Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

नाशिक के सटाणा तालुक्यात बिजोटे गावात बैलजोड़ की विहibraltar? नहीं. किसान बचाव में असफल नहीं? बैलजोड़ गिरा, नुकसान भारी—जेसीबी से उठाव

VNVishal Nagesh More
Feb 28, 2026 08:30:56
Malegaon, Maharashtra
नाशिक के सटाणा तालुक्यात बिजोटे गावात शेतात मशागत करताना नागरासह बैलजोडी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. सुदैवाने शेतकरी बचावाला. मात्र बैलजोडी ठार झाल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जेसीबीच्या सहाय्याने बैलजोडी वर काढण्यात आली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Feb 28, 2026 10:16:52
Akola, Maharashtra:अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ‘हॉर्टिकल्चर डे’ निमित्त फळे, भाजीपाला, फुलपिके तसेच औषधी व सुगंधी वनस्पती पिकांच्या दोन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.दोन्ही दिवस विद्यापीठाचे प्रक्षेत्र शेतकरी बांधवांसाठी अवलोकनाकरिता खुले राहणार असून विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले जाणार आहे. यासोबतच कृषीविषयक भव्य प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या हॉर्टिकल्चर डे निमित्त तब्बल 370 एकर क्षेत्रावर उद्यानविद्याविषयक 703 पिकांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत. यामध्ये 33 भाजीपाला पिकांचे 38 वाण 20 एकर क्षेत्रावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच 42 फळ पिकांचे वाण 300 एकर क्षेत्रावर लागवड तंत्रज्ञानासह दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय 10 एकर क्षेत्रावर 540 औषधी व सुगंधी वनस्पतींची प्रात्यक्षिके ठेवण्यात आली आहेत.या दोन दिवसीय शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह विशेषतः विदर्भातून अंदाजे एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातीलच नव्ह तर देशभरातील शेतकरी, कृषी विस्तार अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती व विद्यार्थ्यांनी या अद्वितीय संधीचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 10:03:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीराजे सदा फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे फेरीवाल्यांनी शहागंज भागात एका दांपत्याला मारहाण केली त्यातून आता महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे तरी या कारवाईवर एमआयएम आक्षेप घेतला आहे आणि त्यांनी थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार सुरू केला आहे यामुळे मात्र राजकारण चांगलंच पेटला आहे महापालिकेच्या कारवाईला एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्याचा आक्षेप महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्यांची दमदाटी एम आय एम चा फेरीवाल्यांना अभय ? छत्रपती संभाजी नगरात दांपत्याला मारहाण झाल्यानंतर महापालिकेने फेरीवाल्यां विरोधात जोरदार मोहीम उघडली मात्र याच मोहिमे विरोधात आता एमआयएम रस्त्यावर उतरला आहे, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर हे जिथे जिथे महापालिकेचे पथक जात आहे तिथे तिथे जाऊन या पथकाला विरोध करत आहे अधिकाऱ्यांना दमदाटी केली जातेय इतकाच नाही तर त्यांना हुसकावून लावल्या जातेय, कारवाई केली तर खबरदार अशा पद्धतीचा इशारा जणू एमआयएमचे हे नेते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देत आहे यावरून आता संभाजीनगरचे पालकमंत्री मात्र चांगले संतापले आहे हे गुंडगिरी खपवून घेतल्या जाणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल आणि याबाबत महापालिका आयुक्तांनी सांबांधित नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे Byte संजय शिरसाठ,  पालकमंत्री या मुद्द्यावर एम आय एम आक्रमक झाले आहे चूक कोणी केली शिक्षा मात्र महापालिकेचे पथक दुसऱ्यांना देत आहे , अशा अन्यायकारक कारवाई होऊ देणार नाही प्रसंगी प्रशासना विरोधात उभे राहू असं एमआयएम पक्षाचे महापालिकाेल विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे म्हणणं आहे... तर पालकमंत्री संयाग शिरसाठ यांनी आमच्यावर टीका करण्याऐवजी स्वतःचं काय चाललंय हे बघा असा टोला हे त्यांनी संजय शिरसाठ यांना लगावला Byte समीर बिल্ডर,  विरोधी पक्ष नेता महापालिका या मुद्द्यावर चूक कोणी केली शिक्षा मात्र महापालिकेचे पथक दुसऱ्यांना देत आहे , अशा अन्यायकारक कारवाई होऊ देणार नाही प्रसंगी प्रशासना विरोधात उभे राहू असं एमआयएम पक्षाचे महापालिकाेल विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे म्हणणं आहे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 28, 2026 09:50:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:राज्यात एकच महाराष्ट्र केसरी घ्या, अन्यथा राज्यातील हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी गदा परत करू - कुस्तीपटूंचा इशारा.. अँकर - एक महाराष्ट्र, त्यामुळे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, अन्यथा राज्यातल्या महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी आपल्या गदा राज्य सरकारला परत करून मुंबईतल्या आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू करतील, असे इशारा महाराष्ट्रातील कुस्ती वीरांकडून देण्यात आला आहे. हिंदकेसरी दीनानाथ सिंह डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून कुस्तीपटूंनी, राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. कुस्ती संघटनांच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत, आणि आता संघटनांच्या वाद उफाळून आल्याने चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने एकच महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाइट - दिनानाथ चौहान - हिंदकेसरी बाइट - चंद्रहार पाटील - डबल महाराष्ट्र केसरी
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 09:17:54
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 28, 2026 09:17:36
