. त्यानंतर चन्नम्मा चौकात कानडी संघटना आल्यानंतर त्यांनी खासदार धैर्यशील माने विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्यानंतर माने यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला आणि त्यांच्या फोटोला काळे फासून चपलाने मारहाण केली. एकीकडं बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी एक नोव्हेंबर रोजी खासदार धैर्यशील माने यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना बेळगाव बंदी घालून लोकशाही पायदळी तुडवली होती. याचीच तक्रार खासदार माने यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केल्यानंतर कानडी संघटनांचे आज बेळगाव मध्ये पोटसुळ दिसून आलं. दरम्यान या घटनेचा बेळगाव मधील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समितीने निषेध नोंदवला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 14:08:29
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- पक्षांचे दरवाजे सताड उघडे असले पाहिजेत या मुख्यमंत्र्याच्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची शेलकी टीका, भाजपची दारे सताड उघडी असून ईडी- सीबीआय चे आरोप असलेल्या सर्वांना इथे प्रवेश मिळेल अशी पाटी लावा असा लगावला टोला, पक्ष मजबुतीसाठी भाजप हेच करत असल्याचे मत अँकर:--पक्षाचे दरवाजे सताड उघडे असले पाहिजेत या मुख्यमंत्र्याच्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेलकी टीका केली आहे. भाजपची दारे सताड उघडी असून ईडी- सीबीआय चे आरोप असलेल्या सर्वांना इथे प्रवेश मिळेल अशी पाटी लावा असा टोला त्यांनी लगावला. पक्ष मजबुतीसाठी भाजप हेच करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बाईट १) विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्पूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 14:04:05
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- सुधीर भाऊंच्या मदतीला धावले वडेट्टीवार, सुधीरभाऊंना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्हे तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली शाब्दिक शक्ती, पक्षातील अनुभवी लोकांना योग्य महत्त्व दिले पाहिजे या भूमिकेशी सहमत असल्याचे व्यक्त केले मत, मलाही काँग्रेस पक्षाने फारसे महत्त्व दिले नाही अशी व्यक्त केली खंत अँकर:-- चंद्रपूरात सुधीरभाऊंच्या मदतीला चक्क वडेट्टीवार धावले. पराजयाच्या गदारोळात सुधीरभाऊंना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्हे तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शाब्दिक शक्ती दिली. पक्षातील अनुभवी लोकांना योग्य महत्त्व दिले पाहिजे या भूमिकेशी सहमत असल्याचे  मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. मात्र हे विधान करताना मलाही काँग्रेस पक्षाने फारसे महत्त्व दिले नाही अशी खंत व्यक्त करत आपलेही दुखणे मांडले. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले यावर प्रतिक्रिया देताना दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मला पक्षाने शक्ती अर्थात मंत्रिपद न दिल्याने ही परिस्थिती ओढविल्याचे विधान केले होते. आता सुधीरभाऊंच्या मदतीला वडेट्टीवार धावून आल्याने दोन्ही पक्षातील नेते कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. बाईट १) विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
Advertisement
Back to top