Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

धुळे महायुती: भाजपा-शिवसेना की पहली बैठक सफल, अजित पवार मौजूद नहीं

PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:02:26
Dhule, Maharashtra
धुळे महानगरपालिकेमध्ये महायुती करण्यासाठी प्राथमिक बैठक संपन्न झालेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित, भाजपा आमदार अनुप अग्रवाल आणि आमदार राम भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. यावेळेस दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे महायुतीच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे युती झाली तर भाजप आणि शिवसेनेची होईल अशी सध्याची स्थिती आहे. युती संदर्भात चार सदस्य समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. यामध्ये दोन जण भाजपके तर दोन जण शिवसेनेचे असणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. युतीमध्ये निवडणूक लढावे असा प्रयत्न असून, त्यासाठी बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रावल यांनी यावेळी स्पष्ट केल.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 23, 2025 03:52:01
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकल्याप्रकरणी डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू (36) याला सोलापुरातून अटक झाले आहे. किडनी विक्री प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडे याने फेसबुकच्या माध्यमातून किडनी विकण्यासाठी माहिती मिळवल्याची आणि त्यानंतर चेन्नई येथील डॉक्टर कृष्णा याने त्याला कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर कृष्णा याचा शोध घेतला असता डॉक्टर कृष्णा हे त्याचं बनावट नाव असल्याची आणि रामकृष्ण सुंचू हे त्याचं मूळ नाव असल्याची माहिती आली पुढे आलो होती. गरजू लोकांना हेरून तो किडनी विकण्यासाठी त्यांना कंबोडियाला नेत होता. रामकृष्ण सुंचू याच्या अटकेने आता या प्रकरणातील अवयव तस्करीच्या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 03:48:58
Kolhapur, Maharashtra:ग्रोबझ शेअर ट्रेडिंग कंपनीवर गुन्हा दाखल होताच आरोपींच्या बँक खात्यावरील कोट्यावधी रुपये आणि एक किलो सोने कोल्हापूर पोलिसांनी जप्त केले नाही ? फॉरेन्सिक ऑडिट करायला का विलंब झाला ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने कोल्हापूर पोलिसांना फटकारले आहे. इतकच नव्हे तर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डीगे यांनी तात्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही तपासा संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.. तात्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यानंतर दुसरे तात्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही या गुन्ह्याप्रकरणी सर्किट बेंच मध्ये ऑनलाइन उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागली. त्यामुळे ग्रोबझ शेअर ट्रेडिंग कंपनीच्या तपासाबद्दल कोर्टाने कोल्हापूर पोलिसांना चांगले धारेवर धरले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 23, 2025 03:48:50
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 23, 2025 03:48:37
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील जी सेवन शुगर्स आणि अमडापूर येथील नृसिंहलक्ष्मी हे दोन साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देत नसल्याचा आरोप करीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून साखर कारखान्या विरोधात आंदोलन सुरू केलय. उसाला पहिली उचल किमान 3 हजार रुपयांची द्यावी आणि चार हजार रुपये प्रति मेट्रिक टन असा अंतिम भाव द्यावा या मागणीसाठी गंगाखेड येथील जी 7 साखर कारखाण्यावर शेतकऱ्यांनी संत जनाबाईच्या मंदिरातून साखर कारखान्यापर्यंत भजन दिंडी काढली होती. दिंडी जी सेवन साखर पोहोचून तीन तास उलटल्यानंतर ही साखर कारखाना प्रशासनाकडून कुणीच शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येत नसल्याने यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते,कारखान्याचत शिरण्याच्या विचारात असल्याने शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेऊन शेतकर्यांची सुटका केली,
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 03:39:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुती नंतर आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून दावा प्रती दावा केला जात असला आहे.. शिवसेना ठाकरे गटानंतर आत्ता शरद पवार राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्येक प्रभागात किमान एक याप्रमाणे 21 जागा मिळाल्याच पाहिजेत अशी आक्रमक मागणी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील करत आहेत. महाविकास आघाडी मध्ये सध्या जागा वाटपाची बोलणी सुरू असून काँग्रेस समोर जागावाटपमध्ये ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला किती जागा द्यायच्या हे डोकेदुखी ठरले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 23, 2025 03:39:05
