Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक जिले समेत शहरों में भारी बारिश, येलो अलर्ट जारी; खेत-फसल को नुकसान

SGSagar Gaikwad
Oct 26, 2025 03:22:10
Nashik, Maharashtra
नाशिक जिल्ह्यासह शहरात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदवड, गोदाकाठ भागातील म्हाळसाकोरे, बागलाण, दिंडोरी, कळवण, मनमाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याला आज पर्यंत 'यलो अलर्ट' देण्यात आलाय. चांदवड शहर व परिसरात काल मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. म्हाळसाकोरे भागात मुसळधार पावसाने नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. बागलाण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे कांदा, कांदा बियाणे, मका, हरभरा तसेच डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी, कळवण तालुक्यात पावसाने हजेरी लावलीये...
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Oct 28, 2025 07:57:59
Thane, Maharashtra:आनंद परांजपे पॉइंटर संयाज राऊत यांच्यावर टीका: कुबड्या टाका: हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा विचार जिवंत असेल, तर संजय राऊतांनी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्वरित काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या 'कुबड्या' टाकून द्याव्यात. बाळासाहेबांचे विचार: 'ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल, त्या दिवशी दुकान बंद करेन,' हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार राऊतांनी आठवावेत. आत्मपरीक्षण करा: 'भांडुपच्या भोंग्यांनी' (राऊत) दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व आणि मराठी माणसाचा स्वाभिमान यावर आत्मचिंतन करावे. रोहित पवार यांच्यावर टीका: अति घाई: रोहित पवार हे 'नेतृत्व बनायची अती घाई' असलेले व्यक्तिमत्त्व आहे. पक्षाकडे लक्ष द्या: त्यांनी दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची पडझड आणि पक्षातून बाहेर चाललेली लोक यावर लक्ष द्यावे, ते हिताचे ठरेल. ज्योतिषी आहे का? संग्राम जगताप हे अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे आमदार आहेत. त्यांची काळजी रोहित पवारांनी करू नये; ते काय ज्योतिषी आहेत का? समजूत: अजित पवार आणि तटकरे यांनी संग्राम जगताप यांना जी समज द्यायची होती, ती दिलेली आहे. मतदार याद्या आणि बोगस मतदारांवर आरोप: आदित्य ठाकरेंना प्रश्न: आदित्य ठाकरेंना वरळीत १९,००० बोगस मतं असल्याचं आता आठवलं, पण जेव्हा अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढले, तेव्हा ही १९,००० मतं बोगस आहेत हे आठवलं नाही का? संभ्रम: लोकसभेच्या विजयानंतर मतदार याद्या योग्य वाटतात आणि विधानसभेतील दारुण पराभवानंतर त्यांत घोळ वाटतो, अशा प्रकारे विरोधी पक्षांकडून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. On जितेंद्र आव्हाडांवर निशाणा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी-शरद पवार गट) कळवा-मुंब्रामध्ये दुबार नावांवर बोलत असतात, पण त्यांच्याच मतदारसंघात (विधानसभेत) १९,००० दुबार नावं आहेत. मुंब्रा-कळवा आणि कल्याण ग्रामीणमध्ये १४,००० दुबार नावं आहेत. याबद्दल त्यांनी कधी आवाज उठवला नाही. धक्कादायक आरोप: आव्हाड यांच्या मतदारसंघातही बोगस मतदारांचा सहभाग आहे, हे त्यांनी मान्य करावे. साखर संस्था (VSI) चौकशी आणि मुख्यमंत्री: चौकशी योग्य: মুখ्यमंत्र्यांनी शासनाकडून अनुदानाचा (Grant) योग्य वापर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (VSI) होतो की नाही, याची चौकशी लावली आहे. अधिकार: मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली यात काही गैर नाही; तो त्यांचा अधिकार आहे. घाबरू नका: तक्रारी आल्या असतील म्हणूनच चौकशी लावली असेल. 