Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

मालेगांव में 7 वर्षीय बालिका के साथ फिर लैंगिक अत्याचार, आरोपी गिरफ्तार

VNVishal Nagesh More
Feb 23, 2026 01:01:40
Malegaon, Maharashtra
मालेगांव हादरले! मालेगावी पुन्हा 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. संशयित नराधमाला पोलिसांकडून अटक... दोन दिवसांपूर्वी देखील संशयिताने एका लहान बालका सोबत गैरकृत्य केल्याची चर्चा. मालेगाव शहर पुन्हा एकदा हादरले असून वर्ष 20 राहणार मालेगाव या संशयित नराधम तरुणाने एका 7 वर्षीय बालिकेवर छत्रपती शिवाजी महाराज टाऊन हॉल जुन्या महानगर पालिकेसमोर ती बालिका लहान मुलींसोबत खेळत असताना त्याने तिचे वर लैंगिक अत्याचार केले. या घटनेची माहिती समजताच तेथील स्थानिकांनी वेळीच पकडून किल्ला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील सदर या संशयित नराधम आरोपीने एका लहान बालकावर देखील असेच गैरकृत्य केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान टाऊन हॉल परिसर, तुडक्या भिंती इमारती, संरक्षक गेट नीट नसणे यामुळे हा परिसर नेहमीच नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथे वेळीच महानगर पालिका आणि पोलिस प्रशासनाने मिळून यावर अंकुश आणला पाहिजे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:48:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यात नव्यावर्षात ही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच... जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वाधिक बीड जिल्ह्यात. मराठवाड्यात 2025 या मागील वर्षात तब्बल 1129 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले होते. शेतकरी आत्महत्याचे हे सत्र नव्या वर्षातही सुरूच आहे. जानेवारी 2026 या एका महिन्यात मराठवाड्यात तब्बल 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.यात सर्वाधिक 24 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 20 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी-yामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. शिवाय पिकविलेल्या शेतीमालाला हमीभाव प्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. या गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी आता सरकारने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. ग्राफिक्स जानेवारी महिन्यात मराठवाड्यात कुठल्या जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या पाहुयात. - छत्रपती संभाजीनगर - 20 - जालना - 06 - परभणी - 02 - हिंगोली - 05 - नांदेड - 11 - बीड - 24 - लातूर - 03 - धाराशिव - 05 - एकूण - 76
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 23, 2026 02:46:12
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत शिवजयंती साजरी करत असताना दोन गटात वाद, वादात बार्शी ग्रामीण रुग्णालयाची केली तोडफोड - बार्शीत शिवजयंती साजरी करत असताना फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटात वाद - दोन गटात झालेल्या वादावरून जोरदार हाणामारी तर दुसऱ्या गटाकडून बार्शी ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड - एका गटातील तरुणांकडून दुसऱ्या गटातील महिला आणि युवकांना जबर मारहाण - जखमींवर बार्शीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू - नऊ जणांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर चार आरोपींना अटक - दोन गटात हाणामारी झाल्याने रात्री उशिरापर्यंत एका गटाचे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन - बार्शीत दोन गटात झालेल्या जबर मारहाणीमुळे शहरात तणावांचे वातावरण
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:45:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रवासी महसूल उत्पन्न करणाऱ्या स्थानकांच्या यादीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाने २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवत १०४ कोटींवर उत्पन्न मिळवत झोनमध्ये नववा क्रमांक पटकावला. २०२५-२६ या आर्थिक वर्षातही अशीच कामगिरी राहिली. परंतु, इतके उत्पन्न देऊनही छत्रपती संभाजीनगरला नव्या रेल्वेंची प्रतीक्षा करावी लागत आहे.  राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख, औद्योगिक व शैक्षणिक प्रवास तसेच मुंबई, पुणे, हैदराबाद व दक्षिण भारताकडे वाढलेली रेल्वे प्रवासी संख्या यामुळे महसूल वाढीस मदत होत आहे. परंतु, मुंबईसह विविध शहरांसाठी नव्या रेल्वे करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड रेल्वे संघटनांतून होत आहे. शिवाय या स्टेशनमधून सुटणाऱ्या रेल्वेही इतरत्र पळविण्यात आल्या.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:35:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला एका दारुड्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सोमनाथ मुरलीधर गिरी असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅफिक पोलिस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर ड्युटी करीत होते. त्यावेळी दुचाकीस्वार सोमनाथ हा डिव्हायडर जवळून गाडी चालवत होता. त्यास थांबवल्यावर तो दारू पिल्याचे आढळले. चौकशी सुरू केल्याने त्याने हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला दोन दिवसात बघून घेतो अशी धमकीही दिली. खरात यांच्या अंगावर हात उचलला. त्याने पत्नीला बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी वाद सुरू केला. शिवीगाळ करीत लोटालोटी केली आणि फिर्यादीला चापट मारली. सोमनाथ हा रस्त्यावर जाऊन झोपला आणि वाहतुकीला आडथळा निर्माण केला. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पुंडलिकनगर, दामिनी पथक बोलावले. रस्त्याने जाणाऱ्यांनीही पती-पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिस आल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:34:32