Jalna, Maharashtra:जालना : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून आंदोलनाची तयारी सुरु आंदोलनस्थळी मराठा बांधवांकडून साफसफाई अंतरवाली सराटीत आंदोलनासाठी पुन्हा मंडप उभा राहणार जरांगे पाटील जून महिन्यात पुन्हा उपोषण करणार? अँकर- अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांकडून आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आलीेये.. हैदराबाद गॅजेटिअरच्या जीआर नंतर जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवलं होतं. मात्र जीआर निघूनही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. त्यामुळं जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन सुरु करणार आहेत. यासाठी अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपोषणस्थळी मंडप उभारला जाणार आहे.जरांगे यांच्या जून महिन्यात होणाऱ्या आंदोलनाच्या निमित्तानं होणाऱ्या मराठा आंदोलकांच्या बैठकी देखील यांच ठिकाणी घेता याव्यात यासाठी अंतरवाली सराटीये येथील मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 09:03:47
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 28, 2026 09:02:08
Shirdi, Maharashtra:मंगळवार 3 मार्च रोजी खग्रास चंद्रगहण असल्याने ग्रहणकाळात साईदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आलाय.... खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिट सुरू होवून 6 वाजून 48 मिनिटाने संपणार आहे..या काळात भाविकांसाठी साईदर्शन बंद ठेवण्यात येणार असुन साई समाधी दुर्वा , तुळशीपत्र , हरळ यांचे आच्छादन ठेवून मंत्रोच्चार सुरू राहणार आहे.ग्रहण कालावधी संपल्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान पार पडेल आणि धुपारती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येताना त्याप्रकारे नियोजन करावे असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 28, 2026 09:01:54
Washim, Maharashtra:अँकर:गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावातील 70 वर्षीय शांताबाई मानकर या कोमात असताना बँकेत पैसे काढण्यासाठी नेल्याची धक्कादायक घटना घडली. औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांच्या मुलगी-जावयाने अंगठ्याचा ठसा घेऊन महाराष्ट्र बँकेच्या शाखेत पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र खातेदार प्रत्यक्ष हजर नसल्यास पैसे देणार नाही,अशी भूमिका बँकेने घेतली. त्यामुळे कोमात असलेल्या शांताबाईंना बँकेत न्यवे लागले. आज सकाळी त्यांचे निधन झाले असून गावकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.ते वाशिम येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात आळे होते. बाईट: प्रतापराव जाधव,केंद्रीय राज्य आयुष मंत्री
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 28, 2026 08:50:29
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग - मालेगाव महापालिका नमाज पठण प्रकरण - आता नमाज पठण केल्याचा गुन्हा दाखल नंतर आता हनुमान चालिसा पठण करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल - मालेगावात नमाज पठण प्रकरणात नमाज पठण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल नंतर नमाज पठण केल्याचा निषेधार्थ मालेगाव महापालिका आयुक्त कार्यालयात हनुमान चालिसा पठण करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर मालेगाव किल्ला पोलिसात गुन्हा दाखल - श्याम देवरे, मयुर जैन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल - मुंबई पोलिस अधिनियम कलम 135, 37(1), 37(3), BNS 189(2),190, 224 नुसार गुन्हा दाखल - मालेगाव महापालिका विद्युत विभागात काहींनी नमाज अदा केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी हनुमान चालिसा पठण करण्यात आल्याने गुन्हा दाखल
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 28, 2026 08:32:03
Shirur, Maharashtra:अष्टविनायक महामार्गावरील शिरूर तालुक्यातील मलठण येथील चौकात रस्त्याच्या कामातील अनियमितता व विविध समस्यांवरून स्थानिक ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मलठण, सोनेसांगवी, कवठे, वाघाळे तसेच परिसरातील गावांतील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. महामार्गाच्या कडेला साइड पट्ट्या नसणे, आवश्यक सूचना फलक (बोर्ड) नसणे, तसेच अपूर्ण कामामुळे वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या समस्यांकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 28, 2026 08:16:51
Nala Sopara, Maharashtra:नालासोपाऱ्यात आचोळे परिसरातील मेडिकल मध्ये आग अग्निशमन जवानांकडून आगीवर नियंत्रण नालासोपारा पूर्व येथील आचोळे परिसरातील चौधरी मेडिकल स्टोअरमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. अवघ्या काही क्षणात दुकानातील साहित्याने पेट घेतला , घटनेची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकाच्या अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. लागलेल्या आगीत दुकानासमोर पार्क असलेल्या एका कारचे जळून नुकसान झाले आहे ... आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीत औषधांचा मोठा साठा जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 28, 2026 07:20:19
Shirur, Maharashtra:चिमुकल्यांना बाजारी ज्ञानाच्या अर्थकारणाचे धडे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन शेतीचे व्यावसायीक अर्थकारण चिमुकल्यांना आत्मसाद व्हावं यासाठी Shirur तालुक्यातील Chaandoh येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळकरी मुलांचा विकेंड भाजी विक्री बाजार भरलाय. गावातील नागरिकांनीही चिमुकल्यांकडुन भाजीपाल्याची खरेदी केलीय मात्र मागच्या काही दिवसांपासुन शेतमालाच्या उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि मिळणारे उत्पन्न यातील तफावत दिसुन येतेय त्यामुळे शेतक-याच्या कष्टाची मातीच होते त्यामुळे शिमुकल्य वयात शाळकरी मुलांना शेतमाल विक्रीचे ज्ञानाचे धडे प्रत्यक्षात बाजार शिक्षक देत आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 28, 2026 07:18:55
Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यातील देरडे कोऱ्हाळे येथे बनावट खतांच्या साठ्यावर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी पोलिसांच्या मदतीने गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी विविध कंपन्यांच्या नावाने साठवून ठेवलेल्या सुमारे ३०० खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यात बनावट खतांचा सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे..
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top