'ज्याला कर नाही, त्याला डर कशाला?' जर काही गडबड नसेल, तर इन्स्टिट्यूटने चौकशीला सामोरे जावे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर (दुसऱ्यांदा) टीका: नकलाकार: जितेंद्र आव्हाड हे 'नोटंकीकार' आहेत. आधी स्वपक्ष पाहा: आव्हाड म्हणतात 'आमच्या पक्षाचे बारा वाजले', पण त्यांनी त्यांच्या शहरात त्यांच्या पक्षाचे बारा वाजले आहेत का, हे पाहावे. जागरूक व्हा: त्यांचा जिल्हाध्यक्ष, युवक अध्यक्ष, आणि जळगावमधील नऊपैकी सात नगरसेवक सोडून जातात, मग आमच्या पक्षाचे बारा वाजले की तुमच्या शहरात तुमचे बारा वाजले हे नकलाकार जितेंद्र आव्हाड यांनी पाहावं. खंबीर नेतृत्व: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीर उभी आहे. लाडकी बहीण योजना: महायुती सरकारने आणलेली ही योजना निरंतर चालू राहील. मोर्चा: लोकशाहीत सगळ्या पक्षांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. ठाण्यात युती: ठाण्यामध्ये युतीबाबतचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत.. निवडणूक धोरण: महायुती म्हणून जिथे शक्य होईल तिकडे लढावं, ही मानसिकता आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढत होऊ शकते, मात्र एकमेकांवर टीका करू नये या मूलमंत्रांनी निवडणुका लढल्या जातील. जागावाटप: महापौर पदाचे आरक्षण आणि प्रभागाचे आरक्षण निघाल्यावर पालिका निवडणुकीसाठी योग्य निर्णय नेते घेतील.
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 28, 2025 07:52:22
Akola, Maharashtra:राज्य शासनाच्या कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी ‘साथी पोर्टल-२’चा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या पोर्टलच्या वापरामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कृषी निविष्टा विक्रेते संघटनांनी आज एकदिवसीय आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन विक्रीबंद आंदोलन पुकारले आहे.देशातील 32 राज्यामध्ये ही ऍप सुरू करण्यात आली असून केवळ महाराष्ट्र सरकारनेच हे सक्तीचे केले असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केलाय.प्रत्येक बियाण्याच्या पाकिटाचे लेवल नंबर वेगवेगळे असल्याने ही प्रक्रिया खूप किचकट होत असल्याचाही विक्रेत्यांनी म्हंटलंय.विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ‘साथी पोर्टल-२’वरील प्रक्रिया गुंतागुंतीची असून व्यवहार करताना अनेक अडचणी येणे तसेच ग्राहकांना बियाणे विक्री करताना विलंब होणे अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पोर्टलच्या अंमलबजावणीस विरोध दर्शवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातील कृषी व्यवसायिकांनी एक दिवसाचा व्यापार बंद ठेवत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 28, 2025 07:51:08
Chendhare, Alibag, Maharashtra:सुनील तटकरे यांचा मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का ..... उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे राष्ट्रवादीत जाणार ..... आज मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश ....... शेकडो सहकाऱ्यांसह रमेश मोरे मुंबईकडे रवाना ....... राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का दिलाय. भरत गोगावले यांच्या मतदार संघातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होतोय. रमेश मोरे यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी, पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत डेरेदाखल होत आहेत. या प्रवेश सोहळ्यासाठी रमेश मोरे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 28, 2025 07:34:02
Nagpur, Maharashtra:नागपूर अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष (on बचू कडू आंदोलन) --बच्चू कडू यांच आंदोलन होत आहे, शेतकरी अडचणीत आहे, यात निवडणुकी दरम्यान प्रचारात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, सरकार आल्यास सातबारा कोरा करू असे ठासून सांगितले होते... आज भाजपचे सरकार है, मुख्यमंत्री है, आत कर्जमाफी करावे सोयाबीन सरकारी भाव आहे तो आहे 5 हजार रुपये सरकारी भाव असतांना 3200 चे भावाने खरेदी करत आहे, हमीभाव पेक्षा 2 हजाराचा तोटा आहे, यात कापूस बाजारात येत आहे, यात चुकीच्या धोरणाने कापूस परदेशातून भारतात येत आहे, आयात करत 11 टक्के वरून 0 टक्के केला... त्यामुळे भारतात भाव पडणार, धनाची परिस्थिती तशीच आहे, सरकारचे लक्ष नाही, शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, आकडे फुगवण्यात आले आहे, शेतकरी मागण्यासाठी मच्छीमार असो, किंवा मेंढपाळ असो On वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशी लागली कीं नाही, याबद्दल संपूर्ण माहिती होऊ द्या...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 28, 2025 07:31:27