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शहाजी बापू नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी ठरले - मंत्री जयकुमार गोरे - बापूंनी कितीही सांगितलं तरी त्यांनी आमच्या अगोदर त्यांचे उमेदवार जाहीर केले होते - बापूंनी आम्हाला सोबत घेतलं नाही पण बापू हा नरेटीव्ह लोकांसमोर नेण्यात यशस्वी झाले - लोकांच्या भावनेसोबत जाण्यास बापू सक्सेस झाले आमची लोक सकसेस झाली नाहीत.. पण याची अडचण नाही - पण भाजपाने स्वतःचं अस्तित्व तिथं दाखवून दिलं - जो शेकापचा गड होता त्या ठिकाणी भाजपच्या कमळ चिन्हावर आम्ही मतदान घेतलं - ही सुरुवात आहे... भाजपने सुरुवात खूप शून्यातून केली होती... - देशामध्ये आणि 23 राज्यांमध्ये सत्ता होत असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याची आम्हाला सवय आहे... आम्ही लढू जयकुमार गोरे ( सोलापूर पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री )
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 23, 2025 03:38:44
kolhapur, Maharashtra:नागपूर सुधीर मुनगंटीवार, भाजपा नेता. - दोन्ही सख्खे भाऊ एकत्र यावे यासाठी सदिच्छा आहे शक्य आहे... - मुंबईत दोघांचा जीव आहे जे जे प्रयत्न करता येईल तेथे प्रयत्न त्यांचे दोन भाऊ आणि पक्ष करणार आहे - शेवटी परिस्थिती निरूप प्रत्येक जण निर्णय घेतात. भाजपा महायुती जिथे शक्य तिथे एकत्र लढत आहे. त्या शहराच्या संघटनेच्या शक्तीच्या आधारावर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा या लक्षात घेऊन युती महाविकास आघाडी हे होत असते. - युतीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करायच असते. शेवटच्या क्षणावर प्रयत्न करण्यासाठी ही भाषा करणे आवश्यक असतं. - असं कोणी चोरून नेत नाही, असं वाटणं स्वाभाविक आहे. शिवसेनेने आयुष्यातली मोठी चूक केली ती कधीतरी मान्य केली पाहिजे.. तो भाजप सोबत युती तोडणे हा इतिहासात काळा दिवस होता. - आता तो विषय संपला,आता माझी काही नेत्यांशी भेट होईल - आज काही नेत्यांशी भेटणार आहे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 23, 2025 03:37:13
kolhapur, Maharashtra:नागपूर महायुतीकडून आम्हाला निवडणूक लढवायची आहे. चर्चा सुरू आहे चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल अस अपेक्षित आहे. महायुती म्हणून लढायचं आहे, गुणवत्तेवर जागावाटप होईल, वेगवेगळ्या लढल्याने नुकसान होतं. कधी फायदा होतो. पण आम्ही सामांजस्यातून चर्चा करून यातून सकारात्मक मार्ग काढू. महाराष्ट्रात युतीमध्ये युती झाली.. स्थानिक स्वराज्य संस्था एकमेकांना सोबत घेऊन जायचं आहे. माझ्या मतदारसंघात रामटेक आणि पारशिवनीआम्ही युती न करता जिंकलो. तर कांद्री येथे युती करून जिंकलो. परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात (On ठाकरे गट -मनसे) त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायची गरज नाही, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मनसे आणि ठाकरे एकत्र आला तर जास्त मायनस होईल असं मला वाटतं.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 03:17:28
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी पूर्ण झाली असून, अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत भाविकांनी देवीच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केल्याचे समोर आले आहे. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, दोन महिन्याच्या कालावधीत दहा दानपेट्यांमधून तब्बल २ कोटी ४४ लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून दररोज हजारो भाविक मंदिरात येतात. सण-उत्सव, शुक्रवार तसेच सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या लक्षणीय वाढते. याच कालावधीत भाविकांनी रोख रक्कमेसह नाणी, तसेच काही प्रमाणात मौल्यवान वस्तूही देवीच्या चरणी अर्पण केल्या आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 23, 2025 03:17:16
