Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नाशिक के येवला में आंधी-बारिश से कांदा की फसल भुईसपाट, किसानों को बड़ा नुकसान

SKSudarshan Khillare
Mar 30, 2026 04:16:26
Yeola, Maharashtra
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या उन्हाळी कांदा पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी कांद्याची पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहेत. वादळी वाऱ्यामुळे कांद्याची उभी पिके आडवी झाली असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 30, 2026 05:37:05
Beed, Maharashtra:बीड: पोटच्या मुलाकडून वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा बस स्थानक परिसरात पोटच्या मुलानेच वडिलांची निर्घुण हत्या केलीय. अनिल मुळे असे मृत पित्याचे नाव असून आरोपी मुलगा किरण मुळे फरार आहे. किरण मुळे हा कायम दारूच्या नशेत असायचा त्यानेच आपल्या राहत्या झोपडीत झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड घातून हत्या केली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पिसादेवी येथील रहिवासी असलेले हे कुटुंब अनेक वर्षांपासून कडा शहरात मजुरीसाठी स्थायिक झालेले आहेत. आज पहाटेच्या सुमारास किरण दारूच्या नशेत घरी आला. वडील गाढ झोपेत असताना त्यांने अचानक त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे मृताची पत्नी झोपेतून उठली असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी इथे धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोटच्या मुलाने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणाने उचलले? याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. आरोपी मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पहाटे घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आष्टी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
425
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 30, 2026 05:34:06
Pandharpur, Maharashtra:Anchor - महाराष्ट्रातील प्रवीण एक खोड डाळिंब लागवड पॅटर्न चार राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी स्विकारला आहे. सोलापूरच्या मोडनिंब मध्ये यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी यांची कार्यशाळा आणि सन्मान सोहळा पार पडला सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील प्रवीण माने यांनी 24 वर्ष संशोधन करून प्रवीण एक खोड डाळिंब लागवडीचा पॅटर्न तयार केला. यामुळे उध्वस्त झालेल्या 80 टक्के डाळिंब बागा पुनर्जीवित झाल्या. डाळींबावर पडणारे मर , तेल्या , खोड आळी असे विविध रोग आटोक्यात आले. महाराष्ट्र सोबत गुजरात राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातील शेतकऱ्यांनी एक खोड तंत्रज्ञान स्वीकारल. या नव्या डाळिंब लागवड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे.शेवाय निर्यातीचा टक्क देखील वाढला आहे. अशा यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान प्रवीण माने यांनी केला. ----- Byte - प्रवीण माने, संशोधक एक खोड डाळिंब तंत्रज्ञान
437
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 30, 2026 05:31:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:मुख्यमंत्री समज देऊनही राणे ऐकत नाहीत, बहुतेक त्यांना मुख्यमंत्र्यांना ओव्हरटेक करायचं असेल - आमदार इद्रिस नायकवडी महाराष्ट्र मध्ये तीन ते चार जण आहेत ते मुस्लिम समाज बद्दल वक्तव्य करत असतात. हे शाईनीग हिरो आहेत. तर मंत्री नितेश राणे हे प्रक्षोभक वक्तव्य करून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करत आहेत. राणे हे वाचाळवीर असून मूर्खासारखे बोलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कधीही वादग्रस्त वक्तव्य करत नाहीत, मात्र त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कदाचित नितेश राणे करत असावेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केली आहे, ते मिरजेत पत्रकार बैठकीत बोलत होते..
495
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 30, 2026 05:17:12
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर, शहर विकासावर मोठा भर -आमदार नरेंद्र मेहता "मिरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेने संतुलित अर्थसंकल्प सादर केला असून यात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. ​ महापालिकेच्या शाळांत CBSE बोर्ड सुरू करणार; शाळा दत्तक योजना आणि विद्यार्थ्यांसाठी बस सेवा. शहरात महापालिकेच्या तर्फे पहिली MRI मशीन उपलब्ध होणार; आरोग्य केंद्रांत औषधांचा पुरेसा पुरवठा. २ एकर जागेवर महापालिकेची नवीन मुख्य इमारत; जेसल पार्क ते घोडबंदर लिंक रोडचे नियोजन. शहरात १०० नवीन शौचालये; फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन आणि वर पार्किंगची सोय. १० एप्रिलपासून रस्ते रुंदीकरणाच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार.