Nala Sopara, Maharashtra:नालासोपारा ड्रग्स कारखाना प्रकरण: वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन; पोलिस आयुक्त नीकेत कौशिक यांनी कारवाई केली. नालासोपारा पूर्व पेल्हार हद्दीत मुंबई पोलिसांनी उध्वस्त केलेल्या MD ड्रग्स कारखाना प्रकरणात स्थानिक पेळ्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या तडकाफडकी निलंबन झाले. त्यामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिस दलाचे आयुक्त नीकेत कौशिक यांनी ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांना सापडलेला कारखाना हा पोलिस ठाण्यापासून ३०० मीटर अंतरावर होता. मुंबई पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणलेल्या ड्रग्सच्या फॅक्टरी बाबत आपल्याला नसल्याचे सांगत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी चौकशीत अनभिज्ञता व्यक्त केली होती. मात्र, ठाण्याच्या इतकी जवळ अवैध ड्रग्स निर्मिती सुरू असताना पोलिस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून गस्त करून घेणे, गोपनीय माहिती मिळविणे, अवैध व्यवसायांवर कारवाई करणे या कामात सक्षम हलगर्जीपना केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्तांनी हे निलंबन केले आहे. निलंबन काळात त्यांना नियंत्रण कक्षात हजेरी द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 28, 2025 07:30:30
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील जावळी तालुक्यात कुसुंबी परिसरात चक्क वनहद्दीतच खैर या दुर्मिळ वृक्षाची तोड झाली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे झालेली तोड वन विभागालाच माहीत नव्हती. वन विभागाने पाच दिवसानंतर प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामा केला असला तरी अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होते आहे.यात गंभीर बाब ही की याच जावली तालुक्यातील आसनी गावात मार्चमध्ये बेसुमार खैर झाडांची तोड करण्यात आली होती.त्याचा पंचनामा देखील वनविभागाने केला होता मात्र पंचनामा केलेली ही खैरांची लाकडे त्या ठिकाणावरून गायब झाली. कुसुंबी परिसरात चक्क वनविभागाच्या हद्दीतच अज्ञाताने दुर्मिळ खैर वृक्षांची तोड केली आहे. एरव्ही वन हद्दीत घुसण्याचे धाडस कोणाचं होत नसताना चक्क वन हद्दीतघुसून ही दुर्मिळ खैरवृक्षाची तोड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 28, 2025 07:22:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर : देशभरातून चेस खेळण्यासाठी आलेल्या खेळाडू आणि पालकांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी फसवणूक हिमालया पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेदरम्यान पालकांचा संताप देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातून २४० खेळाडू सहभागी झाले आहेत. २५ ते २ नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा होती अचानक पुढची स्पर्धा रद्द स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही पाणी नाही ना राहण्याची व्यवस्था नाही फीस म्हणून पालकांकडून मोठी रक्कम उकळली, सोबतच पैसे घेऊन राहण्याची व्यवस्था केली नाही, पालकांचा आरोप छत्रपती संभाजी नगर बुद्धिबळ असोसिएशन चे तोंडावर बोट झालेला खर्च फीस परत द्यावी पालकांची मागणी
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 28, 2025 07:21:49
Chendhare, Alibag, Maharashtra:परतीच्या आणि अवकाळी पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान ....... सरसकट पंचनामे करून भरपाई द्या ...... शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची मागणी ....... अँकर - परतीच्या पावसाबरोबरच आता सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कोकणातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतातील उभं आणि कापलेलं भिजलं आहे. सरकारने या नुकसानीची गंभीर दखल घेऊन सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी तसा अहवाल सरकारला सादर करावा अशी त्यांची मागणी आहे. यंदा पिक चांगलं आलेलं असतानाही निसर्गाने ते हिरावून नेलं आहे. संपूर्ण कोकणात ही परिस्थिती आहे. यावर विचार विनिमय करण्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. बाईट - जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 28, 2025 07:21:27