Nanded, Maharashtra:राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांची भरदीवसा गाडी अडवून मारहाण करत अपहरण केल्याची घटना नांदेडमध्ये घडली. अरपहरणकर्त्यांनी मारहाण करून त्याना रस्त्यावर सोडले. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर त्यांच्या पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करून मारहाण करायला लावली असा आरोप जीवन पाटील यांनी केला. पोलिसांना त्यांनी तशी फिर्याद देखील दिली. आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांसोबत आपला दोन कोटीचा आर्थिक व्यवहार होता. तसंच राजकीय हेतूने हा प्रकार घडला असा जीवन पाटील यांचा आरोप आहे. मागील एक वर्षापासून मला धमक्या येत होत्या, मानसिक आणि राजकीय त्रास दिला जात होता. याबाबत मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला आपण तक्रार दिली असून संरक्षण देण्याची मागणी देखील केली होती असा दावा जीवन घोगरे पाटील म्हणाले. काल सकाळी साडे अकरा वाजता सिडको भागातून जात असताना जिवन पाटील यांची गाडी अडवून स्कॉर्पिओ गाडीतून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. पोलिस मागावर असल्याचे समजल्याने आपहरणकर्त्यांनी त्यांना सोडुण पळ काढला. अपहरण करणाऱ्या सात जणांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आमदार चिखलीकर आणि माजी आमदार हंबर्डे यांनी अपहरण करायला लावल्याचा आरोप झाल्याने नांदेडमध्ये खळबळ उडालीये.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 23, 2025 03:16:26
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - यंदा प्रथमच महापालिका निवडणुकांची मतमोजणी सात ठिकाणी करण्याचे नियोजन नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूक निकाल नंतर त्याच्या ईव्हीएम मशीन रामवाडी शासकीय गोदामात आणून ठेवण्यात येणार आहेत. 16 जानेवारीला होणारी सोलापूर महापालिका निवडणुकीची मतमोजणी यंदाच्या वेळेस गोदामात होणार नसून शहरातील सात ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन रामवाडी गोदामात ठेवण्यात आल्याने तो परिसर सील करण्यात आलाय. यंदाची मतमोजणी एस आर पी कॅम्प सोरेगाव, मेहता शाळा, शासकीय तंत्रनिकेतन, कुचन प्रशाला, नुमवी, सिंहगड महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय इत्यादी ठिकाणी होणार आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांची धावपळ होते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठीच मतमोजणीला सात ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 03:06:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर  जिल्हा परिषदेच्या उपकरातून गरीब मुलींसाठी १ सायकल वाटप व मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी ५ कोटी रुपयांच्या विविध योजनांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद आहे. मात्र, सध्या जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात नसल्याने या योजनांच्या खर्चास मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची मान्यता घ्यावी लागते. ही संचिका चार महिन्यांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत पडून आहे. जि. प. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी ही संचिका निकाली निघणार का, हा मुद्दा सध्या चर्चेत आहे.  जि. प. समाजकल्याण विभागातर्फे जि. प. शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायकल देण्याच्या योजनेत १०९ प्रस्ताव आले आहेत. मागासवर्गीय शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटार संचासाठी १०३ अर्ज प्राप्त आहेत. शेतकऱ्यांना कडबा कटर यंत्रासाठी ३५५ अर्ज आले असून, या तिन्ही योजनांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये निधी आहे. हा निधी मिळण्याकडे लाभार्थीचे लक्ष लागलेले आहे
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 02:50:24
Dhule, Maharashtra:हुकुमशाही विरोधात लोकशाहीचा विजय झाल्याचं चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगत, येतो अभी झांकी है जिल्हा परिषद बाकी आहे, असे सांगत भाजपाला इशाराही दिला आहे. येणारा जिल्हा परिषदेवर कुठलाही अध्यक्ष झाला तरी चालेल, मात्र डॉ. गावित परिवाराचे अध्यक्ष होऊ देणार नाही, असं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निर्धार केला आहे. जिल्ह्यात एकही पालिकेवर भाजपाची सत्ता आली नसल्यामुळे भाजपाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं सल्लाही त्यांनी दिला आहे. नगरपालिकेवर गेल्या ४० वर्षापासून सत्तेत असलेले चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होण्याच्या मान मिळला असून, जिल्ह्यातील चारी नगरपालिकेंवर आमच्या विचाराची सत्ता आली है. भारतीय जनता पार्टीची गटबाजी त्यांना भोवली आहे. आम्ही पक्षापेक्षा मोठे आहोत असे काही लोकांना वाटत होतं, त्यांना चारी नगरपालिकेचे जनतेने त्यांची जागा दाखवली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या निशाणा पुन्हा एकदा डॉ. गावित परिवारास साधला,
0
comment0
Report
Advertisement
Back to top