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 23, 2026 02:32:49
Nagpur, Maharashtra:नागपूर बारावी दोन पेपर फूटल्याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आलीय. निशिकांत मून आणि फरहान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी निशिकांत मून हा एका ट्यूशन क्लासेसचा संचालक असून त्याच्याकडे फरहान हा शिक्षक म्हणून काम करतो.. नागपूरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर गुरुवारी बारावीचा केमिस्ट्री पेपर होता. या पेपर दरम्यान एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. महिला शिक्षिकेने तिची झेडपी घेतली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळून आला. या स्मार्टफोन मधील एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पेपर सुरू होण्याअगोदरच पेपर आणि त्याची उत्तरे आढळून आली होती. त्यावरून पेपर तासभरापूर्वीच फुटल्याचा संशय पर्यवेक्षकांना आला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. दरम्यानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून हा पेपर लीक झाला होता त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये निशिकांत एडमिन तर फरहान प्रश्नांची उत्तरे सोडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती... या पेपर फुटी प्रकरणी पोलीसांना अजून काही धागेदोरे मिळाले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:32:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जायकवाडी येथील मुख्य पंपगृहातील तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी नियोजित वेळापत्रकात एका दिवसाचा बदल करण्यात आला आहे. रविवारी ज्या भागात पाणी येणार होते त्या भागात आता सोमवारी पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. पंपिंग मशिनरी आता टप्याटप्याने कार्यरत करण्यात आली असून पाणी साठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आता २४ तास पुढे ढकलण्यात आले आहे. नागरिकांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:30:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल परिसरात असलेल्या गल्ली क्रमांक दोनमध्ये एका घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. छत्रपतीनगरमधील रहिवासी किशोर राऊत यांच्या घरात ही घटना घडली. रविवारी घरामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि ठिणग्या पडल्याने जवळच असलेल्या गादीने पेट घेतला. काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. घरातील कपडे आणि फर्निचरला आग लागल्यामुळे धुराचे लोट बाहेर येऊ लागले. आग पसरत असतानाच स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा केला आणि आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे शेजारील घरांना होणारा धोका टळला.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 23, 2026 01:01:21
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर येथील भाजी मंडई शेजारी लावण्यात आलेला महापुरुषांचा फलक मोठ्या महिलाने फाडल्याचा आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ महिला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री कबनूर मधील रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन केले. संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा मोठ्या संख्येने ग्रामस्थ चौकात जमले. त्यानंतर आंदोलन सुरू केलं. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी केली, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चौकात मोठा बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, रविवारी दुपारी फलक फाडल्याचा प्रकार घडल्यानंतर काहींनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सायंकाळी काही अज्ञात व्यक्तींनी संबंधित महिलेच्या घरावर तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकारात एका दुचाकीचे तसेच घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर संतप्त जमावाने इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे धाव घेत घोषणाबाजी केली व पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन केले. दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात पाचारण केले. संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आंदोलन करते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इचलकरंजी पोलिसांनी कबनूर मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवलाय. दरम्यान संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून सोमवार सकाळपर्यंत विशिष्ट समाजाचे झेंडे न काढल्यास सोमवार इचलकरंजी व कबनूर बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 22, 2026 14:30:53
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 22, 2026 13:49:00
Akola, Maharashtra:अकोला जिले के बाळापूर तालुक्यात मनारखेड गाव में आज श्री हनुमान की मूर्ति की प्राणप्रतिष्ठा उत्साह के साथ संपन्न हुई. धार्मिक वातावरण में हुए इस कार्यक्रम में पंचक्रोशी के भक्तों ने भारी संख्या में भाग लिया. विधीवत मंत्रोच्चार और पूजाअर्चना के बाद मूर्ति की प्राणप्रतिष्ठा की गयी. इस कार्यक्रम के मुख्य यजमान के रूप में राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार पक्ष के लोकसभा समन्वयक संदीप पाटील उपस्थित थे. उनके हाथों विभिन्न धार्मिक विधियाँ संपन्न की गयीं. दौरान, मंदिर के कलश से दस और बीस रुपयों की नोटों की उछाले गई. कलश से पैसे की वर्षा होते ही उपस्थित भक्तों में वह प्रसाद समझकर प्राप्त करने के लिये भीड़ लग गयी. इस धार्मिक उत्सव से मनारखेड परिसर में उत्साह और भक्तिमय वातावरण बना।
0
comment0
Report
Advertisement
Back to top