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 28, 2025 07:21:12
Shirdi, Maharashtra:शिर्डी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. काकडी ग्रामस्थ व गावातील तरुणांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू. अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना ठेकेदारामार्फत नोकरीला न घेता MADC च्या कॉन्ट्रॅक्टवर घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू. शिर्डी विमानतळामार्फत प्रकल्पग्रस्त मुलांनी दिल्ली आणि कोलकत्ता येथे फायर ट्रेनिंग केली असताना देखील आम्हाला तरुणांना विमानतळ प्रशासनाने नोकरीपासून डावललं. काकडी ग्रामस्थांचा विश्वासघात केला आणि आमच्यावर अन्याय केला या मागणीसाठी आमचं बेमुदत आमरण उपोषण सुरू. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही , उपोषणकर्त्यांची प्रतिक्रिया. शिर्डी विमानतळाबाहेर सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणाहून आढावा घेऊन उपोषणकर्त्यांशी बातचीत केलीय आमचे representatives कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 28, 2025 07:20:38
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 28, 2025 07:01:11
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात आज शिवशस्त्रशौर्यगाथा प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा खेळ खंडोबा देखील पाहायला मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन होते. त्यामुळे गेला महिनाभर उद्घाटनाचा कार्यक्रम रेंगाळला होता. पण त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे या प्रदर्शनाचे प्रत्यक्ष उपस्थित राहून उद्घाटन करणार होते, पण ते देखील आज ऑनलाइन पद्धतीने प्रदर्शनाचं औपचारिक केले. थोडक्यात काय तर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा गेल्या महिनाभरापासून फार्स सुरू होता हे दिसून आले .इतकच नाही तर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी देखील पाठ फिरवली, त्यामुळे कार्यक्रम स्थळी खुर्च्या रिकाम्या पडल्याचा दिसून आले.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 28, 2025 06:47:22
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टर स्ट्रोक, सोलापूर जिल्ह्यात पवार काका पुतण्याचे पक्षच रिकामे करण्याची व्यूहरचना? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी सोलापूर जिल्ह्यातील आमदार खासदार पदाधिकारी यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस माळशिरस आमदार उत्तम जानकर, मोहोळ आमदार राजu खरे, करमाळा आमदार नारायण पाटील यांनी दांडी मारली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकांचे मंथन होणार असताना पक्षाच्या बैठकीत ही अनुपस्थिती आश्चर्यकारक आहे. गावविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्यात पुतण्या नंतर काकांना सुद्धा धक्का देण्याच्या तयारीत आहेत काय अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अजित पवाराना मानणारे दोन माजी आमदार, राजन पाटील, यशवंत माने, एक माजी आमदार बबन शिंदे पुत्र तर पक्ष प्रवेश करणार आहेत. तर तिसरे सांगोलचे माजी आमदार दीपक साळुंखे सुद्धा त्याच वाटेवर आहेत. माण खटावच्या राजकारणात नेहमीच पवार कुटुंबाने आपल्याला राजकीय त्रास दिल्याचे वक्तव्य मंत्री जय कुमार गोरे यांनी अनेकदा केले आहे. आता वेळ बदलली आहे. ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री पदाच्या अधिकाराने गोरे यांचे बळ वाढले आहे. त्यामुळे मंत्री गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात दोन्ही पवारांचे राजकीय अस्तित्व नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे रचले आहेत. एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला असणारा सोलापूर आता मंत्री गोरे यांचे नेतृत्व मान्य करत असल्याचे चित्र आहे.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top