1018
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 30, 2026 04:51:59
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय, विशेष बाब म्हणून 14 कोटी रुपयांची देण्यात आली सूट - सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वपूर्ण निर्णय - एमआयडीसीतील उद्योजकांना क्रिटीकल इन्फ्रा स्कीममधून विशेष बाब म्हणून 14 कोटी रुपयांची सूट देण्यात आली. - भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुऱ्यावाला मोठे यश - शहरातील अक्कलकोट रोड आणि औद्योगिक वसाहत एमआयडीसी मधील रोडसाठी 'क्रीटिकल इन्फ्रा स्कीम'च्या माध्यमातून 65 कोटींचा निधी दिला. - एमआयडीसीसाठी असलेल्या विशेष योजनेतून 65 पैकी 14 कोटींचा खर्च उद्योजकांना द्यावा लागणार होता. - मात्र विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर एमआयडीसीतील व्यापाऱ्यांच्या वाट्याचा खर्च माफ करत 14 कोटी रुपयांची सूट दिली. - त्यामुळे हा निर्णय राज्यातील एकमेव निर्णय असून मुख्यमंत्र्यांनी सोलपूर एमआयडीसीसाठी घेतला आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी राज्यातील एकमेव निर्णय घेतला आहे. - या निधीच्या माध्यमातून एकाचवेळी अक्कलकोट रोड एमआयडीसीत 35 रस्ते आणि औद्योगिक वसाहत एमआयडीसीत 9 रस्ते तयार होणार आहेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापुरातील उद्योजकांना मोठा दिलासा
943
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 30, 2026 04:48:18
Yavatmal, Maharashtra:जिल्ला प्रशासनाने आयोजित केलेल्या यवतमाळ महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद रिकाम्या खुर्च्या घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाच दिवसीय या महोत्सवाकडे नागरिकांनी पाठ फिरविली असून महिला बचत गट व शेतकऱ्यांनी लावलेल्या स्टॉल कडे देखील नागरिक फिरकले नसल्याने त्यांचाही हिरमोड झाला आहे. या भव्य आयोजनासाठी स्थानिक मंडप डेकोरेटर, कुणाही कुणालाही रोजगार उपलब्ध करून न दिल्या गेल्याने देखील नाराजी व्यक्त होत असून यवतमाळ महोत्सव हा कुणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रचंड उन्हात घाई गडबडीत आणि मोठा खर्च करून या महोत्सवाचे आयोजन केल्या गेले, मात्र शेतकरी, उद्यमशील महिला व स्थानिक व्यावसायिक आदींना त्याचा फायदा होता ना दिसत नसल्याने शासकीय निधीचा चुराडा झाल्याचा आरोप होत आहे.
1016
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 30, 2026 04:31:01
1015
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 30, 2026 04:05:02
Amravati, Maharashtra:श्रद्धा कॉलनी–नवसारी परिसरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय; नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न हाणून पाडला, सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद शहरातील श्रद्धा कॉलनी आणि नवसारी परिसरात रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची घटना समोर आली आहे. या टोळीने मध्यरात्रीनंतर दोन ते तीनच्या दरम्यान परिसरातील मोकळ्या मैदानात बसलेल्या जनावरांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्ती वाहनासह परिसरात येऊन जनावरांना पकडून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी काही जागरूक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी आपल्या घरातील लाईट्स लावताच या चोरट्याने तेथून पळ काढल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पस्ट दिसत आहे त्यामुळे जनावरे पळवून नेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
1064
comment0
Report
Advertisement
Back to top